भारत रत्न एक चेष्टा

सध्या भारत रत्न एक चेष्टाचा विषय झाला आहे. म्झाया मते एकतर हा पुरस्कार बंद करावा अथवा खिरापती (जसा पद्मश्री वाटतात) सारखा वाटावा.
सध्या सर्व पक्ष आपल्या माणसाला पुरस्कार मिळावा यासाठी धपडताना दिसत आहे.
पण आपल्या मते हा कोणाला द्यावा?

माझे मत बाबा आमटे.

शेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

बाबा आमटे या नावावर् सहमती.
प्रकाश घाटपांडे

दोन्हीस सहमत...

भारतरत्न एक चेष्टा झाली आहे - या बद्दल सहमत
बाबा आमटे - सहमत.

आंबेडकर, सरदार पटेल, टाटा, अरूणाअसफली यांना मिळण्याच्या आधी अथवा अनेक सशस्त्र क्रांतिकारकांना, समाजसेवकांना/सुधारकांना (बाबा आमट्यांसहीत अनेक) न देता जेंव्हा ते मदर तेरेसा आणि एम जी रामचंद्रन यांना (निवडणूकीच्या आधी, ते गेल्यावर राजीव गांधींच्या कारकिर्दीत) दिले गेले, तेंव्हाच त्याची कुचेष्टा झाली.

त्यातही अजून एक "अँटीक्लायमॅक्स" म्हणजे सुभाषचंद्र बोसांना १९९२ ते मरणोत्तर दिले गेले पण नंतर कोणीतरी खटला भरला की ते हयात कशावरून नाहीत. म्हणून मग ते परत मागे घेतले...

सहमत

भारतरत्न हा पुरस्कार एक चेष्टेचा विषय झाला आहे. या पुरस्काराची आम्ही केलेली चेष्टा इथे वाचा.

हा पुरस्कार आता कायमसाठी बंद करणे बरे असे वाटते. बाबा आमटे किंवा सचिन तेंडूलकर यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करायला अशा बेगडी झूलांची गरज नाही असेही वाटते.

अगदीच आवश्यक असेल तर अटलबिहारीजी वाजपेयीजी, कांशीरामजी, जगजीवनरामजी, चौधरीजी चरणसिंगजी वगैरेंना हा पुरस्कार वाटून द्यावा. एकाने भा हे अक्षर वापरावे दुसर्‍याने र तिसर्‍याने त वगैरे वगैरे.

(महाराष्ट्ररत्न) आजानुकर्ण

भारताची रत्ने किती?

इथे बरेच प्रश्न पडतात. पहिला म्हणजे भारतरत्न मिळाण्याची पात्रता काय? बाबा आमटेंना हा पुरस्कार मिळाल्यास आनंदच आहे. पण जो पुरस्कार राजीव गांधीनाही (कशासाठी?) मिळाला आहे तोच बाबा आमटेंना दिला तर त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची ती योग्य दखल होईल का? बरं कलाकार, खेळाडू यांना द्यायचा म्हटल तर पात्रतेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. लता मंगेशकर, रवी शंकर यांना मिळाला आहे, मग आशा भोसले, भीमसेन जोशी, शिवकुमार शर्मा, झाकिर हुसैन अशी बरीच नावे येतात. आता या सर्व दिग्गजांची पात्रता ठरवायची कुणी आणि कशी? (यादीत टागोरांचे नाव नाही याला काय म्हणावे?)
मुळात हा पुरस्कार मिळाल्याने नक्की काय होते? या सर्व मंडळींचे काम इतके मोठे आहे की यांना कुठल्याही पुरस्काराची गरज नाही. मग उगाच हा ष्टांप मारायचा तरी कशाला?
किंवा वर म्हटल्याप्रमाणे सर्वांनाच देउन टाका, उगीच कटकट नको. (लालूप्रसाद, रबडी, मायावती येउद्यात सगळे)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

एम एफ हुसेन

एन डी टी व्हीने सुचवलेल्या नावात एक होते "एम एफ हुसेन" यांचे. त्यासाठी एनडीटीव्हीने काय "क्रायटेरीया" वापरला ते कळले नाही...

बाकी बाबा आमट्यांना असल्या पारीतोषिकाची गरज नाही हे मान्य. पण जो पर्यंत असे पारीतोषीक राहणार असेल तो पर्यंत त्याचे गेलेले महत्व पुन्र्स्थापित करण्यासाठी "योग्य" व्यक्तीस बक्षीस देणे हे महत्वाचे आहे असे वाटते.

आज ऍल गोर ला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला जो योग्य आहे आणि त्याला त्याची गरज नव्हती. काही वर्षांपुर्वी तोच पुरस्कार मिळाला होता : हेेन्री किसिंजरसारख्या अतिशय कपटी माणसाला ज्याचा व्हिएटनाम युद्धात मोठा वाटा होता आणि मला भारतीय म्हणून तो आवडत नाही कारण तो अतिशय भारताच्या विरोधातील आहे (इंदीरा गांधी त्याला पुरून उरली ही गोष्ट वेगळी).

बाकी त्यांचे राजकारण काय होते माहीत नाही, पण भाजपने हे सर्व चालू करून नकळत लोकांमधे जागृती आणली की हा सर्व प्रकार किती सवंग झाला आहे ते....

भारतरत्न, पद्मविभूषण इ.

जयललितांचा पाठिंबा महत्त्वाचा असताना जसे एकाच वर्षी तमिळनाडूतील तीन व्यक्तींना (कलाम, एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि सी. सुब्रमण्यम्) भारतरत्न दिले गेले किंवा आंबेडकर-मंडेला-सरदार पटेलांच्या सोबत किंवा आगे-मागेच जसे राजीव गांधींना भारतरत्न दिले गेले, तसले प्रकार वारंवार होणार असतील तर हा पुरस्कार न दिलेलाच बरा.

[अवांतर - रतन टाटा, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, नारायण मूर्ती , सर एडमंड हिलरी यांच्या तोलामोलाचे पद्मविभूषण कर्तृत्व श्री. प्रणब मुखर्जी यांचेही आहे; हे ऐकून 'श्रुती धन्य जाहल्या'. २००४ पर्यंत एकही प्रत्यक्ष निवडणूक न जिंकू शकलेला गांधीघराणेनिष्ठ राजकारणी असे बीबीसीने त्यांच्या कर्तृत्वाचे (किंवा त्याच्या अभावाचे) वास्तववादी वर्णन गेल्या वर्षी केलेच होते :)]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

आशा भोसले

....तसले प्रकार वारंवार होणार असतील तर हा पुरस्कार न दिलेलाच बरा.

हे पटणारेच विधान आहे. पण कसे शक्य आहे ते माहीत नाही. बाकीचे जाउंदेत, इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असतानाच स्वत:लाच हा पुरस्कार दिला होता. (कदाचीत स्वतः , "कशाला, कशाला" असे म्हणाल्याही असतील!)

आशा भोसलेंना आत्तापर्यंत कुठलाच पद्म पुरस्कार मिळाला नव्हते असे वाचले आणि प्रचंड खेद वाटला...

मला वाटत

हिंदी चित्रपटासाठी जर कोणाला भारतरत्न मिळायला हवे तर-
- पंचमदा याने आर. डी. बर्मन.
बाकी कोणी काही म्हणो - माझे तर हे ठाम मत आहे.

 
^ वर