महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात

नमस्कार ,
ही चर्चा यासाठीच की ......
येत्या काही वर्षात महाराष्ट्रातील काही शहरे(खास करून मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,इ.) हिंदी भाषीक होतील असा अंदाज आहे. मुंबई केंद्रशासीत झालेली असेल. (येथे काही जणांचा युक्तीवाद असा असतो की मुंबईत मराठी माणूस कधीही ५०%च्या वर नव्हता .आता तर तो मुंबईतून कमी कमी होत चालला आहे.)येत्या काही वर्षात तो आणखी किती कमी होईल ते कळणार देखील नाही. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडलेल्या असतील. यापुढे मुंबईचा महापौर हिंदी भाषीकच असेल.
आणखी काय काय होऊ शकते याचा जाणकारांनी अंदाज लावावा. चर्चा फक्त महाराष्ट्रापुरतीच ठेवावी तसेच राज्याबाहेरील इतर शहरांचा दाखला देऊ नये कारण संयुक्त महाराष्ट्र(अजूनही तो पुर्णपणे मिळवता आला नाही) आपण आपले रक्त सांडून मिळवला आहे.
मराठी माणुस नेमका कोठे चुकला ? राज्यकर्ते भ्रष्टाचारात अडकले का ? ते कृपया लिहा.
आणि हो मुंबई नेमकी कोणाची ?
आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वतंत्र महाराष्ट्र

खुप उशीर झालाय हो!

"स्वतंत्र महाराष्ट्र" झाला तरच काही शक्यता आहे यावर तोडग्याची.

आपला
गुंडोपंत

महाराष्ट्राचा आर्थिक फुगवटा बंद करणे हा एक उपाय शक्य आहे

मुंबईतून भारतभराच्या पैशाची उलाढाल होते, आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक शहरांतून माल आणि व्यवहाराची भारतभर देवाणघेवाण होते. त्यामुळे या शहरांमध्ये भारतातील त्या ठिकाणच्या लोकांना यावेसे वाटत असेल. हा रोगट आर्थिक आणि औद्योगिक फुगवटा बंद होऊन मुंबईतून फक्त महाराष्ट्राच्या पैशाचीच उलाढाल व्हावी. ठाणे-पुणे औद्योगिक भागांत कच्चा माल फक्त मराठी मुलुखातून यावा, आणि येथील तयार माल आणि सेवा फक्त मराठी मुलुखातच वितरीत व्हावेत. मग भारतातील विविध भागातून इथे येणार्‍यांचे हे विचित्र आकर्षण निघून जाईल. शिवाय पश्चिम रेल्वे ही पालघर येथे खंडित करावी, मनमाड मार्गे खांडवा मध्य रेल्वे खंडित करावी, तसेच सोलापूर, मिरज, इ.इ. दक्षिण आणि द.म. रेल्वेंबाबत - या सर्व रेल्वे मार्गांनी महाराष्ट्रात आक्रमण होते आहे, हे उघड्या डोळ्यांनी दिसते आहे. शिवाय असेही दिसून आले आहे की मालवाहातूक करणार्‍या ट्रकांचे चालक पुष्कळदा मराठीभाषक नसतात. महाराष्ट्राच्या जकात नाक्यावर ट्रकचा ड्रायव्हर बदलावा, नाही तर जकातनाक्याला काय अर्थ राहिलेला आहे हे कळत नाही.

अशी आर्थिक नियमावली रक्त सांडून मिळवलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाने केली तर हा भयंकर प्रकार संपेल. महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत काय?

पाटते पण...

धनंजयराव,

आपले विचार मराठी म्हणून पटतात पण...
ठाणे-पुणे औद्योगिक भागांत कच्चा माल फक्त मराठी मुलुखातून यावा, आणि येथील तयार माल आणि सेवा फक्त मराठी मुलुखातच वितरीत व्हावेत.
-- आपण असे करायचे ठरवलेच तर याने आपण देशाला खंडीत करण्याचे विचार तर पेरणार नाही ना? इथे आपण जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेचे विचार करतो आहोत तेव्हा ही विरूद्ध दिशा ठरणार नाही का?

महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत काय?
-- नाही, तुंबड्या भरत आहेत.

आपला,
(मराठीच) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

स्पष्टीकरण

पुणे-मिरज-लोंडा-मडगाव हा त्रैराज्य रेल्वे प्रवास माझ्या लहानपणच्या अत्यंत गोड आठवणींचा आहे - कृष्णेकाठी अंजिरे, बेळगावला कुंदा, आणि गोव्यात पुन्हा कोकणी मेवा. त्यामुळे ती रेल्वे बंद व्हावी असे माझे खरेखरचे मत मुळीच नाही. तसेच आमचे नातेवाईक तिकडे इंदूर-खांडवा, इकडे बडोदा, बेंगळूर येथे आहेत, त्यामुळे तेही रेल्वेमार्ग बंद पडू नये असे माझे खरोखरचे मत आहे. वरील प्रतिसादात जवळजवळ सर्व वाक्ये उलट्या अर्थाने वाचावीत.
भारताच्या आर्थिक एकात्मतेच्या बाजूने माझे ठाम मत आहे.

मराठी भाषा टिकण्यासाठी, मराठी माणसाला आणि आगंतुकांनाही त्यात गोडी वाटायला आणि फायदा दिसायला, या दोन्ही गोष्टी पाहिजे, हे माझे खरे मत. "गोडी"साठी मराठीत रंजक रचना व्हाव्यात - उथळ गल्लाभरू सिनेमांपासून प्रौढ वैचारिक साहित्यापर्यंत सर्व पर्याय व्हावेत. "फायदा" असा व्हावा - मराठीत बोलणार्‍या-चालणार्‍या ग्रामीण जनतेने सुशिक्षित व्हावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेने सुदृढ व्हावे. त्या अर्थव्यवस्थेचा फायदा करून घ्यायला आगंतुक मराठीला आपलीशी करतील. तसे असता आगंतुकांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आपल्याला भावतीलही. पुण्यात रास्तापेठेत मला कधी मराठी बोलणारा म्हणून परके वाटले नाही, पण तिथल्या एका दुकानात जशी खरपूस भाजलेली लज्जतदार "मद्राशी" कॉफीपूड मिळायची तशी दुसरीकडे कुठे नाही.

दुधात पडलेली साखर दुधाला विरजतही नाही, आणि आपले साखरपण सोडतही नाही. प्रांताप्रांतांतील संकर असा गोड व्हावा, म्हणजे प्रगतीही आडणार नाही, आणि संस्कृतीही बदलेल पण नासणार नाही. हे मत या लेखविषयाला कदाचित अवांतर आहे म्हणून फार पाल्हाळ नको.

हं

जसे आईला आपली सगळी मुल आवडतात तसे आपल्याला भारतातील सर्व शहरे, गावे का बरे नाही? जसे आपल्या अपत्याचे अगदी तान्हे असताना गळ्यातून येणारा आवाज, मग जरा भसाडा आवाज, मग बोबडे बोल, मग नुस्ती बकबक, मग लहान मुलाचा आवाज, मग टिन् एजर मधला घोगरा, मग दर रविवारी सकाळी सकाळी फोनवर मोठ्या व्यक्तीचा आवाज आवडतो कारण तो आपल्याच बाळाचा असतो. त्यासारखाच आपल्या (भारतीय) भाई बांधवांचा आवाज, कसा ही (कूठल्याही भाषेतला) असला तरी काय बिघडले? (हेच का नॅशनल इंटीग्रेशन?)

शेवटी :- देशातील सर्व भागांचा सर्वांगीण, संतुलीत विकास व्हायला पाहीजे. सर्वांना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहीजेत. बाकी सब झूट है.

सर्वांगीण झाला पाहिजे पण

सहजराव,

आपले विचार अखंड भारताच्या दृष्टीकोनातून येत आहेत हे उमगले. पण एकाचा भगाने बाकीच्या भागांचा बोजा किती दशके आणि का म्हणून उचलायचा?

शेवटी :- देशातील सर्व भागांचा सर्वांगीण, संतुलीत विकास व्हायला पाहीजे. सर्वांना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहीजेत. बाकी सब झूट है.
-- काय आपण मराठी लोकांनी त्या बिहारींना प्रगतीपासून रोखले आहे की काय? निसर्गाने त्यांना उ.प्र.ला महाराष्ट्रापेक्षा जास्त झुकते माप दिले आहे. त्याचा फायदा काय फक्त लोकसंख्या वाढवण्यासाठीच करून घ्यायचा असतो की काय?

आपला,
(भारतीय-मराठी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

सामाजीक जबाबदारी

>>पण एकाचा भगाने बाकीच्या भागांचा बोजा किती दशके आणि का म्हणून उचलायचा?

आता सारे भारतीय माझे बंधू-भगीनी म्हणल्यावर आयुष्यभर की हो, (ऍज लॉन्ग ऍज इट टेक्स्) :-) आता जरा मनोरुग्ण, एका अर्थाने फार् काही कामाचा नाही म्हणून त्या भावंडाला, कर्त्या भावाने काय सोडून द्यायचे का? पुनर्वसनाचे काम केलेच पाहीजे. तुम्ही अशी घरे बघीतली नाही का? एका अनामीक बिहारी सैनीकाने तुमच्या माझ्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्याचे ऋण समजून... नाही पटत तर द्या सोडून...

पण ह्यालाच तर सामाजीक जबाबदारी म्हणतात, दुसरे प्रशासकीय, राजकीय नेतृत्व ज्याने हा विकास नियोजन करून घडवून आणायचा.

आमच्यासारखा गैर-सरकारी माणूस सामाजीक जबाबदारी समजून जितके जमेल तितके करू. बाकी परमेश्वराला माहीत.

पण एक देश, एक कुटूंब विचार सोडलात, फक्त मराठीच विचार् केलात तर लवकरच फक्त मुंबईवाले, फक्त विदर्भ, फक्त पिंपरी फक्त चिंचवड इ. इ. सुरू होईल. :-)

कधीतरी मोठा विचार पण करूया की ;-)...

सहजराव

कृपया फक्त महाराष्ट्रापुरतच बोला.
आपला
कॉ.विकि

हं

जरा वरचा प्रतिसाद समजून घ्यायचा प्रयत्न करा. नाहीतर खालील उत्तरे वाचा

(महाराष्ट्रातील??) मराठी माणुस नेमका कोठे चुकला ?
गेली ६० वर्षे (महाराष्ट्रातील*)कम्युनिस्टांना पुर्ण बहूमताने न निवडून दिले नाही तिथेच.

(महाराष्ट्राचे??) राज्यकर्ते भ्रष्टाचारात अडकले का ?
हो, (महाराष्ट्रातील*) कम्युनिस्ट पक्षाची विचारवंत मंडळी सोडून सर्व इतर अडकले.

ते कृपया (महाराष्ट्रापुरत*) लिहा.
लिहले (वर बघा - महाराष्ट्रापुरत)

आणि हो (महाराष्ट्रातील??*) मुंबई नेमकी कोणाची ?
अर्थात (महाराष्ट्रातील??*) कम्युनिस्टांची!

आता नवे प्रश्र

१) येत्या काही वर्षात महाराष्ट्रातील काही शहरे(खास करून मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,इ.) हिंदी भाषीक होतील असा अंदाज आहे.

जर तर च्या प्रश्रांबाबत आत्ताच कशाला? तसेच शहरे हिंदी भाषीक होतील म्हणजे काय? ह्या शहरात फक्त हिंदीच बोलले जाईल असा कायदा? इतर कुठली भाषा बोलायला बंदी?

१.१) का ह्या शहरात हिंदी बोलणार्‍यांची संख्या इतर भाषा इतर कुठली भाषा बोलणार्‍यांपेक्षा जास्त होईल?
आत्ता देखील महाराष्ट्रात बहूतेक तसेच आहे. मराठी व तोडकी मोडकी का होईना हिंदी बर्‍यापैकी सर्वच मराठी जनांना येते. मग काय प्रॉब्लेम आहे?

१.२) का ह्या शहरात रहाणारी लोक हिंदी भाषीक परराज्यातून आली असतील व त्यांचे व येथील आधीपासून तश्या असलेल्या लोकांचे प्रमाण इथल्या मूळच्या व हिंदी न बोलू शकणार्‍या लोकांपेक्षा जास्त असेल?

हं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे जिथे पोटापाण्याचा प्रश्न सुटतो म्हणून परराज्यांतून लोंढा येतो / स्थलांतर होते. बघा म्हणजे येथील (महाराष्ट्रातील) राज्यकर्त्यांना आता जरा तरी श्रेय देणे आले की त्यांच्या राज्यनितीमुळे जरा भरभराट झाली आहे, बरोबर् की नाई? बाहेरच्या लोकांचापण पोटाचा प्रश्र सोडवला जातोय. भारतीय घटनेने भारतीय नागरीकाला "बहूतेक" (काही भाग सोडले) सर्व देशात कूठेही जाण्याचा, रहाण्याचा अधिकार दिला आहे.

मग आता हो काय? बंगाली, मल्याळी, मराठी ह्या शिवाय आता जरा हिंदी बोलायचा सराव करूया!

साम्यवादी बंधू(कॉम्रेड) नमन कर|

-------------------------------
*कृपया फक्त महाराष्ट्रापुरतच बोला

सहजराव

तुमच्या प्रश्नांची उत्तरे
आपण म्हणता महाराष्ट्र प्रगत राज्य मग स्वातंत्र्यानंतर भारतातील इतर राज्ये प्रगत का झाली नाही. त्या त्या राज्यसरकारांनी आपल्या राज्याबाहेर जाणारा लोंढा थोपवला का गेला नाही.
भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे प्रत्येक भाषेला तो तो प्रदेश आहेच ना.
हल्ली तर आम्ही रेल्वे,बस , मंडई,आजूबाजुला हिंदीच ऐकतो. हिंदीचे,इंग्रजीचे मराठीवर आक्रमण होत आहे.
कितीतरी हिंदी किंवा अन्य भाषीकांना कित्येक वर्षे महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलता येत् नाही . महाराष्ट्रात तर बहुतेक हिंदी भाषीक नेत्यांना तर मराठी देखील बोलता येत नाही. त्यापैकी एक तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळत होते.
तसेच आमचे मराठी नेते सुध्दा खुशाल हिंदीतुन मुलाखाती देतात काय म्हणायचे ?
याबाबत मी मनोगत या संकेतस्थळावर चर्चा केली होती. त्यात स्वाभीमानी शरद कोर्डे सोडले तर कोणिही मराठीच्या बाजूने नव्हते असे मला वाटले.
मुंबई कष्टकर्‍यांची असे मानले तरी लोंढे वाढतच चालले आहे ते थोपविणे आवश्यक आहे.

आपला
कॉ.विकि

मग

सर्वप्रथम तुम्ही ह्या चर्चेत ३ वेळा आलात याबद्दल आनंद झाला. यापुर्वी चर्चा टाकून जायचात बराच काळ गायब असायचाच. :-)

>>लोंढे वाढतच चालले आहे ते थोपविणे आवश्यक आहे

ह्याच्याबद्दलच तर संपुर्ण् देशाचा सर्वांगीण, संतूलीत विकास बोलत होतो. सगळ्यांना सर्वत्र संधी तर तुम्ही म्हणाला फक्त महाराष्ट्रापुरत बोला.

असो येणारे लोंढे हा जर हा कळीचा मुद्दा असेल तर ह्यावर विचार करा, भाषेला कशाला मधे घेता. इतर भाषा बोलणे हा जर गुन्हा नसेल, कोणाला कूठेही जायची मुभा असेल तर त्याविषयी इथे आम्ही काय् करावे?

कोणाला कुठे कधी कुठली भाषा बोलाविशी वाटते ह्याचे काही संवैधानिक नियम आहेत् का? मला मराठी जेव्हा बोलावीशी वाटते तेव्हा बोलतो. जिथे नियम आहेत ते पाळतो, जसे इथे आता मी प्रतिसाद मराठी ऐवजी अन्य भाषेतून देऊ शकतो का?

शेवटी जे आपल्या हातात आहे तेच करणे इष्ट. उगाच चिंता त्रास् कशाला? ह्या की तुम्ही एक पवित्रा. यापुढे कानात बोळे अथवा आयपॉड घालून जाईन की शक्यतो आजूबाजुला हिंदी ऐकू येणार् नाही. [त्या आयपॉडवर फक्त शुद्ध मराठीच गाणी ऐका असा आग्रह नाही हो घरणार :-) ]मंडईत भाजी, हिंदी बोलणार्‍यांकडून घेणार नाही तर मराठी बोलणार्‍यांकडूनच घेईन. हिंदी भाषीकाकडून कूठली सेवा घेणार नाही, रहायला जागा देणार नाही, अघोषीत (कायद्यात बसेल अशीच हा) शक्य तेवढी बंदी टाका बघू काय होतेय?

>>भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे

म्हणजे काय? त्या प्रांतात त्या भाषेशिवाय अन्य कुठली भाषा बोलली जाऊ नये की अन्य कोणी भाषीक तिथे येऊ नये?

>>त्यात स्वाभीमानी शरद कोर्डे

हां आता शरदजींना स्वाभीमानी ही पदवी (जसे महात्मा, सेनानी इ.) तुम्ही दिली असेल तर आनंद आहे पण ते एकटेच स्वाभीमान हा गुण असलेले व आम्ही स्वाभीमानी नाही असा तुमचा एकांगी अर्थ असेल तर आक्षेप आहे.

---------------------------------------------------------------
हिंदी भाषकाकडून महाराष्ट्रात मत चालेल काय? वहीच तो घोडा सब पेंड खा रहेला ना?

हं

मंडईत भाजी, हिंदी बोलणार्‍यांकडून घेणार नाही तर मराठी बोलणार्‍यांकडूनच घेईन. हिंदी भाषीकाकडून कूठली सेवा घेणार नाही, रहायला जागा देणार नाही, अघोषीत (कायद्यात बसेल अशीच हा) शक्य तेवढी बंदी टाका बघू काय होतेय?

बाकी तुमच्या आणि माझ्या मतात अंतर असले तरी हे मत मात्र बराब्बर जुळतां!!! ;)

सहजराव

मराठी भाषेवर संकट आले असताना विषयावर चर्चा करा कृपया माझ्यावर टिका करू नका ही विनंती.
आपला
कॉ.विकि

सहजराव

मराठी भाषेला मध्ये आणलेच पाहीजे. येणारे लोंढे हिंदीच बोलतात. आम्ही तर हल्ली हिंदीच ऐकतो. मराठी बोलणारे क्वचितच भेटतात.
तुम्हाला परप्रांतियांविषयी एवढा पुळका का आला आहे.
आपला
कॉ.विकि

सारे भारतीय

>>तुम्हाला परप्रांतियांविषयी एवढा पुळका का आला आहे.

काय????

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य
सामावले आहे।

अगदी साधं साधं विसरलात् काय हो विकी महाशय? प्रतिज्ञा विसरलात काय हो? :-)

बर चला परप्रांतियांविषयी एवढा पुळका (माझ्या नकळत) आलेला पुर्णपणे गेला, आता मात्र संकूचित विचारसरणीच्या पाताळयंत्री राजकारण्यांची चीड आली आहे.

आणी महामराठीप्रेमी "कॉ. विकी" हा काय प्रकार आहे हो ? हे काय मराठी नाव आहे? असल्यास कृपया जरा पुरावा द्या. का असे म्हणू शकतो हीच का तुमची मराठी भाषेशी बांधीलकी?

मत.

जबरदस्त...
सहज राव तुमचे मत आवडले ही व सहमत ही आहे.

खरंतर भाषावार प्रांत रचना ही आपल्या देशात नकोच होती, जेथे गल्ली साठी भांडणे केली जातात तेथे राज्याचे काय ?
जे मराठी बाधंव गैर मराठी लोकांना थोपवा असे म्हणत आहेत त्यांनी जरा विचार करावा, आपलेच काही बंधू, भगीनी, मामा, काका, भाऊ, दोस्त हे कोठेतरी अमराठी राज्यात / देशात काम करत आहेत तेथील लोकांनी देखील असे म्हणाले की ह्या मराठी लोकांना बाहे काढा ? चालेल ?
अहो हे जंगल राज नाही आहे लोकशाही आहे कोणी कोठे ही जाऊन राहू शकतो आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करु शकतो कायदाने मान्यता दिली आहे ना ह्याला मग का विरोध ? मराठी वाचवायची आहे वाचवायची असे म्हणून काही होइल का ? नाही ना मग ? अहो जेव्हा मुसलमान राज्यकर्ते महाराष्ट्राचे नाव मिटवू शकले नाहीत तेथे हे परप्रातींय / हिंदी भाषीक काय मराठी मिटवणार्. हा पण तुम्ही / आम्ही जर मुले इंग्रजी मिडीयम् शाळेत व मॉलमध्ये हिंदी चित्रपट / हिंदी बोलणे [आपल्याच भागातील मराठी बाधंवाशी हिंदी] थांबवा मग पाहू मराठी कशी मरते ती.

कोठेतरी वाचले होते " आपली भाषा जगवणे मारणे आपल्याच हाती आहे तेव्हा स्वतः मराठी बना व आपल्या मुला-बाळांना देखील मराठी बनवा "

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

सहजराव

भारत माझा देश आहे हे मान्य पण तुम्ही महाराष्ट्र राज्यापुरत बोला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विसरलात काय. १०५हुतात्मे झाले ते विसरलात काय.
परप्रांतिय येथे का येतात ? त्यांच्या राज्यात सोयी सुविधा नसल्याने परराज्यातून स्थलांतर करतात.स्वातंत्र्यानंतरही त्या त्या राज्यात सोयी सुविधा का उपलब्ध नाही. त्याबद्द्ल कोणि महाराष्ट्रात येऊन अथवा त्या त्या राज्यात आवाज का उठवत नाही. आणि इथेही चर्चा करताना कोणि दिसत् नाही.
आपला
कॉ.विकि

विरोधाभास

(प्रतिज्ञा) भारत माझा देश आहे हे मान्य पण करता आणी हे हिंदी भाषीक भारतीय का येतात (अर्थ - प्रवासी म्हणून ठीक अन्यथा नका येऊ) हा विरोधाभास आहे. आधी आपला तो गुंता, आपले नाव हा प्रश्र सोडवा मग बाकीचे.

तुम्ही विधीमंडळात ही पत्रके वाटू शकता की महाराष्ट्राने इतर राज्यांना कळवावे, बाबांनो तुमच्या लोकांना इकडे पाठवू नका. त्यांची काळजी घ्या व मराठी शिकवून मगच जरा वेळ पडलीच तर इकडे येउद्या व इकडे असताना मराठीत बोलायला लावा.

एकदा मराठी, एकदा महाराष्ट्र, एकदा लोंढे. तुमच्या सोयीचे बघता बुवा. आम्ही सर्व बाबींचा, विचार करतो. जरा आज तुम्हाला वेळ आहे तर् मी उपस्थीत केलेल्या सर्व प्रश्रांना उत्तरे द्या.

-------------------------------------------------------------------------------
टाटा, बिर्ला, वालचंद, अंबानी, बजाज, फिरोदीया, पूनावाला, छाब्रीया, कल्याणी, राठी, बॉलीवूडचे तमाम परप्रांतीय, परभाषीय, शेयरबाजार मधील गुजराती, ऊड्पी, शेट्टी समाजातील हॉटेलचालक, वेगेवेगळ्या क्षेत्रात पैसे गुंतवलेले पारशी, सिंधी, तसेच जवळजवळ सर्व मारवाडी किराणामंडळी, पंजाब ते महाराष्ट्र गहू आणणारे पंजाबी ट्रांस्पोर्टवाले आणी तमाम परदेशी बहूराष्ट्रीय कंपन्या हे सगळे आतातायी भाषावाद व पैसा घेऊन बाहेर् गेले की आपला लोंढा कूठे बरे जाईल?

यावर उपाय

सहजराव मी आपल्याशी सहमत.
महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा हिंदी,इंग्लीश,मराठी करणे. मुंबई केंद्रशासीत करणे(मराठी माणूस ५० % हुनही कमी). विदर्भ वेगळा करणे.पोलीस,मनपा,बेस्ट्,इ. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी सेवांच्या नोकरीत हिंदी ही भाषा अधिकृत करणे. तसेच सरकारी नोकर्‍यांसाठी महाराष्ट्रात १५ वर्षाचे अस्तित्व हवे ते प्रमाण ५ वर्षावर आणणे.
बाहेरून आल्याआल्या लगेचच या लोकांस शिधावाटप पत्रिका उपलब्ध करून देणे.
हिंदीतूनच(फक्त महाराष्ट्रापुरतेच) संवाद साधणे.

सहज म्हणून लिहीत आहे-दक्षीणेकडील राज्य त्यांच्या भाषेचा जो अभिमान बळगतात तो कौतुस्कापद आहे.
आपला
कॉ.विकि

सहमती कसली?

>>सहजराव मी आपल्याशी सहमत.

हे कशा संदर्भात जरा विशद करा प्लीज. नंतर उगाच गैरसमज नको.

तसेच
महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा हिंदी,इंग्लीश,मराठी करणे. - मान्य. सर्वांची सोय झाली पाहीजे.

तसेच सरकारी नोकर्‍यांसाठी महाराष्ट्रात १५ वर्षाचे अस्तित्व हवे ते प्रमाण ५ वर्षावर आणणे. - का हो ? गेल्या बर्‍याच वर्षात, इथल्या भुमिपुत्रांनी नाकारून उरलेल्या खूप सरकारी नोकर्‍या असतील तर आपला उपाय मान्य. अन्यथा नाही.

बाहेरून आल्याआल्या लगेचच "या लोकांस" शिधावाटप पत्रिका उपलब्ध करून देणे.
- या लोकांस कोण? शिधापत्रकास पात्र जे कोण भारतीय असतील त्यांना त्यांच्या राहत्या ठीकाणी ते शिधापत्र वापरास परवानगी. म्हणजे जर एखादा बंगाली असेल जो महाराष्ट्र दीर्घ मुक्कामास आला तर पुरावा दाखवल्यावर त्याला इकडे शिधापत्रक वळवायला (ट्रान्सफर) काहीच हरकत नसावी.

हिंदीतून(फक्त महाराष्ट्रापुरतेच) संवाद साधणे. - का बरे? "" शब्दाला आक्षेप.

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित करण्यात येत आहे. - संपादन मंडळ.

सहजराव

एकीकडे भारत माझा देश आहे म्हणायचे भुमीपुत्रांना कशाला मध्ये आणयचे.
आपला
कॉ.विकि

पूर्ण पेपर सोडवा

आधीच्या प्रश्रांची उत्तरे द्या.

तुमच्या आत्ताच्या प्रश्राला उत्तर एका शब्दात देतो. समजतेय का बघा "तारतम्य"

सहज

मी फक्त एवढेच म्हणेण -जय संयुक्त महाराष्ट्र !!
आपला
कॉ.विकि

मराठी भाषिक झाले तर्....

समजा येणारे सर्व अमराठी भाषिक मराठी जाणणारे झाले तर हा वाद उद्भवेल का?

व्वा !

किती सुंदर कल्पना आहे ही. असे झाले तर मग हा चर्चा विषय राहणारच नाही.
पण प्रत्यक्षात ते होणे शक्य नाही. म्हणून तर आपणा सर्वांची ही धडपड आहे.

आपला,
(मराठी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

अवघड

अवघड प्रश्न विचारलात बुवा :)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

महाराष्ट्र आणि प्रगत?

महाराष्ट्र राज्य सगळ्या राज्यात प्रगत आहे ही मूर्खासारखी कल्पना पहिल्यांदा सोडून द्या. गुजराथ महाराष्ट्रापेखा जास्त प्रगत आहे. इ-तंत्रज्ञानाच्या उपयोगात बंगलोर आणि हैदराबाद आपल्यापुढे आहेत. संगीत, नृत्यादी कलात उत्तर प्रदेश(त्यातले काशी, लखनौ) , व दक्षिणी भारत आपल्या पुढे आहे. महाराष्ट्रात फक्त लावणी, बाल्या आणि कोळीनृत्य आहे. कलाकुसरीचे लघु‍उद्योग महाराष्ट्रात जवळजवळ नाहीत. प्रशासकीय अधिकारी बिहारमधून जेवढे येतात त्याच्या एक दशांशही महाराष्ट्रातून नाहीत. केंद्रीय शिक्षणपद्धतीमुळे दिल्लीचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात पुढे जातात. महाराष्ट्रातले बारावीपर्यंतचे शिक्षण खालच्या दर्जाचे आहे. महाराष्ट्रात शिक्षकांना नगरपालिकेच्या झाडूवाल्याच्या निम्मा पगारही मिळत नाही. पिंपरी-चिंचवडच्या झाडूवाल्यांना गेल्या दिवाळीत १२ हजार रुपये बोनस मिळाला. शिक्षकांना शून्य. शिक्षकाना पूर्ण पगार क्वचित मिळतो, जास्त पगारावर सही घेऊन कमी पगार हातावर टिकवतात. शिक्षकांची भरती लायकीवर नाही तर लाच देण्याच्या क्षमतेवर आणि जातीवर ठरते. महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, बिहार येथे शिक्षकांना अतिशय आदराने वागवले जाते, महाराष्ट्रात दर शिक्षकदिनाला नगरसेवकापासून मुख्य मंत्र्यांपर्यंत तमाम राजकारणी शिक्षकांना उपदेश करतात. हिंदीभाषी उत्तर भारतात, अगदी बिहारमध्येसुद्धा, वर्तमानपत्रात किंवा दुकानांच्या पाटीवर एकही अशुद्धलेखन आढळत नाही. इथे नव्वद टक्के पाट्या आणि शंभर टक्के जाहिरातीत चुकीचे मराठी सापडते. दूरदर्शनच्या पडद्यावर लिहून येणारे एकही वाक्य शुद्ध नसते. याचाच अर्थ महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आहे. मराठी किराणा दुकानदार पुण्या-मुंबईत तरी नाहीत. महाराष्ट्रातल्या लठ्ठ पगाराच्या केंद्र सरकारच्या नोकर्‍यांकरिता लायक मराठी माणसे मिळत नाहीत. सैन्यात गुजराथ्यांच्या नंतर मराठी माणसे अत्यल्प आहेत.
याला उपाय. मराठी माणसांनी इतर भारतीय भाषा शिकाव्यात आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून इतर राज्यांत जाऊन नोकरीधंदा करावा. असे केल्याने आपल्याला महाराष्ट्र किती मागासलेला आहे ते कळेल, इतर भाषकांविषयी आपुलकी निर्माण होईल आणि आपला अहंगड जाईल.--वाचक्‍नवी

प्रगत कसा नाही???

प्रगत कसा नाही??? या इतक्या सगळ्या क्षेत्रात इतक्या वर असलेलं एकतरी राज्य दाखवा. प्रत्येक राज्य आपापल्या क्षेत्रात उत्तम असेल. पण या सगळ्या क्षेत्रांत चांगली कामगिरि फक्त महाराष्ट्रातच होते आहे.
तेही कामचुकार राज्यकर्ते, अशुद्ध पाट्या लिहिणारे, शिक्षकांना कमी लेखणारे असूनही ;)
आणि आता बाहेरची लोकं आली आहेत तर महाराष्ट्रातील या उणिवा जातील ना? इतकी अग्रसर लोकं महराष्ट्रात आल्याने ते आपल्यात आपुलकी निर्माण करणार आहेत :-) आणि हीच लोकं महाराष्ट्राच्या प्रगती साठी झटणार आहेत हो की नाही?

पंजाब

या इतक्या सगळ्या क्षेत्रात इतक्या वर असलेलं एकतरी राज्य दाखवा.

पंजाबकडे पाहा.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

महाराष्ट्र बराच उजवा आहे.

तंत्रज्ञानाच्या उपयोगात आणि पैसे खर्च करू शकेल असा मध्यमवर्ग यात पंजाब प्रचंड मागे आहे असं मी तरी ऐकून आहे. तिथे पिकतं बरच पण विकलं काहीच जात नाही. महाराष्ट्रासारखी बाजारपेठ क्वचितच असेल. शिवाय सुरक्षितता याबावबतीतही या राज्यापेक्षा महाराष्ट्र बराच उजवा आहे. चित्रपट-कलेबाबत माहीत नाही पण तिथेही बरिच राज्य पंजाबच्या पुठे असावीत.

डावे-उजवे

इथे कुठले तंत्रज्ञान अपेक्षित आहे? पंजाबात पैसे खर्च करणारा मध्यमवर्ग नाही असे आपल्याला का वाटते?
पिकवणारे प्रगत की विकत घेणारे? बाजारपेठ असणे मानाची बाब आहे की उत्पादनकेंद्र?
पंजाबसारख्या समस्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत का?
हिंदी चित्रपट म्हणवले जाणारे चित्रपट/संगीत आपल्याला पंजाबी वाटत नाही!

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

हं

ही चर्चा महाराष्ट्रात लोकं कशामुळे येतात् त्यावर चालू होती. त्या अनुशंगाने, जिथे विकत घेणारे जास्त तिथेच विकणारे गर्दी करतात हे सरळ आहे. जरि पंजाबमधे पिकत असलं तरी त्यांना विकायला इथेच यावं लागतं (शिवाय मुंबईसारख महानगर महाराष्ट्राकडे आहे .जिथे कोणीही पोट हमखास भरू शकतो :-) )

>>हिंदी चित्रपट म्हणवले जाणारे चित्रपट/संगीत आपल्याला पंजाबी वाटत नाही!
नाही हिंदी चित्रपट सगळ्याची सरमिसळ आहे.

>> बाजारपेठ असणे मानाची बाब आहे की उत्पादनकेंद्र?
महाराष्ट्रात दोन्ही आहे. (पंजाब केवळ उत्पादनकेंद्र आहे) असं राज्य असण नक्कीच मानाचं

>>पंजाबसारख्या समस्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत का?
नसतील पण महाराष्ट्रासारख्या समस्या पंजाबनं कुठं पाहील्या आहेत ? आणि तरिही महाराष्ट्र् पंजाबपेक्षा सुरक्षित आहेच्! लोंढे यायचं माझ्यामते प्रमुख कारण

>>इथे कुठले तंत्रज्ञान अपेक्षित आहे?
हे पटलं. कदाचित कृषी तंत्रज्ञानात महाराष्ट्र् मागे असेल (माहीती नाही?)

माझे मत

कदाचित कृषी तंत्रज्ञानात महाराष्ट्र् मागे असेल
कदाचीत नाही, खरोखर मागे आहे, हवे असतील तर तुम्ही आपल्या येथील काही शेतांची चित्रे पाठवा मी ईकडची पाठवतो.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कृषी तंत्रज्ञान

उत्तरेकडे हिमालयातून उगम पावणार्‍या नद्यांमध्ये उन्हाळ्यातही तसे मुबलक पाणी असते. तिथे कालवे वर्षातून अधिक काळ पाणी देऊ शकतात. सह्याद्रीतून निघणार्‍या नद्यांमध्ये पाणी उन्हाळ्यात आटते. महाराष्ट्राची बहुतेक शेती कोरडवाहू आहे, आणि कालव्यांनी सिंचित क्षेत्रफळ फार कमी आहे. त्यामुळे इथे हिरवीगार शेते फक्त खरीप हंगामात दिसतात. प्रगत शेतकीचा मानदंड म्हणून शेतांचा रंग वापरू नये.

इथे चर्चा महाराष्ट्रातील परप्रांतीय आगंतुक आणि भाषेचे भवितव्य अशी सुरुवातीला मांडली गेली होती. त्यामुळे "महाराष्ट्र प्रगत आहे की नाही" या मुद्द्यावर वेगळी चर्चा व्हावी, असे वाटते.

खरे तर विविध क्षेत्रातील आकडेवारी देऊ केल्यास काम थोडे सोपे होईल. उदा : दरडोई उत्पन्न, स्त्री साक्षरता, अपेक्षित रोगमुक्त आयुष्यमान, वगैरे. पैकी अनेक आकडे जालावर उपलब्ध आहेत. पण तसे केल्यास "अमुक बाबतीत महाराष्ट्र पुढे, तमुक बाबतीत पाठीमागे" असली मिळमिळीत मते सांगावी लागतील. आणि या अटीतटीच्या प्रतिस्पर्धी मतमांडणीची गंमत निघून जाईल.

सहमत

उत्तरेकडे हिमालयातून उगम पावणार्‍या नद्यांमध्ये उन्हाळ्यातही तसे मुबलक पाणी असते. तिथे कालवे वर्षातून अधिक काळ पाणी देऊ शकतात. सह्याद्रीतून निघणार्‍या नद्यांमध्ये पाणी उन्हाळ्यात आटते. महाराष्ट्राची बहुतेक शेती कोरडवाहू आहे, आणि कालव्यांनी सिंचित क्षेत्रफळ फार कमी आहे. त्यामुळे इथे हिरवीगार शेते फक्त खरीप हंगामात दिसतात. प्रगत शेतकीचा मानदंड म्हणून शेतांचा रंग वापरू नये.

सहमत.
हा विचार मी केला नव्हता क्षमा असावी.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

प्रश्न

राकट, कणखर , दगडांचा देश प्रगत झाला म्हणायचे म्हणजे या समस्या यायच्याच. :)

मग तुलना व्हावी कशी? पंजाबला समुद्र किनारा नाही. (दमट हवामानामुळे) मुंबईत कापडगिरण्यांचा उद्योग कसा विकसित झाला हे उघड आहे. राज्याची नैसर्गिक स्थिती त्याच्या सुबत्तेला कारणीभूत असणे सहाजिक आहे व ती वगळून तुलना करणे निरर्थक आहे. हे म्हणजे गोवा/केरळ/काश्मीरात निसर्ग सौदर्य आहे म्हणून.. नाही तर महाराष्ट्र कमी देखणा नाही म्हटल्याप्रमाणे आहे. शेती सोडा. संस्कृती संगोपन, उद्योजकता, निव्वळ ३% (साधारण) लोकसंख्या असताना पूर्ण् भारतावर छाप असणे याबद्दल पंजाबचे पाणी मानावेच लागेल.

आता प्रश्न हा की बिहारी तिथे जात नाहीत का? जात आहेत. दिल्ली (जिथे हिंदी, उर्दू बरोबर पंजाबी अधिकृत भाषा आहे) मधील पंजाब्यांचे कमी होणारे व उत्तर भारतीयांचे वाढणरे प्रमाण हा त्यांच्या ही चिंतेचा विषय आहे. खुद्द पंजाबातही बिहारी मजदूर दिसतात म्हणे. (ते आसामातही दिसतात, बंगालातही मुबलक आहेत.) मुंबईप्रमाणेच जमशेदपूरसहीत (!), सूरत, दिल्ली, कलकत्ता मध्ये देखील राज्याबाहेरील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. तिथल्या समस्या उपाय काय आहेत हे पाहणे रोचक ठरेल.

एकूण महाराष्ट्र एकटाच प्रगत आहे (की नाही), सारे भारतीय इथे(च) यायला तळमळत आहेत, याही पेक्षा ते इथे आल्यानंतर मराठी माणसाची पिछेहाट होत आहे का? असल्यास का? हा मुख्य प्रश्न आहे.

अवांतर : आपण वर दिलेल्या निर्देशांकडे पाहता केरळ इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत बरेच उजवे ठरते. (महाराष्ट्र आकारमान, लोकसंख्या वगैरे बाबीत पुढे असावा. मुंबई वगळल्यास (कारण अर्धे अमराठी!) महाराष्ट्राची आर्थिक बाजू देखील फार सुदृढ असेल याची खात्री नाही.)

(मुंबई विरुद्ध उर्वरित महाराष्ट अशी आकडेवारी पाहायला उत्सुक) तो

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

बिहारी 'सरदारांचा' पंजाब

ही बातमी पाहा. यातील ठळक मुद्दे,

  • ८१% बिहारी मजदुरांच्या भाषेवर पंजाबीचा प्रभाव आठळला.
  • पंजाबच्या प्रत्येक पाच नागरिकामागे एक बिहार/उ.प्र. चा स्थलांतरित आहे.
  • या स्थलांतरांच्या राहणीमानात, कपडे-लत्ते, खानपानातही लक्षणीय फरक पडला आहे.
  • ११% स्थलांतरितांनी आपल्या आडनावापुढे पंजाबी 'सिंग' लावलेले आढळले.

महाराष्ट्रात स्थलांतरितांबद्दलचा अनुभव काय आहे? वेगळा असल्यास तो तसा का असावा? यावर एखादा/दे अभ्यास/सर्वेक्षण झाल्याचे वाचनात आहे?

संदर्भ/प्रयोजनः स्थलांतरितांची समस्या (?) महाराष्ट्रालाच आहे का?, सारे इथेच यायला धडपडत आहेत का?, स्थलांतरितांवर स्थलांतराचा होणारा प्रभाव, वगैरे.

उस्तुकता आणि मुंबईकर

>>महाराष्ट्रात स्थलांतरितांबद्दलचा अनुभव काय आहे? वेगळा असल्यास तो तसा का असावा? यावर एखादा/दे अभ्यास/सर्वेक्षण झाल्याचे वाचनात आहे?
वा वा .. असा अभ्यास कोणाच्या वाचनात आला असल्यास जरूर कळवा. उस्तुक आहे.
(अवांतर(?) आमचा इस्त्रीवालाअ भैया म्हणतो "मै तो मुंबईकरही हुं.. इधरही पैदा हुआ.. इधरही धंद करता हुं|..." वगैरे यात'मुंबईकर' हा मराठी भाषिक वैशिष्ट्याचा परिणाम म्हणता येइल का? (नवीन भैया "बंबईवाला" बोलतो )

(उत्सुक) ऋषिकेश

नवीन

हिंदीभाषी उत्तर भारतात, अगदी बिहारमध्येसुद्धा, वर्तमानपत्रात किंवा दुकानांच्या पाटीवर एकही अशुद्धलेखन आढळत नाही.

ही माहिती नवीन आहे. तसे असल्यास बरेच आहे. माहितीदाखल येथील काही चित्रे पहावीत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वाचक्नवी

वाचक्नवी यांच्याशी बर्‍याच अंशी सहमत.


आम्हाला येथे भेट द्या.

आकडेवारी ???

प्रशासकीय अधिकारी बिहारमधून जेवढे येतात त्याच्या एक दशांशही महाराष्ट्रातून नाहीत.

आकडेवारी आहे का? त्याच्या माहिती नुसार परिस्थिती इतकी वाईट नक्कीच नाही. बिहारी फारतर दुप्पट वगैरे असावेत.

(याचा अर्थ प्रतिसादाला विरोध आहे असा नाही. :) )

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

वाचक्‍नवी, महाराष्ट्र प्रगत आहे !

प्रिय,
वाचक्नवी .
स. न. वि. वि. प्रतिसाद लिहिण्यास कारण की, आपला प्रतिसाद वाचून आपण कोणत्या राज्याबद्दल लिहित आहात असा प्रश्न पडला.
पण नंतर कळाले की, आपण माझ्या महाराष्ट्राबद्दलच लिहीत आहात. खरे तर उणिवा या प्रत्येक राज्यात कमीअधिक प्रमाणात आहेत. आता आमच्याकडे कोणतीही अधिकृत आकडेवारी नसली तरी गेली दहा वर्षातील महाराष्ट्राचा प्रगतीचा आलेख हा चढत्या क्रमाणे वाढतो आहे, असे वाटते. आपण म्हणता महाराष्ट्रात केवळ लावणी, बाल्या याच कला आहेत. महाराष्ट्र ही संताची भुमी ,इथे लोककथा, लोकगीते, भारुड, भजन- किर्तने, फुगड्या,भोंडला आणि कितीतरी कलाप्रकार इथे आहेत. पैठणची जगभर प्रसिध्द असलेली पैठणी इथलीच. प्रशासकीय अधिकारी बिहार मधून इथे येत असले तरी इथून बाहेर जाणारेही मराठी माणसे अनेक आहेत. बारावी पर्यंतचे शिक्षण खालच्या दर्जाचे आहे, असे आपण कसे म्हणू शकता. इथपर्यंत दिल्या जाणारे शिक्षण हे त्या विद्यार्थ्याला भविष्यकाळातील शिक्षण घेण्यापर्यंतचा एक मुख्य दरवाजा आहे, असे वाटते. इथूनच तो कोणत्या शाखेकडे वळावे, वळाले पाहिजे याचा विचार करतो. त्यामुळे मला तरी बारावी पर्यंतचे शिक्षण हे उत्तम दर्जाचे आहे, असे वाटते. फार तर अभ्यासक्रमात बदल जरुर केले पाहिजेत.
शिक्षकांना जास्तीचे कामे असतील,पण इतर राज्यापेक्षा येथील शिक्षकांची परिस्थिती बरी असावी. त्याचे कारण असे किमाण डि.एड किंवा बी.एड.ची पदवी तरी घेऊन ( डोनेशन घेऊन जरी प्रवेश घेतलेला असला तरी ) अभ्यासक्रम कठीण आहे, तो पूर्ण केल्याशिवाय तो उत्तीर्ण
होत नाही. त्याशिवाय तो शिक्षक होत नाही. इतर राज्यात डिग्र्या विकत मिळतात आणि तो शिक्षक होतो आणि मिळेल त्या पगारात (मानधनात ) नौकरी करतो. अहो, प्राध्यापकाच्या बाबतीतही असेच आहे, नॅकला अधिक संखेने सामोरे गेलेले महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे, गूणवत्त्ता सर्वांमधे येण्याचा तर प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. शिक्षणाचे मागासलेपण मागील दहा वर्षात जीतके होते तितके आता राहिलेली नाही असे वाटते. चूकीच्या पाट्या, शुद्धलेखन, यावरुन जर मराठी माणूस मागासलेला आहे असे आपणास म्हणायचे असेल तर मात्र ही विचारांची दिवाळखोरी आहे, असे आम्हाला तरी वाटते. चूकीच्या पाट्या लिहिणारे त्यांचे शिक्षण याचाही विचार झाला पाहिजे. खरे तर मराठी माणूस खासगी आणि शासकीय सेवेत लठ्ठ पगाराची नौकरीही करतो आहे, (जरा वरकमाई ही आहे.)मराठी बाणा आणि मराठी भाषेबरोबर इतर भाषांचाही जीवनात वापर करुन जीवनाची, महाराष्ट्राची वाटचाल प्रगतीकडे घेऊन जातोय असे आम्हाला तरी वाटते.
इतके बोलून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो ! जय हिंद, जय महाराष्ट्र !

अवांतर :- या चर्चेत सहजरावांनी मांडलेल्या विचारांशी आम्ही १००% सहमत आहोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संतप्त म्हणजे किती ते म्हणायचे!!

>>असे केल्याने ....इतर भाषकांविषयी आपुलकी निर्माण होईल आणि आपला अहंगड जाईल.

किंवा असा जळजळीत प्रतिसाद वाचून. कशाला कूठे जायचे, बसल्या जागीच ते काम करवले. :-)

एकंदर प्रगतीच्या बाबतीत तुमच्या मते मग महाराष्ट्राचा नंबर लागतो तरी कितवा म्हणायचे? म्हणजे तुमच्या मते महाराष्ट्र् जर का (तुलनेत हो!) प्रगत नाही तर हे लोंढे का येतायत (बहूदा पिंपरी-चिंचवडला झाडूवाल्याच दुकान् टाकायला?)? का अहंगडातून उगाच आलेला गैरसमज?

नाचात दुसरे कोणीतरी, कलाकूसरीत अजून दुसरेच, केंद्रीय शिक्षण पद्धती महान, तंत्रज्ञानात दुसरी "शहरे" (राज्याची तुलना राज्याशी तरी करा) लठ्ठ पगाराच्या केंद्र सरकारच्या नोकर्‍यांकरिता अमराठी भरणा / कर्तृत्व जास्त... असे "चेरी पिकिंग" सर्वेक्षण नको हो.

एकदा वाटले की तुम्ही आमच्या बाजूने बोलताय, पण महाराष्ट्राच्या नावाने शिमगा जरा जास्तच वाटला बर का. तसेच विषयांतरपण..एकतर "प्रगत महाराष्ट्र" हा मूळ विषयाला चर्चेत जरा आधार म्हणून घेतला होता तुम्ही त्या एका शब्दावरच विद्रोह केलात...

इतका पण महाराष्ट्र मागासलेला नाही आहे हो.

>पिंपरी-चिंचवडच्या झाडूवाल्यांना गेल्या दिवाळीत १२ हजार रुपये बोनस मिळाला. शिक्षकांना शून्य.

जर केवळ उदाहरण म्हणून आले असेल तर ठीक आहे नाहीतर ही पण एक विकृत मानसीकता आहे जीचे निर्मूलन झाले पाहीजे (त्या झाडूवाल्याला बोनस मिळाला पण शिक्षकांना नाही)
मला तर वाटते ह्याहून जास्त बोनस, सफाई कामगार यांना मिळालाच पाहीजे. एकदा त्यांचे काम पाहीले पाहीजे कोणी शहाणा माणूस तक्रार करणार नाही. हा अहंगड कधी जाईल? कसा बरे घालवायचा?

---------------------------------------------------------------------
एकदम इतके नका हो बदडू. बोनस मिळावा ही सदिच्छा व्यक्त करतो!!(मग सगळ माफ ना :-))

झाडूवाल्यांचे काम

मला तर वाटते ह्याहून जास्त बोनस, सफाई कामगार यांना मिळालाच पाहीजे. एकदा त्यांचे काम पाहीले पाहीजे कोणी शहाणा माणूस तक्रार करणार नाही. हा अहंगड कधी जाईल? कसा बरे घालवायचा?
एखाद्या स्वच्छ रस्त्यावर दहा मिनिटे उभे राहून झाडूवालींचे काम पहावे. चार-पाच झाडूवाल्या हातात झाडू घेऊन एकमेकांभोवती रिंगण घालून झाडू-नृत्य करतात. एकच स्वच्छ रस्ता घेऊन तो पुन्हापुन्हा झाडण्याचे नाटक बराच वेळ चालू असते.
तेच शिक्षकांचे काम पहा. शाळेत घसा दुखेस्तवर ७०-८० मुलांच्या वर्गावर ओरडून ओरडून शिकवणे, घरी वह्यांचे-उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेऊन येणे, मे महिना सोडून प्रत्येक शनिवार-रविवार-सणाच्या दिवशी घरी बसून शाळेची कामे करणे हे प्रत्येक शिक्षकाच्या नशिबी असते. मे महिन्यातसुद्धा कुठलातरी प्रशिक्षण वर्ग असतो. एरवी गावातली कुत्री मोजा, निवडणुकीच्या मतदारांची नोंद करा, पोलिओच्या डोसची आठवण करण्यासाठी घरोघरी जा, तांदूळ वजन करून वाटा, त्याची खिचडी करून मुलांना खायला घाला इत्यादी अनेक कामे शिक्षक करतात. त्याच्या एक शतांश काम पण झाडूवाले करत नाहीत. शिक्षकांना खडूच्या धुळीमुळे शाळेच्या नोकरीत असतानाच दमा लागतो हे किती लोक जाणतात? --वाचक्‍नवी

लोंढा

एकंदर प्रगतीच्या बाबतीत तुमच्या मते मग महाराष्ट्राचा नंबर लागतो तरी कितवा म्हणायचे? म्हणजे तुमच्या मते महाराष्ट्र् जर का (तुलनेत हो!) प्रगत नाही तर हे लोंढे का येतायत (बहूदा पिंपरी-चिंचवडला झाडूवाल्याच दुकान् टाकायला?)? का अहंगडातून उगाच आलेला गैरसमज?
महाराष्ट्रात इतर प्रांतियांचा लोंढा येतो याचे कारण मराठी माणूस कामचुकार असतो. हलकी समजली जाणारी करत नाही आणि कष्टाची कामे, गवंडी, सुतार इत्यादी व्यवसाय त्याला जमत नाहीत म्हणून. कुठल्याही इमारतीच्या बांधकामावर जाऊन पहा. गवंडी-सुतार राजस्थानी, मजूर कानडी आणि लोखंडी किंवा काचेचे काम करणारे उत्तर भारतीय मुसलमान दिसतील. मराठी गवंड्याकडून फरशीचे काम करून घेतले की उतार बरोबर उलट्या दिशेने केलेला दिसेल. एवढी कुशल-अर्धकुशल कामगारांची वानवा ज्या प्रांतात आहे तिथे परप्रांतियांनी का येऊ नये?--वाचक्‍नवी

तिथे परप्रांतियांनी का येऊ नये?--

तिथे परप्रांतियांनी का येऊ नये?--
कारण म्हणे ते मराठी बोलत नाहीत...

मराठी माणूस "कामचुकार" आहे की त्याला ते काम न करण्याचे स्वातंत्र्य आहे. तो ते बजावतो आहे. असे म्हणता येईल काय?

परप्रांतीय कुशल-अर्धकुशल कामगार येथे नुस्ती वर्षातून कामचुकार मराठी जनांनी टाळलेली डागडूजी करायला येतो असे नाही वाटत. तेवढे नवे बांधकाम, उलाढाल, व्यापार, "प्रगती/विकासाची" कामे महाराष्ट्रात होत आहे, भरपूर् काम मिळते आहे, मागणी आहे म्हणून येतात.

असो माझा मुद्दा नीट लिहला नव्हता, मला म्हणायचे होते की लोंढा येतोय की नाही (का येतोय नव्हते विचारायचे) मूळात "कामचूकार"मराठी माणसाला उगाच ग्रह झाला की बघा कसे लोंढे येऊन आमची माती आमची माणसे खराब करतायत का लोंढा ही खरीखुरी समस्या आहे.

एकंदर प्रगतीच्या बाबतीत तुमच्या मते मग महाराष्ट्राचा भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत नंबर लागतो तरी कितवा म्हणायचे?
हा प्रश्र अनुत्तरीत राहीला.

अवांतर होईल

शिक्षकांचे काम ते काम, झाडूवाल्याचे काम ते त्यामानाने आराम, शिक्षकांच्या एक शतांश काम पण झाडूवाले करत नाहीत ही विधाने अत्यंत हास्यास्पद, अतिशयोक्तीपूर्ण व खोडसाळ आहेत.

प्रत्येक शिक्षकाला गावातली गणना, निवडणुकीच्या मतदारांची नोंद करा, पोलिओच्या डोसची आठवण करण्यासाठी घरोघरी जा, तांदूळ वजन करून वाटा, त्याची खिचडी करून मुलांना खायला घाला इत्यादी कामे रोज करावी लागत नाहीत. त्या त्या कामाची वेळ व परिक्षेत्र ठरले असते. जे काम आहे ते चुकावायचे कशाला? सरकारी कामकाज व शिक्षक संघटना दोघेही एकमेकांना पुरून उरतील. तुम्ही म्हणता तसे असेल तर बेमुदत संप झाले असते. ( तुमच्या युक्तीवादानुसार कामचुकार मराठी शिक्षक ऐकून घेतील असे वाटले काय्? )

मे महिन्यातसुद्धा कुठलातरी प्रशिक्षण वर्ग असतो.
म्हणजे काय संपुर्ण भारतभर (माफ करा विकीराव महाराष्ट्रभर) झाडूवाले, इतर क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सुटीवर असतात व फक्त शिक्षक काम करतात?

शाळेत घसा दुखेस्तवर ..ओरडून ओरडून शिकवणे
शिक्षकाचा दोष आम्ही पण शाळेत गेलो होतो घसा दुखेस्तवर ओरडणारे कोणी नव्हते. त्या शिक्षकाने तो पेशा सोडणेच उत्तम.

शनिवार-रविवार-सणाच्या दिवशी घरी बसून शाळेची कामे करणे हे प्रत्येक शिक्षकाच्या नशिबी असते.
सणाच्या दिवशी निदान घरी रहायचे सुख शिक्षकाला असते, बर्‍याच कामगारांना नसते. घरी काम करू शकणे वेळीअवेळी कचेरीत जाऊन काम करण्यापेक्षा सुखावह नाही का?

शिक्षकांना खडूच्या धुळीमुळे शाळेच्या नोकरीत असतानाच दमा लागतो
शरीरस्वास्थ्याची योग्य काळजी घेतलीच पाहीजे. शाळाप्रशासन, शिक्षक संघटना, शिक्षण मंत्रालय ह्यांनी तोडगा काढला कसा नाही अजून? जर खडूच्या धुळीमुळे दमा तर सफाई कामगाराच्या आरोग्याचे प्रश्र किती बिकट असतील हे सांगायलाच नको. जनावरांची विष्ठा, उलट्या, मेलेली जनावरे, संसर्गजन्य विषाणू, विषारी वायू असलेली तुंबलेली गटारे, सार्वजनीक / कचेरीतील स्वच्छतागृह, कचराकुंड्या, तमाम लोकांनी सर्व स्वरूपात केलेली घाण अशीच साफ होत असते. (माझ्या सारखा कामचूकार तरी पटकन खिचडी चुलीवर टाकून गावातील कुत्री मोजून येईल. )

चार-पाच झाडूवाल्या हातात झाडू घेऊन एकमेकांभोवती रिंगण घालून झाडू-नृत्य करतात.

हं येडे लोक उगाच बी एड, डी एड च्या प्रवेशाला गर्दी करतात. मस्त पैकी झाडूवाले व्हायचे, कमी काम, जादा दाम, परत नृत्यसाधना!!

व्यक्तिगत रोखाची काही वाक्ये संपादित. अश्या वाक्यांनी आपापसात कटुता निर्माण होणार नाही याची सदस्यांनी कृपया काळजी घ्यावी. - संपादन मंडळ.

कचराकोंडी

http://video.google.com/videoplay?docid=3070120386399623186

Set in Pune (India), this film depicts the lives of sanitary workers maintaining health and hygiene of our cities. It juxtaposes citizens, administrators, politicians, labor leaders and the "Sanitary soldiers"; and lets the viewers draw their own conclusions. (The Marathi version is titled कचराकोंडी
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
.


प्रकाश घाटपांडे

खतरनाक कामासाठी "धोक्याचा अधिक पगार" योग्य आहे

व्हिडियोतील विशेषतः ड्रेनेज कामगाराचे काम पाहिले, तर "धोक्याचा अधिक पगार" मिळणे रास्त आहे. शिक्षकापेक्षा (म्हणजे माझ्यापेक्षा) अधिक पगार मिळाला तर वावगे नाही. (थोड्या अधिक शिक्षणामुळे मला थोडे अधिक वेतन मिळावे असे मानले तरीही) खूप अधिक धोक्यामुळे त्या कामगाराला खूप अधिक वेतन मिळावे.

पुण्याच्या ~४० लाख लोकसंख्येसाठी ~२३०० सफाई कामगार आहेत. न्यू यॉर्क च्या ~८५ लाख लोकसंख्येकरिता ~६५०० सफाई कामगार आहेत (२२०० कचरा उचलणारे ट्रक आहेत...). न्यू यॉर्क शहरात सफाई कामगारास सुरुवातीचा पगार वार्षिक ३०,०००, ६ वर्षांत ६०,००० डॉलर इतपत वाढतो. (ही रक्कम न्यू यॉर्क मध्ये दरिद्री मानली जावी, कारण ते महाग शहर आहे.)
नेमके गणित कसे करावे ते कळत नाही, पण सारांश असा की शहर "वर्ल्डक्लास" स्वच्छ ठेवण्यासाठी पुण्यात हल्ली करतात त्यापेक्षा थोडा अधिक खर्च करावा लागेल, असे वाटते. (तसे म्हणावे तर न्यू यॉर्क अगदी चकाचक स्वच्छ नाही...)

ज्योतीषशास्त्र

मुंबई केंद्रशासीत झालेली असेल...यापुढे मुंबईचा महापौर हिंदी भाषीकच असेल.

कशाच्या जोरावर हे बोलणे चालले आहे? का कम्युनिस्टांचा भविष्य/ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो?

मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडलेल्या असतील.

त्याला कारण आत्ताची पद्धती आहे. आजची पद्धत कदाचीत बंद होईल पण मराठी भाषा काही बंद होणार नाही..

चर्चा फक्त महाराष्ट्रापुरतीच ठेवावी तसेच राज्याबाहेरील इतर शहरांचा दाखला देऊ नये कारण संयुक्त महाराष्ट्र(अजूनही तो पुर्णपणे मिळवता आला नाही) आपण आपले रक्त सांडून मिळवला आहे.

जेंव्हा समान स्थितीतील शहरे असतात तेंव्हा त्याचा दाखला देणे म्हणजे काही चर्चेत अवांतर ठरत नाही. आज बर्‍याच राज्यातील बरीचशी शहरे ही उद्योगधंद्यामुळे कॉस्मोपॉलीटन होत आहेत. केवळ मुंबईला आणि महाराष्ट्रातील शहरांना एक (अ)न्याय आणि इतर राज्यांना एक न्याय देणे हे बेकायदेशीरच आहे. त्यामुळे हा प्रश्न स्थानीक भाषेचा आणि भूमीपुत्रांबद्दल आहे. महाराष्ट्राबाबत मराठी लोकांचा आहे आणि अमराठीचे वाढते प्रमाण ही काळजी वाटते. पण भारताच्या बाबतीत हाच प्रश्न बांग्लादेशी मुसलमानांचा आहे. तो मुंबईत जसा आहे तसाच तो इतर अनेक ठिकाणी मुख्यतः आसाम आणि इतर इशान्येकडील राज्यांत आहे.

असो. आपण चर्चा सुरू करता पण आपले विचार मांडतच नाहीत असे वाटले...

अवांतर: वरील बांगलादेशींच्या संदर्भात मला एक वेगळा प्रसंग आठवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस त्याचे सर्वपक्षीय नेते सावरकरांना पाठींबा मागायला गेले (५६-५७ साली). तेंव्हा त्यांनी सरळ पाठींबा देण्या ऐवजी या अर्थाचे सांगीतले की देशांतर्गत सीमांच्या काळजी पेक्षा मला चीनबरोबरच्या सीमेची काळजी वाटत आहे. तो माओ काय करतोय याच्याकडे नेहेरूंना लक्ष देयला सांगा. अर्थातच आपल्या कम्युनिस्ट नेतृत्वाला ते करणे अवघडगेले आणि आजपण हेच कम्यूनिस्ट नेतृत्व या बांगलादेशी घुसखोरांची सर्वात जास्त कालजी घेत देशविघातक कृत्यांना नकळत पाठींबा देत आहे. तात्पर्यः मराठी आणि महाराष्ट्राची काळजी मला नक्कीच वाटते पण त्यापेक्षा या घुसखोरीची जास्त काळजी वाटते.

 
^ वर