हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !
श्री. उपेंद्रकुमार रॉय हे नौखालीच्या नजीक असलेल्या पाचगरिया या गावातील एक प्रसिद्ध हिंदू होते. नौखाली हत्याकांडाचे लोण पाचगरिया गावातही पसरले. मुसलमानांनी श्री. रॉय यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले, तसेच त्यांची सुंदर भाची आरतीदेवी हिचा मुसलमान तरुणाशी विवाह करून देण्याचा इशारा दिला.
``श्री. रॉय व त्यांच्या कुटुंबियांनी गावातून पळ काढला, तर गावातील सर्व हिंदूंना मारून टाकण्यात येईल'', अशी धमकी मुसलमानांनी दिली. श्री. रॉय यांनी मुसलमान गुंडांना पैशांचे आमीष दाखवले. त्या मुसलमान गंुडांनी पैसे घेतले; मात्र ते त्यांच्या मागण्यांवर अडून राहिले. संपूर्ण रॉय कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निश्चय केला; मात्र त्याबाबत मुसलमानांना माहिती मिळाली व त्यांनी रॉय कुटंुबाला आत्महत्या करण्यापासून रोखले. अब्दुल्ला या पोलीस अधिकार्याच्या समोर आरतीदेवी हिचा बळजबरीने मुसलमान
तरुणाशी विवाह करण्यात आला. जिल्हाधिकारी मॅकमीलन यांना हा प्रसंग कळल्यावर ते स्तंभित झाले. त्यांनी मध्यस्थी करून आरतीदेवी व रॉय कुटंुब यांची होऊ घातलेली विटंबना रोखली.
(संदर्भ : डॉ. कृष्ण वल्लभ पालीवाल संकलित `इस्लामीझम अँड जेनोसाईड ऑफ मायनॉरिटीज इन बांगलादेश')
हिंदूंनो, सहिष्णुतेच्या नावाखाली भ्याड बनून राहू नका, तर धर्मरक्षणासाठी लढा !
संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-02-07&action=full...
Comments
उपक्रमाचे धोरण काय?
अशा प्रकारच्या भावना भडकवणार्या लेखांचा उपक्रमावर समावेश असू नये असे वाटते.
क्ष समाजाने चूक केली म्हणून य समाजानेही चूक करावी आणि आपापसांतील तेढ वाढवत रहावी हे एखाद्या व्यक्तीचे मत असू शकते, उपक्रमासारख्या समुदायाचे असू नये असे एक सदस्य म्हणून मला वाटते. सदर बातमी काहीजणांसाठी माहितीपूर्ण वाटली तरी समाजहिताच्या दृष्टीने हानीकारक वाटते आणि उपक्रमावर अशा लेखांना स्थान असू नये असे वाटते.
उपक्रमाचे यावरील धोरण समजावून घ्यायला आवडेल.
- प्रियाली.
धोरणे
धोरणांची चर्चा करण्यापेक्षा अशा सदस्यांवर प्रतिबंध कसा घालावा याचा विचार जास्त व्हावा असे वाटते. गेले काही दिवस काही सदस्य असा खोडसाळपणा करताना दिसत आहेत. अलिकडेच एक सदस्य मी इथला संपादक आहे असा गैरसमज पसरवत आहेत. आजच एका सदस्याने एका चर्चेतल्या प्रतिसादावर मला अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारा आणि जात, वंशाचा उद्धार करणारा व्य. नि. पाठवला आहे. हे अत्यंत खेदजनक आणि उपक्रमाच्या लेखन विषयक मार्गदर्शनाशी पूर्णपणे विसंगत वाटते.
उपक्रमाचे धोरण ... +१
हिंदू, हिंदूत्व, सध्य स्थिती, राजकरण वगैरे विषयावर येथे माझ्यासकट अनेकजण परस्परविरोधी मते "मन लावून" मांडत असतात, वाद घालत असतात. पण प्रस्तुत विषय आणि मथळा भडकपद्धतीचा वाटला.
व्यक्तिगत माझ्यासाठी कुठलाही विषय मी व्यर्ज मानत नाही पण एखादा विषय का मांडला जातो आणि कसा मांडला जातो याला उपक्रमासारख्या सार्वजनीक स्थळांवर काही मर्यादा असाव्यात असे वाटते. एखाद्याला असे लिहायचे असेल तर स्वतःची अनुदीनी (ब्लॉग) ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तो त्यांच्यापुरता आणि त्या अनुदीनीला भेट देणार्या/प्रतिक्रीया देणार्यांपुरता मर्यादीत विषय राहतो.
ह्या चर्चेचा आधी म्हणल्याप्रमाणे मथळा भडक आणि दोन समाजांमधले वैर दाखवणारा आहे म्हणून न पटणारा आहे. पण तसेच, असाच प्रकार जेंव्हा एकाच समाजातील माणसे त्यांच्याच समाजातील त्यांना न पटणार्या अशा श्रद्धास्थांनांवर बुद्धीवादी होत करतात - अर्थात हे मी उपक्रम/तत्सम स्थळांवरील हिंदूंनी हिंदूच्या श्रद्धास्थानांवर विनाकारण करतात तेंव्हा ते पण तितकेच विरोध करण्यासारखे आणि अन्याय्य वाटते. अर्थात अशा लिहीणार्यांना जर ते हिंदू नाहीत असे म्हणायचे असेल तर ते ही ठीक आहे, फक्त मग त्यांनी हिंदू समजणार्यांनापण दुखावू नये इतकेच म्हणायचे आहे.
थोडक्यात उपक्रमाने काही धोरणे ठरवावीत असे वाटते पण म्हणून सेन्सॉरशीप आणावी असे मात्र वाटत नाही.
किंचित असहमती
ढोबळमानाने मी आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे. पण, असेही वाटते की,
एखाद्या चर्चेत, चर्चेला अनुसरून वरील प्रतिसादातील माहिती आली असती (जसे, गोध्रा दंगलीच्या वेळेस अमुक झाले) तर वावगे नसते. परंतु, ज्या समाजांत आधिच सख्य नाही तेथे काहीही कारण नसताना (म्हणजे राज ठाकर्यांचा मुद्दा उचलायला किंवा पाडायला शहरात काहीतरी घडले आहे तेव्हा प्रसंगानुरूप घडते आहे. इथे मात्र तसे काही नाही. खाजवून खरूज काढण्याचा प्रकार.) अशा बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे भावना भडकवण्याचा प्रकार वाटतो. दुसरे म्हणजे, लेखाच्या मथळ्यात आवाहन केलेले आहे जे समाजविघातक आहे.
एखाद्या योग्य वृत्तपत्रात वरील लेख छापून येईल काय? मला वाटते नाही येणार तेव्हा उपक्रमाचा वापरही या लेखांसाठी होऊ नये असे वाटते.
छे हे तर
अशा प्रकारच्या भावना भडकवणार्या लेखांचा उपक्रमावर समावेश असू नये असे वाटते.
यात कुठे काय भावना भडकवणारे आहे?
हे तर इतिहास विषयक साधेसे लेखन आहे. यात संदर्भही दिला आहेत (अनेक इतिहास विषयक लेखात नसतात!)
यात कोणतेही व्यक्तिगत आरोप नाहीत,
संपादकांवर टीका नाही...
लेख निश्चितच माहितीपुर्ण आहे. (यात कुणालाही संदेह नसावा!)
मग हे लेखन ध्येय धोरणांशी सुसंगतच आहे. त्यामुले हे इथे असावेच.
आपला
गुंडोपंत
सहमत
सहमत आहे.
-- आजानुकर्ण
निषेध
हे लिखाण, लेख/वाद/मतप्रदर्शन/चर्चेचा प्रस्ताव यापेक्षा एक धर्मविरोधी जाहिरात/पत्रकावरील मसुदा वाटते.उपक्रमावर असल्या धार्मिक जाहिराती चालतात का?
एखाद्याने धार्मिक गोष्टींवर मत प्रदर्शित करणे आणि असे आगखाऊ पत्रक प्रसिद्ध करणे यातील फरक उपक्रमावर केला जात असेल अशी अपेक्षा आहे
-ऋषिकेश
भडक लेखन हटवले पाहिजे
चर्चेच्या निमित्ताने कदाचित असा विषय संदर्भाच्या दृष्टीने आला असता तर उपयुक्त ठरला असता, पण चर्चाविषय टाकणा-याच्या मनात काही तरी भळभळते आहे, त्यामुळे असे भडक लेखन जे विचारात किंवा सदस्यात तेढ निर्माण करु शकतात असे लेखन संपादकांनी हटवले पाहिजे असे वाटते.
आजिबात नाही!
आजिबात हे लिखाण हटवायला नको!
शिवाजी महाराजांनी ने "फॅनॅटीक हिंदु विचार करून" जर काही केले नसते तर
आपणही आज इंडोनेशीयातल्या लोकांसारखे बुल्ल्या कापून "अल्ला हो अकबर" म्हणत हिंडलो असतो हे लक्षात ठेवा...!!!
औरंगाबादेत आपण "कोणत्याही मुसलमानी गल्लीत" - "शिवाजी महाराज की जय" - असे मोठ्याने म्हणण्याची हिम्मत आजही ठेवता काय?
काय टाप तुमची की तुम्ही असे कराल? कापुन टाकतील ना ते... आज २००७ साली हे परिस्थिती आहे!...
इतिहास व सत्या पासून दूर कशाला पळायचे? तुमच्या कडे किती किस्से आहेत जेंव्हा मुसलमानांनी दंगल विझवली? लोकांना मदत केली?
किती किस्से दंगल पेटवल्याचे आहेत?
तुम्हीच हिशोब करा...
आपला
गुंडोपंत
?
शिवाजी महाराजांनी "फॅनॅटीक हिंदु विचार करून" काहीही केलेले आहे असे मला वाटत नाही. चर्चा आणि भावनेच्या भरात युगपुरुषाला दूषणे नकोत.
असहमत
पंत,
शिवरायांचे एकही कृत्य फॅनॅटीक या सदराखाली बसणारे नाही. रामदासांनी त्यांना जाणता राजा म्हटले ते उगीच नव्हे. आज त्यांच्या नावाखाली जे प्रकार चालत आहेत ते पाहून त्यांना नक्कीच खेद झाला असता. भावनेच्या भरात युगपुरूषांना चर्चेत ओढू नये ही विनंती.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
आजिबात नाही!
आजिबात हे लिखाण हटवायला नको!
शिवाजी महाराजांनी ने "फॅनॅटीक हिंदु विचार करून" जर काही केले नसते तर
आपणही आज इंडोनेशीयातल्या लोकांसारखे बुल्ल्या कापून "अल्ला हो अकबर" म्हणत हिंडलो असतो हे लक्षात ठेवा...!!!
औरंगाबादेत आपण "कोणत्याही मुसलमानी गल्लीत" - "शिवाजी महाराज की जय" - असे मोठ्याने म्हणण्याची हिम्मत आजही ठेवता काय?
काय टाप तुमची की तुम्ही असे कराल? कापुन टाकतील ना ते... आज २००७ साली हे परिस्थिती आहे!...
इतिहास व सत्या पासून दूर कशाला पळायचे? तुमच्या कडे किती किस्से आहेत जेंव्हा मुसलमानांनी दंगल विझवली? लोकांना मदत केली?
किती किस्से दंगल पेटवल्याचे आहेत?
तुम्हीच हिशोब करा...
आपला
गुंडोपंत
लेखन काढलेच पाहिजे
पंत,
औरंगाबादेत आपण "कोणत्याही मुसलमानी गल्लीत" - "शिवाजी महाराज की जय" - असे मोठ्याने म्हणण्याची हिम्मत आजही ठेवता काय?
हिम्मत नाही, पण त्यांचीही हिम्मत नाही आमच्या हिंदू गल्लीत येऊन औरंगजेबाबद्दल गजर करायची ? मुळात माझे शहर हे त्यांच्याच अधिपत्याखाली होते. निजामाच्या गुलामगिरीत राहिलेलो आम्ही ? त्यामुळे तसे असूनही हिंदू म्हणुन या शहरात आमचाच वरचश्मा आहे.
असो,
मुळात चर्चा करण्या-याचा हेतु काय ? भुतकाळात असे झाले म्हणुन आता असे वागावे याचे कोणीच समर्थन करु शकत नाही.
किंवा त्याच्यावर चर्चा करुन आपण हिंदू म्हणवून घेणारे कापाकापी करायला निघणार नाही मग उगाच ऐतिहासिक संदर्भ आहेत किंवा अभ्यासकांची मते आहेत म्हणुन तेढ निर्माण करणा-या लेखांवर चर्चा व्हावी याचे आम्ही समर्थन करु शकत नाही. वाईट याचे वाटले उपक्रमाच्या ध्येय धोरणात असले लेखन बसते म्हणुन !!!
अवांतर :- संपादक महोदय, आम्हाला आपल्याला गुलाबाची फुले द्यायची आहेत कुठे पाठवू ?
हटवले पाहिजे, पण मनात कालवाकालव
हे सदर भडकवणारे आहे आणि चर्चेस पोषक नाही. हे मत वाचकांनी नमूद करणे महत्त्वाचे - हा वे.मु. यांचा मुद्दा पटला म्हणून हा प्रतिसाद देत आहे.
पूर्ण सार्वजनिक स्थळात मात्र पुष्कळ भडक विधाने करण्यास स्वातंत्र्य असावे. ज्या भाषणाचा खरोखरच्या शारिरिक/आर्थिक दुखापतीशी थेट नाते जोडता येते, किंवा जवळजवळ थेट नाते जोडता येते, अशाच भाषणास सार्वजनिक ठिकाणी बंदी असावी. त्यामुळे रस्त्यावर वरील पत्रक कोणी वाटत असल्यास त्यावर बंदी नसावी - अर्थात त्याच्याविरुद्ध भडक प्रचार करणार्यासही बंदी नसावी हे आलेच. त्यामुळे "काढून टाका" म्हणताना मनात कालवाकालव होते आहे.
पण "उपक्रम" हे हमरस्त्याइतके सार्वजनिक ठिकाण नाही. त्यामुळे काही आचारसंहिता येथे असू शकते. उपक्रमावर भडकवू बघणार्या चर्चा नेहमीच्या झाल्या तर न-भडकवता लेखन-वाचन करणार्यांची वर्दळ कमी होऊ शकेल. हा विचार वाचकांनी आणि संचालकांनी जरूर करावा.
असहमत : गुन्हा
असे पत्रक रस्त्यावर वाटल्यास गुन्हा दाखल होऊ शकेल असे वाटते.
"भारतीय दंडविधान १५३ ए नुसार धर्म, वंश, जन्माचे ठिकाण, घर, भाषा, जात, समुदाय यांचा आधार घेऊन द्वेष पसरवण्याचा कुणीही प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो. या गोष्टींचा आधार घेऊन लोकांच्या भावना भडकवणे आणि शहराचा, समुदायाचा शांतताभंग करणे हा देखील गुन्हा आहे."
याच्याच आधारे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकेल. म. टा. मधील ही बातमी पहा.
किंबहुना याच्या आधारे उपक्रमरावांनी हा लेख काढून टाकावा अशी विनंती करावीशी वाटते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
हे
हे वरचे सगळे
तुम्ही आजही आमच्या नाशकातल्या भद्रकाली मधल्या बागवानपुर्यात एकदा 'म्हणून' दाखवा...
तिथुन 'धड' परत आलात तर मग पाहु!
आपला
गुंडोपंत
धड
अहो नाशक लई लांब र्हायल, आता मराठी संकेतस्थळांवरही 'धड' वावरता येईल का नाही अशी परिस्थिती आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सहमत
वरील प्रतिसादांशी सहमत आहे. या लेखाला उत्तरही द्यायची इच्छा नाही कारण अशा लेखांचा रोख चिथावणी करून मग गंमत पहात बसण्याकडे असतो. याचा नको इतका अनुभव आधीही आला आहे. आणि ९९% वेळा हे लेखक असा लेख टाकल्यानंतर परत इथे कधीही दिसत नाहीत. तंत्रज्ञानातील मर्यादांमुळे संकेतस्थळांवर जाळपोळ करता येत नाही. पण चाणक्यरावांना आलेला व्य.नि. याच मनोवृत्तीचे लक्षण आहे. पन्नास वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने प्रगती केल्यास कदाचित सदस्यांच्या खरडवहीत जाळपोळ करणे शक्य होईल.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
काहीच हरकत नाही!
वा!
गणेश राव उत्तम लिखाण अजून येवू द्या.
असा लेख इथे असायला काहीच हरकत नाही.
या शिवाय अजूनही कुणाकडे असे किस्से असले तर द्या...
पण त्यात हिंदुंनी त्या परिस्थितीत मार्ग कसा काढला हे पण पाहिले पाहिजे.
शिवाय अशी वेळ परत (नि परत परत) कुणावरच येवू नये यासाठी काय करता येईल हे पण द्यायला हवे. किंवा हा लेख येथे असावा की असु नये या ऐवजी "असे परत कसे घडणार नाही" यावर चर्चा व्हावी. लेख तर येथे रहावाच.
मी तर मानतो की प्रत्येक घरात एक तरी शस्त्र असावेच. शोभेची म्हणून का होईना पण एक तरी खरी तलवार घरात असावीच... आयुष्यात कधी लागेल सांगता येत नाही बरं! ज्यांनी अशा या दंगलीच्या वेळा अनुभवल्या आहेत त्यांनाच हे कळेल.
उगाच फालतु सदाशीवपेठी चर्चा करू नका!
आपला
सध्या फक्त दोनच तलवारी असणारा...
गुंडोपंत
येऊ दे गणेशा येऊ दे !!!
गणेश राव उत्तम लिखाण अजून येवू द्या.
येऊ दे गणेशा येऊ दे,
आपल्या विचाराने आम्ही भारावलो असून आमचे रक्त आता सळसळते आहे, उसळी मारु लागले आहे. दुश्मन हमारी नजरो मे आ रहा है !!!
ते काही नाही आता थांबायचे नाही !!! आम्ही मावळे आता तयारीला लागलेलो असून आता बस शत्रु दिसला की टिपण्यासाठी आम्ही आमच्या शब्दांच्या शस्त्रांना धार लावतो आहे. बदला घ्यायला आम्ही आसूसलेले आहोत. इतिहासाची पानेची पाने आम्हालाही भरावावी वाटू लागली आहे. म्हणजे भविष्यकाळाता प्रा.डॊ. यांच्या लेखनाचे संदर्भ लोक उपक्रमवर देतील आणि त्यांची मने पेटून उठतील आमचेही पुतळे जागोजागी उभे राहतील, असे आम्हाला बरेच काही सुचू लागले आहे. येऊ दे गणेशा येऊ दे, असेच लेखन. अब रुकना नही !!!!
आपला गणेशाचा भक्त
प्रा.डॊ...............
शस्त्र?
आम्ही एक वस्तरा खरेदी करून ठेवला आहे. चालेल का?
-- आजानुकर्ण
कल्पना नाही
काय चालेल नि काय नाही हे त्या त्या वेळेवर अवलंबून असते.
प्रसंगी वस्तारा पण योग्य ते काम करून जाईल.
मागे आमच्या कडे १२५ त्रिशूळ होते पण नेमके तेच पोलिसांना सापडले व त्यांनी ते गायब केले...
त्यांना खुप समजावले की ते आमच्या कुंपणावरच्या नक्ष्या आहेत म्हणून... पण ते काय ऐकतात. त्यांना आमच्या सगळ्या नक्ष्या माहीत होत्या ना... ;)
आता आम्ही तालमीत फक्त आयत्यावेळी चटकन असेंबल करत येण्यासारख्याच गोष्टी ठेवतो.
आपला
सशस्त्र
गुंडोपंत
चर्चा वाचून
वरची सगळी चर्चा वाचून दादा कोंडकेंच्या पुस्तकात दिलेल्या एका किस्स्याची आठवण झाली.
एका चित्रपटात त्यांनी चर्च च्या पाद्र्याला ला दादा लाथ घालतात असे दाखवले होते. तर तळवलकरांनी त्यांना विचारले "पण भावना दुखावल्या तर काय"
ते म्हणाले की सीन काढून टाकु, पण कोणी काही म्हणणार नाही. आलीच हिंदुंचीच पत्रं येतील!
तो चित्रपट आला... चांगला चालला, एकाही ख्रिश्चन माणसाच्या भावना दुखावल्या नाही.
पण नंतर दादांना 'असे कसे करु शकता असे विचारणारी व भावना दुखावतील असे म्हणणारी' सहा पत्रे आली सगळी हिंदु व एकारांतांची व पुण्याची होती (असे दादांच्या पुस्तकात आहे, मी म्हणत नाहीये!)
वरच्या चर्चेत एकही मुसलमान मला तरी दिसत नाहीये... ;))
तेंव्हा....
आपला
हिंदु फॅनॅटीक गुंडोपंत
दुर्दैवाने
मलाही दिसला नाही पण मला माणसं दिसली, धर्मांधांना तीच दिसत नाही हे दुर्दैव आहे.
तेच तर!
तेच तर! म्हणतोय... धर्मांधांना माणसे दिसत नाहीत.
पण त्यांना एखाद्या हिंदुचे घर जाळायला आल्यावर त्याच्या हातात 'तलवार दिसली' की लगेच घाबरायला होते हे अनुभवाने सांगतो.
धर्मांधांना तेंव्हा "माणूस" दिसत नाही फक्त तलवारच दिसते हे तितकेच खरे!
आपला
गुंडोपंत
पंत
पंत, तुमची मते खरी असतील सुद्धा कदाचित. दुर्दैव हे आहे की हिंदूंमध्येच एकी घडवणे अवघड आहे. आज तुम्ही मुसलमानांसाठी तलवारी द्याल. मुसलमान घाबरतील सुद्धा. पण उद्या ते गप्प बसले की मग हिच तलवार जात या विषयावर वापरली जाईल. असो. इतिहासातल्या गोष्टी उगाळून काय साध्य होणार आहे? आज सुद्धा धर्मांमधल्या तेढी पेक्षा जातींमधली तेढ आपल्याकडे जास्त हानी घडवते.
१०० टक्के
आर्य चाणक्य यांच्याशी पूर्ण सहमत.
कारण विविधतेत एकता वगैरे सगळ थोतांड आहे. मनामनामध्ये ज्या अदृश्य भिंती आहेत त्या पुसल्या जाणार नाहीयेत.
जेव्हा स्ट्रगल फॉर एग्झिस्टन्स होईल तेव्हा काय होईल? कोण बळी जाईल? शेवटी एकतर लोक भुकेने मरणार आहेत किंवा कापाकापीच होणार आहे.
अभिजित...
जातीयवादी कोण?
धर्मांधांना तेंव्हा "माणूस" दिसत नाही फक्त तलवारच दिसते हे तितकेच खरे!
हे अगदी बरोबर बोललात
काही लोक उगाचच आपण फार पुरोगामी विचाराचे आहोत हे भासवण्याकरिता विरोध करत असतात. स्वतःच्या नावामधे एखाद्या विशीष्ट वंशाचा उल्लेख करणारे आणि तो अभिमानाने मिरवणारे दूसर्याला जातीयवादाचे डोस पाजतात.
फेरमांडणी
या प्रकारची मांडणी ही नवी नाही. ती कित्येक वर्ष होत आहे. प्रश्न असा आहे कि इतिहासातून आपण काही बोध घेणार आहोत काय? अत्याचाराला जात नसते. घर्म नसतो.कुठलाही अत्याचार हा माणुसकीला छेद देणाराच आहे. प्रबोधन व प्रतिकार ही शस्त्रे आता काळाच्या कसोट्यांवर पुन:पुन्हा तपासावी लागतात. सूड म्हणजे न्याय नव्हे. न्याय म्हणजे सूड नव्हे. त्याच बरोबर क्रिया आली कि प्रतिक्रिया येणार हे देखील नाकारता येत नाही. स्वधर्मीयांवर केलेले अत्याचार हे जर तपासले तर ते प्रत्येक धर्मात कमी अधिक प्रमाणात ते हम्खास दिसून येतील्.धार्मिक कारणामुळे (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) झालेली हिंसा ही सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमिवर हिंदुत्ववादी विचारवंत श्री स.ह.देशपांडे हे सुद्धा आता 'हिंदुत्वाची फेरमांडणी' असा विषय घेउ लागले आहेत. त्याला पारंपारिक हिंदुत्ववाद्यांचा विरोध आहे. तसेच डॉ.अभिराम दिक्षीत यांनी यासाठी http://abhinavnirmaan.com/ हे अभिनव निर्माण प्रतिष्ठान निर्माण केले आहे. पुण्यात 'जाणता राजा' हा धडाकेबाज कार्यक्रम नुकताच चालवला. हा मुळात विचार मंच आहे. डॉ दिक्षीत हा एक तरुण विचारवंत आहे. कृतिशीलतेची जोड आहे. संकेतस्थळावर बरीच माहिती आहे. त्यांना या प्रश्नाची जाण आहे. एकाने गाय मारली म्हणुन दुसर्याने वासरु मारु नये. मग काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रतिबंधाची ताकद कमवावी. पण त्यासाठी आत्मपरिक्षण जरुरीचे आहे. ते एकदा करुन भागत नाही. ती प्रक्रिया आहे. ही फेरमांडणी आत्मपरिक्षणातून आलेली आहे.इतिहासातून घेतलेला तो बोध आहे.
शेवटी सहिष्णुता/ विवेक यामुळेच हिंदुधर्म टिकला आहे. ती त्याची ताकद आहे. भ्याडपणा नव्हे. लोकांना पेटवण्यासाठी याचा वापर हा देखिल पुर्वी पासून आहे. क्षमाशीलतेला पळपुटेपणा म्हणुन पुन्हा दुष्टचक्रात अडकलो तर बाहेर पडायला कित्येक शतके लागतील्.
अवांतर- शाळेत असताना पेटवण्यासाठी काही वर्गबंधु याचा वापर करीत." अयौ बाळ्या . त्यो सक्या लई घान घान श्या देत व्हता तुपल्याला. आपन त नस्त ऐकुन घेतल बॉ." कि बाळ्याचा मित्र असलेल्या सक्याविषयी 'मित्रत्वा'ऐवजी 'शत्रुत्वा'ची भावना तयार झालीच समजा.
प्रकाश घाटपांडे
उत्तम प्रतिसाद!
उत्तम प्रतिसाद! सहमत आहे.
उत्तम
घाटपांडेसाहेब,
उत्तम, मुद्देसूद आणि संयत प्रतिसाद. संपूर्ण सहमत आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सहमत
प्रकाशराव काय बोललात.. मस्त...क्या बात है!!!
प्रतिसादाशी संपूर्ण सहमत
(विवेकी आणि म्हणूनच हिंदु) ऋषिकेश
सहीष्णूता वगैरे
सर्वप्रथम परत एकदा या चर्चेचा सूर आणि चच्रा काराने त्याला काय वाटते ते नंतर न लिहीणे हे दोन्ही मला पटले नाही. जर त्याने चर्चेला तोंड देत तो कसा बरोबर हे सांगीतले असते तरी ती चर्चा तिथे ठेवल्याचे सार्थक झाले असते. असो.
>>>शेवटी सहिष्णुता/ विवेक यामुळेच हिंदुधर्म टिकला आहे. ती त्याची ताकद आहे. भ्याडपणा नव्हे....सूड म्हणजे न्याय नव्हे. न्याय म्हणजे सूड नव्हे...
"सहिष्णुता/ विवेक यामुळेच हिंदुधर्म टिकला" असे म्हणताना अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणारा, पुण्यात गाढवाचा नांगर फिरवणार्या शाहीस्तेखानाची बोटे तोडणारा आणि शत्रूंना कात्रजचा घाट अनेक वेळेस अनेक पद्धतीने दाखवून हिंदवी स्वराज्य स्थापणारा शिवाजी हा सहीष्णू होता का असा प्रश्न पडतो.
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रीपूला, रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावूनी येई ||
असा उपदेश करणारे रामदासपण असहीष्णूच का? ते जर असे बोलत हिंडलेे नसते आणि जर व्यायामाला महत्व दिले नसते तर जनमानस तयार झाले असते का?
म्हणून सहीष्णूता ह्या शब्दाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भातील ऍक्शन्स या कालानूरूप बदलायला हव्यात असे वाटते.बर्याचदा नेभळटपणा म्हणजे सहीष्णूता समजले जाते आणि सहीष्णूता म्हणजे "वीकनेस". स्वधर्म, स्वराष्ट्र ह्यासाठीची निष्क्रीयता म्हणजे सहीष्णूता नाही. त्याला कारण सामान्य नाहीत तर राजकारणी, कायदेव्यवस्था आणि न्यायसंस्था आहेत असे वाटते जरी चित्र हळू ह़ळू बदलत असले तरी.
सूड म्हणजे न्याय नव्हे. न्याय म्हणजे सूड नव्हे... हे एकदम मान्य! याच संदर्भात परत पहाल तर शिवाजी म्हणजे काय "बदले की आग" असा प्रकार नव्हता!
आज जो काही प्रक्षोभ वेगवेगळ्या कारणाने दिसतो त्याचे कारण वैयक्तिक जीवनात हताशतेने आलेला सामान्यजनांना त्रागा आणि त्यात विविधतेत एकाला "इतर" वाटणार्यांच्या खचीतच अयोग्य क्रियांना न्याय न मिळणे हा प्रकार आहे. सुदैवाने १२ मार्चच्या बॉबस्फोटातील आरोपींना काहीतरी शिक्षा झाली हे पाहीले की विश्वास वाढू लागतो. तसेच अफझल गुरूच्या फाशीबाबत जर कुठलेही राजकारण झाले नाही तर न्यायसंस्थेबरोबरच सत्ताधार्यांवरील विश्वास वाढू शकेल. अशा विश्वास वाढवणार्या घटना जितक्या वाढतील तितके असले भडक लिखाण हे कालबाह्य होईल. ती खरी सहीष्णूता असेल.
याचा अर्थ आत्ताच्या जगात घोड्यावर स्वार होऊन तलवारी घेऊन लढायचे असा होत नाही. त्याने आपण शिवशाही आणणार नाही तर तालीबानी होवू. त्या संदर्भात "हिंदूत्वाची फेरमांडणी" हा प्रकार औत्सुक्यपूर्ण वाटला. तशा प्रकारच्या प्रयत्नांची/संवादाची नक्कीच गरज आहे.
शब्दांचा मार आणि टग्या यांचे पत्र
चर्चाप्रस्ताव धार्मिक तेढ वाढवणारा आहे आणि सर्वांसाठीच (प्रस्तावकासह) उपयोगशून्य*आहे. पण प्रतिक्रिया वाचून असे वाटले की "काढून टाका" म्हणण्याने आपला उद्देश साध्य होणार नाही. त्याऐवजी प्रत्येकाने अशी भावना कशी चुकीची आणि आपल्याच अहिताची आहे हे सांगितले तर असल्या प्रकारांना अधिक चांगला पायबंद बसेल. आपण प्रक्षोभक लिहूनही इथले लोक पेटत नाहीत उलट आपल्यालाच चार समजुतीचे शब्द ऐकवतात हे सर्वांना कळेल :)
टग्या याच्या "ओपन लेटर" ने आमच्या भावना पोचवल्या आहेत. त्यामुळे पुन्हा वेगळे लिहीत नाही.
*असा काही शब्द आहे का?
या निमित्ताने ...
मी काही स्वतःला कडवा धर्माभिमानी समजत नाही. हा लेख मला सरळसरळ मला भडकवणारा वाटतो आणि त्यामुळे या व्यासपीठावर अनुचित परिणाम होतीलसे वाटते.
मात्र एक सहिष्णु, शांतताप्रिय हिंदु व्यक्ति म्हणून माझे असे काही प्रश्न आहेत ज्याना मला खरोखर उत्तरे मिळालेली नाहीत. या निमित्ताने ते प्रश्न मांडणे अनुचित होणार नाही .(मग त्यामुळे माझी एकूण प्रश्नांबद्दलची अपुरी समज आणि एकूण अज्ञान उघडे का पडेना !)
- जातिविषयक असहिष्णुता , धर्मांधपणा या बाबतीत अनेक वेळेला प्रागतिक विचारसरणीचे लोक अनुक्रमे पुराणमतवादी आणि हिंदुत्त्ववादीना उपदेश करतात, त्यांना विरोध दाखवतात. हे सारे योग्यच आहे. मला सपशेल मान्य आहे. पण हेच पुरोगामी लोक मुस्लिम धर्मांधांविरुद्ध, पुराणामतवादाविरुद्ध, हिंसाचारी प्रवृत्तींबद्दल त्या धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध स्टॅंड घेतात का ? का केवळ हिंदुना "सॉफ्ट् टार्गेट्" मानले जाते आणि घरच्या म्हातारीला सर्वजण बोलतात ? गम्मत अशी की, हा मुद्दा कुणाही हिंदू धर्माच्या व्यक्तिने विचारला की लगेच त्या माणसाकडे "हा भगवा आहे" असे रंगवले जाते. आणि मूळ प्रश्न आहे तो बाजूलाच रहातो. मी अशा अड्ड्यांमधे वावरलो आहे. त्या लोकाना मी समजावून सांगत असतो की बाबानो, मी देखील "प्रबोधनाच्या" बाजूचाच आहे ! पण हे प्रश्न मुस्लिमांच्या संदर्भात विचारायची खोटी ....झाSSSSले. मी एकदम "क्लॉझेट् फंडामेंटॅलिस्ट्" ठरतो !
मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की, हिंदू काय की मुस्लिम काय , धर्मवादी, त्यांचा मूलतत्त्ववाद या सगळ्या भयंकरच गोष्टी आहेत. मात्र मुस्लिम धर्मवाद ही इतकी जहाल गोष्ट आहे , आणि इतकी काळीकुळकुळीत गोष्ट आहे , एकूण मुस्लिम समाजव्यवस्थेवरचा त्यांचा पगडा (पगडा कसला म्हणता, गळफासच !) इतका भयकर आहे की भलेभले समाजसुधारकी, प्रबोधनवादी सुद्धा त्याना उपदेश देण्याच्या भानगडीत पडत नाहीत ! म्हणजे त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप वर्षानुवर्षे सडलेल्या जखमेप्रमाणे रहाते आणि "डॉक्टर"लोक सुद्धा मूळ कारणाच्या जवळ जाण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
या माझ्या निरीक्षणात काही चुकले असेल तर माझा कान पकडावा. मी आनंदाने माझी चूक मान्य करेन.
चांगला मुद्दा
चांगला मुद्दा आहे. धर्मांधतेबद्दल सहमत आहे. मुस्लिम धर्मांधतेचे परिणाम वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रश्न हा आहे की मुस्लिम धर्मांधतेला हिंदू धर्मांधता हे उत्तर आहे का? सुरूवातीला मुस्लिम धर्मांधतेला उत्तर म्हणून याची सुरूवात होईल पण संदर्भ बदलले की कुठल्याही बाबतीत विरोध करणारे सर्व लोक याच पद्धतीने भरडले जातील. हा रस्ता फक्त विनाशाकडेच जातो.
विवेकाला सदाशिवपेठी वृत्ती म्हटले जाते हे आपले दुर्दैव आहे. दोन-चार शिव्या हासडून संताप व्यक्त करायला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. हिंसेने राग व्यक्त करण्यापेक्षा संयमाने प्रतिकार करणे याला मोठी ताकद लागते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सहमत
काय करणार? शिव्या देण्यालाच जे पुरूषार्थ समजतात त्यांना काय सांगायचे? शिव्या देणे, दुसर्याचे आई-बाप काढणे हे फार सोपे आहे. पण ज्यांना विनाशाकडेच जायचे आहे त्यांना थांबवायचेच कशाला?
लोकांना लगोलग निष्कर्ष काढायची घाई असते. या टोकाचा नाहीस मग त्या टोकाचा नक्कीच आहेस. एखादा सुवर्णमध्य असू शकतो असा विचार करणारे आपण आहोत का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. उगाच दुसर्याला शिव्या द्यायच्या आणि आपल्या मांडीवर शड्डू ठोकायचा. याला मराठी बाणा म्हणायचा. इथे येउन मराठीपणाच्या गप्पा मारणार आणि संध्याकाळी दारु मारुन "हमारे मराठी लोग ना साले ......." म्हणत एखादी दु:खद उर्दू गझल ऐकणार. यांची मते इतरांना पटली नाहीत की त्यांना पुरोगामीचे लेबल लावणार. काय करायचे? इतरांना सदाशिवपेठी म्हणले की ... उरलेल्या पेठा यांच्या असा गैरसमज.
अवांतरः मराठी लोकांनी उर्दू गझल ऐकू नयेत असे आमचे मत आहे, असा गोड गैरसमज कृपया पसरवू नये.
या निमित्ताने
वरील सर्व प्रतिसाद वाचले. ज्यांना हा लेख इथे रहावासा वाटतो किंवा हिंदूच काय ते सहिष्णू आहेत, मुसलमानांविरूद्ध बोलायचे म्हटले की मूग गिळून बसतात असं वाटतं त्यांनी खालील विषय सुरू करावेत.
१. ब्राह्मणांनो तुम्ही पूर्वी इतर सर्व जातीयांना आपल्या अंकित केले होते हे कधी विसरू नका.
२. क्षत्रियांनो तुम्ही इतिहासात या देशाचे राजे होता तुमचे राजेशाही थाट विसरू नका.
३. दलितांनो तुमच्यावर हजारो वर्षे केलेले अत्याचार कदापि विसरू नका.
प्रत्येक चर्चेला ४० प्रतिसाद निश्चित आणि उपक्रमाची मान्यवर सजग आणि प्रतिभावंत सदस्यांचे संकेतस्थळ म्हणून वाहवा ही निश्चित!
-राजीव
सनातन वाती : सगळेच अवांतर
एक अवांतर प्रतिसादः
हे लेखन येथे ठेवावे की ठेवू नये? , असे प्रक्षोभक लेखन वाचल्याने हिंदूंच्या मनात इतरधर्मीयांबद्दल द्वेष निर्माण होऊन भारताच्या एकात्मतेला बाधा पोहोचेल काय? इत्यादी आणि वगैरे प्रश्नांवर विचार करकरून मन उद्विग्न झाले असेल तर सनातनच्या सात्विक वाती समईत घालून पेटवा. मन कसे सात्विक आणि कोमल बनून जाईल. :)
प्रत्येक भावनेला कसल्या ना कसल्या क्रय-विक्रयासाठी वापरल्याने आता मन दगडाचे झाले आहे. वर 'शुद्ध' ५ ग्रॅम कापसाला (आणि हो, तो सेवाभावी नामजप...तो विसरलोच!) ५ रुपये देणगी मूल्य? देणगी आणि मूल्यही?
प्रस्तुत चर्चाविषय म्हणजे सनातन प्रभात च्या वेबसाईटची जाहिरात आहे हे सूज्ञपणाने समजून त्याकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.
सहमत
हा ह्या चर्चेतला सर्वोकृष्ट प्रतिसाद!!
चर्चा नायक कुठे गेला?
ही सर्व चर्चा आमच्या सकाळी उठून वाचताना मला पुलंची म्हैस आठवली. म्हशीला कुठे लागले, पाठीचे हाड मोडले का जिभेचे का मेली, किती दूध देयची इत्यादी आणि "कॉफीत काय असते" सारख्या अनेक विषयांवर लोक वाद घालत असताना, त्या चर्चेची नायीका म्हणजे म्हैस कधीच बाजूला लावलेल्या खाटा ढकलून निघून गेलेली असते आणि बाकीचे मात्र उगाच वेळ खर्च करत बसलेले असतात...
...तसेच काहीसे येथे होत नाही आहे ना? :-)
म्हणून म्हणतो, चर्चा नायक कुठे गेला? विषय काढल्यावर त्याला तोंड देयला पण शिका आणि जे काही मनापासून बरोबर वाटते ते सांगा - काही इतरांकडून शिका काही इतरांना शिकवा. पण हिंदूंना विरत्वाचे धडे देत, स्वतः पळपुटेपणा करू नका. कारण जो पर्यंत हिंदूंनी नोआखलीत पळपुटे पणा केला तो पर्यंत, जे धर्मांध मुसलमान होते ते वरचढ होते, पण जेंव्हा हिंदूंनी "आउट ऑफ कंपल्शन" म्हणून म्हणा पण प्रतिकार केला तेंव्हा त्यांची पळती भूई झाली आणि गांधीजींना पण ऐन स्वातंत्र्याच्या पहाटे तिथे जाऊन बसावे लागले हा इतिहास आहे.
अपेक्षित
आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे नवीन नावाने चर्चा सुरू करणारे नंतर उत्तर द्यायला सहसा येत नाहीत असा अनुभव आहे. असे का होते याचे आपापले उत्तर ज्याने-त्याने शोधावे. (हिंट : उत्तर फारसे कठीण नाही.)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
हिंदूंनो
ही चर्चा येथे राहू नये या विचाराचे आम्ही असल्याने आम्हाला आवडणारे विचार आमच्या खरडवहीत वाचा.
धन्यवाद.
-- आजानुकर्ण
तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !'
तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !'
दारूगुत्ते वाढताहेत, वेश्या रस्त्यावर खुणावताहेत
गॅसटंचाई भेडसावत आहे, झोपडपट्टी वाढत आहे ।। १ ।।
गुन्हेगारीच्या चित्रपटांची चलती आहे, दरोड्यांची संख्या वाढती आहे
तरीही यांचे पालुपद आहे, `आम्ही महाशक्ती होणार !' ।। २ ।।
गुंड धीट होत आहेत, राजकारणात शिरत आहेत
सज्जन माणूस अंग चोरून सारे काही बघत आहे ।। ३ ।।
गुन्हेगार लोकसभा, विधानसभा काबीज करत आहेत
सात्त्विक जनता भजन व प्रवचन यांत मग्न आहे ।। ४ ।।
गुंड-गुन्हेगार संघटित आहेत
सज्जन-शक्ती विघटीत आहे ।। ५ ।।
तरीही आम्ही म्हणतो `आम्ही महाशक्ती होणार !'
- श्री. अशोक तेलंग (लोकजागर, ऑगस्ट २००७)
दहशतवादाची समस्या आज भारतात `आ' वासून उभी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दहशतवाद्यांनी आपले जाळे पसरले आहे. त्याच्या विरोधात सर्व हिंदूंनी आज संघटितपणे उभे रहाण्यासाठी प्रयत्न करत असतांना या लेखाला `समाजात आग लावणे' म्हणणारे हिंदू दहशतवादाची आग स्वत:च्या घरापर्यंत पोहोचल्यावर जागे होणार का ? `मी आणि माझे घर' ही वृत्ती जोपासणारे समष्टीसाठी काही करतील अशी आशाच करता येत नाही. काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराबाबत इतके संवेदनहीन असणारे जन्महिंदू दहशतवाद्यांकडून मारले जाण्याच्याच लायकीचे होत !
दुबळयांच्या शांती-अहिंसेने देशाचा घात होतो. देश टिकवायचा तर शक्ती हवी, शस्त्रे हवीत. रामाच्या हातात धनुष्य आहे आणि श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र. सज्जनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष देवांनाही हाती शस्त्रे घ्यावी लागतात. राष्ट्राच्या सीमा फक्त तलवारीनेच आखता येतात. हे हिंदू तरुणा उठ, जागा हो. राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र उचल. - स्वा. सावरकर
भारतियांनो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररीत्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
कदाचित या वरुण मी जो लेख पाठवला होता त्याबद्दल ज्यांना जे समजायचे असेल ते समजतील आणि ज्याना समजत नसेल (? ) त्यांनी का समजले नाही याचा विचार करवा असे वाटते
आपला
गणेश
स्वल्पविराम
या वाक्यात योग्य जागी स्वल्पविराम न टाकल्याने 'हिंदू दहशतवादाची' असे वाचले गेले. तेवढी दुरुस्ती जन्महिंदूंनी करणे आवश्यक आहे.
रामाच्या हातात धनुष्य आणि कृष्णाच्या हातात चक्र असल्यावर हिंदू तरूणांनी काळजी करण्याचे कारणच काय? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
(जन्मगाढव) आजानुकर्ण
+१
ह ह पुवा :)))
अवांतर : आता यावरून शुद्धलेखन असावे/नसावे असा नवीन वाद सुरू होणार का?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
फ्रॉईडीयन
स्लिपवरून बुशसाहेबांचे हे वाक्य आठवले. (त्यांच्या बाबतीत स्लिप न म्हणता फॉल किंवा ऍक्सिडेंट म्हणणे योग्य ठरेल.)
"Our enemies are innovative and resourceful, and so are we. They never stop thinking about new ways to harm our country and our people, and neither do we." —President George W. Bush, Washington, D.C., Aug. 5, 2004
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
नाही समजले
कदाचित या वरुण मी जो लेख पाठवला होता त्याबद्दल ज्यांना जे समजायचे असेल ते समजतील आणि ज्याना समजत नसेल (? ) त्यांनी का समजले नाही याचा विचार करवा असे वाटते
कालच मी कोणा एका लॉरेन्स पॉवेल नामक माणसाचे वाक्य वाचले होते, "Write to be understood, speak to be heard, read to grow." मला काय म्हणायचे असेल ते समजले असेल. आपण जे काही सनातन वर्तमानपत्रातून लिहीले होते त्याचा आणि आपल्या वरील उत्त्राचा संबंध लागला नाही.
....गल्लीपासून दिल्लीपर्यंत दहशतवाद्यांनी आपले जाळे पसरले आहे. त्याच्या विरोधात सर्व हिंदूंनी आज संघटितपणे उभे रहाण्यासाठी प्रयत्न करत असतांना
ही जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे असे वाटत नाही का? हिंदूंनी संघटित असण्यास माझा विरोध नाही. तसे कोणीही संघटीत व्हावे पण जेंव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेंव्हा भारतीय म्हणून संघटीत होवू नये की काय?
दुबळयांच्या शांती-अहिंसेने देशाचा घात होतो. देश टिकवायचा तर शक्ती हवी, शस्त्रे हवीत. रामाच्या हातात धनुष्य आहे आणि श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र. सज्जनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष देवांनाही हाती शस्त्रे घ्यावी लागतात. राष्ट्राच्या सीमा फक्त तलवारीनेच आखता येतात. हे हिंदू तरुणा उठ, जागा हो. राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र उचल. - स्वा. सावरकर
बिचारे सावरकर. इतर अनेक थोरांप्रमाणे त्यांचे स्वतःस अनुयायी समजणारेच त्यांना समजू शकत नाही आहेत की त्यांचा खर्या अर्थी अनुनय करू शकताहेत. सावरकरांचे तुम्हाला हे जर वाक्य प्रमाण मानायचे आहे तर बाकीच्या विचाराबद्दल काय? - त्यांची विज्ञान निष्ठा तुमच्या सनातन धर्मातील वातींना चालेल का? ते म्हणाले होते की जो पर्यंत इतर लोकं त्यांच्या धर्माच्या नावाने राहताहेत तो पर्यंत मी (राष्ट्रीय स्वार्थासाठी) हिंदू म्हणेन. पण उद्या सर्व लोकं त्यांच्या धर्माचे नाव टाकायला तयार असली तर मला हिंदू म्हणून घेण्याची गरज वाटणार नाही. राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र उचलायला कधी, कुठे आणि कुणाला सांगीतली ते पण पहा कारण अभिनव भारताची सांगता करून याच सावरकरांनी त्यातील सदस्यांना शस्त्रे खाली ठेवायला सांगीतली (अर्थात सैन्याला नाही पण समाजात नागरीक म्हणून वावरताना!).
असो. मला इतकेच म्हणावेसे वाटते की तुम्ही म्हणता तसे "आपण अत्याचार विसरलो नाही," तर म्हणजे दररोज वागताना कसे वागायचे? सकाळी उठल्याउठल्या वक्रतुंड हा श्लोक म्हणायचा का नोआखलीतील आठवत बसून त्या श्लोकात अथवा एकंदरीतच अपेक्षीत नसलेले वाकडे तोंड करायचे? थोडक्यात ही चर्चा चालू करताना निदान आज आपण काय करायला हवे हे मांडायचा प्रयत्न झाला असता आणि त्यावर विविध मते आणवण्याचा प्रयत्न केला असता तर जास्त योग्य झाले असते.
मग या मुद्द्यांचे काय?
पण मग जेसन बोर्न च्या या मुद्द्यांच काय ? हा प्रश्न उरतोच.
प्रकाश घाटपांडे
कक्क्क्करररअरररररर्
कट़़कटकर्रकटख्रकर्रकट......
काय म्हणालात? हे काय? अहो हा आवाज आहे. कसला म्हणून काय विचारता? गणेशरावांची एक्सप्रेस हिंदू-मुस्लिम स्थानकावर थांबावी यासाठी उपक्रमींनी आंदोलन केले होते. पण ठेसन जवळ येताच एक्सप्रेसने ट्र्याक बदलले आणि आता दहशतवाद स्थानकाकडे ती रवाना होत आहे. हा आवाज ट्र्याक बदलल्याचा आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.