तर्कक्रीडा: ५१: वनविहार

एकदा इस्पिक राजा- राणी, बदाम राजा-राणी,किलवर राजा-राणी अशी तीन जोडपी वनविहारासाठी निघाली.वनातून जाताना मार्गात त्यांना एक नदी लागलीं. नदीच्या पैलतीरावरील वनश्री नयनरम्य दिसत होती. मात्र नदीचे पात्र विस्तीर्ण आणि खोल होतें. नावेविना नदी ओलांडणे शक्यच नव्हते.सुदैवाने त्यांना जवळच एक लहानशी होडी आंकरून (नांगरून ) ठेवलेली दिसली. नावाडी नव्हता,पण विहारासाठी आलेल्या त्या सहाही जणांना नाव वल्हवण्याचे तंत्र अवगत होते. सर्वांनी पैलतीरी जाण्याचे निश्चित केले.परंतु त्यांच्यापुढे तीन समस्या उभ्या राहिल्या:
१. नाव फारच लहान होती.त्यात दोन पेक्षा अधिक माणसे बसली असती तर ती उलटली असती.
२. चार कृष्णवर्णी व्यक्तींतील प्रत्येकाने सांगीतले की आपण रक्तवर्णी (लाल रंगाच्या) व्यक्तीसह होडीतून प्रवास करणार नाही.
३. तीनही राण्यांनी असे स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितले की" होडीत कय अथवा किनार्‍यावर काय आपला पती बरोबर असल्याशिवाय आम्हापैकी कोणीही परपुरुषाबरोबर क्षणभर देखील थांबणार नाही." (समजा पैलतीरावर एक अथवा दोन राण्याच आहेत. आता ऐलतीरावरून नावेत बसून एक जोडपे निघाले तर "परपुरुष येत आहे " असा ओरडा पैलतीरावरून होईल.)
तर या अटी तंतोतंत पाळून त्यांनी नदी पार कशी करावी ?
**********************************************************************
( भास्कराचार्यांच्या "लीलावती" तील एका कोड्याच्या आधारे. )..कृ. उत्तर व्यनिं. ने

लेखनविषय: दुवे:

Comments

डोके की खोके

यनावाला महाशय,
तुम्ही असे कोडे देत आहात की आम्हाला संशय येत आहे आमचे डोके आहे की खोके. या कोड्यात रक्तवर्णी व्यक्तींना कसे न्यावे हा प्रश्नच आहे.
तरी सुद्धा प्रयत्न केला आहे. उत्तर बरोबर आहे का?

आपला,
(????) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

एक प्रयत्न केला आहे

माझे उत्तर बरोबर आहे का?

-ऋषिकेश

वनविहार.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यात दिलेल्या सर्व अटी पाळून तीनही जोडप्यांना नावेतून पैलतीरावर सुरूपपणे पोचवण्यात श्री. ऋषीकेश हे यशस्वी ठरले आहेत. त्यांचे विशेष अभिनंदन!

फारच शालीन स्त्रिया

इस्पिक दंपती त्यांच्या गुलामाला डोळे आल्याकारणाने आधी येणार नव्हते. पण गुल्लूचे आलेले डोळे अर्धे गेल्यामुळे, काळजी निवळली. त्याला राजवाड्यात सोडून वनविहारास येण्यास इस्पिक राजाराणी अवचित तयार झाले. ते फार छान झाले, कारण ते आले नसते तरी बदाम-किलवर चौकडीला नदी पार करणे शक्य नव्हते.
तसेच चौकट दंपती राज्यकारभारात व्यस्त असल्यामुळे वनविहाराला जाऊ शकले नाही. हे पथ्यावरच पडले. कारण तेही आले असते तर सर्व आठ जणांनी नदीपलीकडे जाणे शक्य नव्हते.

पिकनिक सफल होण्यास नशिबाची मोठी साथ लागते, हेच खरे.

मदत

श्री. धनंजय,

मदतीला धाऊन आल्याबद्दल आभार. पण आमचे खोके अजूनच जास्त बुचकळ्यात पडले आहे.

आपला,
(खोकेवाला) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

नौकानयन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांचे उत्तर आले. त्यांना सुटणार नाही असे कोणतेही कोडे नाही, असे मी एकदा मागे लिहिले होते ते खरे ठरले. त्यांनी अचूक उत्तर शोधलेच आणि ते पूर्णतया पटेल अशा रीतीने मांडले.खरेतर "श्री. धनंजय यांचे उत्तर आले." एवढे लिहिल्यावर " ते उत्तर बरोबर आहे " असे लिहिणे ही द्विरुक्ती आहे.

माझ्या ९०% बरोबर उत्तरंचे गुपीत

जी कोडी मला उकलत नाहीत, ती उत्तरे मी व्यनिने पाठवतच नाही. त्यामुळे पाठवलेल्या उत्तरांपैकी ९०% मार्क (पण न पाठवलेल्या उत्तरांपैकी ०% मार्क!).

आमच्या शाळेत नागरहळ्ळीसर न दिलेल्या उत्तरांचे गुण कापत असत. त्यामुळे त्या दुष्ट नागरहळ्ळीसरांपेक्षा आम्हाला यनासर फारच आवडतात.

सुलभीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे सोडविण्यासाठी ते सहा पत्ते घ्यावे. होडीसाठी जोकर घ्यावा. नदी म्हणून एक पट्टी ठेवावी. आता अटीत बसतील अशा चाली कराव्या. कोडे सुटेल. ज्या 'लीलावती पुनर्दर्शन' या पुस्तकातून हे कोडे घेतले त्यात उत्तर दिलेले नाही. मी पत्ते घेऊन सोडवले. गंमत म्हणजे श्री. धनंजय यांनाही पत्त्यांचे सहाय्य घ्यावे लागले."लीलावतीत" पत्त्यांचा उल्लेख अर्थातच नाही.
[एक सुचवणी (हिंट): सर्व प्रथम बदाम राजा-राणीला नावेत बसवावे.]

नाव बदलेपर्यंत

नावेत चढेउतरेपर्यंत तरी राणीला परराजाची सोबत मुभा आहे का?

नाव (होडी) बदले पर्यंत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नावेत चढेउतरेपर्यंत तरी राणीला परराजाची सोबत मुभा आहे का?"
नाही. हा अटीचा भंग आहे. अशी परिस्थिती उद्भवता नये.

मी एक्सेल वापरले

कोडे सोडवण्यासाठी मी एक्सेल वापरले :प्

वनविहार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांनी अटींच्या चौकटीत राहून सर्व जणांना नदीपार करण्याची योग्य पद्धत शोधून काढली आहे.त्यांचे अभिनंदन!

वनविहारः उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अ= ऐलतीर, प=पैलतीर
१. लाल जोडपे पैलतीरी गेले.'ब' राजा परतला.
२. दोन काळ्याराण्या पलीकडे गेल्या.
आता ऐलतीरी तीन राजे तर पैलतीरी तीन राण्या + होडी .
३. 'ब' राणी प कडून अ कडे आली.दोन काळे राजे अ कडून प कडे गेले.
आता ऐलतीरी लाल जोडपे .तर पैलतीरी दोन काळी जोडपी.+ होडी.
४. इ. राजा-राणी प कडून अ कडे, ब राजा-राणी अ कडून प कडे.
५.कि. राजा-राणी प कडून अ कडे.
आता ऐलतीरी दोन काळी जोडपी +होडी, पैलतीरी लाल जोडपे.
६.दोन काळे राजे अ कडून प कडे ,बदाम राणी प कडून अ कडे.
आता ऐलतीरी तीन राण्या + होडी, पैलतीरी तीन राजे .
७. दोन काळ्या राण्या अ कडून प कडे जातात. बदाम राजा प कडून अ कडे येतो आणि आपल्या राणीला घेऊन पलीकडे जातो.
अशा प्रकारे सर्व अटी पाळून तीनही जोडपी पैलकिनार्‍यावर पोहोचतात.

 
^ वर