अनंत अमुची ध्येयासक्ती...

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला...

अमेरिकेत १२ ऑक्टोबर हा कोलंबस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्टोबरचा दुसरा सोमवार ही त्या निमित्ताने काही भागात सुट्टी असते.
वास्तवीक कोलंबसने अमेरिका या देशात कधीच पाऊल ठेवले नाही आणि त्याला (तर्कांप्रमाणे) कधी कळले पण नाही की हा भारत नाही. त्याच्या दृष्टीने तो भारतातच होता.

एकीकडे कोलंबस डे साजरा केला जात असताना दुसरीकडे येथील नेटिव्ह अमेरिकन्स आणि अमेरिका खंडातील मूळ रहीवासी (लॅटीन अमेरिकन्स) मात्र त्याच्या नावाने ओरडत असतात आणि या दिवसाला Día de la Raza ("day of the race") असे अथवा व्हेनेझुएलामधे "Día de la Resistencia Indígena" ("Day of Indigenous Resistance") असे म्हणून साजरा करतात. कारण अर्थातच कोलंबसाने आणि त्याच्यामुळे नंतर जे काही येथील साध्या पद्धतीने राहणार्‍या नेटीव्ह अमेरिकन्सवर अत्याचार झाले ते आहे.

कधी कधी वाटते की आपल्याला ह्यातले भारतात (निदान मी शिकत असताना) काहीच शिकवले जायचे नाही. कुसुमाग्रजांची कविता "कोलंबसाचे गर्वगीत" कधी काळी पाठ पण होती... त्यातील कोलंबसाचे वर्णन हे जरी एक "एक्स्प्लोरर" म्हणून आकर्षक वाटले असले तरी तो आणि त्याच्या पाठोपाठ आलेले युरोपिअन्स हे सिव्हिलाईज्ड असण्यापेक्षा जास्तच हिंसक म्हणून रानटी होते असे म्हणावेसे वाटते.

ह्या सर्वात एक नशिब म्हणजे तोच काळ हा बर्‍याच अंशी भारतातील काळरात्र होता. कोलंबस जर चुकला नसता आणि खरेच भारतात आला असता तर आज आपण कसे असतो?

लेखनविषय: दुवे:

Comments

फार वेगळे नसतो

कोलंबस जर चुकला नसता आणि खरेच भारतात आला असता तर आज आपण कसे असतो?

तर फार वेगळे नसतो. ख्रिस्तोफर कोलंबस(१४५१-१५०६) अमेरिकेत आणि वास्को द गामा (१४६०-१५२४) भारतात, म्हणजे परकीय व्यापाराच्या उद्देशाने दोघेही सारख्याच काळात परदेशात पोहोचले. आपल्याकडील शासकांकडे दूरदृष्टीचा अभाव होता त्यामुळे कोलंबस आला असता तरी तेच झाले असते आणि जसे व्हायचे तसेच झाले असते. (व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते झाले.) शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबर्‍यांतून त्यांनी धोका ओळखला होता असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यांनीही किती धोका ओळखला होता याची कल्पना नाही, पण त्यांनी आपले आरमार सक्षम केले यावरून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. फिरंग्यांच्या बंदुका, शस्त्रास्त्रे इ. साठी सर्वच भारतीय शासकांना त्यांच्याशी व्यापार हवाच होता असे वाटते. लॅटीन अमेरिकेपेक्षा भारत राजकीय, सांस्कृतिक आणि सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतींत बर्‍याच सुस्थितीत होता असेही वाटते. त्यामुळे मूठभर परकीयांनी येऊन अत्याचार करण्यापेक्षा व्यापाराच्या मार्गे शिरकाव करून नंतर सुरक्षेची हमी देऊन, कधी धाक दाखवून, पुढे धर्मांतरे करून भारत बळकावणे त्यांना अधिक पथ्यावर पडले.

image2

उलट मला वाटते कोलंबस अमेरिकेला पोहोचला आणि नंतर युरोपीय अत्याचारांना सुरुवात झाली त्याप्रमाणे वास्को द गामा भारतात पोहोचला आणि युरोपीय अत्याचारांना सुरुवात झाली असा विचार आपले लोक करून खापर त्याच्या डोक्यावर फोडत नाहीत ते बरेच आहे.

बाकी, जर नेटिवांच्या ताब्यात अमेरिका राहिला असता तर "कोलंबस डे" साजरा झाला नसता असे वाटते. असे दिवस साजरे करायची गरजही मला कळत नाही. म्हणजे "जिझीया कर डे" आणि "जिझीया कर निषेध डे" असला बाष्कळपणा करायची आपल्याला गरज नाही तेवढीच यांनाही नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. :))

प्रतिसाद घाईत लिहिला आहे. थोडा विस्कळीत वाटल्यास क्षमस्व!

महाराज

>>>शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबर्‍यांतून त्यांनी धोका ओळखला होता असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यांनीही किती धोका ओळखला होता याची कल्पना नाही,...

मी असेही ऐकले आहे की राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस ईस्ट इंडीया कंपनीच्या प्रतिनिधींनी काही तरी ७-८ कलमे मिळवण्याची विनंती केली. ती व्यापारासंदर्भात होती. महाराजांनी सर्व कलमे मान्य केली फक्त एक कलम रदबातल केले - ते म्हणजे शिवशाहीत राणीचा छाप असलेली नाणी वापरायास परवानगी.

असाच एक डे

म्हणजे "जिझीया कर डे" आणि "जिझीया कर निषेध डे" असला बाष्कळपणा करायची आपल्याला गरज नाही तेवढीच यांनाही नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. :))

अगदी मान्य! आपल्या (भारतीय) सेक्यूलर विचारांमधे जिझीया कर निषेध डे बसणार नाही (आणि नको पण बसायला हे माझे ही मत!) पण मीच चालू केलेल्या या चर्चेत विषयांतर करून एक बघितलेला किस्सा सांगतो:

पोखरण#२ अणू चाचणी झाल्याला एक वर्षे झाले म्हणून त्यावेळेस एमाआयटी च्या पायर्‍यांवर आपलेच (भारतीय) बंधू-भगिनी काही शेजारील बंधूंबरोबर भारताचा अणू चाचणी करून एक वर्षे झाले म्हणून निषेध करत होते. जाणारे येणारे गोरे हा काय प्रकार म्हणून पाहात जात होते.

कोलंबस आणि वास्को

बरोबर आहे. कोलंबस तसा वास्को दा गामा.

पण तुमचा विषय मला आवडला. पुढे जिंकलेले लोकही जेत्याच्या विचारसरणीचे होतात. त्यामुळे वास्कोची डोळेझाक करून प्रशस्ती करणारे पूर्वी गोव्यात सापडायचे. तुम्ही कोलंबसचे म्हणता तसे वास्कोचे चरित्र ही "एक्स्प्लोरर" म्हणून आकर्षक वाटावे पण त्यामुळे भारतावर झालेले दुष्परिणाम ही ओळखावे.

गोवामुक्तीनंतर हे झालेच आहे म्हणा. पण अशी आपली इतिहासातली दुसरी कुठली उदाहरणे आहेत तेही शोधायला पाहिजे.

जरतर

हा जरतरचा खेळ बर्‍याचदा मनोरंजक ठरतो (रोजच्या आयुष्यातही). आत्तापर्यंतच्या इतिहासात जितक्या वेळा लोक एक्स्प्लोरर म्हणून गेले तितक्या वेळा त्यांनी स्थानिक जमातींवर अमानुष क्रौर्याचे प्रदर्शन केले आहे. कोलंबसने २० लाख स्थानिक रहिवाश्यांचा बळी दिल्याचे मानले जाते. ब्रिटीश आपल्याइथे आले तेव्हा काय झाले हे सांगायला नकोच. नवीन प्रदेशातील प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त कशी वापरता येईल याकडे त्यांचा कल होता. मॊरिशस बेटावर गेलेल्या डच प्रवाश्यांनी डॊडॊ पक्ष्याची अपरिमित शिकार करून त्याला नामशेष करून टाकले. कोलंबस भारतात आला असता तर कदाचित आज अमेरिका आणि भारताची स्थिती काही प्रमाणात वेगळी असती. इथे अजून एक जरतर आठवतो. आपण भारतीय जगातील इतर देशांमध्ये गेलो असतो तर आज भारताची परिस्थिती कशी असती?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

म्हणजे

>असे असूनही, आपण तसेच आहोत.

म्हणजे हम नही सुधरेंगे असे आपल्याला म्हणायचे आहे का? :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आम्ही..

म्हणजे हम नही सुधरेंगे असे आपल्याला म्हणायचे आहे का?

आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना!

(ते खरे गाणे आहे: आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडाना!)

त्यांनी कत्तली केल्या?

जे अमेरिकेत गेले त्यांनी कत्तली केल्या?
ते तर सुरळीत पणे मिसळण्याचा प्रयत्न करतांना दिसले...
(झक मारून मुकाट पणे मिळेल ती कामं करतात आठ आठ तास असे ऐकुन आहे.)

काही लोक तर अमेरिकेचा (च) उदो उदो ही करतांनाही दिसत आहेत.

मी तरी कुठे अशा कत्तली झाल्याचे वाचले नाही बॉ? आमच्या दुरदर्शन नि झी न्युज वर पण दिसले नाही कधी...
मला तरी हे वागणे अतिशय सु-संस्कृत वाटते!

मला नाही वाटत, ब्रिटिश नि स्पॅनिशांनी असे काही केले.
कुठे वाचले तरी नाही बॉ. त्याणी क्रुरपने कत्तलीच केल्या. इअतके की म्हणे कोलंबिया मध्ये ' हा मुळचा कोलंबियन' असे दाखवायला ही उरला नाही. अमेरिकेतही तेच झाले.

काय बरोबर ना?
नसेल तर सांगा
,
असेही गुंडोपंतांना माहीती जरा कमीच असते. आपल्याला असेल तर द्या बॉ!
आपला
गुंडोपंत

छे छे

छे छे
आपले थायलंड, मलेशिया, इण्डोनेशिया मध्ये जाणे वेगळे होते... आपन जाऊन तिथल्या लोकांना उध्वस्त नाही केले!
त्यांना आपलेसे केले.

तुम्ही असे कंपेअरच करू शकत नाही
त्या २० लाखा पेक्षा जास्त कत्तली करणार्‍या रानटी लोकांबरोबर!

तसेच, वर उल्लेखलेला दिवस-
मी म्हणतो असा दिवस साजरा करावाच!
किती कत्तली झल्या नि अत्यचार झाले. "सस्टेनेबली जगण्याचे सर्वसमावेशक मार्ग" उध्वस्त केले गेले हे जाणवत राहील. सिव्हिलाइज्ड समजणार्‍या खोट्या सांस्कृतीकतेचे बुरखे फाडण्याची क्षमता टिकून राहील.

त्यामुळे कळेल, लक्षात राहील की किती व्हाईटनिंग केले गेले आहे इतिहासाचे!
नि किती विचारवंत म्हणवणारे लोक विकले गेले आहेत् प्रगतीच्या नावाखाली त्या अमेरिकन व्हाईटनिंग ला.

आपला
गुंडोपंत

लगे रहो!

लगे रहो गुंडोपंत!

यात

यात फक्त इ़कॉनॉमी आली हो..
पैशा शिवाय जग *ट आहे असे मानणार्‍या अमेरिकनांकडून काय अपेक्षा करणार?

या देशाने पुढच्या पीढीची जगण्याची संधीही आपणच ओरबाडून घेतली आहे.
हे निस्र्गाच्या साध्या क्रमाच्य विरुद्ध आहे. माझ्या अल्प मती प्रमाणे यात अतिशय छोटा मेंदू असलेली मुंगी ही समजदार आहे.
तीला सस्टेनेबल आयुष्य माहित आहे.

आता ग्लोबला वॉर्मींग नि सोशली रिस्पाँसिबल असण्याच्या च्या बाता मारतात. काय अर्थ आहे त्यात?
हमर सारख्य बिनडोक गाड्या प्रमोट करण्यात नि त्यांना स्टेटस सिंबॉल बनवण्यात यांना रस!

फक्त आपली तुंबडी भरून घेणार्‍या कुणाच साठी काही शिल्लक न ठेवणार्‍या या सगळ्या 'हुषार' लोकां विषयी हा बावळट गुंडोपंत काय म्हणणार?

त्याची बिचार्‍याची समजच नाहीये हो तितकी.

आपला
गुंडोपंत बावळट

पंत

यात फक्त इ़कॉनॉमी आली हो..
पैशा शिवाय जग *ट आहे असे मानणार्‍या अमेरिकनांकडून काय अपेक्षा करणार?

हा गुण फक्त अमेरिकनांचा नाही. सगळ्यांचाच आहे. पुण्यामुंबईत काय वेगळे दिसते?


आम्हाला येथे भेट द्या.

जे लेनो

आत्ताच जे लेनोने मारलेला पी जे ऐकला: "नेटिव्ह अमेरिकन्स आजच्या दिवसाला नॅशनल इललिगल इमिग्रेशन डेम्हणतात कारण कोलंबस हा पहीला इललिगल इमिग्रंट होता आणि म्हणून आपण सर्वच इललिगल आहोत.."

नंतर भारतावर घसरला: "कोलंबस भारताला शोधत होता. कारण त्या वेळेस टेक सपोर्टसाठी फोन नसल्यामुळे लॅपटॉप घेऊन भारतात जावे लागे..!

या विषयावर

या विषयावरची कॉनरॅड रिक्टर यांची

१. द ट्रीज
२. द फिल्ड्स
३. द टाऊन
४. द फ्री मॅन
५. लाईट इन द फॉरेस्ट

ही पुस्तके वाचनीय आहेत असे कळले आहे. लाइट इन् द फॉरेस्ट वाचले आहे. अत्युत्कृष्ट पुस्तक. जे अमेरिकेत आहेत त्यांना एवढ्या लायब्रर्‍या, दुकाने आहेत. ही पुस्तके वाचून त्यांच्याबद्दल आम्हाला कळेलसे लिहा ना. इकडे असे काहीच मिळत नाही :(
इथे मिळतात 'बाकी शून्य', 'नातिचरामि' आणि ह्यारी पॉटर. बाकी शून्य वाचून गटाराच्या काठाला निवांत बसल्यासारखे वाटले.

(हावरा वाचक) आजानुकर्ण

अवांतरः
जीएंनी या पुस्तकांचे मराठी अनुवादही खालील नावांनी केले आहेत.
१. रान
२. शिवार
३. गाव
४. स्वातंत्र्य आले घरा
५. रानातील प्रकाश

(जीएप्रेमी) आजानुकर्ण

जीत आणि जेते यांचा संघर्ष.

जीत आणि जेते यांचा संघर्ष हा सर्वच पातळीवर चालु असतो. त्यात जे वरचढ असतात ते प्रभावी ठरतात. काही काळातंराने त्यात संकर घडत जातो आणि नविन पीढी जन्माला येते आणि ती काही वेगळेच मानत असते असे मला वाटते.

सुदैवाने भारतीय मानसात ( मानस) क्रोर्याचा मागोवा अथवा प्रभाव कमी असल्यामुळे रासवट म्हणता येईल असे घडले नाही.

स्वकीयांचेच स्वकीयांवर अत्याचार?

जमीनदारी , पिढ्यानपिढ्या वेठबिगारी, अशिक्षीत मजूरांवर भरमसाठ व्याज लावून पिळवणूक, शतकानुशतके त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे, अस्पृश्य म्हणून तहानलेल्या माणसांना पाण्याविना तडफडून मरू देणे. माहेरून "हुंडा" "कमी" आणला म्हणून छळ करून जिवंत जाळणे. पोलीसांनी नशेत (दारू व सत्तेच्या) कैद्यांचे डोळे फोडणे. कुणा एका गावाबाहेरील वस्तीवरच्या माणसाने गावातील सर्वणाबरोबर झगडा केला म्हणून त्या वस्तीला कोंडी करून आग लावणे ज्यात वृद्ध, बायका, मुले जळणार.

तरी बरे सुदैवाने भारतीय मानसात ( मानस) क्रोर्याचा मागोवा अथवा प्रभाव कमी असल्यामुळे रासवट म्हणता येईल असे घडले नाही. घडत नाही व कधी घडेल असे वाटत नाही. हे परकीय लेकाचे आमच्या जिवावर उठले असतात.....

----------------------------------------------------------------------
मी पक्षपात करत नाही. मी भेदभाव जाणत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.

जोरात

सहज रावांचा
प्रतिसाद वाचून जोरात कानाखाली आवाज आल्या सारखे वाटले!

आपला
गुंडोपंत

सहमत पण

आपल्या मतांशी सहमत. पण आपल्याला फरक एवढाच कि आपण नेहमीच हे सगळे सहन केले. कधी स्वकियांकडून कधी परकियांकडून. आम्हाला गुलामगिरी का आवडते ते यातुन कळून येते. बाकि दुसर्‍या पेक्षा आम्ही कमी क्रुर अथवा आम्ही सुद्धा तेवढेच क्रुर हे सगळे relative आहे. सगळीकडे थोड्याफार फरकाने हेच दिसुन येते. युरोपियन लोक जास्त व्यवहारी आहेत हे मान्य करायला हवे. मला काहि प्रमाणात असे वाटते...

अमेरिकन मानसिकता: पैसा सर्वात महत्वाचा. मग त्यासाठी काहीही करा.
युरोपियन मानसिकता: पैसा महत्वाचा पण भावनेला सुद्धा येथे मोल आहे असे वाटते.
भारतीय मानसिकता: अनेकदा भावनेला जास्त किंमत. पैसा महत्वाचा आहेच. पण तो कमीत कमी कष्टाने हवा. डो़क्याला जास्त त्रास नको. मग त्यासाठी लाचारी करणे जास्त स्वीकारलेले बरे...

अर्थात हि मते आजवरच्या अनुभवांमुळे असल्याने उद्या बदलु शकतात.

अवांतर( हि हल्लीची इथली फॅशन आहे म्हणे) : मुंबईमध्ये बसपाचे एक वाक्य वाचले. सब ही ब्राम्हण परदेसी है, बाकि सब मुलनिवासी है. हे वाक्य सत्य मानले तर वरच्या प्रतिसादात लिहिलेली क्रुरता हि काही अंशी भारतीय नाही असे म्हणायला वाव आहे. :)

मराठीत लिहा. वापरा.

स्वकीय?

क्षूद्रांना व स्त्रियांना तुम्ही स्वकीय समजता?

अवांतर: स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातले. स्वकीय म्हणजे?

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

तुलना.

प्रिय सहज,

तुमचा संताप मी समजू शकतो, परंतु तुलना करताना समान पातळीवरून करावी असा संकेत आहे. भारतीय आणि परकिय यांच्यात तुलना चालु आहे. अस्पृश्य, स्त्री यांच्यावरील झालेल्या किंवा भविष्यात होणार्‍या अत्याचाराचा कोण बरे समर्थन करेल?

जगात अपप्रवृत्ती आहेतच पण चांगल्या गोष्टीही आहेत आणि चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा अथवा अनुकरण करायला हवे.

द्वारकानाथ

फार फरक नसता

प्रिय द्वारकानाथजी,

प्रियालीताई जे म्हणाल्या आहेत. त्यापेक्षा फार वेगळे मला वाटत नाही.

जरी शतकानुशतके परकीय गुलामगिरीत काढुनही आपण स्वतःला अजूनही भारतीयच समजतो. (पूर्णता मोघलाळलेले, पूर्णता आंग्लाळलेले असे समजत नाही) म्हणून म्हणतो की स्पॅनीश सत्ता आली असती तरी फार काही फरक पडला असता असे वाटत नाही. आत्ता आहोत थोडेफार तसेच असतो. जर इंग्रजांसारखे व्यवस्थापन स्पॅनीश् लोकांनी दाखवले असते तर (जशी इंग्लीश शिकलो) तर स्पॅनीश भाषा आली असती. असाही एक मुद्दा आहेच की इंग्रजही कोलंबस नंतर (जसे वास्को-द-गामा नंतर) आले असते व स्पॅनीश लोकांकडून सत्ता काबिज केली असती. त्यामुळे परत तेच.

वरच्या प्रतिसादातुन मला हेच सुचवायचे होते की कुठलीही परकीय सत्ता असती तरी फार काही फरक पडला नसता.आपल्या इथली पारंपारीक / प्रचलीत व्यवस्था, (आता खरडवहीत तुम्ही आम्हाला दलित समजला आहात तर, आपल्या (आपल्या हो आपल्याच कारण आता दलीत-ब्राह्मण युती आहे म्हणे) मायावती मॅडमच्या भाषेत मनुवादी) "स्वतंत्र भारताला" ६० वर्षे झाली तरी जग जेवढे आमुलाग्र बदलले, तितकी बदलली नाही. तुम्हीच सांगा चालीरीती, कूळाचार, सण, समारंभ, उत्सव, समजूती, रोटी-बेटी ई. व्यवहार आमुलाग्र बदलले आहेत का बर्‍यापैकी जैसे थे न्यायाने तसेच चालत आले आहेत. चला आमुलाग्र काही बदलले असतील पण त्याला प्रचंड कालावधी लागला आहे. भारतीय समाजाने शर्यत नेहमीच गोगलगायीच्या, कासवाच्या गतीच्या गटात ठेवली आहे. (आजपण जर का चीन सारखे धोरण ठेवले तर अजूनही विकासदर वाढू शकतो. योग्य नियोजनाने लवकर गरीबी हटाव होऊ शकते. पण आपल्याकडे सरकार् दरबारी अजुनही दिरंगाई होते. कळत पण वळत नाही.)

उगाचच गुर्‍हाळ लावले / शिळोप्याचा प्रकार आहे (माझ्या खरडवहीत तुम्ही तसे लिहले आहे.) असे आपल्याला वाटत असेल, मला नाही तस वाटत.
>>कोलंबस जर चुकला नसता आणि खरेच भारतात आला असता तर आज आपण कसे असतो?
ह्या विषयाला धरूनच माझी मते आहेत. मला नाही वाटत फक्त "भारतीय आणि परकिय यांच्यात तुलना चालु आहे" तो चर्चेतील एक भाग आहे. मान्य आहे की माझा प्रतिसाद तुमच्या "सुदैवाने भारतीय मानसात ( मानस) क्रोर्याचा मागोवा अथवा प्रभाव कमी असल्यामुळे रासवट म्हणता येईल असे घडले नाही." ह्या वाक्याने फटकन बाहेर आला. पण नक्कीच एकंदर सबंधीत विषयाला धरुनच आहे.

>>जगात अपप्रवृत्ती आहेतच पण चांगल्या गोष्टीही आहेत आणि चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा अथवा अनुकरण करायला हवे.

ह्या फोलोसॉफीची / टीपणीची इथे का गरज असे मी नाही विचारणार. माझा "गर्व" उतरला कि समजेल मला बहूतेक ;-)

-------------------------------------------------------------------------
कृपया यापुढे माझ्याशी बोलताना कोणी जात, धर्म इ. घेऊन वैयक्तिक बोलू नका. वर मी केलेला खरडवही / जात उल्लेख ह्या अनुषंगाने आहे. मला "भारतीय", फारतर मराठी भाषा येणारा अशी / इतकी ओळख पुरेशी वाटते.

ओझे.

प्रिय सहजराव,

मी जातीयवादी नाही अथवा याचा पुरस्कारही करण्याचे माझ्या मनात येत नाही.

आता प्रश्न असा येतो की आपण काय करावे? समजा मी दलित असतो तर काय केले असते? मी मुस्लिम असतो तर काय केले असते आणि अर्थातच मी जहाल हिंदुवादी असतो तर काय केले असते?

मी कोणत्याही जातीचा असलो तर उच्चतम शिक्षण घ्यायला हवे असे मला वाटते आणि आपल्या नातेवाईकांनाही तसे उत्तेजन दिले असते.

दुसरा प्रश्न आपले लक्ष वर्तमानकाळात हवे की भविष्यकाळात हवे? एक ज्येष्ठ म्हणून मी सल्ला देईल की भविष्यकाळाचा वेध घ्या, सर्वच प्रश्न सुटतील.

आता काही अवांतर, काल / परवाच मी एका पुस्तक प्रकाशन समांरभात गेलो होतो, तेथे भिमराव अगस्थी नावाचे एका कार्यकर्त्याचे मनोगत ऐकले. ( देवदासी / बेरड, रामोशी साठी हे काम करतात). बेरड आणि रामोश्यांची ३७ संस्थाने होती आणि हाच समाज आज गुन्हेगार समाज म्हणून समजला जातो. मी हेच तात्पर्य काढतो की काळाच्या गतीत सर्वांना तितकेच परिश्रम करावे लागते आणि एखादी चुक पुढच्या पीढीना दुर्देवाच्या चक्रात ढकलू शकते.

कृपया माझे म्हणणे बिनचुक आहेच असे मी म्हणणार नाही पण आपल्याला भूतकाळाचे ओझे काय आहे आणि ते कसे फेकायला हवे हे मात्र समजले पाहिजे.

तुमचे म्हणणे मला निरोपाद्वारे, खरडवहीत अथवा येथे येथे समजून घ्यायला नक्किच आवडेल.

आपला,

द्वारकानाथ

 
^ वर