तर्कक्रीडा: ५८:बुद्धिर्यस्य धनं तस्य |

मोहोरबंद केलेले तीन लखोटे आहेत.एक लाल, एक पिवळा तर एक निळ्या रंगाचा आहे.त्यांतील एकाच लखोट्यात एक हजार रुपयांची एक नोट आहे.अन्य दोन लखोट्यांत नोटेच्या आकाराचा कोरा कागद आहे.
तुम्हाला यांतील एकच लखोटा उघडायचा आहे. त्यात नोट असली तर ती तुम्हाला मिळेल.प्रत्येक लखोट्यावर दोन दोन विधाने आहेतः
.......
लाल लखोटा:१. या लखोट्यात नोट नाही.
..............२.हे कोडे प्रा.रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित आहे
.
पिवळा लखोटा:१.लाल लखोट्यात नोट नाही.
.............२. हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित नाही.
........
निळा लखोटा:१. या लखोट्यात नोट नाही.
...............२. खरे तर नोट पिवळ्या लखोट्यात आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका - विधानांचा सत्याशी संबंध?

अ. विधानांचा खर्‍या खोट्याशी, तथ्याशी काही संबंध आहे काय?
---
आ. "पिवळे २. हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित नाही." चा अर्थ असा घ्यावा काय? : "हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या कुठल्याही (किंवा उपरोल्लेखित) कोड्यावर आधारित नाही."

नाही तर लाल २. मधले कोडे आणि पिवळे २. मधले उल्लेखलेले कोडे वेगळे असू शकते. असे असल्यास सर्व विधाने सहज सत्य असू शकतात, किंवा काही सत्य/काही असत्य असू शकतात.

पण लाल २. मधले कोडे आणि पिवळे २. मधले उल्लेखलेले कोडे एकच असेल तर सर्व विधाने सत्य असूच शकत नाहीत.

कोड्यातील अपूर्णता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
क्षमा करा. विधानांच्या सत्यासत्यते संबंधी लिहायचे राहिले.
"यांतील कुठल्याही लखोट्यावर एकापेक्षा अधिक असत्य विधाने नाहीत." तर नोट कोणत्या लखोट्यात आहे?
असे लिहायचे होते. लखोटे रंगवायच्या नादात ते महत्त्वाचे वाक्य राहून गेले.
** "हे कोडे '' याचा संबंध एकाच कोड्याशी आहे.म्हणजे लाल आणि पिवळ्या लखोट्यांवरील विधान क्र. २ एकच कोड्याविषयी आहे.
श्री. धनंजय यांनी या त्रुटी निदर्शनाला आणल्या.त्यंचे आभार.

व्यक्तिगत निरोप

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांचे अचूक उत्तर सर्वप्रथम आले.त्यामुळे त्यांना धनलाभ झाला आहे.

उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी नोटेचा लखोटा अचूक शोधला आहे.

उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
श्री.प्रमोद् देव यांनी या कोड्याचे पाठविलेले उत्तर् बरोबर आहे. धन्यवाद!

व्य. नि. उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत आणि श्री. अमित कुलकर्णी यांनी नोटेचा लखोटा बरोबर शोधला आहे.

बुद्धिर्यस्य...अंतिम उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांनी पाठविलेले उत्तर पुढील प्रमाणे:--
"निळ्या लखोट्यावरील पहिले विधान खोटे असू शकत नाही. (अन्यथा दुसरेही असत्य असायला हवे)
म्हणजे नोट लाल किंवा पिवळ्या लखोट्यातच आहे.

जर नोट लाल लखोट्यात असेल तर - लाल-१ असत्य आहे म्हणून लाल-२ सत्य असायला हवे (म्हणून पिवळे-२ असत्य ठरते). शिवाय पिवळे-१ तर असत्य आहेच. हे शक्य नाही.

म्हणून नोट पिवळ्या लखोट्यातच आहे.

ताळा -
लाल-१ सत्य, लाल-२ असत्य,
पिवळे-१ असत्य, पिवळे-२ सत्य,
निळे-१ सत्य, निळे-२ सत्य"

ताळा?

>>लाल-१ सत्य, लाल-२ असत्य,
पिवळे-१ असत्य, पिवळे-२ सत्य,<<इति अमित कुलकर्णी.
का? पिवळे २ असत्य आणि लाल २ सत्य असू शकते.
स्पष्टीकरण असेही चालेल.
लाल२ व पिवळे २ ही विधाने एकमेकांविरुद्ध आहेत, म्हणून त्यातले एक खोटे. म्हणून लाल १ आणि पिवळे १ दोन्ही खरी. म्हणजे लाल लखोट्यात नोट नाही. निळ्यात असेल तर त्या लखोट्यावरची दोन्ही विधाने खोटी; हे शक्य नाही. म्हणून नोट पिवळ्या लखोट्यात !--वाचक्‍नवी

ताळा: खुलासा

पिवळे २ असत्य आणि लाल २ सत्य असू शकते - हे खरे आहे.
कोड्याचे उत्तर "नोट पिवळ्या लखोट्यात " इतकेच हवे आहे. ताळा लिहिण्याची गरजच नव्हती, तरीही मी तो लिहिला, पण पूर्ण लिहिण्याचा कंटाळा केला हे चुकले, हे मान्य.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

------------------------------------------
Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

 
^ वर