द मशीन स्टॉप्स

आवांतर विषय होता नि वेगळी चर्चा सूरू केली तरीही
धनंजय व त्याची क्षमा मागून,
-------
आत्ता धनंजयाच्या लेखात प्रतिक्रीया वाचतांना
त्याने लिहिलेले
पूर्वजांच्या खांद्यावर चढूनच जगाकडे पाहावे लागेल. स्वतः सारे पाहावे एवढी आपली उंची नाही :)
हे वाक्य वाचले आणी इ. एम. फॉर्स्टर च्या, द मशीन स्टॉप्स या कथेची आठवण झाली. खूप मागे वाचलेली ही कथा, मॅट्रीक्स या चित्रपटाशी खूप मोठे साधर्म्य दाखवूने देते. शिवाय आजच्या ऑटोमेशन व जालावर विसंबणार्‍या पीढीला तर वाचलीच पाहीजे अशी आहे.

कथा अशी,
मानवांनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे यंत्र बनवले. मानवजात या यंत्राच्या पूर्ण आहारी गेली व जगण्यासाठीही हेच सर्व पृथ्वी समावेशक यंत्र आवश्यक होवून बसले. कालौघात यंत्र प्रगत होत गेले व मानवालाच आपल्या इच्छांप्रमाणे वागवायला लागले. शिवाय पृथ्वीवर आता जगण्यासारखे हवामान नाही हे त्या यंत्राने ठसवून दिले. त्याचे ऐकले नाही तर यंत्र बेघर करेल अशी शिक्षा देवू लागले... शिवाय पृथ्वीवर सगळे काही सर्व ठिकाणी सारखेच तयार केले गेले. समान घरे व समान सुवीधा. कुठे जाण्याचे कामच नको.

त्यात एका मानवाला वेगळा विचार सुचला - या यंत्राच्या पलिकडे काय आहे पाहण्याचा! तोवर मुळ घटनेपेक्षा त्या घटनेवरचे इतरांचे विचारच महत्वाचे मानले जावू लागले होते. मग त्या विचारांवर असलेले आपले विचार! त्या वेगळा विचार सुचलेल्या मानवाने अनेक हिकमती लढवत पृष्ठभागावर जावून पाहीले की तो पृष्ठभाग जगण्यालायक आहे.
या बद्दल त्याला शिक्षा देण्याचे ठरण्यात येते. शिवाय हा मानव 'योग्य' विचार करत नाही म्हणून त्याची पुढची पीढी यणार नाही असेही ठरवले जाते. तो हे त्याच्या आईला सांगायचा प्रयत्न करतो. पण आई ते ऐकून घेत नाही व 'यंत्रा पलिकडे' पाहील्या बद्दल दुषणे देते!
पण त्याचा या यंत्रवरचा विश्वास उडतो. यंत्रात बिघाड होवू शकतो हे तो परत आईला सांगतो पण ती ते मान्य करत नाही. पण एक एक खराबी त्या यंत्रात होवू लागते. एक दिवस ते पूर्ण बंद पडते! मानव जात हतबल होवून मृत्युची प्रतिक्षा करते.
तेंव्हा कथा नायक म्हणतो की, मानव जात एक धडा शिकली आशा आहे आता हे यंत्र परत कधी सूरू होणार नाही.
-----

यातला फॉर्स्टर ने रंगवलेला उद्या खूपच इंटरेस्टिंग आहे. शिवाय हे त्याने पन्नास साठ वर्षांपुर्वी केले हे पाहिल्यावर तर गारच व्हायला होते.
मला वाटलेला महत्वाचा भाग या कथेचा भाग असा की धनंजयाच्या चर्चेत 'त्या'ने दिलेल्या पूर्वजांच्या खांद्यावर चढूनच जगाकडे पाहावे लागेल. स्वतः सारे पाहावे एवढी आपली उंची नाही :)

हे विधान त्यातल्या एका पात्राच्या अत्यंत जवळ जाणारे आहे, वाचून या कथेची आठवण झाली. या विधानातच प्रगती अडते असे गुंडोपंतांना वाटते. एकदा कुणाचे तरी म्हणणे प्रमाण मानले, तर ती ही एक अंधश्रद्धाच नाही का? सिद्ध झालेले आहे म्हणून शंकाच घ्यायला नको असे काही नाही.

त्यामुळे किती अव्यवहार्य दिसत असले, वाटले तरीही कोणत्याही 'सेट सिद्धांतांना' प्रश्न तर विचारलेच पाहिजेत, या मताचा मी आहे!
आपल्याला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्सुकतावर्धक

गुंडोपंत आपण सांगीतलेली कथा माहीत नव्हती, पण वाचायला आवडेल. त्या माहीती बद्दल धन्यवाद. या वरून मला एच् जी वेल्सच्या कथे वर काढलेला "टाईम मशीन" हा (जूना, नवीन माहीत नाही) चित्रपट आठवला. यात पण नायक असाच पुढच्या काळात जातो आणि त्याला सर्व माणसे मशिनसारखी वागत जे काही मशिन सांगतोय ते ऐकत असतात असे घेतले आहे. ग्रंथालये ओसाड पडलेली असतात वगैरे...

एकदा कुणाचे तरी म्हणणे प्रमाण मानले, तर ती ही एक अंधश्रद्धाच नाही का? सिद्ध झालेले आहे म्हणून शंकाच घ्यायला नको असे काही नाही.

आपले हे विधान देखील पटले. फक्त त्यात इतकेच अजून सांगावेसे वाटते की झापडे न लावता प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेणे हे गरजेचेच नाही तर आवश्यक आहे पण संशय घेऊन वर्तन मात्र फलदायी वाटत नाही.

मलाही

झापडे न लावता प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेणे हे गरजेचेच नाही तर आवश्यक आहे
हे मान्य!
मलाही संशय म्हणायचा नाहीये.. :)

आपला
गुंडोपंत

विज्ञानकथा

त्यामुळे किती अव्यवहार्य दिसत असले, वाटले तरीही कोणत्याही 'सेट सिद्धांतांना' प्रश्न तर विचारलेच पाहिजेत, या मताचा मी आहे!
आपल्याला काय वाटते?

आम्हाला बी त्येच वाटतयं!

आजच्या विज्ञानकथा हे उद्याचे वास्तव असू शकते असे म्हटले तर वावगे ठरु नये.
प्रकाश घाटपांडे

वास्तव झालेही आहे

आजच्या विज्ञानकथा हे उद्याचे वास्तव असू शकते असे म्हटले तर वावगे ठरु नये.

काही विज्ञान कथा खरंच वास्तव ठरल्या आहेत. (स्पेस ओडीसी का?)
आपली क्रिएटीव्हीटी स्वैर सोडायला काहीच हरकत नाही असे वाटते! :)
आपला
गुंडोपंत

विचार प्रवर्तक कथा

> एकदा कुणाचे तरी म्हणणे प्रमाण मानले, तर ती ही एक अंधश्रद्धाच नाही का?
ज्याचे म्हणणे प्रमाण मानणार त्याची कठोर परीक्षा घेणे भाग आहे. नाहीतर (१) तसे मानून काही तोटा होत असेल तर ती अंधश्रद्धा (२) काहीही तोटा होत नसेल तर तो साहित्यिक आनंद. साहित्यिक आनंद मिळाला तर तसे काही वाईट नाही.

खांदा भक्कम आहे असे बघितल्याशिवाय त्याच्यावर चढू नये. पडायची शक्यता फार. भक्कम आहे असे बघितल्यावर जरूर चढावे, कारण तसे करून त्या उत्तुंग महामानवाला दिसले त्यापेक्षाही दूरवर आपली नजर जाऊ शकते.

रूपक आणखी जास्त चालवायचे म्हणजे असे : नुसते त्या महामानवाने सांगितलेले मानायचे की "दूरवर मला नदी दिसते आहे", तर ती अंधश्रद्धा. त्या महामानवाच्या खांद्यावर चढून नदी तर बघायचीच, नदीपलीकडचे माळरानही बघायचे, हा महामानवाच्या उंचीचा सदुपयोग.

क्या बात है!

त्या महामानवाच्या खांद्यावर चढून नदी तर बघायचीच, नदीपलीकडचे माळरानही बघायचे, हा महामानवाच्या उंचीचा सदुपयोग.

क्या बात है!
सही बोललात!
आपण कथा वाचलीत तर, या कथे मध्ये मात्र त्याचा उपयोग अगदी विरुद्ध बाजूला केला गेला आहे. कोणत्याही 'मूळ विचारापासून परावृत्त' करण्यासाठी म्हणून असे ही म्हणायला हरकत नाही!

आपला
गुंडोपंत

टाइम मशीन

मलाही चटकन टाईम मशीन च आठवला.गुंडोपंत,तुम्ही ओळख करून दिलेली कथा वाचायला आवडेल.
स्वाती

मस्तच.

मस्तच.
संपुर्ण पुस्तक कोठे मिळेल ?

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

रोचक/दुवा

रोचक चर्चा विषय आहे. पूर्वजांनी जे म्हटले आहे ते डोळे झाकून स्वीकारू नये हे खरेच, पण त्यांनी जे शोधण्यात वेळ खर्च केला आहे तेच आपण परत शोधत बसलो तर रिइन्वेंटींग द व्हील होईल असे मला वाटते आणि प्रगती होणार नाही. कथा रोचक आहे आणि विषय मॅट्रीक्स किंवा टर्मिनेटर यांच्याजवळ जाणारा आहे.
द मशीन स्टॉप्स इथे उपलब्ध आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धन्यवाद.

एकदम रोचक व व मस्त कथा.
काही शब्द हे पुरातन काळातील [१०० वर्षामागील आहेत] त्यामुळे वाचताना अडचण येते पण शब्दकोष जवळ ठेवला की वाचणे सोपे जाते ;}

बाकी असाच एक चित्रपट पाहीलेला आठवतो आहे पण नाव लक्षात येत नाही आहे, ज्यामध्ये जो मेन सर्वर असतो तो सगळे आपल्याच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो... मला वाटतं "अन्-नोन् वायरस " असावा..

जरा कथानक बदलले तर टरर्मिनेटर सिरीजची आठवण देखील येते.. हे देखील मस्तच चित्रपट आहेत, माट्रिक्स बद्दल् काय लिहावे मला स्वतःला कमीत कमी ५ वेळा पाहिल्यावर कळाले की काय कथा आहे ती... पण चित्रपटातील स्टंट व ग्राफिक उत्तमच.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

नकोच!

रिइन्वेंटींग द व्हील नकोच हो!

पण तपासूनच पाहू नये हा विचारही योग्य नाही इतकेच! ;))
इतक्या जुन्या काळी लेखाने प्रभावी चित्रण केले होते असे वाटते.
मला या कथेचा जालाशीही संबंध जाणवतो! आपण खूप अवलंबून आहोत या जालावर....
हे फारसे योग्य नाही... पण 'काय योग्य आहे हे' मला माहित नाही हे पण मान्य!

आपला
गुंडोपंत

टर्मिनेटर

ज्यामध्ये जो मेन सर्वर असतो तो सगळे आपल्याच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो

हे टर्मिनेटर ३ मध्ये देखील आहे. स्कायनेट नावाचा सर्वर सेल्फ अवेअर होतो आणि जगाचा विध्वंस करतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

ह्म्म

ह्म्म पण नाही, तो जो चित्रपट आहे त्याचे नाव आहे "नेट" द नेट संदर चित्रपट आहे पहा एकदा.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

हो

स्कायनेट
सर्वर सेल्फ अवेअर होतो आणि जगाचा विध्वंस करतो अर्थात वाचवायला नेहमी प्रमणे जगात फक्त अमेरिकनच असतात! ;))

इथे सगळी क्रिएटीव्हीटी कुठे जाते ते त्या लेखकांनाच माहीत बॉ!

आपला
गुंडोपंत

काय करणार

>जगाचा विध्वंस करतो अर्थात वाचवायला नेहमी प्रमणे जगात फक्त अमेरिकनच असतात! ;))

काय करणार? बनवणारे ते आणि बघणारे आमच्यासारखे वेडे. या वाक्यावरून इंडिपेंडन्स डे आठवला, त्याची सगळी ष्टोरी या एका वाक्यात आहे ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आणी

आणी
या सगळ्यात फक्त त्या प्रेसिडेंटलाच एलियन्स ना काय हवे ते कळते बरं का!
बाकी सगळे माठ असतात हो आमच्या सारखे!

काय पन पावर त्या प्रेसेडेंटची!!! वा!

'विज्ञान कथेतून प्रेसिडेंट ला दैवत्व' देण्याचा इतका अफलातून प्रकार कुठेच पाहिला नाही!
आपले बॉलिवूड चे सिनेमे काय तिन भावांच्या तिन बाटल्या एका आईला लावतात ते काहीच नाही हो या पुढे!

आपला
गुंडोपंत पावरबाज बाटलीवाला

फायटर

सहमत आहे, हा पहा त्यांचा लेटेष्ट फायटर पायलट! :)))

">

यापुढे बिचार्‍या वयोवृद्ध कवीची काय कथा!

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

स्कायनेट

" स्कायनेट सर्वर सेल्फ अवेअर होतो "
ही कल्पनाच किती अचाट आहे नाही, एक मशीन मानवजातीला एकदम मरणाच्या तोडीं पोहचवते ;}

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

सेट सिद्धांत

त्याला आजही मोटर कशी फिरते हे समजत नाही. पुन्हा पुन्हा विचार केला तरीही. पुस्तक वाचले तरीही. शेवटी नाईलाजाने तो पुस्तक बाजूला ठेवतो, (एका वैद्याने (डॉक्टराने) सुचवलेल्या पाकिटातील डोकेदुखीवरच्या गोळ्या (ज्याचे नावही तो लक्षात ठेवू शकत नाही, ज्यात नक्की काय आहे हे त्याला कळणे शक्य नाही) पोटात ढकलून, पंखा चालू करतो व झोपी जातो.)

इथे 'प्रत्यय' येत असल्याने (पंखा, डोकेदुखी थांबणे) तो आधिच कमकुवत असलेल्या मेंदूला ताण देण्याचे टाळतो इतकेच.

इथे खांदा निवडणे महत्वाचे. अन्यथा भोंदू वैद्यासारखा एखादा खांदा तुम्हाला भलतीकडेच पोहोचवेल :)

न्यूटनला वेळ होता, त्यामुळे त्याला हे जमले. 'त्या'ला थोडा अधिक वेळ लागेल, पण न्यूटनने जे केले, ते त्याला जमेलच असे मानण्यात राम नाही.
(त्याला न्यूटनने जे-जे केले ते सारे समजेल असे देखील वाटत नाही :) )

मानवी ज्ञानाने एका मानवी आयुष्यातील ज्ञानार्जनाच्या क्षमता कधीच पार केल्या आहेत असे तो मानतो.

स्वत:चे ज्ञान वाढवण्यासाठी (सवाल पू्छना) वाईट नाही पण खात्री नसल्यास, शक्य तिथे (सवाल उठाना) टाळावे. कसे?

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

सहमत

> पण न्यूटनने जे केले, ते त्याला जमेलच असे मानण्यात राम नाही.

मलाही जमणार नाही. लहानपणी झाडाखाली असताना डोक्यावर भरपूर चिंचा, बोरे पडली ती खाण्यावाचून दुसरे काही जमले नाही ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मर्फी लॉ

"पण न्यूटनने जे केले, ते त्याला जमेलच असे मानण्यात राम नाही."

असाच एक मर्फी लॉ देखील आहे ना ?
"त्यांनी केले म्हणून तु करु शकतोस असे नाही"

जर मर्फी लॉ नसेल तर ह्यांला राजे लॉ समजावा ;}}

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

हे सही!

जर मर्फी लॉ नसेल तर ह्यांला राजे लॉ समजावा ;}}

हे अगदीच सही....

आपला
गुंडोपंत

वा!

मी कथा वाचली नाही. आता प्लॉट समरी वाचतो. मूळ कथा आहे का इंटरनेटवर पूर्ण?

पूर्वजांच्या खांद्यावर चढून जग बघायला मला आवडेल पण मी ते माझ्या डोळ्यांनी बघेन आणि मला हव्या त्या दिशेला बघेन. खांद्याचा उपयोग फक्त चढण्यासाठी.

- राजीव.

हे पण आवडले

पण मी ते माझ्या डोळ्यांनी बघेन आणि मला हव्या त्या दिशेला बघेन. खांद्याचा उपयोग फक्त चढण्यासाठी.

हे आवडले!
विचारात दम आहे!

आपला
गुंडोपंत

मशीन कशी काय स्टॉपस?

गुंड्याभाऊंची गाडी थाबंल्याली माहिती आहे बॉ. पण हे मात्र भलतच् काहीतरी .... :)

विनोदी दिशा मिळाल्याने चर्चा खमंग वाटत आहे.
जेसनाचे "पूर्वजांच्या खांद्यावर चढून जग बघायला मला आवडेल पण मी ते माझ्या डोळ्यांनी बघेन आणि मला हव्या त्या दिशेला बघेन. खांद्याचा उपयोग फक्त चढण्यासाठी."... हे भारी पटले बुवा.

आपला,
(खांदेकरी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

गाडी

गुंड्याभाऊंची गाडी थाबंल्याली नाही हो!
जरा अडखळली आहे.
डॉळेच रडतायेत हो!

आपला
गुंडोपंत

 
^ वर