तर्कक्रीडा: ५१: गंधर्व, यक्ष आणि तुंबर
अमरद्वीपाच्या उत्तरेकडील भागात गंधर्व,यक्ष आणि तुंबर अशा तीन धर्मांचे लोक राहातात.गंधर्व नेहमी सत्य बोलतात. तर यक्ष असत्यच. तुंबरधर्मीय व्यक्ती कधी खरे तर कधी खोटे बोलते.तुंबरांच्या बोलण्याविषयी निश्चित नियम नाही.
इथे अशी रूढी आहे की गंधर्वकन्येचा विवाह यक्षपुत्राशीच होतो; तर यक्षकन्येचे लग्न गंधर्वाशीच होऊ शकते. मात्र तुंबर मुलीचा विवाह तुंबर मुलाशीच होतो. ही सामाजिक रूढी कटाक्षाने पाळली जाते.
विवाहानंतरसुद्धा प्रत्येक व्यक्ती आपले सत्यासत्य कथनाचे व्रत तसेच पुढे चालू ठेवते. म्हणजे गंधर्व कन्येचे लग्न यक्षपुत्राशी झाले तरी मुळची गंधर्व असल्याने ती नेहमी सत्यकथनच करते. तसेच यक्षकन्या विवाहोत्तर सुद्धा असत्यच बोलते.
एकदा एक तर्कशास्त्री या भागात गेले असता त्यांना दोन स्थानिक जोडपीं भेटली. श्री आणि सौ अ, श्री आणि सौ ब.त्या चौघांतील तिघांनी पुढील विधाने केली :
.....श्री. अ : श्री. ब हे गंधर्व आहेत.
.....सौ. अ : माझे पती सांगतात ते खरे आहे. श्री. ब गंधर्व आहेत.
.....सौ. ब : होय. माझा नवरा गंधर्वच आहे.
..
तर या चार जणांचे धर्म निश्चित करा.
******************************************************************
प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित. उत्तर कृपया व्यनि. ने
Comments
गंधर्व, यक्ष, तुंबर व्यनि. उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मुक्तसुनीत यांनी चारही जणांचे धर्म अचूक ओळखले आहेत. त्यांनी योग्य अशी कारण मीमांसाही लिहिली आहे.
गंधर्व,यक्ष,तुंबर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनु यांनी या कोड्याचे उत्तर पाठविले आहे. ते अगदी अचूक आहे. त्यांनी लिहिलेला युक्तिवादही पटण्यासारखा आहे.
गंधर्व,यक्ष,तुंबर :व्यनि. उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वश्री. सहज, वाचक्नवी,धनंजय आणि ऋषीकेश यांनी उत्तरे पाठविली. सर्वांची उत्तरे बरोबर आहेतच. तसेच प्रत्येक उत्तरासमवेत आवश्यक तो युक्तिवादही लिहिला आहे.
...यावेळी सहा उत्तरे आली (आतापावेतो) . ती सर्वच्या सर्व अचूक आहेत. असे प्रथमच घडले. माझ्यामते कोडे काही अगदीच सोपे नव्हते.
अहो
>>असे प्रथमच घडले. माझ्यामते कोडे काही अगदीच सोपे नव्हते.
ह्या पुर्वी तिघांनी "एकच" ("तेच") वक्तव्य केले नव्हते. कोड्याच्या अटीमुळे तर लगेच शिक्कामोर्तब झाले. :-)
मला वाटले की इथला कालचा सावळा गोंधळ पाहून तुम्ही कल्पकतेने "हम पंछी एक डाल के / हम सब चोर है" कोडे टाकलेत. ;-)
आणखी एक उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. परीवश यांनी या कोड्यांतील चारही व्यक्तींचे धर्म अचूक ओळखले. त्यांनी दिलेला युक्तिवाद थोडा लांबला आहे. पण तो कोणालाही पटावा असाच आहे.
उत्तर बरोबर असणारे
बरोबर उत्तर पाठवणार्या पहिल्या दोघांत माझे नाव नव्हते तेव्हा वाटले -"कोडे अगदीच सोपे नसावे. फारसा विचार न करता आपण चुकीचे उत्तर पाठवले. आता निवांत विचार करून सावकाशीने अचूक उत्तर पाठवूया"; पण तशी वेळच आली नाही हे पाहून हुश्श वाटले.--वाचक्नवी
आजानुकर्ण यांचे उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आजानुकर्ण यांनी योग्य युक्तिवाद करून हे कोडे यशस्वीरीत्या सोडवले आहे. त्यांचे अभिनंदन!
अंतिम उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी आंनी या कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे. तेच या कोड्याचे अधिकृत उत्तर म्हणून खाली दिले आहे.
गंधरव्,यक्ष, तुंबर : उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांचे उत्तर :
......................................................................................................................................
म्हणून श्री. ब (व श्री. अ) हे यक्ष किंवा तुंबर असू शकतील.
समजा श्री. ब हे यक्ष आहेत - तर सौ. ब गंधर्व असतील. मग त्यांचे विधान खोटे ठरते.
म्हणून श्री. ब (आणि सौ. ब) हे दोघेही तुंबर आहेत.
श्री. अ आणि सौ. अ यांची विधाने परस्पर विरोधी नाहीत. म्हणून ते दोघेही तुंबर आहेत.
..............................................................................................................................................