तर्कक्रीडा:५३:शापित कोण?

[ ठाणवईचे कोडे अवघड असल्याचे काही जणांनी कळविले. म्हणून हे नेहमीच्या पठडीतील कोडे; प्रा. रेमण्ड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित.]
...............................................................................................................................
अमरद्वीपावरील गंध्रर्व नेहमी खरे बोलतात तर यक्ष खोटेच बोलतात हे आपल्याला ज्ञात आहेच.
....या बेटाच्या अतिपूर्वेकडील भागात गंधर्व आणि यक्षच रहातात,पण त्यातील काहीजण शापित असतात.शापित गंघर्व (अथवा यक्ष) हा दिवसा सामान्य गंधर्व(अथवा यक्ष) वागावा तसाच वागतो. मात्र रात्री हा शापित धोकादायक बनतो.शापित कोण कोण आहेत हे सर्व गंधर्व यक्ष यांना ठाऊक असते.त्यामुळे सर्वजण योग्य ती दक्षता घेतात.
...एकदा एक तर्कशास्त्री या अतिपूर्वेकडील भागात गेले.त्यावेळचे हे तीन भिन्न प्रसंग आहेत.सर्व प्रसंग दिवसा घडले आहेत.
(१) तर्कशास्त्रींना अ,ब, क अशी तीन स्थानिक माणसे भेटली. त्यातील एकच शापित असून तो गंधर्व होता.दोघांनी पुढील विधाने केली:
....: आम्हा तिघांत किमान एकतरी यक्ष आहे.
.....बः क हा शापित आहे.
तर शापित कोण? अ, ब की क?
*
(२) तर्कशास्त्रींना भेटलेल्या अ,ब, क या तिघांत एकच शापित असून तो गंधर्व होता.अन्य दोघे यक्ष होते. म्हणाला शापित आहे.
तर शापित कोण?
*
(३) या वेळी तर्कशास्त्रींना अ आणि ब असे दोघेच भेटले. त्यांतील एकच शापित होता.
....अ: आम्हा दोगांत जो यक्ष आहे तो शापित आहे.
....बः आम्हा दोघांत जो गंधर्व आहे तो शापित आहे.
तर शापित कोण?
...........................................................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

शापित कोण?

प्रकाटाआ

शापित कोण?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी या कोड्याचे अचूक उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी युक्तिवादही लिहिला आहे.

शापित कोण?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री वाचक्नवी यांचे उत्तर आले. पहिल्या दोन प्रसंगांची उत्तरे अगदी अचूक आहेत. तिसर्‍या प्रसंगातील उत्तरात किंचित् दोष आहे. त्याचे ते निवारण करतील.

किंचित दोष

किंचित दोष एवढाच की मी जास्तीची माहिती दिली आहे, ती काढून टाकली की उत्तर अचूक.(तशी टीप मी उत्तरात लिहिली होती.)--वाचक्‍नवी

शापित कोण?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अमित कुलकर्णी यांनी तीनही प्रसंगांत शापित कोण ते अचूक ओळखले आहे.
तसेच श्री.ॠषीकेश यांनीही याकोड्याची उत्तरे पाठवली आहेत ती सर्व बरोबर आहेत. पुरेसा युक्तिवादही लिहिला आहे.

 
^ वर