लोकमित्र मंडळ - भाग २

श्री. यनावाला यांच्या परवानगी शिवायच
लोकमित्र मंडळ चा
भाग २ येथे सुरु करत आहे!
(ड्रुपल मध्ये ५० प्रतिसादां नंतर प्रतिसाद शोधणे शक्य होत नाही या कारणास्तव भाग २ सुरु करणे भाग आहे असे वाटले.)

तेंव्हा कृपया मागील चर्चे वरीलही सर्व प्रतिसाद येथेच द्यावेत ही विनंती!

आपला
गुंडोपंत

---------------------------------------------------------------------------------
श्री. धनंजय यांचा लेख वाचून`प्रकर्षाने वाटले की हा लेख अनेकांच्या वाचनात यायला हवा. तेव्हा एक कल्पना तरळली. आता विचारान्ती ती अव्यवहार्य असावी असे वाटते. पण इथे मांडण्यात प्रत्यवाय नसावा.
गृहीतके :
*विवेकी व्यक्तीला समाजिक बांधिलकीची जाणीव असते.त्यासाठी काही करावेसे वाटते.
*सांघिकपणे अधिक चांगले आणि व्यापक कार्य होते.
*चांगल्या वाचनाने उद्बोधन आणि विचारपरिवर्तन होऊ शकते.
..म्हणून "उपक्रमाच्या" संमतीने आपण :
**एक मंडळ स्थापावे. समजा,लोकमित्र मंडळ.
**मंडळाचे एक अध्यक्ष असावे. समजा ,श्री. प्रकाश घाटपांडे.
** दोन कार्यवाह असावे. समजा, श्री. योगेश (आ'कर्ण), प्रा. डॉ. बिरुटे.
**नाममात्र शुल्क , समजा रु २००/,कार्यवाहांकडे पाठवल्यावर सभासदत्व निश्चित वावे.
कार्यपद्धती:
** महाराष्ट्रातील अग्रगण्य (जिल्हापातळी पर्यंत) नियतकालिकांची नावे, पत्ते,ई-पत्ते, इ माहिती गोळा करावी.
** निवडक नियतकालिकांच्या (दै., सा., मा.) संपादकांना पत्रे पाठवून आपली योजना कळवावी.
** सभासदांच्या वाचनात जे उपयुक्त लेख येतील ते इथे स्थापित करावे.(शब्दमर्यादा हवी.)
* सर्वांनुमते ठरलेले लेख नियतकालिकांकडे पाठवावे.
....प्रसिद्धी निश्चित मिळेल.मूलस्रोताचा ऋणनिर्देश करावा. म्हणजे प्रताधिकाराचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
** पुढे सुचतील तसे विविध उपक्रम हाती घेता येतील. शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधता येईल. संगणक (इंटरनेटसह) जिल्हा पातळी पर्यंत पोहोचला आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल.
......श्री.धनंजय यांच्या लेखाच्या निमित्ताने मनात आलेली कल्पना मांडली एवढेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे

अरे चुकुन् भाग २ असे लिहायचे राहिले.
संपादक मदत करतील काय?

आपला
दिलगिर
गुंडोपंत

चुकलो!

कामत नव्हे प्रभू!
नवीन
प्रेषक प्रमोद देव (शुक्र, 12/21/2007 - 02:57)
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
"विट्ठल कामत त्यांच्या 'निरामय कामजीवन' या पुस्तकातही हेच प्रतिपादन करतात"

विठ्ठल कामत नव्हे ! डॉ.विठ्ठल प्रभू म्हणा!
कामत हॉटेलवाले---ऑर्किड आणि इडलीचे लेखक.
डॉ. विठठल प्रभू हे "निरामय कामजीवन" चे लेखक आहेत.

»
प्रतिसाद प्रमोद देव यांना व्यनि पाठवा

चुकलो अगदी ठार चुकलो.
गल्लत झाली खरी!

कामतांचे इडली आणि ऑर्कीड कसले भंगार पुस्तक आहे. त्यांना शेवट पर्यंत कळलेच नाहीये की पुस्तक कशावर लिहायचे आहे.
शिवाय पुस्तकात बायकोला निट गुंडाळूनच ठेवले आहे... बिचारी!

आपला
धांदरट
गुंडोपंत

आम्ही काय करावे ते सांगा ?

पंत, आता अधिक केवळ चर्चा न करता कामाला सुरुवात करावी. जसे, आपापल्या जिल्ह्यातील नियतकालीकांची नावे, पत्त्यासहीत गुंडोपंताच्या खरडीत लिहावी. आणि बरीच नावे जमली की, ती इथे प्रसिद्ध करावी...! मग पुढे ठरवू काय करायचे ते. किंवा पंत, आम्ही काय करावे ते सांगा ?

कामाला लागलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही हो

नाही हो सर!
ती माहीती ए बी सी देईल त्याची काळजी नको.
ती माहीती घेवून लोकांना संपर्कात आणणे महत्वाचे आहे.

थोडेफार शोधले तर जालावरही सहज मिळेल.
पण शाळाना या माहीती वर्तुळात (माहीतीचा लूप) आणणे फार महत्वाचे आहे.
त्या दृष्टीने काही सुचते का?
त्यांना हे 'उपयोगी' कसे वाटेल यावर चर्चा व्हावी.
आपला
गुंडोपंत

मटा ऑनलाईन प्रतिसाद खुला करतोय

प्रमोद देवांनी महत्वाची माहीती दिली होती पण नेहमीच्या गदारोलात ती हरवली.

आता ती परत देतोय
"http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2579463.cms हा तो दुवा. कुणीच त्याची दखल घेतली नाही म्हणजे कमाल झाली. इथे फुकटमध्ये लेख प्रकाशित करता येतील."

हे जर मटा ऑनलाईन प्रतिसाद खुला करतोय तर इतर सगळे वृत्तपत्रेही करणारच आहेत आज नाही तर उद्या.
म्हणजेच सगळी वृत्तपत्रे जालावर मराठी लिखाणाची व प्रतिसादाची सोय देणार आहेत हे नक्की!
मग याची गरज खरंच उरेल का हाही !!
म्हणून शाळा डोक्यात आल्या....
(शिवाय मागे येथे २ पत्रकार आले होते तेही आठवले त्यांना तर अशा इंटरॅक्टीव्ह स्थळावर लिखाण अशक्यच होईल, म्हणजे कामधंदाच बंद म्हणा की!)

आपला
गुंडोपंत

लेखन अनुमती ...

तुमचे लेखन आता प्रशासकांच्या अनुमतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांची अनुमती मिळाली की/तर ते प्रकाशित होऊ शकेल. असा फक्त तिथे निरोप येत नाही. प्रतिसाद प्रसिद्ध झाल्यावर आपणास कळविण्यात येइल, असे मटावाले म्हणतात. ऑनलाइन प्रतिसाद कसा असला पाहिजे, खरडले की प्रकाशित.

आपला.
लेखन स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा.
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे

छान

पंत,
तुमचा बस फ्याक्टर १ चा प्रतिसाद आवडला. आणखी एक असेच उदाहरण म्हणजे गुरूदेवांचे शांतिनिकेतन.
आपला,
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

उत्साह

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मंडळाची कल्पना श्री.गुंडोपंत उत्साहाने पुढे नेत आहेत हे पाहून मनोमनी आनंद झाला.त्यांची 'आशा' ही कविता 'मिसळपाव' वर वाचली, तेव्हा त्यांच्या संवेदना किती तीव्र आहेत याची जाणीव झाली. मनातून करावेसे वाटते ते कार्य आपल्या हातून होत नाही याची खंत ते कवितेत व्यक्त करतात. ते केवळ शब्द नसून त्यांच्या भावना आहेत हे प्रतीत होते. या मंडळाला मूर्त स्वरूप देण्याचे काम त्यांच्या हातून होईल असे वाटते. त्यांना आम्हा सर्व सदस्यांचे सक्रिय सहकार्य लाभेलच.
..त्यांनी एडिसनचे समर्पक उदाहरण दिले आहे. अनेक प्रयोग अयशस्वी झाल्यावर त्याचे मित्र म्हणाले,"तुझे एवढे प्रयोग वाया गेले." त्यावर एडिसनने सांगितले,"वाया गेले नाहीत. प्रत्येक वेळी माझे काय चुकले ते मला समजले.झालेली चूक मी पुन्हा कधी करत नाही."
तेव्हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.

:)

त्यांची 'आशा' ही कविता 'मिसळपाव' वर वाचली, तेव्हा त्यांच्या संवेदना किती तीव्र आहेत याची जाणीव झाली. मनातून करावेसे वाटते ते कार्य आपल्या हातून होत नाही याची खंत ते कवितेत व्यक्त करतात. ते केवळ शब्द नसून त्यांच्या भावना आहेत हे प्रतीत होते.

गुंडोपंतांनी फक्त,

'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!'

हे वचन लक्षात ठेवावे म्हणजे झाले!

बोलणे खूप सोपे आहे, परंतु स्वत: पुढाकार घेऊन काही कृती करणे खूप कठीण आहे! फावल्या वेळात जालावर येऊन सामाजिक बांधिकलीविषयी चार ओळी खरडणे तर फारच सोपे आहे! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

संस्था काढणे : एक ठोस प्रस्ताव

पुढील विचार व्यवहार्य आहे का सांगावे.

"लोकमित्र मंडळ" किंवा "लोकमित्र प्रतिष्ठान" नावाचे ट्रस्ट मी काही थोडीफार रक्कम देऊन स्थापन करावे. हे भारतात (बहुतेक गोव्यात) पंजीकृत होईल. (माझ्या कोणा नातेवाइकाकडे मी वकालतपत्र [पावर ऑफ अटॉर्नी] देईन.) याला सुरुवातीला केवळ दोनच विश्वस्त लागतात. प्रतिभूत कागदावर (स्टँप पेपरवर) पंजीकरण लागेल. हा दुवा बघा.
(आणखी पर्याय : सेक्शन २५ कंपनी; धर्मादाय सोसायटी : या दोन्ही प्रकारांत वैयक्तिक पुढाकार पुरणार नाही, समविचारी सदस्य स्थापनेच्या आधीच "स्थापन" व्हावे लागेल.)

त्याचे ट्रस्ट डीड लिहिणे फार कठिण जाऊ नये. या दुव्यावर एक नमुना सापडेल. या बाबतीत उत्साह दाखवलेल्या काही लोकांनी विश्वस्त व्हावे (जास्तीत जास्त ५ - "एकमत" होणे नाहीतर फार कठिण). विश्वस्तांना काही थोडे नाममात्र मानधन मिळावे (टपालखर्चापुरते तरी) १०००-२००० वार्षिक (समजा). एक-दोन वर्षांत स्थापकाचा मंडळातला विशेषाधिकार नाहिसा व्हावा, आणि विश्वस्त मंडळ पूर्णपणे जबाबदार व्हावे.

मी स्थापनापत्रक येथे प्रकाशित करीन. येथे चर्चा होईल पण मतदान होणार नाही. प्रस्तावित ५ विश्वस्तांनी (ते जे कोणी असतील) चर्चेवर सारासार विचार करून बदल सुचवावेत. (विश्वस्तांना मंडळाच्या कार्याचे महत्त्व वाटणे हे अनिवार्य; पण विशाल मनोवृत्ती, अडेलतट्टूपणा नसणे, ऊठसूट अपमान न मानणे, असे गुण असणे विश्वस्तांत बेशकीमती.)

(कोणीतरी) वैयक्तिक जबाबदारी सुरुवातीला घेण्याचे कारण हे की १. नुसतीच चर्चा होत राहिली तर मंडळ सुरू करण्याची क्रिया कोणीच करणार नाही. २. सुरुवातीची केवळ सोपस्कार-रूप कर्मकांडे एका व्यक्तीने करणे सोयीस्कर असते, जे अजून निर्माणही झालेले नाही त्या "मंडळा"कडून या क्रिया करणे फारच कठिण जाईल. ३. सुरुवातीला जर काही १०-२० हजार रुपये खर्च आला तर त्याचा विनिमय देणार्‍या व्यक्तीच्या देखरेखीखाली व्हावा. मंडळ कार्यरत झाल्यावर खर्च वाढतील, देणगीदार वाढतील, विश्वस्त अनुभवी होतील, आणि स्थापकाचे योगदान नगण्य होईल. कालांतराने स्थापकाचे महत्त्व कमी होणे स्थापनापत्रातच स्पष्ट नमूद व्हावे.

माझ्या ऐवजी दुसर्‍या कोणी व्यक्तीने स्थापना/पंजीकरण करण्यात पुढाकार घेतला तर ते जास्त चांगले. मी जमेल तितके आर्थिक साहाय्य करेन. स्थापक भारतात राहाणारा असण्यात खूप फायदा आहे, सोय आहे. जर कोणी स्थापक पुढे आले नाही तर वर निर्दिष्ट उत्साही/कार्यकारी लोकांनी माझ्या प्रस्तावावर विचार करावा.

स्थापनेचा प्रस्तावित कालावधी : आजपासून ३ महिने.

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे."

स्वागत..

वा धन्याशेठ! तुझं कौतुक वाटतं!

स्वत: पुढाकार घेऊन मंडळ स्थापनेची तयारी दाखवलीस याचे बरे वाटले!

असो, या निमित्ताने मी माझा खारीचा वाटा उचलत आहे. प्रस्तावित मंडळाला मी माझ्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाची (रुपये १५१/- फक्त) देणगी जाहीर करतो!

एक अवांतर सूचना - मंडळ स्थापन झाल्यावर मंडळाने देणगीदारांना आयकर कायदा कलम ८० जी अंतर्गत आयकरात सूट मिळेल हे पाहावे आणि त्याकरता धर्मादाय आयुक्त किंवा संबंधित कार्यालयाकडे तसे प्रयत्न करावेत ही विनंती! त्यामुळे देणगीदारांनाही त्याचा फायदा होईल असे वाटते!

आमच्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये देणगी दिल्यास देणगीदारांना कलम ८० जी चा फायदा मिळतो!

असो, प्रस्तावित मंडळला अनेकोत्तम शुभेच्छा!

आपला,
तात्या अभ्यंकर.
स्वयंसेवक,
भाऊबीज निधी,
महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
पुणे.

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!"

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

यनावालाशेठ,

माझ्या ऐवजी दुसर्‍या कोणी व्यक्तीने स्थापना/पंजीकरण करण्यात पुढाकार घेतला तर ते जास्त चांगले. मी जमेल तितके आर्थिक साहाय्य करेन. स्थापक भारतात राहाणारा असण्यात खूप फायदा आहे, सोय आहे.

यनावालासाहेबांचे किंवा गुंडोपंतांचे येथील प्रतिसाद पाहता त्यांची सदर नियोजित मंडळाबद्दलची तळमळ ध्यानात येते. ही मंडळी स्थापना/पंजीकरणाच्या कामात नक्कीच पुढाकार घेतील असे वाटते!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बीड, जालना, लातूर, औ.बाद

मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात वृत्तपत्रांत कामे करणारी मित्रमंडळी आहे. त्यांना अजून "उपक्रम" संकेतस्थळ माहित नसावी. पण त्यांच्या सगभागाविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करावी का? जर "हो", तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा? अथवा मी त्यांची माहिती कोणा उपक्रमीस देऊ का जेणेकरून माझ्या वैअयक्तिक संपर्काव्यतिरिक्त आपण "लोकमित्र" संस्थेच्या नात्याने त्यांच्याशी बोलू शकतो.

कृपया मार्गदर्षन करावे ही विनंती.

आपला,
(उत्साही) भास्कर
आम्ही येथे वसतो.

पत्रकार मित्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.भास्कर केन्डे लिहितात, "मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात वृत्तपत्रांत कामे करणारी मित्रमंडळी आहे"
..ही नियोजित मंडळाच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे.या पत्रकार मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. श्री.भास्कर यांच्याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधता येईल.शक्य असल्यास त्यांना सहसभासद (नि:शुल्क) करून घेता येईल.

इंग्रजी मसुदा

येथे बघावा (दुवा).

मुख्य भाग परिच्छेद ३अ,ब,क बघावेत. ३अ आणि ब ही निकटची उद्दिष्टे आहेत. ही संस्था कावळ्याच्या छत्रीपेक्षा अधिक काळ तगली, आणि वाढली, तर ३क हे उद्दिष्ट तिला वाढायची मुभा देते.


३. या प्रतिष्ठानाची उद्दिष्टे येणेप्रमाणे आहेत
(अ) व्हर्न्याक्युलर भाषेतील लोकशिक्षणात्मक लेखांच्या विनिमयाचे एक आगार स्थापन करणे, आणि अशा लेखांचे नियतकालिकांत प्रकाशन होण्याचा पुरस्कार करणे. या लेखांचे संभाव्य विषय विज्ञान, कला, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, आरोग्य, हे असू शकतील, पण याच विषयांपुरते क्षेत्र मर्यादित नाही. या लेखांत निव्वळ कल्पित साहित्याचा किंवा व्यापारी मालाच्या जाहिरातीचे साहित्याचा, की ज्याच्यात लोकशिक्षणाचा हेतू नाही, अशा साहित्याचा अंतर्भाव होऊ नये.
(ब) प्रतिष्ठानाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणार्‍या दात्यांच्या सदस्यमंडळाची स्थापना करणे.
(क) विज्ञान, साहित्य, संगीत, नाट्य, कला, पुरातत्त्वसंरक्षण, संशोधन यांना वाहिलेल्या, किंवा असाच सार्वजनिक हेतू असलेल्या संस्थांना भारतात स्थापणे, त्यांचे साहाय्य करणे, त्यांना तगवणे, आर्थिक मदत करणे.

झेप फार नाही, सुचवलेलेच कार्य आहे, फक्त कागदोपत्री ओनामा

मंडळ/प्रतिष्ठान
प्रेषक यनावाला (रवि, 12/23/2007 - 05:24)
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मी केवळ एक विचार मांडला. माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे. हे काम त्या मर्यादांच्या पलीकडचे आहे.ते माझ्याने होणे नाही. श्री.धनंजय लिहितात की कुणीतरी ठोस कृती केल्याशिवाय ही नुसती चर्चाच राहील. (चर्चा केवळ काळ्या-पांढर्‍यात न राहाता मूर्तस्वरूप येऊ दे असे मत प्रियाली यांनीही प्रतिसादात मांडले आहे.) आता श्री. धनंजय स्वतःच पुढाकार घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
...मूळ कल्पना अगदी मर्यादित स्वरूपाची होती. धनंजय यांची झेप मोठी आहे. सभासद शुल्कातूनच काय तो खर्च भागवायचा.( प्रारंभी लेटरहेड ,शिक्के इ. पुढे पत्रव्यवहारासाठी टपाल खर्च).देणगी गोळा करण्याची कल्पना नव्हती.
त्यांनी मांडलेले उद्दिष्ट :"व्हर्न्याक्युलर भाषेतील लोकशिक्षणात्मक लेखांच्या विनिमयाचे एक आगार स्थापन करणे, आणि अशा लेखांचे नियतकालिकांत प्रकाशन होण्याचा पुरस्कार करणे. या लेखांचे संभाव्य विषय विज्ञान, कला, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, आरोग्य, हे असू शकतील, पण याच विषयांपुरते क्षेत्र मर्यादित नाही. या लेखांत निव्वळ कल्पित साहित्याचा किंवा व्यापारी मालाच्या जाहिरातीचे साहित्याचा, की ज्याच्यात लोकशिक्षणाचा हेतू नाही, अशा साहित्याचा अंतर्भाव होऊ नये."
हे मात्र माझ्या मनातलेच आहे.

देणगी या क्षणी खर्च चालवण्यासाठी गोळा करायची नाही. सुरुवातीचा हा खर्च देण्याची ही हमी उपक्रमावरील काही सदस्यांनी (व्यक्तिगत निरोपांत) व मी घेतो आहोत. तुम्ही आधी सुचवलेले काम, आधी सुचवलेल्या मर्यादेतच करायचे आहे. बँकेचे खाते असणे, शिक्के असणे, असल्या गोष्टी आड येऊ नयेत म्हणून हे प्रतिष्ठान काढायचे. हे अत्यंत छोटेखानी प्रतिष्ठान आहे - तुम्ही सुचवलेलेच काम करणार. तुमच्या, भास्कररावांच्या सर्वांच्या ओळखीच्या पत्रकारांना मोफत सभासदत्व देण्यात काहीच आडकाठी नाही. सभासदत्वाला नाममात्र शुल्क (ज्याला मी "देणगी" म्हटले आहे) असणे याकारणासाठी की त्यायोगे सभासद मंडळाकडे/प्रतिष्ठानाकडे गांभीर्याने बघतील. याच्यातून कितपत खर्च निघेल हे या क्षणी महत्त्वाचे नाही. उपक्रमावरील (अमेरिकेत स्थित) काही सदस्य रोजकारभारासाठी खर्चाचे पहिल्या १-२ वर्षांचे पाहू. पण जे काम व्हायचे आहे, पत्रलेखन व्हायचे आहे, भेटीगाठी वायच्या आहेत, ते भारतातील सदस्यांकडूनच व्हावे.

काम तुम्ही सुचवलेले तेच, तुम्ही सुचवलेल्या कार्यकारी मंडळानेच करायचे आहे (तुम्हा सर्वांची अनुमती असेल तर.)

पुढे काय करावे ते सांगा !

डॊ.धनंजय,
लोकमित्रमंडळातील पुढील कामाचे स्वरुप काय ते सांगावे.
आमचा सहभाग आहेच. म्हणजे हळूहळु कामाला सुरुवात करता येईल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर