तर्कक्रीडा:५२ : उत्सवमूर्ती कोण?

श्री.मोहन आपटे यांचा विवाह झाला . नवपरिणीता सौ.आपटे यांचे माहेरचे आडनाव बापट. श्री.आपटे यांची बहीण आणि सौ. आपटे यांचा भाऊ ही दोघे परस्परांना अनुरूप होती. त्यांचाही विवाह पार पडला.आता सौ. बापट ही सौ.आपटे यांची नणंद (पतीची भगिनी) तर भावाची पत्नी (जाया) म्हणून भावजय.
या चौघांत दोन पुरुषांची नावे मोहन आणि माधव तर स्त्रियांची सुधा आणि सुलभा अशी आहेत.
.....यांतील एका व्यक्तीचा वाढदिवस होता. त्या व्यक्तीला आपण 'उत्सवमूर्ती' म्हणू. तो वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा करून उत्सवमूर्तीला अनपेक्षित आश्चर्यानंद द्यायचा असे अन्य तिघांनी गुप्तपणे ठरविले.
.....या समारंभाच्यासंदर्भात माधवची बहीण सुधाच्या नवर्‍याशी मंगळवारी बोलली, तर बुधवारी मोहनची बहीण आणि उतसवमूर्तीची सहधर्मचारी व्यक्ती (स्पाऊस) या दोघांची कार्यक्रमाविषयी चर्चा झाली.सर्व बोलणी उत्सवमूर्तीला सुगावा लागू न देता गुप्तपणे झाली.
तर उत्सवमूर्तीचे नाव काय?
ही चारही नावे आणि त्यांची नाती यांची संगती लावा.

******************************************************************
उत्तर व्यनि. ने
................................................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त कोडे आहे !

यनावाला साहेब,
कोडे मस्त आहे. हे तरी सोडवता येते का ! प्रयत्न करतो आणि उत्तराच्या जवळ जरी आलो, तरी व्य.नि.करतो ! :)
आम्ही कालच एका पुस्तक प्रदर्शनातून आपले 'निवडक शब्दकोडे' पुस्तक विकत घेतले, पण ते निघाले शब्दकोड्यांचे पुस्तक !
आपण जे नात्यागोत्याचे कोडे घालता त्या पुस्तकाचे नाव काय ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दकोडी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ.बिरुटेसर,
बर्‍याच वर्षांपूर्वी (किमान दहा) मला एका बाईंचा फोन आला. त्या प्रकाशन व्यवसायात उतरणार होत्या. पहिल्या पुस्तकासाठी त्यांना ,सकाळवृत्तपत्रात छापून येणारी माझी शब्दकोडी हवी होती. मी 'हो' म्हटले. पुढे त्यांनी लेखी संमती घेतली. पुस्तक छापले. तदनंतर त्याचे काय झाले काही कल्पाना नाही. मानधन इ. दूरच राहिले. पुढच्या आवृत्तीविषयी काही कळवलेच नाही.असो . तुमच्या प्रतिसादावरून पुस्तक उपलब्ध असून त्यावर माझे नावतरी आहे हे कळले. असो हेही नसे थोडके.

उत्सवमूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे उत्तर श्री. सहज यांनी अचूक शोधले आहे. त्यांनी संक्षिप्त युक्तिवाद दिला आहे, तो पटण्यासारखा आहे.

वाढदिवस

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उत्सवमूर्ती कोण ते शोधण्यात तसेच चारही नावे आणि त्यांची परस्परांतील नाती यांची योग्य संगती लावण्यात श्री. वाचक्नवी हे यशस्वी ठरले आहेत.

उत्सवमूर्ती: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी आपल्या नेहमीच्या 'मूले कुठारः|' पद्धतीने कोडे सहजतेने सोडविले आहे.

उत्सवमूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनु यांनी या कोड्याचे उत्तर पाठविले आहे. ते बरोबर आहे. सर्व नावे आणि नाती यांची योग्य संगती त्यांनी लावली आहे.मात्र त्यांनी कारणमीमांसा दिलेली नाही.योग्य युक्तिवाद त्यांनी लढवलाच असणार. पण लिहिला नाही.तार्किक कोड्याच्या उत्तरात पर्याप्त(पुरेसा) युक्तिवाद संक्षिप्त स्वरूपात मांडता यावा अशी एक अपेक्षा असते.

उत्सवमूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनु यांनी या कोड्याचे उत्तर पाठविले आहे. ते बरोबर आहे. सर्व नावे आणि नाती यांची योग्य संगती लावली आहे...........
द्विरुक्ती झाल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे.

आणखी एक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋषीकेश यांनी या कोड्याचे उत्तर अचूक शोधले आहे. त्यांनी योग्य कारण मीमांसाही केली आहे.
..................................................

उत्सवमूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे अंजू यांनी यशस्वीरीत्या सोडवले आहे. त्यांची सर्व उत्तरे बरोबर आहेत. युक्तिवादही पुरेसा आहे.

उत्सवमूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत यांनी हे तार्किक कोडे योग्यरीतीने सोडविले आहे. त्यांनी पर्याप्त कारणमीमांसाही दिली आहे.

 
^ वर