बेनझीर भुट्टो

बीबीसीवरील बातमी. : http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7161590.stm
पाकिस्तानच्या कोट्यावधी लोकांकरता आनि एकूणच उपखंडातील शांतिकरता मला प्रार्थना करावीशी वाटते. '८४ आणि '९१ च्या अंगावर शहारा आणणार्‍या आठवणी येतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

दुर्दैवी

बेनझीरची हत्या ही खरेच दुर्दैवी आहे. मला पण वर आपण म्हणल्याप्रमाणे ८४ आणि ९१ ची आठवण झाली. फरक इतकाच आहे की तेंव्हा कितीही गेलेल्या नेत्यांबद्दल वाईट वाटले असले आणि ८४ मधे शिखांना ज्या प्रकारे मारले गेले ते खटकले असले तरी, एकंदरीत भारतातील "कलेक्टीव्ह लोकशाही" वर विश्वास होता. त्यामुळे "राम-कृष्ण ही आले गेले" या व्यतिरीक्त देश चालू शकला (किंबहूना अजूनच विकसित आणि व्यक्तीस्वातंत्र्य असलेला झाला).

आज पाकीस्तानात जे काही झाले आहे त्याचे लोकशाहीच्या अभावामुळे असलेले परीणाम त्यातच एका बा़जूस अल कायदा असल्यामुळे काय होऊ शकतात हे समजत नाही. आज तेथे "लोकशाही संस्था" अस्तित्वात नसल्यातच जमा आहेत. लष्कराचा प्रभाव प्रचंड आणि त्यांच्या हातात सर्व एकवटलेले अणूशक्तीसकट सैन्यबळ आणि अलकायद्याशी असलेले संबंध - याचे "रिपलींग इफेक्ट्स" भारतावर काय होऊ शकतात ह्याची काळजी घेणे अतिशय मह्त्वाचे वाटते.

बाकी टाईम्स ऑफ इंडीयात सुरवातीला आलेल्या बातमी प्रमाणे बेनझीर या हल्ल्यतून थोडक्यात बचावली होती, तीच्या पार्टीच्या एका प्रवक्त्याने सांगीतल्याप्रमाणे देवाच्या दयेने ती वाचली (तीची गाडी लांब गेली आणि मग बाँब स्फोट झाला) असे लिहीले आहे. हे जर आधी सांगीतले गेले तर मग अचानक तीला मारल्यानंतर बाँबस्फोट झाला आशी बातमी कशी तयार झाली? हा दुवा पहायचा प्रयत्न करा. कदाचीत तो नंतर ते काढून ही टाकतील. त्यातील शेवटची वाक्ये अशी आहेतः

PPP spokesperson Farahtullah Babar said Bhutto's vehicle was about 50 metres away from where the blast occurred.

"She had just crossed the gate when we heard a deafening sound. We could feel its impact but by the grace of God she is safe," he was quoted as saying.

Bhutto had survived an attempt on her life when two explosions ripped though her homecoming rally in Karachi on October 18, killing more than 140 people.

टॅब्लॉईड्

...ची बातमी मीसुद्धा वाचली होती. अनेक तास उलटून गेल्यानंतरही त्यानी आपला कचरा साफ केला नव्हता.

काही शक्यता

असे म्हणतात की, देशाच्या सगळ्यात अंधःकारमय क्षणांमधेच त्या देशाचे चारित्र्य (कॅरॅक्टर) ठरते. पाकिस्तानकरता हा क्षण कसोटीचा, यात शंका नाही. विकासरावानी सांगितलेला "कलेक्टीव्ह लोकशाही"बद्दलचा विचार अगदी मार्मिक आहे. इंदिरा आणि राजीव गांधी या दोघांच्या निधनानंतर देशातील काही भागात हिंसाचार माजला, हत्याकांडे घडली हे खरे , पण कितीही तुटकीफुटकी का होईना, पण लोकशाही जागृत राहिली. तुम्ही शांती आणि लोकशाही व्यवस्थेला संधी द्या , केव्हातरी त्यातून काहीतरी योग्य घडेल ; जितका काळ मुस्कटदाबी कराल तितकी दशके देशाला तुम्ही मागे लोटाल. पाकिस्तानमधील नेतृत्वाला याचा केव्हातरी साक्षात्कार होईल अशी आशा करतो.

अवघड

पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या अत्यंत अवघड झाली आहे. लोकशाही येण्याचा एक मार्ग दिसत होता तोही आता जवळपास अशक्य वाटतो. रावळपिंडी हे पाकिस्तानमधील सर्वात सुरक्षित शहर आहे. तिथे इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक प्रमाणात गुप्तहेर यंत्रणा आहे. अशा परिस्थितीत जर बेनझीर सुरक्षित राहू शकत नसतील तर तिथे निरपेक्ष निवडणुका होउन लोकशाही नांदेल ही अपेक्षा करणे व्यर्थ वाटते.
विकास यांनी दिलेला दुवा फारच आश्चर्यकारक आहे. मी जेव्हा बीबीसीवर पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्यांच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर आत्मघाती अतिरेक्याने स्फोट केला अशी बातमी दिली होती. गोळी त्यांच्या मानेत लागली होती.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

निकट आणि दूरगामी

लोकशाही प्रक्रिया लगेच कार्यन्वित होईल किंवा व्हावी असे मला बिलकुल म्हणायचे नव्हते. सध्या ते निव्वळ अशक्यच आहे. पण पाकिस्तानात होते काय, की एकदा लष्करशहा गादीवर बसले की वर्षानुवर्षे राहातात. लोकशाही, निवडणुका, बहुपक्षीय व्यवस्था, लोकांचे प्रश्न , आर्थिक विकास या सर्वाना अनेक वर्षे बासनात बसावे लागते. जितक्या लवकर सूत्रे लोकशाहीप्रक्रियेकडे वळवावी, तितक्याच लवकर आशेचे किरण दिसणार. केव्हातरी मूलभूत तत्वांकडे वळायची वेळ येतेच. ती वेळ टाळत राहिले की दशकानुदशके उलटतात, आणि देश कर्दमात रुतत राहतो.

खरे तर हे बोलायची ही वेळ नाही ; पण यादवी युद्ध, आण्विक अस्त्रे , त्या अस्त्रांचे नियंत्रण या संबंधीचे विचार डोक्यात गोळा होतात आणि भारतावर त्याच्या होऊ शकणार्‍या परिणामाच्या नावाने छातीचा ठोका चुकतो.

पाकिस्तानला कसोटीचा, आणि सर्वांना काळजीचा क्षण

पण याचा परिणाम काय होईल तो विचार करताना मती पूर्णच दिङ्मूढ झालेली आहे.

राजीव गांधीच्या हत्येचे उदाहरण (एका थोड्याफार भ्रष्ट पण लोकप्रिय नेत्याची निवडणुकांपूर्वी हत्या) थोडेसे लागू असले तरी मुख्यतः गैरलागू आहे (कारण भारतात आणिबाणी नव्हती आणि इनमिनतीन राज्ये सोडता अराजक नव्हते).

बांगलादेश युद्धापूर्वीचे पाकिस्तानातील अराजक वेगळ्या प्रकारचे होते, पाकिस्तानच्या फाळणीने ते सुटण्यासारखे होते (पाकिस्तान्यांना ते दु:खद का वाटेना...) पण यंदाचे अराजक कसे स्थिरावे? आजचे भांडण प्रांता-प्रांतांतले वैर्य नाही. मुल्ल्यांच्या विजयाने तर स्थैर्य नाही येणार, असे वाटते, पण ती शक्यता नाकारता येत नाही. उदा. ईरानमध्ये मुल्ल्यांच्या विजयाने स्थैर्य आले. (नैतिकता बाजूला सोडली तर) सैन्याच्या पूर्ण लष्करशाहीने इतिहासात पाकिस्तानात स्थैर्य आले असल्याची उदाहरणे आहेत, पण यंदा त्या दिशेने खूप प्रयत्न करूनही मुशर्रफ यांना या बाबतीत साफल्य मिळालेले नाही. मग येथे पुढे काय होणार आहे?

पाकिस्तानातल्या वणव्याची धग जगभर पोचेल, असा वांझ विचार मात्र मनात येतच आहे.

वणव्याची धग

पाकिस्तानातल्या वणव्याची धग जगभर पोचेल, असा वांझ विचार मात्र मनात येतच आहे.

सर्वात प्रथम ही धग कशाला बसली तर जागतीक क्रूडतेलाच्या भावाला. ते लगेच वाढले! व्यापार्‍यांना आहे त्या गोष्टीचा फायदा कसा करून घेयचा हे चांगले समजते..

स्वतः अस्थीर झाल्यावर भारतावर कुरघोडी करण्याची सवय पाकीस्तानी नेतृत्वाला पाकीस्तानच्या जन्मापासून आहे. आता जागतीक मोहरा बदलला असल्याने तसे प्रकार सरळ सरळ होण्याची शक्यता वाटत नाही. पण गेले काही महीने अमेरिकन दबावामुळे कदाचीत, पण वेसणाने बांधून ठेवलेल्या अतिरेकी शक्तींना स्वतःच्या मागची कटकट सोडवण्यासाठी म्हणून भारतात लक्ष घालायला परवानगी देण्याची शक्यता आहे. त्याला उत्तर देणे म्हणजे संपूर्ण "मोडस ऑपरंडी" असलेल्या यंत्रणेने आणि राजकीय शक्तींनी डोळ्यात तेल घालून केवळ देशहीत पाहाण्याची.

म्हणून आज गरज आहे ती एका कणखर नेतृत्वाची. लालबहाद्दूर शास्त्री अथवा इंदीरागांधी पाकीस्तानची आक्रमणे यशस्वीरीत्या परतवून लावली कारण त्यांनी काँग्रेसचे असूनही त्यावेळेस देशाचाच विचार केला. युद्ध हे धर्माविरुद्ध नव्हते तर देशाच्या शत्रूविरुद्ध होते ह्या विचारतील "क्लॅरीटी"मुळे. आज पाकीस्तानबद्दल असे बोलले की देशातल्या मुसलमानांना काय वाटेल, मेडीया काय म्हणेल याचीच जास्त काळजी...

येणारा काळ जितका पाकीस्तानची परीक्षाबघणारा ठरणार आहे तितकाच तो भारतीय जनतेच्या आणि नेतृत्वाची परीक्षा बघणारा पण ठरणार आहे असे वाटते.

शब्दलेखन

श्री. धनंजय,

आजचे भांडण प्रांता-प्रांतांतले वैर्य नाही

आपल्याला वैर असे लिहायचे आहे वाटते. वैर्य हा शब्द चुकीचा आहे असे दर्शवू ईच्छितो.

कलोअ,
सुभाष

नवीन शब्द घडवला त्याची आवश्यकता नव्हती, धन्यवाद

"वैर" आणि जो अर्थ मला वापरायचा होता त्यात अर्थच्छटांचा बारीक फरक आहे. पण त्यासाठी नवीन शब्द घडवण्याची काही गरज नव्हती हे मान्य. प्रचलित "वैरित्व/वैरिता" किंवा "वैरीभाव" शब्द चालले असते. धन्यवाद.

यादवी

ही बातमी धक्कादायक आणि चिंताग्रस्त करायला लावणारी आहे. केवळ पाकिस्तानलाच नाहि पण आपल्यालाही!
अश्या बातम्या आहेत की पाकिस्तानात अपेक्षेप्रमाणे दंगली सुरु झाल्या आहेत. जर या दंगलींचे पर्यवसन समाजकंटन संघटित यादवी मधे करू शकले तर पुढील परिणाम दिसतात
१) देश आणि पर्यायाने अण्वस्त्रे समाजकंटंकाच्या हातीजाणे. यावर अधिक विचारही थरकाप उडवतो.
२) देशाचे तुकडे. तसाही अफगाणिस्तान जवळचा बलुचीबहुल प्रांतावर पाकिस्तानचे नियंत्रण राहिलेले नाहि. त्यांनी जर या यादवीतून वेगळा देश स्थापन करून अण्वस्त्रांवर हक्क सांगितला तर आअश्चर्य वाटायला नको पण काळजी मात्र् करण्यासारखी गोष्ट आहे.
३) जर अमेरिकेने याचा फायदा घेऊन दुसरे इराक घडवले तर एक महाशक्ती आपल्या परसात येऊन पोहोचली असेल :(

थोडक्यात झाले हे केवळ पाकिस्तानच्याच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने चिंताक्रांत करायला लावणारे आहे.

(भुत्तोंच्या अश्या जाण्याने वाईट वाटणारा सचिंत) ऋषिकेश

अपेक्षीत हत्या

पाकिस्तानात ही हत्या अपेक्षीत होती. त्यात नवल नाही वाटले. पण वाईट वाटले. लोकशाही आणण्याचा थोडाफार करिश्मा भुट्टोंमध्ये होता. तरी ही, मुशर्रफ यांच्या हुकुमशाहीत लोकशाहिचा पुनर्जन्म होणे केवळ अशक्य आहे. तिथे हे घडवुन आणलेले गर्भपात होणारच. मला वैयक्तिकरित्या यात असेच दिसते कि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुशर्रफ यांची प्रतिमा थोडीफार धुण्यासाठी या लोकांचा उपयोग केला जात आहे. बाकि याचे परिणाम आत्ता दिसणार नाहीत. भारताने सर्व प्रकारे सतर्क रहावे हेच काय ते आपण समजावुन घेणे योग्य आहे.
राजकिय हत्या हा एक गुढ पण सार्वजनीक विषय आहे. आपल्या येथे सुद्धा शास्त्रीजी, नेताजी, संजय गांधी, राजेश पायलट, माधवराव शिंदे यांचे विमान अपघतातच निधन झाले आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची उघड हत्या झाली. त्याचा फायदा कॉग्रेसला वेळोवेळी झाला आहे. आज हि कॉंग्रेस त्याच दिशेने जात आहे.
फरक एवढाच आहे कि पाकिस्तानात कट्टरवादी आहेत आणि आमच्याकडे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आणि स्वतःला लोकशाहीचे रखवालदार म्हणवुन घेणारे आहेत. जे इतरांना हुकुमशहांचे वंशज म्हणतात.
भारत दहशतवाद सहन करत आला आहे. का? हा एक मोठा प्रश्न आहे. पाकिस्तान दहशतवाद पोसत आला आहे. आता सर्वत्र तोच असल्याने त्याची चव अशी चाखायला लागणारच. एक मानवतावादी म्हणुन या सगळ्या बद्दल वाईट वाटते. पण पेराल तसे उगवते हे मात्र आम्ही पाहतो आहे.

अवांतरः आता फक्त पुढचा नंबर कोणाचा? आणि अमेरिकेचा हल्ला कधी? हेच काय ते पहायचे.





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

वाईटातील चांगले

.... या न्यायाने मुशर्रफ हेच "बेस्ट बेट्" आहेत असे मानायला प्रत्यवाय नसावा. यादवी आणि गोंधळापेक्षा मुशर्रफ यांची धूर्त परंतु स्थिर राजवट या घडीला सगळ्यांच्या हिताची ; नाही का ? प्रश्न आहे तो सत्तेमधे अपेक्षित आणि रास्त कालावधीपेक्षा जास्त ( "ओव्हरस्टेयिंग द वेलकम्") राहण्याचा.

उलाघालीच्या या प्रसंगी एकूणच धर्म आणि सत्तेचे असणारे विभाजन , ते विभाजन न केल्याने एकूण सर्व संस्थांवर - आणि त्यात धर्मसंस्था आल्याच - होणारे अनिष्ट परिणाम, त्याची हिंसाचारात होणारी परिणती आणि त्याचे असे हत्यांमधे होणारे पर्यवसान या सर्वांबद्दल विचार आल्याशिवाय राहावत नाही. पाकिस्तानने आपली प्रतिमा जरी "प्रागतिक मुस्लिम राज्य" (प्रोग्रेसिव्ह् मुस्लिम स्टेट्) अशी मिरवण्याचा प्रयत्न केला असला तरी शेवटी "धर्माधिष्ठीत राष्ट्रसंकल्पना आणि राजवट" या मूलभूत वदतोव्याघाताचेच हे सारे परिणाम आहेत असे म्हणायला लागते. हे म्हणजे तुमची सुरवातच जर चुकीच्या दिशेने झाली असेल तर एकूण प्रवास कितीही वेगाने आणि दमाने केला तरी चुकीच्याच मुक्कामाला येऊन पोचायचे तसे झाले.

याचा फायदा आपण घेतला तर !

खरे तर परवेझ साहेबांचा असा शेवट होईल असे आम्हाला वाटत होते, पण हे जरा अनपेक्षीत वाटले. तसे दोन महिन्यापुर्वी त्याच्यावर हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यातून त्यांनी तेव्हा काही नावेही घेतली होती. याचा अर्थ त्या इथे सुरक्षीत नाही. असे असुनही त्यांनी काळजी घेतली नाही असे वाटते. हुकूमशाहीतला एक अडथळा म्हणुन बेनझीरला संपवणे असाच तो भाग असेल. वरील चर्चेतील एक भाग म्हणजे पाकिस्तानातील यादवी आणि अमेरिका आता काय करेल .( आपल्यासोबत तर येणारच नाही ) खरे तर याचा फायदा आपण जम्मु काश्मिरातील दहशतवाद्यांना 'वरती 'पाठवायची संधी म्हणुन घ्यावा आणि आपण पाकव्याप्त काश्मिरात घुसलो (ते स्वप्नात देखील शक्य नाही)आणि त्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले तर जमेल का ? की यातील आपण काहीच करु शकत नाही, हेही भारतीय म्हणुन आपले दुर्दैव !!!

विकी

विकीपिडियावर बेनझिर भुत्तो यांची माहिती लघेच अद्यावत झाली आहे. विकीचे समयसुचितेबद्दल कौतूक वाटले.

मृत्यू नेमका कसा?

मृत्यू नेमका कसा झाला ह्याविषयी एवढी अनिश्चितता संशयास्पद आहे. पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या तपासातून सत्य बाहेर येणे अशक्य वाटते आहे.

 
^ वर