उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
सुताची गुंडी
यनावाला
December 29, 2007 - 9:09 am
प्लॅस्टिक पिशव्यांच्या सुळसुळाटापूर्वी दुकानांत कागदी पुड्यांत बांधून माल देत असत.(अशा पुडीला गुंडाळ गुंडाळ दोरा गुंडाळणारा 'गुळाचा गणपती' मधील अण्णांच्या दुकानातील नारायण आठवा )."आहे मनोहर तरी..."च्या लेखिका लिहितात :
"...पुडीचा दोरा मी टा़कून देत नसे. कधी उपयोगी पडेल म्हणून या दोर्यांची गुंडी करून ठेवत असे...."
रीळ अथवा अन्य कोणत्याही वस्तूचा वापर न करता केवळ दोर्यावर दोरा गुंडाळून गुंडी करता येते.योग्य दक्षता घेतल्यास घट्ट आणि पूर्ण गोलाकार गुंडी होऊ शकते.
समजा अशा पूर्ण गोलाकार(स्फेरिकल)गुंडीचा व्यास साडेसात सेंटीमिटर आहे.दोर्याची जाडी (व्यास) अर्धा मि.मि.आहे.तर त्या गुंडीतील सुताची एकुण लांबी किती भरेल ? दोरा सलग आहे, मधे गाठी नाहीत. गुंडीत दोर्याशिवाय काहीच नाही.सूक्ष्म पोकळीही नाही. दोरा नम्य(फ्लेक्झिबल) असला तरी तन्य(एक्टेंसिबल) नाही; असे मानावे.

दुवे:
Comments
सुताची गुंडी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री.अमित कुलकर्णी यांनी या प्रश्नाचे उत्तर पाठविले आहे.
ते अचूक आहे.
श्री.धनंजय यांनी पाठविलेले उत्तर बरोबर आहेच.
सुताची गुंडी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे अचूक उत्तर शोधण्यात प्रीती दी यांना यश मिळाले आहे.
सुताची गुंडी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या प्रश्नाचे अचूक उत्तर श्री. वाचक्नवी यांनीही पाठविले आहे.
आणखी दोन उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती तसेच श्री. विनायक यांनी या कोड्याची बरोबर उत्तरे पाठविली आहेत.