तर्कक्रीडा :५७: अजापालन

एका शेतकर्‍याजवळ शेळ्यांचा कळप होता.त्या शेतकर्‍याने या अजापालन धंद्यातून निवृत्त व्हयचे ठरविले. त्याला दोन मुलगे होते. त्या दोन मुलांना आपले अजाधन अगदी समसमान वाटून द्यावे अशी त्याची इच्छा होती.पण दोन्ही मुलांना कुक्कुटपालनात अधिक रस होता.म्हणून शेतकर्‍याने शेळ्या विकण्याचे ठरविले.

त्याने शेळ्यांची संख्या मोजली. त्यासंख्येच्या दहापट प्रत्येक शेळीची किंमत या प्रमाणे सर्व शेळ्या विकल्या.आलेल्या रकमेतून त्याने शंभर रुपयांना एक या भावाने अधिकात अधिक येतील तेवढ्या कोंबड्या खरेदी केल्या.काही रुपये उरले त्यांचे एक बदक विकत घेतले

.

त्या सर्व कोंबड्या त्याने आपल्या दोन मुलांत समसमान वाटल्या. तेव्हा एक कोंबडी उरली. ती त्याने कनिष्ठ पुत्राला दिली.तर बदक ज्येष्ठ पुत्राला दिले.

....आता धाकट्याने मोठ्या भावाला किती रुपये द्यावे म्हणजे त्या बंधुद्वयात अजाधनाची विभागणी अगदी समसमान होऊन वडिलांच्या इच्छेची परिपूर्तता होईल?
.............................................................................
कृपया उत्तर व्यनि. ने.
................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

अजापालन : उत्तर

माफ करा मित्रहो. चुकून प्रतिसाद दिला.

अजापालन्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पूर्णवर्ग संख्यांच्या सर्व लक्षणांचा विचार केला तर कोडे सहज सुटू शकेल.
श्री. महेश हतोळकर यांनी निम्मे कोडे सोडविले आहे. पुढचा विचार अजून व्हायचा आहे.

अजापालन :उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक यांनी या कोड्याचे अचूक उत्तर शोधण्यात यश मिळवले आहे. त्यांची रीत पुष्कळ लांबली. पण शेवटी त्यांना उत्तर गवसलेच.त्यांचे विशेष अभिनंदन !

गणिताची आवड

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. महेश हतोळकर यांना गणित विषय प्रकर्षाने आवडतो असे दिसते. पहिल्या प्रयत्नात जमले नाही तरी त्यांनी कोड्याचा पिच्छा सोडला नाही. बदकाची किंमत किती ती त्यांनी काढली आहे. आता केवळ शेवटचे उत्तर कळविण्याची औपचारिकता उरली आहे.

अजापालनःव्य नि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. वाचक्नवी यांनी शोधलेले उत्तर बरोबर आहे.
तसेच श्री. अमित कुलकर्णी यांनीही उत्तर पाठविले आहे. अंतिम उत्तर काढताना अनवधानाने एक चूक झाली असली तरी त्यांचे उत्तर बरोबर आहे असे मानणेच योग्य होय.

प्रयत्नपूर्वक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री. मुक्तसुनीत यांनी प्रयत्नांन्ती अचूक उत्तर शोधले आहे.त्यांचे प्रयत्न आणि युक्तिवाद प्रशंसनीय आहेत.

आणखी दोन उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. परीवश आणि अदिती यांनी उत्तरे पाठविली आहेत.दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.

मौखिक कोडे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अद्यपावेतो सात सदस्यांनी कोड्याचे उत्तर पाठवले. सर्वांचे अंतिम उत्तर बरोबर आहे. मात्र अपेक्षित ती रीत कोणी वापरली नाही. वस्तुतः कोडे तोंडी सोडवण्यासारखे आहे. लेखी आकडेमोडीची आवश्यकता नाही. कोडॅ पूर्णवर्ग संख्याच्या लक्षणांवर आधारित आहे.
श्री. अमित कुलकर्णी यांनी त्या लक्षणाचा ओझरता उल्लेख केला आहे. मात्र त्याचा परिणामकारक वापर केला नाही.

अजापालनः उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पूर्णवर्ग संख्येच्या एककस्थानी जर सहा(६) हा अंक असेल तर,आणि केवळ तरच,त्या संख्येच्या दशकस्थानी विषम अंक असतो.
याचाच अर्थ असा की पूर्णवर्ग संख्येचा दशकांक जर विषम असेल तर तिचा एककांक ६ च असला पाहिजे. अन्य कोणताही असणे शक्य नाही.
****
या कोड्यात शेळ्या विकून आलेली रक्कम पूर्णवर्ग संख्येच्या दहा पट. तिला १०० ने भागल्यावर आलेल्या संख्येचा पूर्णांक भाग म्हणजे कोंबड्यांची संख्या. ती विषम. म्हणजे वर्गसंख्येचा दशकांक विषम. म्हणून एककांक सहा. म्हणून ६० रु. उरले .ती बदकाची किंमत. म्हणून धाकट्याला ४० रु अधिक मिळाले. म्हणून त्याने त्यातील निम्मे म्हणजे २० रु. थोरल्या भावाला द्यावे.

 
^ वर