तर्कक्रीडा :५४:भृगुसंहिता आणि चरकसंहिता
मजजवळ भृगुसंहितेच्या शिळामुद्रित अशा काही दुर्मिळ प्रती होत्या. तसेच चरकसंहितेच्याही काही प्रती (भृ.सं.च्या प्रतींहून ३ ने कमी) होत्या.
...हे सर्व ग्रंथ विकायचे ठरविले.त्याकरिता एक निवेदन तयार केले आणि आमच्या कार्यालयाच्या सूचना फ़लकावर लावले.त्यात प्रती किती आणि प्रत्येक ग्रंथाचे अपेक्षित मूल्य किती तेही लिहिले.प्रत्येक ग्रंथाचे मूल्य शंभर रुपयांहून अधिक आणि पूर्ण रुपयांत होते.भृ.सं.चे मूल्य च.सं.च्यामूल्यापेक्षा ५ रु. नी अधिक होते.
....सूचना लावल्याच्या तिसर्याच दिवशी एक ग्रंथप्रेमी गृहस्थ आले. त्यांनी काही घासाघीस न करता अपेक्षित मूल्यानुसार सर्व प्रती विकत घेतल्या आणि त्यांचे एकूण मूल्य एकहजार नऊशे एकोणपन्नस (१९४९) रु.माझ्या हाती रोख दिले.
तर चरकसंहितेच्या प्रती किती?
....प्रत्येक प्रतीचे मूल्य किती?
........................................................................................
कृपया उत्तर व्यनि. ने
.....................................................................................
Comments
प्रकाटाआ
प्रकाटाआ
..संहिता: पहिले उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अमित कुलकर्णी यांनी या कोड्याचे अचूक उत्तर शोधले आहे. अभिनंदन!
त्यांच्या रीतीवरून दिसते की त्यांना बरीच आकडेमोड करावी लागली असावी. पदावलीचे अवयव पाडले असते तर गणित लौकर सुटले असते.
मूल्य?
भृ.सं.चे मूल्य च.सं.च्यामूल्यापेक्षा ५ रु. नी अधिक होते.
येथे भृगूसंहितेचे एकूण मूल्य की एका प्रतीचे मूल्य?
लेखनातील त्रुटी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
****************************
"..भृ. सं.च्या प्रत्येक प्रतीचे मूल्य हे च.सं.च्या प्रत्येक प्रतीच्या मूल्यापेक्षा ५ रु. नी अधिक .." असे हवे. श्री. आ'कर्ण यांनी हे निदर्शनाला आणले.श्री.आ'कर्ण यांना धन्यवाद! आभार. लेखन नि:संदिग्ध असावे वाचकांना कोणतीही शंका येऊ नये हे योग्यच आहे.
उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी आणि श्री. विनायक या दोघांनी पाठविलेली उत्तरे अचूक आहेत. दोघांनीही प्रयत्न- प्रमाद(ट्रायल-एरर)पद्धत वापरली. मात्र ती रीत विचारपूर्वक वापरल्याने उत्तर चटकन आले.
बीजगणिती रीत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा आणि श्री. धनंजय यांनी बीजगणिती रीत वापरली. आलेल्या पदावलीचे अवयव पाडले.त्यामुळे ट्रायल- एरर पद्धत वापरावी लागली नाही. उत्तरे अर्थातच अचूक आली.
भृगुसंहिता,चरकसंहिता : उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. दिगम्भा यांनी पाठविलेले उत्तर पुढील प्रमाणे:
...................................................................................
"कोडे आवडले.#
रीतः भृ = क्ष, च = क्ष - ३; तसेच दर भृ -> य, च -> य - ५ असे मानले.
म्ह. क्षय + (क्ष - ३)(य - ५) = १९४९
म्ह. ४ क्षय - १० क्ष - ६ य = ३८९८ -> (२ य - ५)(२ क्ष -३) = ३८८३ = केवळ ११ * ३५३ आणि य >= १०५
म्ह. य = १७९, क्ष = ७
पण आपण हिंट दिल्यामुळेच इतके सोपे गेले.
अर्थात् त्याशिवायही बहुधा ही रीत सुचली असती व सोडवू शकलो असतोच.
- दिगम्भा"
..................................................................................
#
मूळ कोडे कुठल्याशा इंग्रजी पुस्तकातील आहे. मी केवळ भाषांतरित केले..यनावाला