उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
लग्नस्थानी मीनेचा शुक्र चांगला की वाईट?
निमिष सोनार
November 16, 2007 - 12:22 pm
लग्नस्थानी मीनेचा शुक्र चांगला की वाईट?
मला हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे, मीनेचा शुक्र हा उच्चीचा असतो, पण लग्नस्थानी मीनेचा शुक्र आला, तर अष्टमस्थानी तुळ येणारच् आणि अष्टमाचा स्वामी प्रथमस्थानी आला. तर मग चांगला प्रभाव की वाईट?
दुवे:
Comments
चांगला !!!
लग्नस्थानी मीनेचा शुक्र चांगलाच असतो कारण मीनेचा शुक्र हा उंचीचा असतो. (कारण आमची रास मीन आहे) मीने पासून आठवी रास तुळ जर येत असेल, आणि अष्टमाचा स्वामी प्रथमस्थानी येत असेल तर मग त्याचा प्रभाव जरा अनुकूल होत नाही असे वाटते. अधिक माहितीसाठी आपण आमचे मित्र धोंडोपंताशी इथे संपर्क करावा ते आपणास योग्य मार्गदर्शन करतील.
अवांतर :- आमचे ज्योतिषविषयक ज्ञान इथे उपक्रमावर डेव्हलप झालेले आहे. त्यामुळे आम्ही सांगितलेल्या मताचा प्रभाव चांगला, वाईट होत असेल तर त्याची जवाबदारी आमची राहणार नाही !!! कारण अशा गोष्टींवर आमचा काही विश्वास नाही.आणि राशीचक्राच्या बाबतीत आम्ही रिस्कही घेत नाही....!
ता.क. प्रकाश घाटपांडे साहेब, यांचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे भागही वाचावेत !!!
मीनेचा शुक्र
फलितात ग्रहयोगाचा "साकल्याने" विचार करावा लागतो. या "साकल्यातच" सापेक्षता आहे. कोणताही एका गोष्टीवरुन फलित सांगणे अशास्त्रीय आहे. तरी पण आपण"कला क्षेत्रात" बाजी मारणार शुक्र हा कला, सौंदर्याचा कारक आहे. आपणास तो लाभदायक आहे. उच्च अभिरुचीचे ते लक्षण आहे.
प्रकाश घाटपांडे
शुक्राला अष्टम दोष नाही
नमस्ते,
माझाही माझ्या अल्प ज्ञानानुसार प्रयत्न.
मुळात दैत्य गुरू असलेल्या
शुक्राला अष्टम दोष नाही .
त्यामुळे शुक्राचा अष्टमाशी संबंध आल्याने त्याचा प्रभाव वाईट ठरत नाही.
या न्यायाने आपल्या कुंडलीतल्या शुक्राचा प्रभाव चांगला मानायला हरकत नाही.
आपला
गुंडोपंत
हलकेच घ्या
मुलगी पसंत असेल तर चांगला. नाहीतर वाईट. ;-)
पत्रिका जुळत नाही == नकार.
अभिजित...
लग्नाचा अन मिनाचा
कायस् बी संबध नाय,
तु बिंधास्त लग्न कर
लग्न झाल्यावर सा-याच राशीचा परिनाम होतो माण्सावर तेव्हढ ध्यानात घे.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)
बाबूराव :)