कळत-नकळत

सध्या दूरदर्शनच्या झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता "कळत-नकळत" ही मालिका प्रसारित होत असते. त्यांत दाखवलेली मधुरा या पात्राची वर्तणूक समाजांत अगोदरच दुय्यम स्थान असलेल्या मुलींविषयी अनिष्ट संदेश पसरवण्याची शक्यता आहे. एक विवाहयोग्य सुशिक्षित मुलगी प्रेमाने आंधळी होऊन घरादाराला संकटांत लोटते हे पाहिल्यावर आपलीही मुलगी वयांत आल्यावर असे करील की काय या शंकेने प्रेक्षकांतील कित्येक पालक आपल्या मुलींवरील नियंत्रण अधिक कडक करण्याची शक्यता आहे, तर आईबाप होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रेक्षकांना आपल्याला मुलगी न झाली तर बरी असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित मालिकेंत मुलीची काहीशी बंडखोर वर्तणूक घरांतील वडिलांच्या दहशतीची प्रतिक्रिया म्हणून दाखवली असेल. पण हे किती आईवडिलांना जाणवेल व कितीजण त्यापासून धडा घेऊन स्वतःच्या वागणुकींत योग्य ते बदल करतील हा प्रश्नच आहे.

मुलींविषयी प्रेम वाटावे असे व्यक्तिचित्रण असलेल्या मालिका, नाटके वा चित्रपट नसतील असे नाही. पण सकारात्मक चांगल्या संदेशांपेक्षा नकारात्मक, भीति व शंका निर्माण करणारे, पूर्वग्रहांना बळकटी देणारे संदेश लवकर पसरतात व त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकतात असा अनुभव आहे.

निर्मात्यांनी दूरदर्शनसारख्या दृक्-श्राव्य माध्यमांचा माणसांच्या विचारांवर होणारा परिणाम लक्षांत घेऊन कार्यक्रम तयार करायला हवेत.

आपणांस काय वाटते?

Comments

माझं मत..

निर्मात्यांनी दूरदर्शनसारख्या दृक्-श्राव्य माध्यमांचा माणसांच्या विचारांवर होणारा परिणाम लक्षांत घेऊन कार्यक्रम तयार करायला हवेत.
आपणांस काय वाटते?

सर्व वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या मराठी मलिका या एकापेक्षा एक बकवास असतात असं माझं मत आहे. उत्तम कथा, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत या सर्व गोष्टींचा त्यात अभाव असतो. या मालिका पाहणे म्हणजे रसिकतेचा अपमान आहे असं मी समजतो...

तात्या.

--
आम्हाला येथे भेट द्या!

मान्य

निर्मात्यांनी दूरदर्शनसारख्या दृक्-श्राव्य माध्यमांचा माणसांच्या विचारांवर होणारा परिणाम लक्षांत घेऊन कार्यक्रम तयार करायला हवेत.
यावरचं मालिका क्षेत्रातील व्यक्तीचे मत मनोगतच्या दिवाळी अंकात वाचावे.

बकवास मालिका

एक 'श्रीयुत गंगाधर टिपरे' सोडली तर टी.व्ही. वर दिसणार्‍या तमाम हिंदी-मराठी मालिका पाहण्याच्या लायकीच्या नाहीत. सर्व मालिकातील जवळजवळ प्रत्येक स्त्री नटवी आणि खुनशी दाखवतात. बर्‍याचजणी बदफैली आहेत. बरेच पुरुष दुष्ट, गुंड, लफंगे, ढोंगी , राजकारणी आणि स्त्रियांवर अन्याय करणारे आहेत. सैनिक किंवा क्रीडा पार्श्वभूमी असलेल्या मालिकातसुद्धा अशीच बरबटलेली माणसे दाखवली जातात. शहाण्या माणसाने फक्त डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्रफिक, ऍनिमल प्लॅनेट आणि टॉकशो सारखे कार्यक्रम पहावेत. बातम्यातसुद्धा ब्रेकिंग न्यूज पाहू नयेत.--वाचक्‍नवी

बातम्या!!!

आजकालच्या बातम्या पाहिल्या तर त्यात आणि संध्यानंदसारख्या पेपरात काही फरकच वाटत नाही.. तशाच प्रकारच्या बातम्या

मस्त रे !!!

आजकालच्या बातम्या पाहिल्या तर त्यात आणि संध्यानंदसारख्या पेपरात काही फरकच वाटत नाही..

एकदम सही !!!

इंडिया टीव्ही

इंडिया टीव्ही ला आम्ही टीव्ही वरचा संध्यानंदच म्हणतो.

अगदी

मनातले बोललात वाचक्नवी!

मालिका

या मालिका बनवणार्‍यांना कथा, दिग्दर्शन वगैरेकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. असे असताना याचा लोकांच्या विचारावर कसा परिणाम होईल याचा विचार त्यांच्या आवाक्याबाहेरचा वाटतो. या मालिका गंभीरपणे घेणार्‍या प्रेक्षकांची संख्या किती आहे हे बघणे मनोरंजक ठरावे.
अवांतर : या मानाने पूर्वी येणार्‍या भारत एक खोज सारख्या मालिका किती दर्जेदार होत्या हे आता लक्षात येते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

किलेका रहस्य

या मालिका बनवणार्‍यांना कथा, दिग्दर्शन वगैरेकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो.

अगदी खरे.

अवांतर : या मानाने पूर्वी येणार्‍या भारत एक खोज सारख्या मालिका किती दर्जेदार होत्या हे आता लक्षात येते.

भारत एक खोजच का? "किले का रहस्य" नावाची एक अत्यंत टपडी मालिका येत असे. तीही आजकालच्या मालिकांपेक्षा बरी होती. ;-) मला भीती-बीती वाटायची ती पाहून.

किले का रसस्य

आठवते - पण पूर्ण मालिका बघितली नाही, त्यामुळे काय झाले कोणास ठाऊक.
"ये है अभिशप्त किला, सदियों पुराना है..." वगैरे, सुरुवातीला गाणे होते.

"भारत एक खोज" किंवा अशा मालिकांच्या डीव्हीडी कुठे उपलब्ध आहेत का?

भारत एक खोज

भारत एक खोजच्या डीव्हीडी मीही शोधतो आहे. यूट्यूबवर फक्त हे मिळाले.

यातील सुरूवातीचे आणि शेवटचे संस्कृत श्लोक कशातून घेतले आहेत हे कळू शकेल का?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

नासदिय सूक्त

ऋग्वेदातील नासदिय सूक्त आहे हे असं वाटतं. नासदिय सूक्त अंतरिक्ष आणि सृष्टीच्या उगमाबद्दल वाच्य करते. त्याचे भाषांतर मिळाले तर वाचण्यासारखे आहे.

या गाण्यातील सृष्टीसे पहले.... आणि सृष्टी का कौन है कर्ता हे विचार करण्यासारखे आहेत.

कोणी काही म्हणावं पण मला ही सूक्ते म्हणजे सरळसरळ ऍग्नोस्टीक व्ह्यूज वाटतात आणि ती त्याकाळी रचणार्‍यांचे प्रचंड कौतुक वाटते.

येथे संपूर्ण भाषांतर वाचता येईल.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद. मलाही या रचना करणार्‍यांबद्दल असेच वाटते. बाकीची बहुतेक मनुष्यजात (काही संस्कृतींचा अपवाद वगळल्यास) जेव्हा आपले रोजच्या गरजा भागवण्याच्या कामात गढली होती, त्या काळात ही सृष्टी कशी निर्माण झाली, याचा कर्ता आहे का असे गहन प्रश्न ज्यांना पडले त्यांच्या प्रतिभेला दाद द्यावीशी वाटते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आत्मषटक अथवा निर्वाणशटक

नासदिय सूक्ताच्या दुव्याबद्दल धन्यवाद. यात जसे म्हणले आहे की सुर्वातीस कोणीच न्व्हते. त्याच अर्थी पण विरुद्ध बाजूने तत्वज्ञान सांगणारे आदीशंकराचार्यांचे आत्मषटक अथवा निर्वाणषटक वाटते.

यात जेंव्हा काहीच नसल्याच्या पातळिवर आतमा जातो तेंव्हाच त्याला सच्चीदानंद (इट्र्नल हॅपिनेसा या र्थाने) लाभतो असे वर्णन आहे. त्यातल्या शेवटच्या ओळी अशा आहेतः

अहंनिर्विकल्पो निराकार रूपो विभूर्याप सर्वत्र सर्वेंद्रीयाणि
सदामे समत्वम् न मुक्तीर्नबंध, चिदानंद रूपो:शिवोहम् शिवोहम्

I am thought-free and I have no form,
I am all-pervading and existing everywhere,
I am the king of behind all sense-organs,
I am always impartial to everything,
I am free from everything and I have no attachment to anything,
I am a fortunate, joyful, supreme being as the emblem of truth,
knowledge and eternal bliss. I am the self SPIRITUAL Joy (pure
consciousness) Shiva, Shivoham Shivoham

दुर्दैवाने यातील तत्वज्ञान न समजता लोक शंकराचीच पूजा करत सच्चिदानंद मिळवण्याचा प्रयत्न करत बसले.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

डीव्हीडीज्

"भारत एक खोज" किंवा अशा मालिकांच्या डीव्हीडी कुठे उपलब्ध आहेत का?

मिर्झा गालिबचाणक्यच्या सीडीज मिळतात.

उपक्रमींना लागू असलेली एक मालिका...

वादविवादात व्यस्त रहू इच्छीणार्‍या उपक्रमींना लागू होईल असे एका मालीकेचे नाव या चर्चेमुळे आठवले:

आ बैल मुझे मार!

मालिका

त्यातल्या त्यात हिंदी मालिका मराठी मालिकांपेक्षा जास्त बटबटीत असतात असे वाटते.
ही रंजक चर्चाही वाचा.
किले का रहस्य मी न चुकता पाहायचे. त्यात अगदी उत्कंठेच्या क्षणी व्यावसायिक विश्रांती येऊन 'टि व्ही एस चॅम्प' ची जाहिरात लागायची ती पण आठवते. मला ती टिव्हीएस चॅम्प ची जाहिरात नुसती लागली तरी किले का रहस्य आठवून भीती वाटायची. त्यात शेवट वो कौन थी सारखा होता बहुतेक. भूत बीत काही नसून खलनायक मंडळींचे कारस्थान इ.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.
 
^ वर