फुलपाखरू
एक ग्रॅम पर्यंत अचूक वजन करणारे एक इलेक्ट्रॉनिक वजनयंत्र आहे.त्यावर वृत्तचितीच्या आकाराचे (सिलिंड्रिकल ) एक रिकामे काचपात्र आहे.काचपात्रावर गच्च (एअर टाईट ) बसू शकेल असे झाकण आहे.झाकणाला ३ मिमि व्यासाचे एक छिद्र आहे.छिद्रावर चिकट चकती (स्टिकर) बसवून ते हवाबंद केले आहे. या झाकणासह काचपात्राचे वजन ३०० ग्रॅम दिसत आहे.
....चार ग्रॅम वजनाचे एक जिवंत फुलपाखरू भांड्यात घालून झाकण बसवले.फुलपाखराला हवा मिळण्यासाठी छिद्रावरील चिकटचकती काढून झाकणावरच चिकटवली.आता :-
*
(१)फुलपाखरू काचेवर (आतल्या बाजूला) बसले आहे. तर यंत्र किती वजन दाखवील?
*
(२) फुलपाखरू पात्राला कुठेही स्पर्श न करता आत उडत आहे. आता वजनाचे वाचन (रीडिंग ) किती?
*
... छिद्रावर चिकट चकती लावून झाकण हवा बंद केले. आता:-
*
(३) फुलपाखरू काचेवर बसले आहे. यंत्रावर वजन किती दिसेल ?
*
(४) फुलपाखरू कुठेही स्पर्श न करता पत्रात उडत आहे. वजनाचे वाचन किती?
*
....झाकण उघडले. फुलपाखरू बाहेर उडून गेले. आता:-
(५) यंत्रावर किती वजन दिसेल?
Comments
चिकट चकती
छान प्रयोग. चिकट चकतीमुळे कोडे आणखी मजेदार होते.
फुलपाखरू
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याची चार उत्तरे व्यनि. ने आली. दुर्दैवाने त्यांतील एकही उत्तर पूर्ण बरोबर नाही.
फुलपाखरू
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांचा व्यक्तिगत निरोप आला. फुलपाखराच्या वजनासंबंधीची सर्व पाचही उत्तरे त्यांनी अचूक दिली आहेत हे सांगणे नलगे.
या कोड्यातील पाचवा प्रश्न लिहिण्याचे कारण एवढेच की प्रयोग संपल्यावर फुलपाखराला मुक्त केले हे कळावे.
फुलपाखरू: उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
झाकणाचे छिद्र उघडे
(१)फुलपाखरू काचेवरः- वजन साहजिकच वजनयंत्रावर पडणार....म्ह. वाचनः ३०४ ग्रॅम.
*
(२) फुलपाखरू काचपात्रात उडत् आहे : यावेळी फुलपाखराचे वजन संपूर्ण वातावरणाने पेलले आहे. छिद्र उघडे असल्याने आतली बाहेरची सर्व हवा एक आहे.त्यामुळे फुलपाखराच्या वजनाचा परिणाम वजनयंत्रावर पडणार नाही.
.......म्ह. वाचन ३०० ग्रॅमच.
*
झाकणाचे छिद्र बंद
(३) फुलपाखरू काचेवरः........ वजनयंत्राचे वाचनः ३०४ ग्रॅम.
*
(४)फुलपाखरू उडते आहे: आता फुलपाखराचे वजन पात्रातील बंदिस्त हवेनेच पेलले आहे. ती वातावरणाशी जोडलेली नाही.त्यामुळे फुलपाखराचे वजन यंत्रावर पडणार.... ...म्ह. वाचनः
३०४ ग्रॅम.
*
(५) फुलपाखराला मुक्त केले :....वाचन : ३०० ग्रॅम
(येथे लेखनात एक चूक झाली आहे." झाकण उघडले. फुलपाखरू उडून गेले" एवढेच लिहिले आहे. "झाकण पात्रावर बसवले" असे लिहायला हवे होते. श्री तो यांनी ही चूक नेमकी हेरली आणि निदर्शनाला आणली.)
हम्म्
आले लक्षात !!