कोडी - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग १ - मद्यालय

"अ" आणि "ब" हे जिवलग दोस्त. दर शुक्रवारी कचेरी सुटल्यावर नजिकच्याच मद्यालयात जाऊन भरपूर ढोसणे हा त्यांचा आठवडी कार्यक्रम.

आजही ते कामावरून सुटल्यावर मद्यालयात गेले. दोघांनी एकाच प्रकारच्या मद्याची एकेका पेगची मागणी केली. वेटरने एकसारख्याच आकाराच्या दोन् ग्लासमध्ये त्यांची पेये आणली आणि प्रत्येक ग्लासात बर्फाचे दोन-दोन खडे टाकले.

आता "अ" आणि "ब" यांच्या समोर प्रत्येकी एक ग्लास आहे. त्याचा आकार एकसारखा आहे. त्यातील मद्य एकाच प्रकारचे आहे. त्या मद्याची quantity देखील एकसारखीच आहे. दोहोंमध्ये बर्फाचे दोन-दोन खडे आहेत.

तरीही, मद्य प्राशन करताच क्षणी "अ" खाली कोसळून मृत्यूमुखी पडतो तर "ब" मात्र जिवंत राहतो. हे कसे?

टीप : मृत्यूचे कारण ग्लासातील पेय हेच आहे. हृदयविकाराचा झटका वगैरे नाही.

उत्तरे कृपया व्य नि ने पाठवावीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

मेला?

बाबो!!! आप्ण तर याच्या बरोबर आजाबात प्यायला बसणार नाय!
आपला
गुंडोपंत

बर्फाच्या खड्यात काही गडबड आहे का ?


'अ' च्या ग्लासात, एका बर्फाच्या खड्यात काही गडबड आहे, का ?

(मृत्यूमुखी पडला या ऐवजी नशा जास्त होऊन तो लोळु लागला असे पाहिजे होते, असे वाटते.)

'ब' बरोबर बसायला टरकलेला.
"क"

मेलाच हो..

मृत्यूमुखी पडला या ऐवजी नशा जास्त होऊन तो लोळु लागला असे पाहिजे होते, असे वाटते

नाही. "अ" मृत्युमुखीच पडतो.

'ब' बरोबर बसायला टरकलेला

काही हरकत नाही. तुम्ही "स" बरोबर बसा!!

(निर्भय) "स"

नाही...

मद्यप्राशन "ब" ने देखील केले.

माझा एक गेस (प्रतिशब्द?) - अंदाज / अदमास हा प्रतिशब्द कसा वाटतो?

उत्तर लवकरच टाकीन. अद्याप एकही उत्तर बरोबर नाही. मी एका तरी बरोबर उत्तराची वाट पाहत होतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

 
^ वर