लिनक्स् : माहिती हवी आहे

माझ्या घरी २ डेस्कटॉप्स् आहेत (पी सी). त्यापैकी एकावर लिनक्स् टा़कून त्याबद्द्ल शिकावे असे मला वाटते ; पण नक्की काय शिकता येईल याबद्दल मला माहिती नाही. त्याबद्दल उपयुक्त "स्थळे" आणि पुस्तके सांगू शकलात तर उपकृत होईन. त्याचबरोबर हे संगणक एका नेटवर्कवर आणण्याकरता काय करावे लागेल ?

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडेसेच पाऊल बुडवून बघायचे असेल तर

फार बदल न करता केवळ लिनक्सची चाचणी करायची असेल तर क्नोपिक्स आवडते का बघा.
संगणकावरची मूळ कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) न बदलता सीडी किंवा डीव्हीडी (बूटेबल) ड्राइव्ह वरून ही प्रणाली चालते.

ओ एस् बदलायचीच आहे.

आणि लिनक्स् ची सीडी सुद्धा तयार ठेवली आहे. मात्र काय शिकायचे ते माहीत नाही. ऍडमिनिस्ट्रेशन शिकेन म्हणतो. त्याकरता चांगले साधन (रीसोर्स) हवे होते म्हणून हा विषय उघडला.

लिनक्स कमांड

आपण आधी काही बेसिक युनिक्स / लिनक्स कमांड शिकाव्यात असे मला वाटते.

जुजबी लिनक्स् येते.

आता इरेस पडलो तर बच्चम्-जी थोडे अजून शिकायची इच्छा आहे.

अहो

कसले ज्ञान आणि कसले काय ! काम करायला शिकायचे म्हणून तर मार्गदर्शन हवे आहे. "गूगलिंग" करायला काय लागते एरव्ही !

नक्की

तुम्हाला नक्कि काय माहिती हवी आहे? वर लिहिल्या प्रमाणे तुम्ही सीडीचा वापर करुन संगणक वापरु शकता. पुर्ण संस्करन न करता सुद्धा. अर्थात माझे यातले ज्ञान जुजबी आहे. मला सुद्धा काही प्रश्न आहेत.

  1. माझ्याकडे उबंटुच्या तबकड्या आहेत. त्या वापरुन जर संस्करण केले तर मला इंटरनेट कसे सुरु करता येइल?
  2. लॅपटॉप ड्युएल बुट करणे हि कल्पना योग्य आहे का?
मराठीत लिहा. वापरा.

१ . चे उत्तर देतो

माझ्याकडे उबंटुच्या तबकड्या आहेत. त्या वापरुन जर संस्करण केले तर मला इंटरनेट कसे सुरु करता येइल?

मी काही कारणाने केले होते तंव्हा युबंटूने आपले आपणच माझे कनेक्शन शोधले होते.
पण तसे त्याने शोधले नाही तरी काँफिगर करणे फार अवघड जावू नये तुमच्या सारख्या नव्या पीढीच्या लोकांना...

आपला
गुंडोपंत

दोन प्रकार

यात २ प्रकार येतात.
१. घरच्या संगणकासाठी - ज्यावर आमचा सर्वाधिकार
२. कार्यालयात - जिथे आमची धाव फक्त नेटवर्क पर्यंत. पुढे लागणारे अधिकार नसल्याने प्रश्न येतात.

मराठीत लिहा. वापरा.

एम.टी.एन.एल. कनेक्शन

आपण मुंबई/ दिल्लीत एम.टी.एन.एल. चे कनेक्शन वापरत असाल तर खालील माहिती भरून लिनक्स मधून नेट वापरता येईल.
आय. पी. : १९२.१६८.१.२
मास्क : २५५.२५५.२५५.०
गेटवे: १९२.१६८.१.१
डी. एन. एस. १: २०३.९४.२२७.७०
डी. एन. एस. २: २०३.९४.२४३.७०

इंटरनेट आणि ड्युअलबूट

माझ्याकडे उबंटुच्या तबकड्या आहेत. त्या वापरुन जर संस्करण केले तर मला इंटरनेट कसे सुरु करता येइल?

इंटरनेटचा कोणता प्रकार आहे (डायल-अप्, ब्रॉडबँड इ.) ते कळवले तर निश्चित सांगता येईल

लॅपटॉप ड्युएल बुट करणे हि कल्पना योग्य आहे का?

हो. हार्डडिस्कवर पुरेशी जागा असेल तर जरूर. योग्य प्रकारे केल्यास संगणकावर आधी असलेल्या नियंत्रण प्रणाल्या आणि त्यांचा डेटा यांना काही धोका नाही.

नोपिक्स लाईव्ह सिडी

मी नुकताच नोपिक्स या लाईव्ह सिडी विषयी एक लेख माझ्या ब्लोगवर लिहिला आहे. ही सिडी वापरून मराठीत कसे टाईप करता येईल ते त्यात लिहिले आहे.

ड्युएल बूट

फार पूर्वी स्लॅकवेअर आणि रेडहॅट वर बराच काळ खेळायला मिळाले होते*. सध्याची लिनक्स डिस्ट्रिब्यूशन्स कशी आहेत याचा अनुभव नाही. डुएलबूटसंबंधी इथे जास्त माहिती मिळू शकेल. इतरही काही अडचण असल्यास या फोरमवर चटकन मदत मिळते असा अनुभव आहे.

अवांतर : *त्या काळी हेल्प वाचून लिनक्स इन्स्टॉल आणि कॉन्फिगर केल्यावर शेवटी साउंड कॉन्फिगर करायचे असे. ते झाल्यावर साक्षात लिनस तोरवाल्ड्सचा आवाज येई, "धिस इज लिनस तोरवाल्ड्स. आय अनाउन्स लिनक्स" (चूभूद्याघ्या). आमच्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असे. अजूनही लिनसचा आवाज येतो का कल्पना नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उबुन्टू

उबुन्टू वापरून पाहा. ubuntuforums.org वर बरीच माहिती व नवख्यांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तरं आहेत. "The Official Ubuntu Book" इथून डाऊनलोड करता येईल.

काही माहिती

पण नक्की काय शिकता येईल याबद्दल मला माहिती नाही. त्याबद्दल उपयुक्त "स्थळे" आणि पुस्तके सांगू शकलात तर उपकृत होईन.

तुमचा नक्की रस कश्यात आहे (सर्फिंग, प्रोग्रामिंग, गेम्स, इमेजिंग, इ.) ते कळले तर काही सांगता येईल. कारण लिनक्स मध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे.

त्याचबरोबर हे संगणक एका नेटवर्कवर आणण्याकरता काय करावे लागेल ?

यासाठी तुम्हाला दोन्ही संगणकांवर नेटवर्क कार्ड असावे लागेल. त्यानंतर 'प्रायवेट नेटवर्क रेंज' मधील (10.x.x.x, 192.168.x.x इ.) कोणतेही दोन आयपी ऍड्रेस निवडून या संगणकांना द्यावे लागतील (योग्य "नेटमास्क" देण्याची काळजी घेऊन). दोन संगणक थेट जोडायचे असतील तर "क्रॉस केबल" लागेल. नाहीतर दोन "स्ट्रेट केबल्स" आणि हब किंवा स्विच सारखे एक साधन लागेल. या संबंधात काही विशिष्ट प्रश्न असतील तर जरूर विचारा.

 
^ वर