तर्कक्रीडा:५९: बलोपासना-तंत्र आणि मंत्र

माझ्या एका मित्राने ही गोष्ट सांगितली.तो म्हणाला;
"

माझ्या लहानपणीच माझे आई-वडील वारले.आम्ही पोरकी मुलें काकांकडे वाढलो.मोठे झाल्यावर पांगलो.काही वर्षांनी मला काकांचे एक पत्र आले.त्यांनी कळविले 'तुझ्या वडिलांनी "बलोपासना -तंत्र आणि मंत्र " या शीर्षकाचे एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले होते. त्याच्या काही प्रती(< ५०) माझ्याकडे दिल्या होत्या. त्या सर्व अजून माझ्याकडेच आहेत. प्रतीचे मुद्रित मूल्य १०रु आहे. त्या प्रमाणे त्या सर्व प्रतींची किंमत मी तुला देणार आहे. वडिलांची स्मृती म्हणून तुला जर काही प्रती हव्या असतील तर त्या ४०रु. ना एक या प्रमाणे तुला विकत घ्याव्या लागतील. तरी लौकर भेट.'
....मी काकांना भेटलो.त्यांनी प्रथम दहा रुपयां प्रमाणे सर्व प्रतींची किंमत माझ्या हाती ठेवलीं नंतर पुस्तक दाखवले. चाळीस रुपयांना एक या प्रमाणे मी काही प्रती घेतल्या.
....मला वाटले ,असे पत्र मला एकट्यालाच आले असेल.पण काकांनी आम्हा सर्व भावांना असेच पत्र (छायाप्रत) पाठविले होते.(काका जरा विक्षिप्तच आहेत!)प्रत्येक जण त्यांना भेटला.प्रत्येकाला काकांनी दहा रु. मूल्याप्रमाणे सर्व(वडिलांनी त्यांच्याकडे दिल्या होत्या तेव्हढ्या) प्रतींची किंमत दिली.प्रत्येकाने ४०रु. ना एक या प्रमाणे काही प्रती (किमान पाच )घेतल्याच.
....काकां जवळच्या सर्व प्रती संपल्या.(आम्ही सर्व भावांनी विकत घेतल्या मुळे.) या व्यवहारात आम्हा सर्व भावांना मिळून काकांनी पदरचे ७८०रु. दिले. हे सर्व नंतर समजले."

तर पुस्तकाच्या प्रतींची(काकांजवळील) संख्या किती? पुतण्यांची(पुस्तके खरेदी करणार्‍या) संख्या किती?
....................................................................................
कृपया उत्तर व्य. नि. ने
...................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

बलोपासना: उत्तरः १

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी बीजगणिती समीकरण मांडून कोडे सोडविले आहे. (माझ्या मते बीजगणिताचे सहाय्य अपरिहार्य आहे.) त्यांनी शेवटी ताळा करून दाखवला आहे. त्यामुळे "उत्तर बरोबर आहे" असे लिहिण्याची आवश्यकताच नाही.

अंकगणित

मी अंकगणिताच्या साहाय्याने गणित सोडवले आहे, कितपत बरोबर आहे ते यनावालांच जाणे !--वाचक्‍नवी

बलोपासना: उत्तरः२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी यांनी प्रतींची संख्या तसेच पुतण्यांची संख्या या दोन्ही संख्या अगदी अचूक शोधल्या आहेत.

बलोपासना: उत्तरः३

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांनी पाठविलेले उत्तर अचूक आहे. त्यांनी बीजगणिताचा उपयोग केला आहे.

बलोपासना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अमित कुलकर्णी यांनी पाठविलेले उत्तर असे:
समजा क्ष प्रती आणि य पुतणे आहेत. तर,
काकांनी पुतण्यांना दिलेली एकूण रक्कम = १०क्षय रु.
पुतण्यांनी काकांना दिलेली एकूण रक्कम = ४०क्ष रु.

१०क्षय - ४०क्ष = काकांनी केलेली पदरमोड = ७८० रु.

क्ष (य - ४) = ७८

याची उत्तरे = {(२, ४३), (३, ३०), (६, १७), (३९, ६), (२६, ७), (१३, १०)} अशी आहेत.

परंतु प्रत्येक पुतण्याने किमान ५ पुस्तके घेतली आहेत, म्हणून ५य <= क्ष
म्हणून उत्तर फक्त (३९, ६) हेच आहे

३९ प्रती / ६ पुतणे
*************************************************

 
^ वर