मराठी -> संरक्षण, संगोपन आणि संवर्धन.

आपल्या सर्वांच्या दृष्टीने मराठी भाषा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजकाल काहीही हाकाटी चालली असो परंन्तु मराठी भाषेच्या दृष्टीने बरेच लोकं प्रसिद्धिपरान्मुख राहून काहीनाकाही उपक्रम आखत असतात. एखाद्या एकांड्या शिलेदारापणे वर्षानूवर्ष असे उपक्रम राबवतही असतात. या सर्वांची माहिती जमवावी असे माझ्या मनात आहे. आपणही आपणास ठावूक असणार्‍या व्यक्ती, संस्था अथवा मंडळा बद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती.

या विषयाला चालना देण्यासाठी, मराठी भाषेसाठी कार्यरत असणार्‍या माझ्या माहितीतील संस्था अथवा व्यक्ती.

१. मनोगत ( वेलणकर), उपक्रम ( शशांक) आणि मिसळपाव ( तात्या) यांनी पूर्णपणे मराठीतच चर्चा, देवाणघेवाणीचे व्यासपीठ निर्माण केले आहे.
२. मराठीवर्ल्ड डॉट कॉम च्या भाग्यश्री केंगे यांनी मराठीचे प्रथम संकेतस्थळ निर्माण केले.
३. "रसिक साहित्य योजने"चे श्री योगेश नांदुरकर यांनी घरोघरी पुस्तके अथवा घरपोच सेवा हा उपक्रम राबवलेला आहे.
४. श्री पारखी हे प्रत्येक वर्षी दिवाकरांच्या नाट्यछटेचे शिबीर घेत असतात.
५. अक्षरधारा हे पुस्तकच्या प्रदर्शनासाठी सदैव कार्यरत असतात.
६. नागपूरमध्ये श्री देव हे माझा ग्रंथ संग्रह अर्थातच माग्रस अशी संस्था ( ३०/३२ वर्षापासून) चालवत आहेत.
७. सातार्‍याला "माझी अभ्यासिका" नावचे सातवी पर्यंतच्या मूलासाठी प्रत्येक महिन्यात प्रश्नसंच प्रकाशित करत असतात. ( १६ वर्ष)
८. वरदा प्रकाशनाचे श्री ह मो मराठे हे जुन्या पुस्तकांचे प्रकाशन करत असतात. मागच्या वर्षी त्यांनी गो ना दातारांच्या १०० वर्षपूर्वीचे सर्व खंड प्रकाशित केले.
९. मेहता प्रकाशन हे परकिय भाषेतील दर्जेदार पुस्तके मराठीत अनुवादीत करत असतात.
१०. श्री अनिल गोरे हे पुण्यात समर्थ मराठी संस्था चालवत असतात, त्यानी दुकानावर मराठी पाट्यांचा आग्रह धसास लावलेला आहे. ( अंदाजे ४०००० दुकानावरील पाट्या मराठीत लावल्या गेल्या).

प्रिय मित्रांनो, आपणासही असे काही उपक्रमी माहित असल्यास कृपया माहिती द्यावी ही विनंती.

द्वारकानाथ कलंत्री

Comments

माझे शब्द

माझे शब्द हे मला माहीत असलेले अजुन एक संकेतस्थळ जिथे मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव सारखीच सेवा उपलब्ध आहे.

- सूर्य

मायबोली.कॉम

मायबोली.कॉम हे संकेतस्थळ कल्पना नाही सगळ्यात जुने आहे का पण १९९६ साल पासून आहे. बॉस्टनच्या अजय आणि भावना गल्लेवाल्यांनी ती चालू केली आणि आजतागायत चांगली चालली आहे.

वरदा प्रकाशन

वरदा प्रकाशनचे मुख्य ह.अ.भावे आहेत, हमो मराठे नाहीत.
मायबोली डॉट कॉम हे सर्वात जुने संकेतस्थळ असावे. त्या स्थळावर पहिल्या आठवड्यात लिहिले गेले असेल तेव्हढेच अनेक वर्षे दिसायचे. जरी पुढे कित्येक वर्षे त्यात काहीच भर पडली नव्हती . तरी आता मात्र ते एक अग्रगण्य संकेतस्थळ आहे. मराठीत सुमारे ४०० हून अधिक संकेतस्थळे असावीत. अनेक स्थळचालकांनी मनातील विचारांना वाट करून देणे किंवा स्वत:चे ललितलेख आणि कविता प्रसिद्ध करणे याकरिता वाहून घेतले आहे. त्यांचा दर्जा उत्तम आहे. बहुतेक संकेतस्थळे परदेशस्थ मराठी भाषकांची आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांनी चालविलेली स्थळे अधिक आहेत. काही स्थळे बातम्या, पर्यटन, गिर्यारोहण वगैरे विषयांवरसुद्धा आहेत.
अनिल गोरे ह्यांचा छंद मराठी पाट्या लावण्यापेक्षा इंग्रजी पाट्या फोडण्याचा आहे. त्यांचा आग्रह फक्त पाटी मराठीत असावी इतपतच मर्यादित आहे, पाटी शुद्ध मराठीत असावी असा ते अजिबात आग्रह धरत नाहीत. हे गोरे पुण्यात गणिताचे वर्ग चालवतात.
अनिल गोरे नावाचे एक शांत व्यक्तिमत्त्व असलेले आकडेशास्त्राचे प्राध्यापक पुण्यात आहेत. त्यांचा वरील समर्थ मराठी संस्थेच्या अनिल गोर्‍यांशी काही संबंध नाही.
मेहता प्रकाशन हे परदेशीच नाही तर इतर भारतीय भाषांतील उत्तम पुस्तकांचा अनुवाद करवून घेऊन, ते अनुवाद प्रकाशित करतात.
--वाचक्‍नवी

धन्यवाद.

वरदा प्रकाशनाच्या नावासंबंधी लिहिण्यात घोटाळा झाला हे खरे. सुधारणा करण्याबद्दल धन्यवाद. आपणास जी काही माहिती आहे यात अजून जास्त माहिती देता आली तर बरे होईल. या लेखाचा मुख्य हेतु केवळ जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमासंबंधी माहिती पुरवणे हाच आहे आणि तुमच्या सारख्या जाणकार आणि जागृत लोकांमुळे तो बराचसा मार्गी लागेल हेही खरे.

कदाचित तुम्ही हितगुजवर गेला नसाल

मायबोली डॉट कॉम हे सर्वात जुने संकेतस्थळ असावे. त्या स्थळावर पहिल्या आठवड्यात लिहिले गेले असेल तेव्हढेच अनेक वर्षे दिसायचे.
तिथल्या पहिल्या पानाबद्दल् म्हणत असाल् तर खरे आहे. पण् आत जायची तसदी तेंव्हा घेतलि असती तर् हितगुज नावच्ं मोठ प्रकरण् दिसले असते.

मायबोलीच्याही अगोदर जीम ल्ंडो या मेक्सिकन् (/अमेरीकन) माणसाने soc.culture.indian.marathi हा गृप चालू केला असे अजय् गल्लेवाले यानी केंव्हातरी मायबोलीवर लिहिल्याचे स्मरते. SCIM च्या स्थापनेत ज्यानी पुढाकार घेतला त्यात गल्लेवाल्यांच्याही नावाची नोंद आहे, त्यामुळे त्याना अधिक माहिती असावी.
जसे भारतात कॉंगेसची स्थापना एका अभारतियाने केली (सर ऍलन् ह्यूम) तसेच आंतरजालावर मराठीची मुहूर्तमेढ एका अमराठी माणसाने केली.
सगळे newsgroup कधी सुरू झाले, प्रक्रीया काय होती कुणी भाग घेतला हे सगळे आंतरजालावरच बखरीच्या रुपात उपलब्ध आहे त्यामुळे पडताळून पहाता येईल.

marathiworld.com ची Domain registration ची तारीख २८ फेब्रुवारी २०००
maayboli.com ची Domain registration ची तारीख १४ मार्च १९९७ हि माहीती कुणालाही मिळू शकते. मायबोली सप्टेंबर् १९९६ मधे वैयक्तिक संकेतस्थळ (होमपेज्) म्हणून् सुरू झाले या गोष्टीशी ही माहिती जुळते आहे. त्यामुळे मायबोली पहिली मराठी साईट् आहे असा निष्कर्ष निघतो.

युजनेट

मायबोलीच्याही अगोदर जीम लंडो या मेक्सिकन् (/अमेरीकन) माणसाने soc.culture.indian.marathi हा गृप चालू केला असे अजय् गल्लेवाले यानी केंव्हातरी मायबोलीवर लिहिल्याचे स्मरते. SCIM च्या स्थापनेत ज्यानी पुढाकार घेतला त्यात गल्लेवाल्यांच्याही नावाची नोंद आहे, त्यामुळे त्याना अधिक माहिती असावी.

soc.culture.indian.marathi हा एक युजनेट ग्रुप होता आणि अजूनही तो अस्तित्वात आहे. तिथे नक्की कोण काय लिहीते ते माहीत नाही. पण गुगलल्यावर मिळाला. तसले ग्रूप हे साधारण ९५-९६ पर्यंत खूप पॉप्यूलर होते. पण सर्व इंग्रजीत असायचे. आपण म्हणता तसा माणूस कदाचीत युजनेट ला ऍप्रुव्हल देणारा वगैरे असावा... मी पण (उत्सुकतेपोटी) माहीती काढीन. बाकी मायबोली ही पहीली साईट आहे इतके नक्की माहीत होते...

माझा होता

बढाई मारण्याचे (कुणालाच) कारण नाही, कारण ते फक्त माझ्या ज्येष्ठत्वामुळे झाले. इथले तरुण लेखक तेव्हा असते, तर त्यांचाही सहभाग असता.

कनिष्ठ असलो तरी माझापण सहभाग होता...पण मॉडरेट वगैरे करण्यात मी नव्हतो. कदाचीत ते डिस्कशन "नॉट फॉर मायनर्स" असावे :)

हितगुज आणि मोठे?

>>तिथल्या पहिल्या पानाबद्दल् म्हणत असाल् तर खरे आहे. पण् आत जायची तसदी तेंव्हा घेतलि असती तर् हितगुज नावच्ं मोठ प्रकरण् दिसले असते.<< हितगुज अगदी छोटे होते आणि त्यात कित्येक वर्षे काहीही बदल झालेला आढळला नाही. --वाचक्‍नवी

प्रमाण मराठी भाषेचे शुद्धलेखन

'मराठीच्या प्रमाण भाषेचे शुद्धलेखन : एक नवविचार' या विषयावरील चर्चेसाठी मॉडर्न महाविद्यालय(पुणे), राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), आणि मराठी अभ्यास परिषद(पुणे) यांच्या वतीने २०-२१ फेब्रुवारी २००८ या दोन दिवशी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी विभागात चर्चासत्र होणार आहे. उद्‌घाटन बुधवारी २० तारखेला दुपारी १ वाजता. सत्र संध्याकाळी ६ पर्यंत चालेल. दुसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून चर्चासत्र सुरू राहील.
उद्‌घाटक: डॉ. नरेंद्र जाधव(कुलगुरु, पुणे विद्यापीठ), अध्यक्ष : प्रा. म.द.हातकणंगलेकर, वगैरे वगैरे.. --वाचक्‍नवी

 
^ वर