महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात

नमस्कार ,
ही चर्चा यासाठीच की ......
येत्या काही वर्षात महाराष्ट्रातील काही शहरे(खास करून मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,इ.) हिंदी भाषीक होतील असा अंदाज आहे. मुंबई केंद्रशासीत झालेली असेल. (येथे काही जणांचा युक्तीवाद असा असतो की मुंबईत मराठी माणूस कधीही ५०%च्या वर नव्हता .आता तर तो मुंबईतून कमी कमी होत चालला आहे.)येत्या काही वर्षात तो आणखी किती कमी होईल ते कळणार देखील नाही. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडलेल्या असतील. यापुढे मुंबईचा महापौर हिंदी भाषीकच असेल.
आणखी काय काय होऊ शकते याचा जाणकारांनी अंदाज लावावा. चर्चा फक्त महाराष्ट्रापुरतीच ठेवावी तसेच राज्याबाहेरील इतर शहरांचा दाखला देऊ नये कारण संयुक्त महाराष्ट्र(अजूनही तो पुर्णपणे मिळवता आला नाही) आपण आपले रक्त सांडून मिळवला आहे.
मराठी माणुस नेमका कोठे चुकला ? राज्यकर्ते भ्रष्टाचारात अडकले का ? ते कृपया लिहा.
आणि हो मुंबई नेमकी कोणाची ?
आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

त्यात नवल ते काय?

मराठी वाचली पाहिजे आणि वाढली पाहिजे याचा आग्रह कौतुकास्पद आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमीच वाईट असतो. हा मुद्दा लिहिताना आपण हे लक्षात घेतले नाही का कि इतर राज्यात सुद्धा मराठी भाषक आहेत. त्यांच्या बद्दल इतर राज्यातील लोक असा विचार करतात का?
वाचक्‍नवी यांच्याशी मी थोडाफार सहमत आहे. एक वेळ आपण महाराष्ट्र प्रगत मानु, पण तो पुर्णतः नाही. पुर्ण महाराष्ट्र प्रगत आहे का? याची सुद्धा सखोल चर्चा व्हायला हवी. नसल्यास का नाही? याची सुद्धा चर्चा व्हायला हवी. उगाच जगबुडी आल्यासारखे वक्तव्य करुन काय होणार आहे?
परराज्यातुन लोंढे येतात हे मान्य. पण ते कोणत्या कामासाठी येतात आणि त्यातुन मराठीवर नेमका काय वार होतो? वृत्तपत्रे सुद्धा मिश्र भाषा वापरतात. आता मराठी वृत्तपत्र काही एखादा कन्नड माणुस विकत घेउन नुसता चित्रे बघत बसणार नाही. म्हणजे हि मराठी, मराठी माणसेच बदलत आहेत.
मराठीचा सार्थ अभिमान आणि योग्य वापर व्हायला हवाच. खास करुन मराठी माणसांनी मराठी माणसांशी मराठीतच बोलायचा आग्रह धरायला हवा. खास करुन हि सुरुवात प्रत्येक घरात व्हायला हवी. नाहितर बेबी, अंकलना हेलो म्हण, चल लवकर आवर, स्कुलला जायला लेट होतोय. याचा लवकरच जास्त प्रसार होइल.

बाकि विकास यांच्याशी सुद्धा सहमत आहेच.

अवांतरः जर्मनी मध्ये आम्हाला भ्रमणध्वनीच्या दुकानात एक जर्मन स्त्रीने आधी हिंदीत संभाषण करुन धक्का दिला होता आणि आमचे मराठी संभाषण ऐकल्यावर तिने ही मराठी बोलुन महाधक्का दिला होता. तसेच एका कन्नड मित्राला मराठी आणि जर्मन सहकारीणीला हिंदी आणि मराठीची जुजबी ओळख करुन दिली होती.

मराठी भाषेवर अत्याचार होताना आम्ही या संकेतस्थळांवरच पाहिले आहे. मुळातच शुद्ध भाषेचा आग्रह धराला कि लोक कोणाची मराठी शुद्ध याचा वाद सुरू करतात. मग बोलीभाषाच खरी भाषा असा हट्ट. मग बोली भाषेत इतर भाषांची सरमिसळ. अशाने जर उद्या मराठी शहरे हिंदी वा हिंदी मिश्रीत भाषिक होउ लागली तर त्यात नवल ते काय?

एक मराठी भाषेच्या प्रेमातुन करावासा वाटलेला प्रश्नः कॉम्रेड हा शब्द अमराठी नाही काय?





मराठीत लिहा. वापरा.

बोली भाषा

मराठी भाषेवर अत्याचार होताना आम्ही या संकेतस्थळांवरच पाहिले आहे. मुळातच शुद्ध भाषेचा आग्रह धराला कि लोक कोणाची मराठी शुद्ध याचा वाद सुरू करतात. मग बोलीभाषाच खरी भाषा असा हट्ट. मग बोली भाषेत इतर भाषांची सरमिसळ. अशाने जर उद्या मराठी शहरे हिंदी वा हिंदी मिश्रीत भाषिक होउ लागली तर त्यात नवल ते काय?
बोलीभाषा अशुद्ध असते असे कोणीही कधीही म्हणत नाहीत, म्हणत असतील तर ते उचित नाही. कुठलीही बोलीभाषा शुद्धच असते, फक्त ती बोलताना वापरायची असते. लिहिताना आपले विचार अधिकाधिक लोकांना समजावेत अशी किरकोळ प्रामाणिक इच्छा असेल तर प्रमाण-भाषाच शुद्ध स्वरूपात वापरली पाहिजे. अशी गरज वाटत नसेल तर खुशाल 'कॉक्‍नी- स्लॅंग' भाषा वापरावी, ती थोड्याशा लोकांना नक्की समजेल. --वाचक्‍नवी

परप्रांतियांची वाढती दादागीरी

मुंबईतील परप्रांतियांची वाढती संख्या यापे़क्षा त्यांची वाढती दादागीरी हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. फाटाफुटी नंतर जेंव्हा शिवसेना कमजोर होतेय असे जाणवले, तेंव्हा मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणसांनी शिवसेनेला केलेले एकगठ्ठा मतदान हे याचेच प्रत्यय आहे की मुंबईतील मराठी माणसांना परप्रांतियांच्या दादागीरीची झळ पोहचू लागली आहे.

समाजसुधारकांच्या या महाराष्ट्रात आजकाल अनेक रस्त्यांना/चौकांना, पैशांच्या जोरावर ज्यांचा काही इथल्या मातीशी संबंध नाही अशा किंवा सुधारणा विरोधी व अंधश्रद्ध रूढींना प्रोत्साहन देणार्‍या मुनी व आचार्यांची नावं दिली जात आहेत. पुरावा म्हणून दोन उदाहरणे.
१. चार / पाच वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका रस्त्यास (नक्की आठवत नाही परंतु बहुतेक गेट वे परिसरातील) अबू आसीम आझमी यांनी आपल्या वडीलांचे नाव दिले. कारण काय, तर त्यांचे वडील उत्तरप्रदेशातील एका गावात प्रसिद्ध हकीम होते.
२. चार दिवसांपूर्वी बातमी वाचली. ठाण्याच्या मासुंदा तलाव भागातील एका रस्त्यास् कोणा जैन मुनींचे नाव देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सदर रस्त्यास आधीच एका मराठी व्यक्तिचे नाव दिलेले होते.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी सर्व भाषिक शाळांमध्ये पहिली पासून मराठी सक्तिचे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास उषा मेहता, किरीट सोमैया आदी मंडळींनी जोरदार विरोध केला. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. तीन वर्षांपूर्वी निकाल शासनाच्या बाजूने लागूनही परप्रांतियांच्या दबावाखाली अजून कार्यवाही नाही.

मुंबईतील कोळणींचे, भाजीवाल्या बायकांच्या व्यवसायावर यूपी/बिहारींनी आक्रमण केले आहे. आता तर काही वस्त्यांमध्ये हे लोक मराठी विक्रेत्यांना शिरु देत नाहीत.

यादी दिली तर लांबत जाईल, अजून एक उदाहरण देऊन संपवतो.
मुंबईतील कांजुरमार्ग व भांडुप पुर्वेस जवळपास ९५% स्थानिक मराठी रिक्षावाले आहेत. रिक्षांची लक्षणीय संख्या असूनही दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ वाहने शिस्तीत लावली जातात. रि़क्षा स्टँडचा परिसर स्वच्छ व स्वखर्चाने सुशोभित ठेवला जातो. याउलट अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली रेल्वे स्थानकांच्या परिसरात परप्रांतिय रिक्षावाल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परिस्थिती आपण प्रत्यक्ष पाहू शकता. (किंवा अंदाज लावू शकता)

भारतीय घटनेने भारतीय नागरिकाला देशात कूठेही जाण्याचा, रहाण्याचा अधिकार दिला आहे याबद्दल दूमत नाही. परंतु स्थानिक लोक व त्यांची संस्कृती किंवा त्यांच्या अधिकारांवर आक्रमण करण्याचा अधिकार कोणत्या तत्वात बसतो. घटनेनुसार भाषावार प्रांतरचना एकदा का मान्य केली की, तिचा उद्देश त्या त्या प्रांतातील भाषिक समुहाच्या संस्कृतीचे व अधिकारांचे संरक्षण व संवर्धन करणे हा आहे हे सुद्धा मान्य करावे लागेल.

कोणी येथे येण्यास/व्यवसाय करण्यास आमची हरकत नाही. परंतु त्यांनी दादागीरी करावी आणि आम्ही गांघीगीरी करावी अशी कोणी अपेक्षा ठेवू नये.

आपण मराठी माणसे जरा जास्तच लोकशाहीवादी, उदारमतवादी व (परप्रांतियांना) सहकार्य करणारे असतो. (जरा जास्त होतय का? -:)

जयेश

जयेश जी

आपण जे लिहीलेय ते १०० % खरे आहे. आपल्याशी मी सहमत. आपल्यासारखीच माणसे मराठी भाषा वाचवू शकतात. पण तुम्ही शिवसेनेचा जो उल्लेख केला तो जरा खटकला . शिवसेनेचा दरारा जरी असला तरी परप्रांतीयांचे लोंढे वाढत असताना शिवसेना काय करत होती. बरीच वर्षे सेनेचीच सत्ता मुंबई महानगर पालीकेवर होती काय केले सेनेने.
आपला
कॉ.विकि

शिवसेना

विकी,
शिवसेनेचा उल्लेख केवळ सद्य परिस्थितीची कल्पना यावी यासाठी दिला आहे. शिवसेनेची भूमिका हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. "इन डेमोक्रेसी, पिपल् गेट द गव्हर्नमेंट दे डीजर्व "

जयेश

रस्त्या-चौकांची नावे

समाजसुधारकांच्या या महाराष्ट्रात आजकाल अनेक रस्त्यांना/चौकांना, पैशांच्या जोरावर ज्यांचा काही इथल्या मातीशी संबंध नाही अशा किंवा सुधारणा विरोधी व अंधश्रद्ध रूढींना प्रोत्साहन देणार्‍या मुनी व आचार्यांची नावं दिली जात आहेत. पुरावा म्हणून दोन उदाहरणे.
१. चार / पाच वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका रस्त्यास (नक्की आठवत नाही परंतु बहुतेक गेट वे परिसरातील) अबू आसीम आझमी यांनी आपल्या वडीलांचे नाव दिले. कारण काय, तर त्यांचे वडील उत्तरप्रदेशातील एका गावात प्रसिद्ध हकीम होते.
२. चार दिवसांपूर्वी बातमी वाचली. ठाण्याच्या मासुंदा तलाव भागातील एका रस्त्यास् कोणा जैन मुनींचे नाव देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सदर रस्त्यास आधीच एका मराठी व्यक्तिचे नाव दिलेले होते.

व्यक्तिपूजेचे स्तोम माजले की असे होणारच. मुंबई महापालिका रस्त्या-चौकांना संबंधितांकडून पैसे घेऊन नावे देते. मराठी माणूस पैसे देत नाही, मग मराठी नाव कसे देणार? 'नर्गिस दत्त' रस्त्यावरची पाटी हिरव्या रंगात आहे, कारण ज्याने तिच्यासाठी पैसे मोजले त्याची तशी इच्छा होती. चौपाटीजवळच्या लॅबर्नम रोड चे नाव बदलण्याचा प्रयत्‍न झाला. नगरसेवकांना हे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असणार्‍या वृक्षाचे नाव आहे हे माहीत नव्हते. मॅडम कामा रस्त्याचे नाव बदलण्याचा पण प्रयत्‍न झाला होता.
एक ठराव पारित करून रस्त्या-चौकांना १५ ऑगस्ट १९४७ नंतर दिलेली सर्व नावे पूर्ववत करावीत.(कुठलीतरी तोडतारीख हवी.) त्यानंतर नव्याने दिलेली व्यक्तिपूजक नावे बदलून परदेशात असतात तशी प्राणी, फुले ,झाडे, सुखद भावना, प्रसिद्ध पुस्तके यांची नावे द्यावी. त्या रस्त्यावर असलेल्या व्यक्तिनाम नसलेल्या संस्थेचे नाव अवश्य द्यावे. किंबहुना प्रचलित जुनी नावे विचित्र किंवा असभ्य नसल्यास अजिबात बदलू नयेत. पुणे विद्यापीठाला महाराणी जिजाबाई भोसले हे नाव देण्याचा कट हाणून पाडावा. ज्या व्यक्तीने एखाद्या संस्थेसाठी आयुष्य वेचले असेल किवा भरघोस देणगी देऊन ती संस्था उभी केली असेल , किंवा तिच्या स्मरणार्थ ती संस्था निर्माण केली असेल तरच व्यक्तिनामाचा विचार व्हावा. परदेशात असेच होते. पण कुठल्याही परिस्थितीत लांबलचक नावाचा विचार करू नये, लोक त्याचे तुकडे करून वापरतात. लोटि रोड, जे‍एन्‌ रोड, एल्‌बीएस्‌ रोड ही उदाहरणे डोळ्यासमोर असावीत. --वाचक्‍नवी

यात दोष कोणाचा

यात दोष कोणाचा ? मराठी माणसाचा की मराठी राज्यकर्त्यांचा ?
आपला
कॉ.विकि

मराठीला धोका

महा महाराष्ट्र नंबर १ नसन् पर, मराठी हद्दपार होऊन राह्यली.
मराठी मानसाचं काय खरं नाय राह्यलं.
पर् म्या अख्य्या मुंबैत हिंडलो मला जागोजागी मराठी बोलनारे भेटलेच ना भौ.
धंद्यात मराठी मानुस् मागं राह्यला आसन् त्याचं काय नाय भौ, त्यो स्वभावच हाये मराठी मानसाचा. :)

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

एका मारवाड्याची गोष्ट

धंद्यात मराठी मानुस् मागं राह्यला आसन् त्याचं काय नाय भौ, त्यो स्वभावच हाये मराठी मानसाचा. :)

वरील अनुषंगाने " एका मारवाड्याची गोष्ट" हे डॉ. गिरिष लखोटिया यांचे काहीसे आत्मचरित्रपर पुस्तक मराठी लोकांना अतिशय अपील होणारे आहे. त्यांनी मराठी मानसिकतेवर बोट दाखवले आहे. ते अर्थतज्ञ आहेत. मी ते वाचले नाही पण त्याचे परिक्षण अनेक ठिकाणि आले होते ते वाचले आहे.
प्रकाश घाटपांडे

कचरा, झाडूवाले आणि शिक्षक

चर्चा फारच लांबलेली दिसते आहे. अधिक भर आणि फाटे नकोत म्हणून जास्त लिहीत नाही.

फक्त एकच -कचरा काढणे आणि शिकवणे ही दोन्ही कामे सारखीच महत्त्वाची आहेत. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नाही. कचरा कोंडी - हे पुण्यात अतुल पेठे यांनी बनवलेले छोटे चलतचित्र ऐकीवात आले होते. पाहिले नाही, हे आधीच कबूल आहे. त्याबद्दल वाचले जरूर आहे.असेच चलतचित्र जर शिक्षकांवर तेही नगरपालिकेच्या शाळेतील बनवले तर असेच काहीसे दृष्य दिसेल. तपशीलाचे फरक असतील एवढेच.

असो.

मराठी लोक महाराष्ट्र सोडून जगात फिरले पाहिजेत हे मात्र खरे. इथल्या चर्चेत मुख्य दोन प्रवाह दिसतात -
१. मराठी लोक कमी पडताहेत
२. मराठी लोकांनी संकुचितपणा सोडून दिला पाहिजे.

माझ्या मते हे दोन्ही खरे आहे. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचेच असले तर आधी लोकांची भाषा समजून घ्यावी लागते मगच त्यांच्याशी संवाद साधता येतो त्यानंतर पुढचे. यासाठी मराठी लोकांनी उत्तम मराठी आणि उत्तम हिंदी (किमान) तसेच गुजराती शिकावे हा आग्रह धरला पाहिजे. उगाच बाहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात फायदा नाही. त्याचबरोबर स्वतःला नावे ठेवत ठेवत प्रगती होत नाही, ती प्रोत्साहनाने होते.

कचरा काढणे आणि शिकवणे

फक्त एकच -कचरा काढणे आणि शिकवणे ही दोन्ही कामे सारखीच महत्त्वाची आहेत. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नाही.

कचरा काढणे कमी आणि शिकवणे श्रेष्ठ हा मुद्दा नाही. तर अशिक्षित झाडूवाल्याला शिक्षकाच्या दुप्पट पगार आणि सुशिक्षित शिक्षकाला दुप्पट काम करून निम्मा पगार , इथे महाराष्ट्राचा मागासलेपणा आहे.

हम्म

महाराष्ट्रात शिक्षकांना नगरपालिकेच्या झाडूवाल्याच्या निम्मा पगारही मिळत नाही.
अशिक्षित झाडूवाल्याला शिक्षकाच्या दुप्पट पगार आणि सुशिक्षित शिक्षकाला दुप्पट काम करून निम्मा पगार , इथे महाराष्ट्राचा मागासलेपणा आहे.

मी मान्य करते की शिक्षकांचे प्रश्न अत्यंत मोठे आहेत. पण असेही वाटले की झाडूवाले आणि शिक्षक यांची तुलना करायचे कारण नाही. अशी तुलना करायची असली तर ती वेगवेगळ्या क्षेत्रात करता येऊ शकते. अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या कितीक मुलांनी ते मूळ शिक्षण सोडून देऊन सॉफ्टवेअरचा मार्ग पकडला ( निर्णय चूक का बरोबर मी सांगू शकत नाही) कारण मूळ क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही समान पैसे नाहीत. हे अगदी जगभर बघायला मिळते. तेव्हा हे "मागासलेपण" सर्वत्र आहे, महाराष्ट्रातच केवळ आहे असे नाही.

ही चर्चा का?

इतर राज्यातील लोक येथे का येतात तर येथे असणार्‍या सोयीसुविधेमुळे ? त्यांच्या राज्यात सोयीसुविधा का निर्माण झाल्या नाहीत. मुंबईत मराठी माणसाची पीछेहाट का झाली. मराठी माणसं मराठी माणसाला का मागे खेचतात ?
आपला
कॉ.विकि

आभार

मराठी च्या बाजूने(घरभेदी सोडून) लिहीणार्‍यांचे जाहीर आभार.
आपला
कॉ.विकि

घरभेदी सोडून म्हणजे !

विचारांच्या बाबतीत हा आपला आणि तो घरभेदी असतो असे आम्हाला तरी वाटत नाही.
घरभेदीचा विचार ज्यांच्या लेखनात होता, त्यांच्याही विचारांचे आम्ही स्वागत करतो आणि वाचकांच्या वतीने आम्ही त्यांचेही आभार मानतो !

आपला.
चर्चा, चिंतन, मंथनात सर्वांचे पान सुपारी देऊन स्वागत करणारा !
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे

बिरूटे साहेब.....

येत्या काही वर्षात मराठी माणुस मुंबईतून हद्दपार होईल तेव्हा तुम्हाल कळेल घरभेदी चा(उपक्रमावर आहेत काहीजण) अर्थ.
आपला
कॉ.विकि

आम्ही ?

आम्ही प्रतिकुल मत दिले म्हणून आम्ही घरभेदी ???

विचार करावयास हवा पुन्हा एकदा लिहताना मानवाने... हे तुम्हालाच उद्देशून आहे.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

 
^ वर