सेतू: ताजप (३)

आर्टस, कॉमर्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. औरंगाबादला CEDTI ची प्रवेश परीक्षा दिली, जी ऑबजेक्टीव टाईप असते, ती तो चांगल्या तर्‍हेने पास झाला. टेक्निकल विषय आवडायचे म्हणून तीन वर्षाच्या डिप्लोमासाठी त्याला आजीकडे औरंगाबादला ठेवलं. आता त्याच्यावर जास्त जबाबदारी होती. एटीकेटी होत वर्ष वाया न जाता प्रथम श्रेणीत डिप्लोमाची परीक्षा पास झाला. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता. पुढे इंजिनियरिंग करायचं त्याचं त्यानेच ठरवलं. इथल्या इंजिनियरींगच्या डायरेक्ट दुसर्‍या वर्षाला ऍडमिशनही मिळाली. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये आर्मीसाठी निवड झाली.एसएसबी बेंगलोरहून इंटरव्ह्युवसाठी बोलावणं आलं एकशेपाच मुलांमधून ज्या चार मुलांची निवड झाली त्यातला एक मुलगा माझा निखिल होता. आता त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. पण विषय राहिल्यामुळे तेव्हा त्याला जाता आलं नाही.त्यानंतर त्याने दोन एसएसबीचे इंटरव्ह्युव अलाहाबादला दिले. ते दोन्ही इंटरव्ह्युव त्याने क्लिअर केले. आयएमए डेहराडूनला गेलाही पण एका महिन्यातच त्याला कळलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही त्यामुळे ते सोडून परत आला. मग पुण्यात एमबीएला एडमिशन घेतली.आता एमबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. बेंगलोरच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालंय मे महिन्यात जॉईन होणार आहे.

सौ परांजपे: ताईंनी जसे शॉर्टटर्म गोल ठेवले तसेच आम्ही पण ठेवले आहेत त्यामुळे आता आम्हाला रौनकसाठी रायटर घ्यावा लागत नाही.

स्वप्ना: खरं म्हणजे प्रत्येक पालकाने असेच शॉर्टटर्म गोल ठेवायला पाहिजे.मुलगा चवथी -पाचवीत असतानाच पुढे इंजिनियरिंग, मेडिकलला एडमिशन मिळेल की नाही ह्या विचाराने हवालदिल होतात आणि मुलांवर प्रेशर आणतात. चित्रपटात अवघ्या तीन तासात आपल्याला सगळं 'ऑल वेल' दिसतं पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया सोपी नाही, इंस्टंटही नाही हे आपल्या लक्षात आलंच असेल. मुलांना समजावून घेण्याची एक नवी दृष्टी आमिरखानने दिली त्याबद्दल त्याचे कौतुक आणि अभिनंदनही. एकदा आमिरखानसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही इथे बसलेल्या पालकांना काय 'मेसेज' द्याल?

मीः खरंतर काही 'मेसेज' देण्याचा अधिकार मला आहे की नाही, माहीत नाही पण ह्या सगळ्या प्रक्रियेतून मी काय शिकले हे सांगते. आपलं मुलं जसं आहे तसं स्वीकारा. पेशन्स ठेवा. आपल्या मुलांवर शंभर टक्के विश्वास ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा मात्र त्यांच्यावर लादू नका.

श्री परांजपेः अगदी हेच मी पण म्हणेन.

सौ परांजपेः आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे ते ओळखून ती गोष्ट करायला त्याला प्रोत्साहित करा आणि त्याच्या इंटरेस्टच्या फील्डमध्ये तो नक्की चमकेल हा विश्वास ठेवा पण त्याकरिता वाट पाहावी लागेल, धीर धरावा लागेल.

पालकांनी टाळ्यांचा कडकडाट केला मी मात्र डोळे टिपत होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

त्याही पलीकडे.

मंजु सर्वच लेख छान झालेले आहेत. अभिनंदन.

आपण कितीही दावे करोत, पण आपल्यात एक कठोर मुख्यध्यापक दडलेला असतो आणि बर्‍याच वेळेस तो आपल्या पालकत्वावर मात करत असतो. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा पाहत असतो तेंव्हा आपल्या मुलांचे कसे होईल ही भावनाही आपल्याला अस्वस्थ करत असते.

त्यामुळे मुलांचे मोठे होणे हे आपण एक प्रक्रिया म्हणून न पाहता एक एक टप्प्याची स्पर्धा म्हणून पाहत असतो. ( आता दहावी मग बारावी मग महाविद्यालय मग नौकरी इत्यादी इत्यादी).

कधी वाटते अमिरखानचा चित्रपट पाहुन सर्वसामान्याची अशी अपेक्षा होऊ शकते की अशी मुलं असेच नेत्रदिपक यश मिळवू शकतात.

त्यामुळे हा एक चित्रपट आहे हेही लक्षात ठेउन तारतम्याने विचार केला पाहिजे.

लेखमालिका आवडली.

एका वेगळ्या लेखनपद्धतीने माहिती देणारी ही लेखमालिका आवडली.
'तारे जमीं पर' या चित्रपटाने जनजागृती करण्याचे कार्य केले आहे. त्याबद्दल आमीरखानचे अभिनंदन तर आहेच. पण त्या अनुषंगाने चित्रपट आणि वास्तव यातला फरक स्पष्ट केल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन.
एक शंका अशी आहे की डिस्लेक्सिया इंग्रजी माध्यमात शिकणार्‍यांच्या बाबतीत चटकन लक्षात येऊ शकतो. (जसे - स्पेलिंग चुकणे, अक्षरे उलटी लिहिणे इ.)तसे प्रादेशिक भाषेत शिक्षण घेत असलेल्या मुलांमध्ये डिस्लेक्सियाची कोणती लक्षणे दिसतात?

दमदार

मंजूताई अतिशय दमदार लेख.. मस्त शैली .. या हटके विषयावर इथे लिहिल्याबद्दल आभार आणि इतक्या उत्तम लेखनाबद्दल अभिनंदन.. अश्याच वेगवेगळ्या विषयांवर वाचायला आवडेल.
तुमचा लेख वाचून काहि शंका डोकावल्या त्यावरही इथे चर्चा झालेली आवडेल:
१. लेखाच्या सुरवातीला डिस्लेक्सियाशिवाय इतरही तत्सम रोगांचा उल्लेख होता. त्यबाद्दल कोणाला काहि माहिती आहे का?
२. पालकांना सक्तीच्या मानसिक समुपदेशनाची गरज आहे असे वाटते का?
३. डिसलेक्सिया अथवा तत्सम आजार नसलेल्या पण आकलनक्षमता कमी असलेल्या मुलाबद्दलही हाच दृष्टीकोन हवा असे वाटत नाहि काय?
४. अभ्यासक्रम निश्चित करून व्यक्तीसापेक्ष शिक्षणपद्धती हवी का?

-ऋषिकेश

फार चांगला लेख

या कठिण विषयाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवत तुम्ही माहिती दिली आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

आवडले

तीन भाग आवडले.

अजुनही बरेच काही लिहू शकाल. जसे हे वेगवेग़ळे प्रकार कसे ओळखावे, चाचण्या, वैद्यकिय उपाययोजना, सरकारी अनुदान, प्रकल्प, योजना, महाराष्ट्रातील या विषयातील वेगवेगळ्या संस्था इ.

कृपया जरुर लिहा.

आवडला

लेख/अनुभवकथन आवडले.
डिस्लेक्सिया आणि तत्सम गुणधर्मांबद्दल भरपूर माहिती सर्वांपर्यंत पोहचवली जावी म्हणजे अशा मुलांना निष्कारण शिक्षा होणार नाहीत असे वाटते.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

खुपच छान

खुपच छान,
आपले लेखन खुपचाअवडले. मनातला अगदी खास अनुभव
जवळच्या कुणालातरी सांगतांना ऐकतो आहोत असे वाटले.

सहजरावांनीही सुचवले आहेच. मीही त्याला दुजोरा देतो आणि म्हणतो की या विषयावर लिहा. अजून लेख यावे.

आमच्या वर्गातल्या काही मुलांची या निमित्ताने आठवण झाली.
आता मागे वळून पाहतांना त्यातला एक गवळी आडनावाच मुलगा , चुणचूणीत आणि बोलायला हुषार पण नक्कीच डिसलेक्सिया ने पीडीत होता.
त्याचे लिखाण भयंकर होते. त्याला अक्षरे वाचायलाही फार अवघड व्हायचे.
पण एखाद्या जर धडा वाचला तर एकदा ऐकुन त्याचा तो धडा पाठ असायचा. सगळ्या कविता म्हणून ऐकुन पाठ असायच्या.

पण लिखाणाचे हाल. कुणाला कळलेच नाही... शेवट शाळेलाच रामराम करण्यात झाला.
आता मागे वळून पाहतांना फार वाईट वाटते आहे.

आपला
गुंडोपंत

वाईट वाटले.

मनापासून वाईट वाटले. आजच्या प्रगत शिक्षण व्यवस्थेत अश्या मुलांचा शोध घेतला जावा.

अवांतर : इतर प्रतिसादामध्ये हा त्रास इंग्रजी माध्यमाच्या मुलांना जास्त होतो असे वाचले आहे. आपले शालैय माध्यम कोणते होते?

आपली सामाजिक जबाबदारी

मी म्हणेन निदान आपल्याला आपल्या समाजात असे काही कुठल्या मुला बाबत घडतना दिसत असेल तर आपण स्वत: आपले योगदान दीले पाहीजे...

छान

लेखमाला आवडली. ताजपमुळे लोकांना या विषयाची जाणीव होते आहे ही महत्वाची बाब आहे. एका महत्वपूर्ण विषयावरील लेखमालेबद्दल धन्यवाद.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत आहे

लेखमाला आवडली. ताजपमुळे लोकांना या विषयाची जाणीव होते आहे ही महत्वाची बाब आहे. एका महत्वपूर्ण विषयावरील लेखमालेबद्दल धन्यवाद.

सहमत आहे. या विषयावर अधिक लेखन वाचायला आवडेल.

छान

सहज-सोपे पण मनाला भिडणारे लेखन! लेखमालिका फारच आवडली. वर उपक्रमींनी सुचवल्याप्रमाणे आणखीही लिहावे ही विनंती.

 
^ वर