तर्कक्रीडा: ५०: दक्षिणा रमणा
..पेशवाईत विद्वान दशग्रंथी भटभिक्षुकांना सरकारी खजिन्यातून दक्षिणा मिळत असे.त्यासाठी चांदीच्या बंद्या रुपयांचे वाटप होई. साहजिकच हे पैसे घेण्यासाठी भिक्षुकांची झुंबड उडत असे. या गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून दक्षिणा वाटपासाठी पर्वतीवर एक रमणा बांधला होता.रमणा म्हणजे चारी बाजूंना पुरुषभर उंचीच्या भिंती आणि दोन दारे असलेली बंदिस्त जागा. वर छप्पर नसे.प्रवेश द्वारावरील पहारेकरी भिक्षुकांची गणती करून त्यांना आत सोडत असे.ठराविक संख्या झाली की दरवाजा बंद. मग आत दक्षिणा वाटली जाई.
.....एकदा पर्वतीवरील शिवमंदिरात अभिषेक सप्ताह होता. या सोहळ्याचा प्रारंभ सोमवारी झाला. त्या दिवशी भट भिक्षुकांना रमण्यात दक्षिणा वाटली. (प्रत्येकी रक्कम समान आणि पूर्ण रुपयांत.) दुसर्या दिवशी भटांची संख्या साताने (७ने) वाढविली तर प्रत्येकी दक्षिणेची रक्कम पाच (५) रुपयांनी कमी केली.बुधवारी भटांची संख्या आणखी ७ ने वाढविली आणि दक्षिणा आणखी ५ रु. नी घटवली. याप्रमाणे सप्ताहभर म्हणजे आदित्यवारापर्यंत भिक्षुकसंख्या प्रतिदिनी ७ ने वाढवत नेली तर दक्षिणा प्रत्येक दिवशी ५ रु. नी घटवत नेली.म्हणजे शेवटच्या दिवशी (रविवारी) असलेली भटसंख्या ही पहिल्या दिवशीच्या संख्येपेक्षा ४२ ने (७ गुणिले ६) अधिक होती,तर प्रत्येकी दक्षिणा सोमवारच्या दक्षिणेपेक्षा ३० रु. नी कमी होती.
......याप्रमाणे सप्ताहभर वाटप करण्यास एकूण दहा सहस्र सातशे सत्याऐशी रुपये (१०, ७८७ रु.) सरकारी खजिन्यातून खर्ची पडले, असे ऐतिहासिक कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
...तर पहिल्या दिवशी भिक्षुकांची संख्या किती ? त्या दिवशी प्रत्येकी किती रुपये दक्षिणा वाटली ??
Comments
दक्षिणारमणा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम उत्तर श्री. धनंजय यांचे आले. त्यांनी रीतीसह अचूक उत्तर दिले आहे.
तर्कक्रीडा: ५०
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांनी कोड्याचे उत्तर पाठविले आहे.त्यांनी मांडलेले समीकरण तसेच अंतिम उत्तर ही दोन्ही अचूक आहेत.
दक्षिणारमणा :उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मधल्या दिवशी म्हणजे गुरुवारी, भटांची संख्या 'भ' तर प्रत्येकी दक्षिणा 'द' रु. मानू.म्ह. सोम. ते रवि. या सप्ताहात वाटलेली दक्षिणा अशी:
....................................................................
सोम............(भ-२१) (द+१५) रु.
मंगळ...........(भ-१४) (द+१०) रु.
बुध. ............(भ-७) (द+५)
गुरु...............(भ) (द)
शुक्र...............(भ+७) (द-५)
शनि...............(भ+१४) (द-१०)
रवि................(भ+२१) (द-१५)
......................................................................
वरील सर्व गुणाकार करून अंतीं एकूण दक्षिणा रक्कम =७*भद- ९८० =१०७८७
म्ह.......भ*द = १६८१=( ४१) वर्ग
यावरून भ= ४१, द= ४१ रु.
म्हणून प्रारंभी भटांची संख्या =४१-२१=२०, प्रत्येकी दक्षिणा= ४१+१५ = ५६रु.
..................................................................................................................