आदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम

प्रिय हिंदुस्थानी रागदारी संगीत हिंदुस्थानी रागदारी संगीत सदस्यहो

आपल्या माहितीसाठी.

आदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दि.२७ डिसें. ला संध्याकाळी ७ वा. N C P A ने Little Theater मध्ये आयोजित केला आहे. आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण.
धन्यवाद,

आपला नम्र

मोहन खाण्डवे

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा!

आदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दि.२७ डिसें. ला संध्याकाळी ७ वा. N C P A ने Little Theater मध्ये आयोजित केला आहे. आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण.

चि. आदित्यला कार्यक्रमाकरता अनेकानेक शुभेच्छा! सवड मिळाल्यास कार्यक्रमाला यायची इच्छा आहे...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

कोण आदित्य?

श्री. खाण्डवे,

हा आदित्य कोण हे इथल्या सगळ्यांना बहुधा माहिती असेल. मला मात्र तो कोण हे अजिबात माहिती नाही. अर्थात इथे अमेरिकेमध्ये बसून् ते कळालेच पाहिजे असा काही आग्रह नाही.
इथल्या लेखात पूर्ण तपशील असावा असे सुचवावेसे वाटले म्हणून प्रतिसाद देत आहे.

कलोअ,
सुभाष

आदित्य कोण ?

प्रिय सुभाष
सर्वप्रथम त्रोटक बातमी करता क्षमस्व. आदित्य माझा मुलगा. त्याच्या वेबसाइट बद्दल ( www.adityakhandwe.com) या समूदायातच माहिती दिली होती व त्याला प्रतीसादही बराच आला. आदित्यचा कार्यक्रम मुंबइ-ठाण्यात असल्यास कळवावे अशी सुचना होती. उत्साहाच्या भरात त्रोटक माहिती दिल्या गेली.
प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

आपला नम्र

मोहन

धन्यवाद

तुम्ही आणि श्री. देव यांनी दिलेल्या माहितीवरून आदित्य हा होतकरू गायक आहे हे कळाले. त्यास माझ्यावतीने शुभेच्छा. आपल्या गुरुंची परंपरा तो यशस्वीपणे चालवू दे. तात्या इथले दर्दी आहेत. त्यांच्याकडून पावती मिळाली आहे त्यामुळे त्याला उज्वल यश नक्की आहे.

कलोअ,
सुभाष

 
^ वर