पवार पंतप्रधान?

शरद पवार पंतप्रधान होतील असे वृत्त मध्यंतरी मटा मध्ये प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादीच्या ’राष्ट्रवादी’ ह्या फेब्रुवारी अंकामध्ये ह्याबद्दलचे भविष्य ज्योतिषी वसुधाताई वाघ ह्यांनी वर्तवलेले आहे. ह्या वसुधाताई वाघ म्हणजे शिवसेना नेते मनोहर जोशी ह्यांच्या विहीणबाई आहेत. ह्या सर्व गमतीबद्दल वाचा हा लोकसत्तेचा अग्रलेख आणि ह्याबद्दलची आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.

Comments

ही बघा जाहिरात

दैनिक सकाळ मधील ही जाहिरात पहा. १९ मे २००७ ची.
Jyotisha Jahirat-Hanumanbhakta
प्रकाश घाटपांडे

निरूद्योग

सध्या महाराष्ट्रातील विरोधीपक्ष निरुद्योगी झाले आहेत. कारण मोदि पॅटर्न गुजरातमध्ये झाला असला तरी महाराष्ट्रात अजून देशमुख पॅटर्नच चालू आहे. सध्याच्या सरकारला खाली ओढणे शक्य नसल्याने निवडणूका होईपर्यंत, यशवंतराव चव्हाचंच्या भाषेत "पॉलीटिक्स इज द गेम ऑफ पेशन्स" मधील हे पेशन्सचा डाव मांडुन बसलेत कारण राजकारणी "पेशन्स" ठेवू शकेल पण "पेन्शन" घेण्याचा कधी विचार करणार नाही!

बाकी अग्रलेख आवडला, पण जो विषय पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा आहे त्याला वृत्तपत्रातील मुख्य स्तंभ देणे जरा अतीच वाटले. यातून केतकर महाराज एका अर्थी प्रसिद्धीस बळी पडले असे वाटते.

अजून एक राहून राहून कायम वाटत आले आहे की जी वृत्तपत्रे भविष्य कथनाची आणि त्यांच्या मागे जाणार्‍यांची (योग्य कारणासाठीच) टिका करत असतात त्यांच्या छापील आणि जालावरील आवृत्तीत "राशिभविष्य" कसे काय टेवतात?

कदाचित

कदचित ही शरद पवार यांनीच आपल्या समर्थकांमार्फत घडवून आणलेली बातमी असेल.कूणाच्या काय प्रतिक्रिया येताहेत हे जाणून घेण्यासाठी!

पण जो विषय पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा आहे त्याला वृत्तपत्रातील मुख्य स्तंभ देणे जरा अतीच वाटले
सहमत.

जी वृत्तपत्रे भविष्य कथनाची आणि त्यांच्या मागे जाणार्‍यांची (योग्य कारणासाठीच) टिका करत असतात त्यांच्या छापील आणि जालावरील आवृत्तीत "राशिभविष्य" कसे काय टेवतात?
इथे किंचित गल्लत होतेय. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्‍या सर्वच गोष्टी संपादक मंडळींच्या हाती नसतात (यात मुंबईतील काही वृत्तपत्रातील पुरवण्यामध्ये वापरलेली "मिंग्रजी" देखील येते). या सर्व गोष्टी बहुधा मार्केटींग विभागाच्या सल्ल्याने होत असाव्यात.

असो, मराठी राष्ट्रपतींनंतर मराठी पंतप्रधान ही कल्पना कशी छान वाटते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पवार साहेब, पंतप्रधान.....!!!

लेख वाचला नाही.........!!! पण, असे झाले तर आम्हाला खूप आनंद होईल बॉ !!!

(कोण म्हणतंय रे ते चौदा खासदाराच्या भरवश्यावर पंतप्रधानाचे स्वप्न पाहणे म्हणजे मुर्खपणा आहे म्हणून )

शरद पवारांचा चाहता
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाहिरात भारी आहे!

घाटपांदे साहेब,
तुमची जाहिरात भारी आहे! पण मी गप्प बसणेच पसंत करतो आहे.

आपला
ङूम्दॉप्आम्टा

 
^ वर