लिहाल तर कमवाल

Lihal Tar Kamval" alt="">

Comments

मराठी

मराठीत कोण काय कमावणार? किती कमावणार? मराठी वाचक पैसे देउन वाचतील काय?
प्रकाश घाटपांडे

पामर

अनुदिनी लिहिणार्‍या 'पामर' सारख्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे ही.

अनुदिनीवरील लिखाण आणि पूर्वपरवानगी

अनुदिनीवर लिहिलेले लिखाण हे मुक्त स्वरुपाचे असल्याने ते वाचणे, इतकेच नव्हे तर ते इतर ठिकाणी आपल्या नावावर प्रसिद्ध करणेही सहज शक्य आहे. मी माझ्या अनुदिनीवर लिहिलेला गालिबवरील लेख एका तिसर्‍याच माणसाने गुगलवरील गालिबविषयक एका कम्युनिटीत चिकटवला आहे. त्यासाठी माझी परवानगी सोडाच, पण माझा श्रेयोल्लेखही करण्याचे सौजन्य या महाशयांनी दाखवले नाही. याबाबत या कम्युनिटीच्या मालकाकडे मी तक्रार केली असता त्यांनी 'त्यात काय बिघडले?' असा पवित्रा घेतला. आता याला काय करणार?
सन्जोप राव

पूर्वपरवानगी

अनुदिनीच का मनोगत/ उपक्रमावरील लेखही ऑर्कुट कम्युनिटी इ. मध्ये किंवा मनोगतावरही असे ढापलेले लेख छापले गेले आहेत. नेटावर एखाद्याचे लेख/ संदर्भ/ नावे वापरण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याची फॅशन अद्याप रुढ झालेली नाही आणि असे करणार्‍याला आपण वावगे करतो आहोत याची सूतराम कल्पनाही नसते. असे प्रकार नंदन, चक्रपाणी आणि माझ्या लेखांचे झालेले एका कम्युनिटीवर पाहिले होते. माझे शब्दवरही माझ्या लेखांना स्वतःच्या नावाने छापले होते पण राज जैननां या गोष्टीची माहिती दिल्यावर त्यांनी तातडीने ते काढले. मजेची गोष्ट अशी की एका ऑर्कुट कम्युनिटीची टॅगलाईन/ घोषवाक्य हेच नंदनच्या अनुदिनीवरून चोरलेले आहे, या कम्युनिटीकडे विचारणा केली असता 'मग बिघडले कुठे? कोणी लिहिले पेक्षा काय लिहिले याकडे वाचक पाहतात.' असे उत्तर मिळाले. या सर्वावर उपाय म्हणजे

१. कॉपीराईट खरेदी करणे आणि केस लढवणे. - जे वेळ आणि सहनशक्तीच्या पल्याड असू शकते.
२. त्या कम्युनिटीत जाऊन स्वतःच आपले लेख चढवणे. - जे मी करायचे ठरवले. आपले लेख इतरांच्या नावावर जाण्यापेक्षा आपल्या नावावर गेलेले बरे पण हा काही रामबाण उपाय नाही झाला.
३. किंवा तक्रार नोंदवून याला वाचा फोडणे - मनोगत किंवा इतर मोठ्या संकेतस्थळांवर हे उपयुक्त आहे परंतु लहान समुदायांत 'त्यात काय बिघडले?' असा पवित्राच घेतलेला दिसतो.

उपाय

लेख चित्राच्या स्वरुपात / पीडीएफ मध्ये लेखकाच्या (इथे स्वतःच्या) नावासहीत प्रकाशित करा. हे लेख वाचून, इतत्र टंकण्याएवढी सोशिकता या चोरांकडे नक्कीच नसेल :)

(कसे कराल? सोपा उपाय म्हणजे लेख उपक्रमावर/मनोगतावर टंकल्यावर 'प्रिंट स्क्रीन च्या सहाय्याने' किंवा ऍडोब/क्यूट पीडीएफ च्या सहाय्याने हवी ती फाईल बनवा व आपल्या अनुदिनीवर चढवा. वर्ड इत्यादीचा वापर केल्यास वॉटरमार्क्स वगैरेही वापरता येतील. रिजोल्यूशन व फाईलचा आकार याकडे मात्र थोडे लक्ष द्यावे लागेल.)

कायदेशीर जबाबदारी

उपरोक्त लेखात नमूद वाक्य" या लिहिलेल्या मजकुराची कायदेशीर जबाबदारी मात्र लिहिणार्‍यावर येते आणी कॉपीराईट मात्र कंपन्यांकडे राह्तो." यावर वाचकांची काय मते आहेत?
प्रिंट मिडीयात तरी वेगळे काय होते?
१) कॉपी राईट जरी लेखकाकडे असले तरी किती छापली जातात व विकली जातात याबाबत लेखक अनभिज्ञ असतो.
२) जनरली १००० कॉपींची आवृत्ति असते. प्रकाशक आणि लेखक यांच्यात लेखी करात असला तरी वरील गोष्ट त्याला समजत नाही
३) अन्य कोणी त्याचा इकॉनॉमी क्लोन . पेपर बॅक एडिशन सारखा तयार केला तर प्रकाशक , लेखक व विक्रेता तिघेही अंधारात. जंगली महाराज रोडला अशी पुस्तके पुण्यात मिळतात.
४) आता माझा अनुभव मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीची .... पहिली आवृत्ती काढली. पटकन कार्यकर्त्यातच "खपली"नंतर अंनिसला काढण्यास तोंडी परवानगी दिली . नंतर दुसरी आवृत्त्ती काढली.
ती नारळी करांच्या परिक्षणाच्या कृपेने "खपली" तरी ६०% कमिशनने. नंतर एका कार्यक्रमात " मनोविकास प्रकाशन" च्या प्रकाशकांचा परिचय झाला. त्यांना तिसरी आवृत्ती काढायला माझी हरकत नसल्याचे सांगितले. त्यांनी ती काढली पण मुखपृष्ठ ही बदलले व आवृत्ती पहिली असे लिहिले. आमच्या दृष्टीने आमची ती पहीलीच असल्याने तसे लिहिल्याचे सांगितले. साहजिकच दुसर्‍या आवृत्तीच्य
निमित्ताने लिहिलेले गाळले. लेखी कराराची नमुना प्रत दिली पण लेखी करार मी काही केला नाही. सरकारी नोकरीत होतो ना तेव्हा (२००५) अकाली स्वेच्छानिवृत्ती आत्ता एप्रिल २००७ ,नंतर कंटाळा व जडत्व. (ह घ्या)
५) सध्या राज जैन ई बुक करत असल्याचे आपसात ठरले आहे
६) सुरेश चिपळूणकरांना स्वैर हिंदी भाषांतर करायला परवानगी आहे.
७) पहिलि आवृत्ती अंनिसत अनेक रिप्रिंटस चालू आहेतच . एकदा पुस्तकाचे नावच बदलल्याचे मला दिसले. "फलज्योतिषाकडे जाण्या पुर्वी...."मी अंनिसच्या प्रकाशकांना विचारले अहो नाव तरी बदलू नका? आशय हानी होते. फलज्योतिष हा विषय आहे व ज्योतिषी ही व्यक्ती आहे, जाणारा तो जातक त्याच्या करता हे लिहिले आहे. ते म्हणाले थोडा बदल केला कि लोकांना तोच तोच पणा वाटत् नाही. तुम्ही तर आपलेच. सांगा दुसर एखाद नांव पुस्तकाला? आता मि काय बोलणार....
८) एकदा मी स्थानिक लंगोटीपत्रात त्यातला मजकूर वाचला लेखकाचा उल्लेख नाही फक्त उधृत असे लिहिले कोठुन ते नाही
९)यामुळे आपल्याकडे चोरुन नेण्यासारखे काहीतरी आहे हा इगो सुखाउन घेतो. दुसर काय करणार?

प्रकाश घाटपांडे

ब्लॉग लेखक(ब्लॉग चालक) आणी लेखक

बरेच ब्लॉग (मराठी नाही हा) असे पाहीले आहेत की जे ऑनलाइन पॅरीस हील्टन टाइप कंटेंट असलेले आहेत म्हणजे भानगड, फॅशन, लेटेस्ट त्रांगडी इ. (जरा वेगळे म्हणजे म्युझीकबद्दल, गॅजेट्सबद्दल, आर्थीकज्ञानाबद्दल पण धरता येईल )काहीतरी लिहून, वाचकाला चांगल्या ऑफर्स देऊन जाहीरात, मार्केटींग द्वारे उत्पन्न मिळवणे. थोडक्यात जे खपते अश्या विषयावर ब्लॉग बनवुन तो लोकप्रिय करुन उप्तन्न मिळवणे. असे "ब्लॉग लेखक" म्हणण्यापेक्षा ह्याला "ब्लॉग चालक" (बिझनेस) म्हणणे जास्त संयुक्तीक ठरेल. त्यातल्या त्यात टेक्नोलॉजीचा वापर, थोडाफार आवाज करून, थोडीफार गुंतवणूक कायदेशीरबाबतीत करून लेखनचौर्याला थोडा आळा घालता येईल पण पुर्णता जरा अवघड आहे. विशेषता आंतरजालाचे स्वरूप व वेगवेगळ्या देशातील ह्या संबधीचे कायदे, न्यायदानाचा वेळ व अंमलबजावणी पहाता.

किंवा चांगले (पारंपारिक) लेखन करुन पैसे कमावणे. जगातील आजची सर्वात श्रीमंत लेखीका जे. के . रोलिंग १९९४ मधे बेकार होती व सरकारी मदतीवर एका लहानश्या खोलीत ([सिंगल मदर]आपल्या लहान मुलीबरोबर)रहात होती. एकदा हॅरी पॉटर लिहून झाले............

ढापून ढापून ब्लॉग

ब्लॉग लिव्हल्यावर पैसे मिलतंय म्हणल्यावर,

सगळ्ह्याचे ब्लॉग वर्चे लेखन् ढापून ढापून आपुण् बी एक ब्लॉग लिव्हणार हाये.

पैसे किती मिळतीन तेव्हढ सांगा.

बाबूराव :)

ब्लॉग वरून कमाई?

""यामुळे आपल्याकडे चोरुन नेण्यासारखे काहीतरी आहे हा इगो सुखाउन घेतो. दुसर काय करणार?""
वा प्रकाश साहेब काय छान बोललात... माझ्या अनुदिनी वरून सुद्धा बरेचदा लोकांनी "माल" न सांगता, न विचारता उचलला, आणि आपल्या अनुदिनी वर टाकला, काही "भले" होते म्हणून त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला, पण काहींनी तर ते सुद्धा नाही... असो...
मी पण आपल्या ब्लॉग वर एक "गूगल एडसेंस" लावून ठेवला आहे... एका वर्ष भरात त्यात साड़े चार डॉलर एकत्रित झालेत, आता बघूया केव्हां ते दहा डॉलर होतात, कारण त्यानंतरच गूगल बाबा आम्हास दहा डालर चा प्रसाद देतील... :)
फ़ुकटात मिळाले काय वाईट आहे?
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर