कोडी - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग २ - जहाज

श्री पाटील हे व्यवसायाने "ट्रॅवल एजंट". एके दिवशी सकाळी उठून त्यानी वर्तमानपत्र उघडले आणि खालील बातमी वाचली -
"मुंबईहून मॉरीशसला जाणार्‍या प्रवासी जहाजातील एक प्रवासी सौ. देशपांडे यांचे जहाजावरच निधन"

याच देशपांडे पती-पत्नींना त्यांनी काही दिवसांपूर्वी मॉरीशसची तिकिटे विकली होती. बातमी वाचून त्यांची खात्रीच पटली की हा म्रुत्यू नैसर्गिक नसून सौ. देशपांडे यांचा खूनच झाला आहे.

कसे काय कळले असेल श्री पाटील यांना हे?

उत्तर कृपया व्यनिने पाठवावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मी पण

पाठवले आहे.

उत्तरे..

सर्किट आणि कोलबेर यांनी आत्तपावेतो बरोबर उत्तरे दिली आहेत.

जलयान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
...असा प्रसंग एका रहस्यकथेत (बहुधा अगाथा ख्रिस्ती यांच्या) वाचल्याचे स्मरते.

ऊत्तरे

यनावाला अनु यांनीही "तर्कसंगत" उत्तरे पाठवली आहेत.

क्षमस्व...

विलंबाबद्दल क्षमस्व. उत्तर दिले आहे!

उत्तर - कोडी - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग २ - जहाज

श्री पाटील हे ट्रॅवल एजंट आहेत. जेव्हा देशपांडे त्यांच्याकडे मॉरीशसची तिकिटे काढण्यासाठी आले आणि स्वतःसाठी परतीचे परंतु पत्नीसाठी मात्र फक्त जाण्याचे तिकिट काढले तेव्हाच त्यांना जरा विचित्र वाटले.

ही बातमी वाचून त्यांची खात्रीच झाली की श्री देशपांडे यांचा हा पूर्वनियोजित कटच होता!!

पूर्वीच सांगितल्याप्रमाणे सर्किट, कोलबेर, यनावाला आणि अनु यांनी अचूक अंदाज व्यक्त केले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उत्तम...

दुनिया वेड्यांचा बाजार - झांझिबार! झांझिबार!! झांझिबार!!!

मॉरीशस सोडा, तुमच्या झांझिबारला एकमार्गी तिकिटाने जाता येते?

असो, प्रतिसाद मनोरंजक आहे हे निश्चित!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

एक अप्रतिम शक्यता

आपला नवरा स्वतःसाठी परतीचे आणि आपल्यासाठी मात्र एकमार्गी तिकीट काढतोय हे लक्षात आल्यावर मुळात सौ. देशपांड्यांनाच शंका येऊन त्या अकांडतांडव करणार नाहीत काय? की त्यांनी स्वतःचे तिकीटसुद्धा बघितले नव्हते?

कदाचित सौ. देशपांडे मुक्या-बहिर्‍या झाल्याच तर आंधळ्या असाव्यात. म्हणून त्यांनी आकांडतांडव केले नाही. ;-)

डिश्क्लेमरः येथल्या सर्वांना खुनी झालो म्हणून काय झालो आपणही श्री. देशपांडे असायला हवे होतो अशी इच्छा झाल्यास मी जबाबदार नाही.

मस्त् शक्यता

दुसरी शक्यता म्हणजे कदाचित श्री. पाटलांनाच सौ. देशपांड्यांचा काटा काढण्याची काही गरज असावी. (कदाचित हाताबाहेर गेलेले प्रेमप्रकरण अधिक पुरावा नष्ट करण्याची गरज?)

हा हा हा.. केकता कपूरचा खूप परिणाम दिसतोय वेड्या मुलावर ;) पण शक्यता एकदम पटल्या.... सगळ्या शक्यतांना +१ :)
त्यातही तिसरी उपशक्यता तर खासच् :प्.. :)))

-ऋषिकेश

साधी सरळ शक्यता

बातमीच्या मथळ्यात निधन म्हटले असले तरी तपशीलात स्पष्टपणे लिहिले होते "की हा खून देशपांडे यांनी केल्याची कबुली दिली आहे" म्हणूनच "बातमी वाचून त्यांची खात्रीच पटली ..........."

(साधा सरळ) ऋषिकेश

किरकोळ बदल

श्री व सौ देशपांडेंचे नाव बदलून श्री. व सौ. लेले केले आणि त्यांना बोटीने मुंबईहून मॉरीशसला न पाठवता गोव्याला पाठवले तर हे कोडे वेड्या मुलांसाठी 'फूल प्रूफ' करता येईल. ह. घ्या.

हा हा हा

बुकिंगक्लार्कमंडळी (विशेषतः मध्य रेल्वेची) तशी बर्‍यापैकी स्थितप्रज्ञ असावीत.

हा हा हा.. स्थितप्रज्ञ हे विषेशण इथे जाम आवडले :))
अवांतरः शाळेत एक कविता होती, (कविता आठवत नसली तरी) त्यात कहितरी '....स्थितप्रज्ञ दगड' अशा ओळी होत्या तेव्हापासून स्थितप्रज्ञ हे केवळ दगडाचे विषेशणच होऊ शकते असं काहितरी डोक्यात फिट्ट बसले आहे ;)

-ऋषिकेश

प्रकटआ

प्रकटआ

हहपुवा

वेडा मुलगाचे प्रतिसाद वाचून हहपुवा झाली.

 
^ वर