कॉल ऑफ ड्यूटी : मॉडर्न वॉरफेअर
![]() |
हॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांना मागे टाकणारे आजकालचे कम्प्युटर/एक्स् बॉक्स/ पी एस् टू खेळ बघितले, की हा करमणुकीचा विभाग आता 'पोरखेळ' राहिलेला नाही ह्याची प्रचिती येते. चित्रपट माध्यम कितीही करमणूक प्रधान असलं तरी प्रेक्षक हे प्रेक्षकावस्थेतच त्याची मजा लुटू शकतात. संगणकीय खेळांमध्ये मात्र कथानकाचे तुम्हीच नायक आणि तुमच्या इशर्यावर सगळ्या घटना घडतात. ही मूलभूत संकल्पनाच ह्या खेळांच्या निर्विवाद यशामध्ये आहे. तसेच एखादा चित्रपट तुमची फार फार तर २-३ तास करमणूक करू शकतो पण हे संगणकीय खेळ मात्र कितीतरी अधिक पटीने (कधी कधी ६० ते ७० देखिल) तासांचे मनोरंजन घेऊन येतात. अर्थातच त्यांमुळे कितीतरी घरांमध्ये आजकाल लहान मुलांपेक्षा त्यांचे आईवडीलच एक्स बॉक्स/निटेंडो ह्यांची मजा लुटताना दिसतात. 'इलेक्ट्रिनिक आर्टस्' 'ऍक्टीव्हिजन' वगैरे स्टुडीओजना युनिव्हर्सल, वॉर्नर ब्रदर्स अश्या प्रथितयश हॉलिवूडच्या स्टुडिओंइतकेच वलय लाभले आहे.
कॉल ऑफ ड्यूटी : मॉडर्न वॉरफेअर हा संगणकीय खेळ ऍक्टीव्हीजन ह्या स्टुडिओची चौथी आवृत्ती आहे. आता पर्यंतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये दुसर्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती . ह्या नव्या आवृत्तीत मात्र समावेश केला आहे आधुनिक जगतातील युद्धांचा. युद्धस्य कथा रम्य!! थरार साहस वीररस असल्या गोष्टी ठासून भरलेल्या असल्याने युद्धाशी निगडित कथा/ चित्रपट आपण नेहमीच आवडीने पाहतो. मॉडर्न वॉरफेअरच्या मनोरंजनाचे रहस्य देखिल हेच आहे. तीन अंकांमध्ये विभागलेले कथानक हे पूर्णपणे काल्पनिक असले तरी अतिशय वेगवान आहे. पहिला अंक इराक सदृश काल्पनिक देशात घडतो जिथे तुम्ही अमेरिकेच्या मरीन्स शाखेमध्ये भरती होऊन जाता. दुसर्या अंकात पूर्व युरोप मधील काल्पनिक मिशन्स मध्ये ब्रिटनच्या स्आस् चे प्रतिनिधित्व करता. दोन्ही अंकांचा शेवट तिसर्या अंकात होतो. तिनंही अंकामध्ये थरार वीररस साहस ठासून भरले आहे. जमिनीवरून शत्रूशी लढाई, लपून केलेला गनिमी कावा, विमानातून बॉम्बींग हे सगळे भरपूर अनुभवायला मिळते. निरनिराळ्या बंदुका, रणगाडे, विमाने,ग्रेनेड्स हे मनसोक्त हाताळायला मिळते. डिजीटल तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे ग्राफिक्स इतके वास्तवदर्शी झाले आहे की बर्याच प्रसंगांमध्ये ते रोमांच उभे करते. त्याचबरोबर नेमके पार्श्वसंगीत आणि अल्फा चार्ली टँगो असल्या भाषेत चालणारे संभाषण ह्या दोन गोष्टी वातावरण निर्मिती इतकी अचूक तयार करतात की खेळताना आपण पूर्णपणे गुंगून जातो.
हे सगळे व्यवस्थित चालण्यासाठी तुमचा संगणक मात्र चांगलाच ताकदीचा असला पाहिजे. बर्यापैकी नवा प्रोसेसर, २ जी बी रॅम आणि जी फोर्स ७६०० ला समांतर तोडीचा ग्राफिक्स प्रोसेसर कमीत कमी असला पाहिजे. इतकी सामुग्री जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला ह्या मॉडर्न वॉरफेअर चा अप्रतिम अनुभव घेता येईल.
![]() |
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा



झकास
माझ्या आवडत्या खेळाबद्दल वाचून फार आनंद झाला पण मॉडर्न वॉरफेअर साठी २ जी बी रॅम आणि जी फोर्स ७६०० ला समांतर गलागते हे ऐकून वीरस झाला. १जीबी रॅम नाहि का हो चालणार ;)
बाकी हा काय किंवा कमांडोज काय असे "स्ट्रॅटेजी" वर आधारीत खेळ खेळणे फारच मस्त असते. :)
-ऋषिकेश
धन्यवाद
अभिप्राया बद्दल धन्यवाद ऋषीकेश!
मिनिमम रिक्वायरमेंट बहुदा १ जी.बी रॅम असावा. वरती दिलेले आकडे हे मी माझ्या संगणकाचे आहेत.. आणि मला सेटींग्ज् बरेच लो करून खेळावे लागले होते.. त्यामुळे बर्यापैकी खेळणेबल अनुभव घेण्यासाठी २ जीबी रॅम तरी असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे.
मॉडर्न वॉरफेअर (आणि सगळेच कॉल ऑफ ड्युटी) हे 'फर्स्ट पर्सन शूटर' विभागात येतात.. 'स्ट्रॅटेजी' विभागातले खेळ जास्त आवडत असतील तर कदाचीत थोडासा विरस होऊ शकतो.
छ्या !!
२ जीबी रॅम !! @#@#@@@# !! गड्या आपला प्याक् म्यान बरा ! हाहाहा ....
कोलबेर तुमचा लेख बाकी आवडला ;-)
वा!
मस्त लेख. विषय जिव्हाळ्याचा असल्याने जास्त आवडला. मी डूम ३ च्या नंतर लढाईचे गेम्स खेळलेलो नाही. नंतर एज ऑफ एम्पायर्स हाती लागला आणि माझ्या आयुष्याचा बराच काळ त्यात गेला. शेवटी जेवण, झोप अशा अत्यावश्यक गोष्टींकडेही दुर्लक्ष व्हायला लागले तेव्हा "दाउ शॅल नॉट प्ले कॉम्पयुटर गेम्स" अशी कमांडमेंट स्वतःवर लागू केली आणि जड अंतकरणाने अनइन्स्टॉल केला. :) अजूनपर्यंत ती कमांडमेंट अबाधित आहे.
माझ्याकडे २ जीबी रॅम आहे पण बरोबरीला व्हिस्टा आहे त्यामुळे आपोआप १ जीबी होत असावे.
अवांतर : लेख वाचून एक वाक्य आठवले, "And lead me not into temptation - I can find it myself!" ;)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
खी खी
खी खी:)).. असं सगळ्यांच्या बाबतीतच होतं का? आम्ही चार मित्रांनी आशी एन् एफ् एस् सोडताना नंतर एज ऑफ एम्पायर्स सोडताना अश्याच प्रतिज्ञा घेतल्या होत्या ;)
माहिती
माहिती चांगली आहे. पण आपल्याला बॉ या विषयातलं काहीच नाही कळत. कॉलेजात असताना इलेक्ट्रॉनिक खेळ खेळायचो पण खूप वेळ जातो आहे असे लक्षात आले आणि बंद केला. आजूनपर्यंत अशा खेळांना हात लावला नाही.
आपला,
(अ़ज्ञानी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
धन्यवाद
भास्करराव,
मधल्या काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमूळे ह्या खेळांच्या स्वरूपात आता अमुलाग्र बदल झाला आहे. एकदा ट्राय करुन बघाच!