३ जी मोबाइल

३ जी मोबाइल सेवा
भारतात ३ जी मोबाइल सेवेसाठी आता परवानगी देण्यात आली आहे.
या शिवाय भ्रमणध्वनी क्रमांक तोच राखुन सेवादाता बदलण्याचीही परवानगी मिळाली आहे. याचा मोठाच लाभ अनेक लोक घेवू शकतील.

मात्र त्याच वेळी थर्ड जनरेशन मोबाइल तंत्रज्ञानाचा नक्की काय उपयोग होणार आहे, असा प्रश्न मला पडला आहे.
म्हणजे आवाजात सुधारणा वगैरे? तो तसाही चांगलाच आहे... की जास्त कव्हरेज मिळेल?
की सगळ्यांनाच आता जालावर भटकंती करायला मिळेल?
जर अशी भटकंती करायला मिळाली तर त्याचे मुल्य कसे आकारले जाईल असे वाटते?
मला वाटते की कंटेंट नुसार या सेवा मिळाव्यात. या शिवाय मोबाईलसाठी ब्रॉडबँडही स्वतंत्रपणे विकले जावू शकेल.
याशिवाय काही खास साइटस यासाठीच सुरु होवू शकतील.
बातम्या तसेच हवामान वृत्तांत, शेयर बाजार वृत्तांत वगैरे सेवा मुल्य आकारून देता येतीलच.
तसेच रेल्वेची व बसची स्थिती किंवा बुकिंगसेवा देता येतील का?
मात्र हवाई वाहतूक वाले यात नक्कीच रस घेतील अशी खात्री वाटते.
त्याचवेळी इतक्या छोट्याश्या पडद्यावर काय डोंबलाचे वाचता येणार की पाहता येणार असाही प्रश्न पडतो.
शिवाय बॅटरी दहावेळा संपणार...

मात्र हे ३जी तंत्रज्ञान नक्की कसे चालते यावर कुणी काही प्रकाश टाकु शकेल का?
आपल्याकडे मोठी माहिती असल्यास आपण स्वतंत्र लेख लिहिलात तरी चालेल.

आपणास असे वाटते का की या नव्या ३जी चा फायदा घेवून या फोन कंपन्या ग्राहकांना अजूनच लुबाडतील?
खरंचा काही उपयोग सामान्य माणसाला आहे का?
आपल्याला काय वाटते?
आशा आहे या चर्चेतून महत्वाचे मुद्दे तसेच मोलाची माहिती मिळेल.

आपला
गुंडोपंत

Comments

धावते जग

पंत,

आपण हा खासच विषय चर्चेला निवडलात.

म्हणजे आवाजात सुधारणा वगैरे?
-- महिती नाही. जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील. पण चांगलं मशीन वापरलं तर चांगला स्पष्ट आवाज येतो.

तो तसाही चांगलाच आहे... की जास्त कव्हरेज मिळेल?
--हो. कव्हरेज जास्त मिळेल. शिवाय तो जागतिक जाळ्याचा भाग असेल जेणेकरुन आपला भ्रमणध्वनी आपल्या देशातल्या जाळ्याचा भाग न राहता वैश्विक होईल. मला वाटते अशा प्रकारे आपण जागतिक-खेड्याकडे वाटचाल करू लागलो आहोत.

की सगळ्यांनाच आता जालावर भटकंती करायला मिळेल?
--नाही. जे पैसे मोजतील त्यांनाच.

याशिवाय काही खास साइटस यासाठीच सुरु होवू शकतील.
-- अशा अगोदरच सुरु झाल्या आहेत. मागच्या अथवा त्या अगोदरच्या महिण्यातल्या इंक मासिकात (अमेरिकेत) त्यांच्यावर सविस्तर लेखा आला होता.

तसेच रेल्वेची व बसची स्थिती किंवा बुकिंगसेवा देता येतील का?
--वर उल्लेख केलेल्या लेखात जेवणाच्या खरेदी पर्यंतची प्रगती झाल्याचे कळते.

मात्र हवाई वाहतूक वाले यात नक्कीच रस घेतील अशी खात्री वाटते.
--हे सुद्धा ऐकून आहे. कोणाला माहिती असल्यास द्यावी ही विनंती.

त्याचवेळी इतक्या छोट्याश्या पडद्यावर काय डोंबलाचे वाचता येणार की पाहता येणार असाही प्रश्न पडतो.

शिवाय बॅटरी दहावेळा संपणार...
-- सध्याच्या बॅटर्‍या संपणार. पण लवकरच आणखी ताकदीच्या बॅटर्‍या येतील अशी अपेक्षा आहे. नाहीतरी सध्या हे जी३ बाल्यवस्थेतच आहे. आणखी बरेच काही येणार आहे.

आपणास असे वाटते का की या नव्या ३जी चा फायदा घेवून या फोन कंपन्या ग्राहकांना अजूनच लुबाडतील?
--कंपन्या तुमचा खिसा रिकामा करायलाच बसलेल्या आहेत. शासनाने काळजीपूर्वक कायदे करुन यात कंपन्या तसेच ग्राहक या दोघांचाही फायदा होईल असा मार्ग आखून द्यायला हवा.

खरंचा काही उपयोग सामान्य माणसाला आहे का?
--करून घेतला तर आहे. नाही तर नाही. शेअर दलाल, उद्योजक, अधुनिक शेतकरी, डॉक्टर्स, कंपन्यांचे अधिकारी, मंत्री, शासकीय अधिकारी अशा लोकांना सध्याच्या जी३ चा नक्कीच फायदा आहे. त्यांना जगाच्या घडामोडींवर लक्ष ठेऊन निर्णय घेण्यासाठी या जी३ मोबाईलकडून मोलाची मदत होऊ शकते. सामान्य माणसापर्यंत हे लोण पसरायला काही वर्षे लागतील असे वाटते. पण आजच्या वैज्ञानिक प्रगतीचा आवाका लक्षात घेता हे काही महिन्यांतही होऊ शकते.

आपला,
(जी२ वरच असलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

काय सांगता?

तो जागतिक जाळ्याचा भाग असेल
काय सांगता म्हणजे मी जर स्वातीताईंसारखा जपान फिरायला कधी काळी गेलोच तर (जाईन असे नाही बर का! तेव्हढे पैसे कुठे आहेत हो? ;) ) तर मला मोबाइल बदलायचे कामच नाही?
वा हे तर खुपच बरे झाले.

शिवाय आपण वाचलेल्या त्या 'इंक' मासिकाची काही 'लिंक' नाही का देता येणार यात?
किंवा लेखाचा गोषवारा तरी द्या.

पण लवकरच आणखी ताकदीच्या बॅटर्‍या येतील अशी अपेक्षा आहे. नाहीतरी सध्या हे जी३ बाल्यवस्थेतच आहे. आणखी बरेच काही येणार आहे.

काय सांगता? आम्हाला तर हेच खुप वाटते आहे...
काय काय येणार आहे ते पण येवू द्या ना इथे... मी तर मागे ऐकले होते की मोबाइलच क्रेडिटकार्ड, आयकार्ड व पाकिट म्हणून काम करणार... ते कसे कळले नाहीये... (कारण मामानी पकड्ल्यावर काय नि कसे करायचे असा साधा प्रश्न आहे हो आम्हाला.)
शिवाय मोबाईल गेला की मेलोच!!!
आमची आयडेंटीटीच जाणारकी हो!

बॅटर्‍या हा मात्र स्वतंत्र विषय आहे. याचा अंतरिक्षातील तंत्रज्ञानाचाही संबंध आहे. ती लोकंतर कधी एकदा खरच जास्त लाईफ स्पॅन च्या बॅटर्‍या मिळतात याकडे डोळे लावून बसले आहेत.
शिवाय हलक्या (वजनाने बरंका) बॅटर्‍याही हव्या आहेतच.

आपला प्रतिसाद आवडला!
आपला
गुंडोपंत

धावती माहिती

थ्री जी तंत्रज्ञान अधिक ग्राहकांना सेवा देऊ शकते (व्हॉईस आणि डेटा अशा दोन्ही प्रकारच्या). त्याशिवाय वाढीव विदा दर (डेटा रेट), आवाजाचा उत्तम दर्जा, अधिक सुविधा अशा अनेक गोष्टी थ्री जी मध्ये आहेत.

केवळ विदा दर पहायचा झाला तर जी.एस. एम. --> जी.पी.आर. एस. --> एज (E.D.G.E.) --> डब्ल्यू. सी. डी. एम. ए. (रिलीज ९९) --> एच. एस. डी. पी. ए. अशी ९.६ केबीपीएस पासून १४.४ (व त्याहून अधिक) एमबीपीएस अशी उत्क्रांती थ्री जी मुळे शक्य झाली आहे. याचा लाभ घेऊन तुम्ही सांगितल्यात तशा अनेक सुविधा उपलब्ध करून देता येतील. सुरुवातीला यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तरी जसजसे अधिकाधिक लोक याचा वापर करू लागतील, तसतशी ती किंमतही कमी होईल. पडदा छोटा आहे, हे खरं पण स्क्रोलबार वापरून वाचायची हळूहळू सवय होते.

बॅटरी संपण्याचा प्रश्न थोडा आखूडशिंगी बहुदुधी सारखा आहे. अर्थात, पूर्वीपेक्षा आता बॅटरीजची क्षमता वाढली आहे आणि एखादी सुविधा (ऍप्लिकेशन) चालवताना वापरली जाणारा विद्युतभार (करंट) कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक उदाहरण द्यायचे झाले तर, पूर्वी एम. पी. ३ फाईल फोनवर सुमारे २०० मिली-ऍंप करंट खायची (म्हणजे तुमच्या फोनची बॅटरी ८०० मिली-ऍंप-तासाची असेल तर चार तास गाणं ऐकलं की फोन पूर्णपणे डिस्चार्ज्ड. सध्या हा आकडा ३० च्या खाली आहे [= दिवसभर गाणं ऐका :)]आणि अजूनही कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

थोडक्यात, मोबाईल फोन केवळ बोलण्यापुरता असणार नाही. आता यात गरज किती आणि चैन किती हा भाग अलाहिदा. पण लोकांच्या मागणीमुळेच या क्षेत्रात मोठी उलाढाल होत आहे, हेही खरं.

[आकडे स्मरणातून दिले आहेत. चू. भू. द्या. घ्या.]

अवांतर

थोडे विषयांतर, पण म. टा. मधील हे फोटो फीचर बोलके आहे.

छोटा पडदा

पडदा छोटा आहे, हे खरं पण स्क्रोलबार वापरून वाचायची हळूहळू सवय होते.
--शिवाय आता पडदे जास्तीचे सुक्ष्म-बिंदू (रिझोल्यूशन) वापरुन बनवत असल्याने ते वाचताना त्रास होत नाही. माझ्याकडे ब्लॅकबेरीचा पर्ल आहे. त्यावर एखाद्याचे नाव खूप लांबलचक असले तर ते अपोआप छोट्या आकारात दिसते. हे छोट्या आकारतले अक्षर वाचण्यास माझ्या पूर्वीच्या यंत्रातील मोठ-मोठ्या अक्षरापेक्षा सुटसुटीत व ठळक वाटते. माझ्या एका मित्राकडे सोनी इरिक्सनचे यंत्र आहे. त्यावर त्याचा मुलगा चित्रपट सुद्धा पाहतो. :)

आपला,
(पडदेवाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अमेरिकीत ४ जनरेशन

अमेरिकीत ४ जनेरेशन हाये अन आपून ३ जी जनरेशनच्या गप्पा हानून राह्येलो.

नाराज.
बाबूराव :)

 
^ वर