शेअर गुरूंच्या बुवाबाजीला फसू नका.

मंडळी शेयर बाजारात सद्या घडत असलेल्या चढ-उतारावर बरेच जण आपले मत व्यक्त करत असतात. ह्यात काही अभ्यासू तर काही नवशिके, काही ज्योतिषशास्त्राचा हवाला देणारे तर काही तांत्रिक विश्लेषक वगैरे वगैरे पद्धतीने बोलणारेही असतात, त्यातच झटपट फायदा करून देतो असे सांगणारे काही तथाकथित "सबसे तेज" तज्ञही असतात. अशा वेळी सामान्य गुंतवणुकदार पार गोंधळून जातो आणि नेमके करू नये ते करून आपले भांडवल घालवून बसतो. अशा लोकांनी हा लेख जरूर वाचावा.
स्वत: अभ्यास करावा आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला प्रवृत्त व्हावे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवावी. कुणी सल्ला दिला तरी त्याची स्वत: शहानिशा करून मग अंतिम निर्णय मात्र स्वत:चाच असावा.

ह्या बाबतीत इथल्या लोकांची मते जाणून घ्यायला आवडतील.

Comments

गुरुमहाराज

गुंतवणुक गुरु, मॆनेजमेंट गुरु, अध्यात्मिक गुरु यांचे पेव फुटले आहे कारण गरज मानसिक आधाराची. पुण्यात एका तांत्रिक विश्लेषण करणार्‍या कंपनीने गणेश कला क्रिडा मदिरात एक भरगच्च कार्यक्रम केला त्यात एक गोंधळलेला गुंतवणुकदाराची मनस्थिती दाखवणारी एकांकिका सादर केली होती. खुपच सुंदर केली होती. यातूनच फाईव्ह स्टार गुंतवणुकदार शिष्य मिळतात. त्यांना मी विरोपाने कळविले कि आपणाला मी गुरु करतो पण मी चिकित्सक शिष्य आहे. आपण तयार आहात काय? पुढे मात्र त्यांचेशी संपर्क होउ शकला नाही. ( आमच्यासारख्या लोकांना वेळ द्यायला ते थोडेच बांधिल आहेत)
प्रकाश घाटपांडे

 
^ वर