वृत्तपत्रांचा दर्जा - मतचाचणी

आपल्यापैकी प्रत्येकजण वृत्तपत्रांमध्ये डावे-उजवे करीत असतो. उपक्रमींचा सामुदायिक कल कोणत्या वृत्तपत्राकडे किती आहे हे समजण्यासाठी निवडक वृत्तपत्रांच्या बाबतींत एक मतचाचणी आयोजित केली आहे. त्यासाठी सर्व उपक्रमींना विनंति आहे की त्यांनी खालील निवडक वृत्तपत्रांना त्यांच्या संपादकीय लेखनाचा दर्जा, वैचारिक प्रामाणिकपणा, परिपक्वता व संतुलितपणा लक्ष्यांत घेऊन गुणवत्ता क्रमांक द्यावेत.

'अ'कार विल्ह्याप्रमाणे निवडक वृत्तपत्रांची नावे :
नवशक्ति, महाराष्ट्र टाइम्स्, लोकसत्ता, सकाळ, सामना

वि.सू.
कृपया आपण देत असलेला गुणवत्ताक्रम व्य. नि. ने कळवावा. प्रतिसादांत लिहू नये. २ मार्चपर्यंत व्य. नि. ने येणारी माहिती संकलित केली जाईल व त्यावर आधारित निष्कर्ष ३ मार्च ला उपक्रमवरच प्रसिद्ध केले जातील.

(अटी नव्हे) सवलती :
१) एकच गुणवत्ता क्रमांक एकापेक्षा अधिक वृत्तपत्रांना देता येईल.
२) एखादा क्रमांक वगळला तरी चालेल.
३) वर दिलेल्या पाच वृत्तपत्रांखेरीज इतर वृत्तपत्रांना १ ते ५ पैकी क्रमांक दिले तरी चालतील.

आपले सहकार्य अपेक्षित आहे.

Comments

अजुन एक

वृत्तपत्राची "आंतरजालिय उपस्थिती आणि त्यांची संकेतस्थळे वापरण्यातील सोय" हा ही एक मुद्दा असावा असे सुचवावेसे वाटते

मान्य

वाचकांशी संवाद साधण्याची सोय हाही महत्वाचा मुद्दा आहे.

यात लोकमत का नाही?

नक्की कशाच्या
आधारावर हीच पत्रे निवडण्यात आली आहेत?
यात लोकमत का नाही?

असो, चांगली कल्पना आहे.

-निनाद

चालेल!

सवलत क्रमांक (३) प्रमाणे आपण 'लोकमत'चाही आपल्याला पाहिजे त्या क्रमांकावर (१ ते ५ पैकी) अंतर्भाव करू शकता.

म. टा.

कोर्डेसाहेब,

म. टा. ला अजूनही आपण वृतपत्र म्हणून संबोधता आहात? ही गेल्या (खरोखरीच रम्य) दिवसांबद्दल हळहळ म्हणायची की कधीतरी पुढेमागे सुधारेल, असा आशावाद? आता ते खरे तर ज्याला इंग्लिशमधे 'रॅगटॅग न्यूजपेपर' म्हणतात, तसेही राहिलेले नाही.

सहमत

सहमत आहे. मटाच्या 'बातम्या' वाचून याचा प्रत्यय येतो.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

'बातम्या' ??

मटात बातम्या येतात का हा मुद्दा आहे. म्हणजे जे येतं त्याला बातमी का बरे म्हणावी? ;) फारतर फार भयंकर मराठीत मथळे असणारे एक करमणूक करणारे वृत्तपत्र असे म्हणता येईल ;)

म्हणूनच

बातम्या न म्हणता 'बातम्या' लिहीले. ;)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

करमणूक?

ते सध्या जे काही आहे, त्यातून धड करमणूकही होत नाही!

वृत्तपत्र

१. सकाळ : पवारसाहेबांच्या हाती गेल्यापासून कायदा-सुव्यवस्थेच्या बातम्या जरा आतल्या पानावर गेल्या आहेत. पण तरीही जुनी संतुलित शैली सोडलेली नाही. मुक्तपीठ, सप्तरंग, ऍग्रोवन, फॅमिली डॉक्टर, अर्थविश्व वगैरे अनेक वाचनीय पुरवण्या आहेत. नवे प्रयोग करायला घाबरत नाही पण त्याच वेळी वृत्तपत्र म्हणून गांभीर्य कमी होणार नाही याची काळजी घेणारे व्यवस्थापन आहे. इ-सकाळमध्ये तांत्रिक सुधारणेस वाव आहे.

२. लोकसत्ता: अग्रलेख बर्‍याचदा टोकाचे असतात. काँग्रेसवगळता बाकीच्यांना गणतीत न धरण्याची काँग्रेसी वृत्ती सुमार केतकरांच्या लेखांतून दिसून येते. अन्यथा इतर लेख वाचनीय असतात. एकंदरीत सकाळनंतर खरेदी करण्यायोग्य.

३. सामना: यात चांगली एकच गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या मुस्लिम अनुनयी वृत्तीवर टीका करण्यात कसलेही हातचे राखून ठेवत नाही. बाकी अचानक उद्भवलेल्या मुद्द्यांना हाताळताना शिवसेनेची होणारी द्विधा मनस्थिती अग्रलेखांतून उत्तमरित्या प्रतिबिंबित झालेली असते. द्वारकानाथ संझगिरी सामनामध्ये लिहीतात. नेटवर उपलब्ध आहे हे ही नसे थोडके. सामना मी विकत घेऊन वाचत नाही. :-)

४. पुढारी: १रुपयात आहे तोवर खरेदी करुन वाचतो. अन्यथा वाचणे सोडून इतर सर्व कामासाठी वापरू शकता. इ-आवृत्तीमध्ये अगदी ग्रामीण पातळीवरच्या बातम्या असतात. अगदी दापोली-लांज्यात काय घडलंय इथपर्यंत. महाराष्ट्राबाहेर असणार्‍यांनी नक्की वाचावा.

५. लोकमत: मटापेक्षा बरा वाटला. यांच्या पुरवण्यावगैरे कधी बारकाईने वाचल्या नाहीत. त्यामुळे नावे आठवत नाहीत.
६.मटा, पुण्यनगरी, संध्यानंद: ;-) अजून काही सांगायला हवे का?

अभिजित...
सोमवारी सकाळ, लोकसत्ता वाचण्यामागे आमचा 'अर्थ'पूर्ण उद्देश असतो.

उदाहरणार्थ मटा

मटाला मी संध्यानंदच्या पंक्तीत बसवण्याचे कारणः ही बातमी वाचताना खाली त्याखाली दिसलेल्या संबंधित बातम्या. त्यांचे फक्त मथळे पुरेसे आहेत.

संबंधित बातम्या
संजूबाबा-मान्यता विवाहावर 'शिक्का'मोर्तब नाहीच!
रंगता रंगता बेरंग...
जोधा अकबरची राजस्थानातून एग्झिट
जोधा-अकबरला थंड प्रतिसाद
दीपिका म्हणते, युवराजही नाही आणि ढोणीही!
संजय- मान्यता विवाह नोंदणीची चौकशी?
मल्लिकाला हॉलीवूडची ऑफर
बिपाशा टू बिप्स, कट टू कट!
पाहाःब्रिटनीचे सेन्शेशनल फोटो फीचर
फराह खानला तिळं... ओम, शांती.. शांती..!
सैफ-करीनाचं शुभमंगल होणार हो!
कतरीनाच्या गालावर सलमानची ‘लाली’
ब्रिटनीच्या प्रकृतीला धोका
सैफ-करीनाचा 'निकाह' झाला?
भारतीय शेतक-यांसाठी निकोल किडमनचा स्विमसूट !
(अवांतरः निकोल किडमनचा स्विमसूट कितीजणांना पुरणार?)

अभिजित...

राज ठाकरे यांच्या दैनिकाची गरज.

बहुधा हा प्रतिसाद यात नसावा अशी कोणाची अपेक्षा असेल तरीही,

राज ठाकरे यांनीही एखादे दैनिक अथवा साप्ताहिक काढावे असे मला वाटते.

प्रत्येक विचारसरणीसाठी आपापले मुखपत्र असावे.

कोणत्याही पेपरला

कोणत्याही पेपरला हल्ली दर्जा नाही हेच खरे.
जाहिरातींना भुललेले आहेत
सगळे विकले गेले कंटेंटस्

शिवानी

माध्यमांचे परीक्षण

सकाळमधील अजून एक उत्तम लेख.

प्रत्यक्षाहून प्रतिमा बिकट:विश्राम ढोले

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

माध्यम..माध्यम

अरे मीच हे लिहिणार होतो. पण जरा कुंडल्यांच्या संकलनात अडकलो होतो म्हणुन लिहिले नाही. http://mr.upakram.org/node/954 इथे मी त्यांच्या टेलीमतदानाच्या लेखाविषयी प्रस्ताव टाकला होता. ते पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन मध्ये प्रा. आहेत.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर