उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तर्कक्रीडा: ५६: नाथांच्या घरची खुण
यनावाला
January 14, 2008 - 8:58 am
सोमनाथ,मंगलनाथ, बोधिनाथ आणि गुरुनाथ हे पुण्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या चार पेठांत राहातात.यांपैकी कोणीही दोन किंवा अधिक जण एकाच पेठेत राहात नाहीत.प्रत्येकाची पेठ वेगळी. आपल्या नावाशी निगडित अशा पेठेत कोणीही राहात नाहीत.
एकदा मी त्यांना काहे प्रश्न विचारले असता, मला गोंधळात टाकण्यासाठी म्हणा किंवा आणखी कशासाठी म्हणा, त्यांनी पुढील प्रमाणे विधाने केली:
*१.सोमनाथ मंगळवार पेठेत राहातात.
*२.मंगलनाथ गुरुवार पेठेत रहातात.
*३.बोधिनाथ सोमवार पेठेत रहात नाहीत.
*४. गुरुनाथ बुधवार पेठेत रहात नाहीत
*२.मंगलनाथ गुरुवार पेठेत रहातात.
*३.बोधिनाथ सोमवार पेठेत रहात नाहीत.
*४. गुरुनाथ बुधवार पेठेत रहात नाहीत
.
आमची प्रश्नोत्तरे ऐकत असलेल्या एका माहितगार गृहस्थांनी मला विश्वासपूर्वक सांगितले की वरील चार विधानांपैकी केवळ एकच विधान सत्य आहे.
.....तर सोमनाथ कोणत्या पेठेत रहातात?
दुवे:
Comments
क्षमायाचना
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शीर्षक : तर्कक्रीडा: ५६ असे हवे.कृपया टंकदोष सुधारून घ्यावा.
मागच्या कोड्याचा क्रमांक ५७ असला तरी क्र. ५६ अनवधानाने वगळला गेला होता.
उलटी (गिनती)
व्यनी पाठवला...
मीही
उत्तराचा व्य. नि. पाठवला आहे
--अदिती
व्यनि. उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्रीं. नंदन आणि श्री. महेश हतोळकर या दोघांची उत्तरे अचूक आहेत. श्री. नंदन यांनी पर्याप्त युक्तिवाद लिहिला आहे. तो कोणालाही सहज पटण्यासारखा आहे.
श्री.महेश हतोळकर यांचे उत्तर तर परिपूर्णच आहे.
नाथांच्या घरची उलटी खूण
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सोमनाथांचे घर कोणत्या पेठेत आहे ते श्री विसुनाना यांनी अचूक शोधले आहे. मात्र त्यांनी युक्तिवाद लिहिला नाही.(तसा तो थोडा लांबतोच.)
...............................................
श्री. विसुनाना लिहितात ;"'उलटी' खूण म्हणजे नक्की काय हो,
अर्थ पूर्वी ऐकला होता पण आता विसरलो.''
**
या संदर्भात मला एक ओवी पुसटशी आठवते ती अशी:
.
बाई उलटीच खूण |
श्रीहरी भरी पाणी,
तिथे पाणक्या होऊन ||
.....
एकनाथांच्या घरी स्वतः देव पाणी भरत होता अशी एक कथा आहे.
खरे तर भक्ताने देवाची सेवा करायची. पण इथे देवच भक्ताघरी पाणक्या म्हणून राबत आहे. हे उलटे लक्षण. उलटी खूण.
...
पूर्वी मोठ्या घरांत पाणक्या म्हणून एक गडी असे. त्याचे काम म्हणजे विहिरी वरून पाणी आणून घरातील मोठमोठे हंडे भरणे. पाणक्याला चेष्टेने "घागरगडचा सुभेदार '' असेही म्हणत
व्यनि. उत्तरे (चालू)
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी आणि मनिमाऊ "सोमनाथ कोणत्या पेठेत राहातात? ''
या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. मात्र दोघांनीही ''का?'' ते लिहिले नाही.
आणखी व्य नि उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. भटका, श्री. विनायक आणि श्री. दिगम्भा हे तिघेही सोमनाथांचा अचूक पत्ता शोधण्यात यशस्वी ठरले आहेत.
श्री. विनायक यांनी पूर्ण युक्तिवाद लिहिला आहे. श्री. भटका यांनीही योग्य विवेचन केले आहे.
व्य. नि. उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मुक्तसुनीत यांनी सोमनाथांचे घ्रर कोणत्या पेठेत ते नेमके शोधले आहे.तसेच इतर तिघांनाही नियमांनुसार पेठा दिल्या आहेत.
शेवटचे उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तो यांनी चारही नाथांच्या घरच्या खुणा अचूक ओळखल्या आहेत.त्यांचे उत्तर बरोबर आहे.
नाथांच्या घरची खुणः उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. महेश हतोळकर यांनी पाठविलेले उत्तर असे :--
"सोमनाथ गुरुवारपेठेत राहतात."
तर्कः
१. कोणीही आपल्या नावाशी निगडीत पेठेत रहात नाहित म्हणून
सोमनाथ सोमवार पेठेत रहात नाहीत
मंगलनाथ मंगळवारात रहात नाहीत
बोधिनाथ बुधवारात रहात नाहीत
गुरुनाथ गरुवारात रहात नाहीत
२. जर सोमनाथ मंगळवारात रहातात हे सत्य मानले तर
मंगलनाथ गुरुवारात रहात नाहीत
बोधिनाथ सोमवारात रहातात
गुरुनाथ बुधवारात रहातात
पण हे शक्य नाही कारण मंगलनाथांना रहाण्यास जागाच नाही. म्हणून
सोमनाथ मंगळवारात रहात नाहीत.
३. याच न्यायाने मंगलनाथ गुरुवारात रहातात हे विधानही असत्य आहे म्हणजेच मंगलनाथ गुरुवारात रहात नाहीत.
४. जर बोधिनाथ सोमवारात रहात नाहित हे सत्य असेल तर
सोमनाथ मंगळवारात रहात नाहीत -- हे वर सिद्ध झालेले आहे.
मंगलनाथ गुरुवारात रहात नाहीत -- हे वर सिद्ध झालेले आहे.
गुरुनाथ बुधवारात रहातात.
आत्तापर्यंतच्या सर्व सिद्ध विधानांचा आणि या विधानातील शक्यतांचा एकत्रित विचार केला तर
सोमनाथ गुरुवारात रहातात
मंगलनाथ सोमवारात रहातात
बोधिनाथ मंगळवारात रहातात
गुरुनाथ बुधवारात रहातात.
फारच लांबण आणि तरी उत्तर अपुरे.
दुसरे उत्तर:
सोमनाथ गुरुवार पेठेत;
मंगलनाथ बुधवारात;
बोधिनाथ सोमवारात;
आणि गुरुनाथ मंगळवार पेठेत. --;वाचक्नवी