मदत हवी आहे !!

भारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल ?

माझ्या माहितीप्रमाणे
घरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-
१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.
२. भाड्याने द्यावयाच्या जागेचा पत्ता.
३. डिपॉझिट व भाड्याची रक्कम
४. घरातील फर्निचर, दिवे, पंखे, ई. गोष्टींचा उल्लेख
५. घर मुदतीपूर्वी रिकामे करायचे झाल्यास दोघांना द्यावी लागणारी आगाऊ सूचना
६. सोसायटीचा देखभाल खर्च, पालिकेचा टॅक्स, पाणी/विज बिल कोणी भरायचे ह्याचा स्पष्ट उल्लेख
हा करार शक्यतो ११ महिन्यासाठी करतात. (ह्यामागे कराराचे रजिस्ट्रेशन टाळण्याचे कारण असावे का?)

ह्याचबरोबर असेही ऐकिवात आहे की भाडेकरूची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यालाही द्यावी.

आता काही प्रश्न -
१. दोन्ही व्यक्तिंमध्ये होणार्‍या भाडेकरारपत्राचे रजिस्ट्रेशन करावे का? असे करणे कायद्याने बंधनकारक आहे का? दोन्ही व्यक्तिंमध्ये काही विवाद झाल्यास - भाडेकरूने घर मुदतीनंतरही रिकामे न करणे, घरमालकाने डिपॉझिटची रक्कम परत न देणे, वगैरे. - असे रजिस्ट्रेशन असलेले जास्त बरे पडेल काय?
२. एक वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठीच रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे का? ते कुठे करावे लागते?
३. पोलिस ठाण्यामध्ये भाडेकरूची कोणती कोणती माहिती द्यावी लागते?
४. भाड्याच्या उत्पन्नावर आयकराबद्दल काय सांगता येइल?
५. अजून काय काय काळजी घ्यावी ?

लेखनविषय: दुवे:

Comments

आपले प्रश्न

आपले प्रश्न मला देखील पडतात. पण माझी बायको मंजिरीचा हाच व्यवसाय पुण्यात आहे. मी त्यात अजिबात लक्ष घालत नाही. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी फक्त फुल्या केलेल्या जागी सह्या करतो. आपले प्रश्न हे प्रातिनिधिक असून आयटी सेक्टर मधल्या तरूणांचे आहेत व ते ऍकॅडमिक आहेत. या सर्व प्रश्नांची "व्यावहारिक " उत्तरे तिच्याकडे आहेत. तिच्या http://mr.upakram.org/node/828 या लेखानुसार आपण संपर्क साधून उत्तरे मिळवू शकता. माझा संदर्भ देण्या ऐवजी या लिंकचा (पत्राचा) संदर्भ दिल्यास ते आपल्याला हेतु साध्य करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असा माझा होरा आहे.
आपला
(होरादूषण)
प्रकाश घाटपांडे

भाड्याचे उत्पन्न

४. भाड्याच्या उत्पन्नावर आयकराबद्दल काय सांगता येइल?
--भाड्याच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागतो. अर्थात बहुतांशी लोक तो भरत नाहीत हा भाग निराळ.

५. अजून काय काय काळजी घ्यावी ?
-- अ) शक्य तो ओळखीतल्या कुटुंबांना आपली जागा भाड्याने द्यावी.
--आ) जमेल तेव्हा एखादी चक्कर मारावी. अर्थात चक्कर मारायचा अधिकार भाडेपत्रामार्फत अबाधित ठेवावा.
--इ) चांगल्या नामांकित कंपन्यात नोकरी असलेल्या लोकांनाच प्रधान्य द्यावे. माझ्या एका मित्राने एका व्यावसायिकाला घर भाड्याने दिले. भाडे वेळेवर मिळत नव्हते. मागायला गेल्यावरचा अनुभव सुद्धा चांगला नव्हता. तो भाडेकरू चांगलाच धटिंगण निघाला. तसेच आमच्या एका मित्राला एका पोलिस अधिकायाचा वाईट अनुभव आला. त्यामुळे मी तर कंपन्यांमध्ये नोकरी करणाया लोकांनाचा प्राधान्य देतो. (चांगल्या व्यावसयिकांची तसेच शासकीय अधिकायांची क्षमा मागून).

आपला,
(अनुभवी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

माझ्या मते

माझ्यामते 'इ' या मुद्याला अग्रक्रम द्यावा.
पण "अ. शक्य तो ओळखीतल्या कुटुंबांना आपली जागा भाड्याने द्यावी" बाबत बोलाल तर माझ्या मते कुटुंब माहितीतील असावं पण फार ओळख नसावी .. काहि गोष्टी/अटी बोलायला आणि पुढे गरज पडल्यास भांडायला ही ओळख नको मधे यायला :)
--(कधीकधी भिडस्त) ऋषिकेश

'इ'

हाच माझाही मुख्य प्रश्न होता ! धन्यवाद !!

शक्य आहे का

हे सहजा सहजी शक्य आहे का? कारण आजकाल लोक कपडे बदलल्यासारखे नोकर्‍या बदलतात. त्यात कोण कंपनी असे पर्सनल कॉट्रक्ट करत बसेल?

आपला,
(प्रश्नाळू) भास्कर
आम्ही येथे वसतो.

शक्यच नाही तर्..

>त्यात कोण कंपनी असे पर्सनल कॉट्रक्ट करत बसेल?

शक्यता सोडा. काही कंपन्यांमध्ये, भाड्याचे करार कंपनीनेच करावेत हा नियम देखील आहे.(अर्थात, जिथे भाडे कंपनी देते.)

नांदी

(सदर कंपनीत) नांदतातच असे नाही.

त्यामुळेच 'सदर' करारावर इतर कर्मचारी राहू शकतील असे एक कलम देखील घुसडलेले दिसते. :)

माझी माहिती

भाडेकरूची माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक आहे, परंतु बरेच लोक ते टाळतात. नमुना अर्ज पोलिस ठाण्यात उपलब्ध असतो.
१. दोन्ही व्यक्तिंमध्ये होणार्‍या भाडेकरारपत्राचे रजिस्ट्रेशन करावे का? असे करणे कायद्याने बंधनकारक आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे जर करार ११ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा असेल तर नोंदणी बंधनकारक नाही. परंतु त्यापेक्षा अधिक कालावधीचा असेल तर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ११ महिन्याचा करार स्वेच्छेने नोंदणी करता येतो. कराराचा नमूना इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यात आपल्या सोयीनुसार (कायद्याच्या चौकटीत राहून) बदल करता येतो.
जयेश

दुवा ??

कराराचा नमूना इंटरनेटवर उपलब्ध आहे

दुवा द्या !!

दुवा?

कराराचा नमूना इंटरनेटवर उपलब्ध आहे

ह्याचा दुवा मिळेल काय्? कालपासून शोधत आहे !

नमुना अर्ज पोलिस ठाण्यात उपलब्ध असतो.

ह्या माहितीबद्दल धन्यवाद (कारण केवळ माहिती विचारायला वगैरे पोलिस स्टेशन मध्ये जाण्याची इच्छा नव्हती !)

नमुना

हा घ्या दुवा

http://www.mumbaipropertyexchange.com/legal/bi_legaldocuments.asp#

जयेश

नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज नमुना अर्ज

 
^ वर