तर्कक्रीडा :४९: शंबू द्वीप
..... हिंदी महासागरात  अमरद्वीपाशेजारी  शंबू द्वीप  आहे. या बेटावर  गंधर्व, यक्ष आणि किन्नर  अशा  तीनच  धर्मांचे लोक  राहातात..गंधर्व  नेहमी  सत्यच  बोलतात तर  यक्ष  असत्यच बोलतात.किन्नरांविषयी सांगायचे  तर ते कधी खरे  तर  कधी खोटे  बोलतात. किन्नरांच्या  बोलण्याविषयी  निश्चित  नियम  नाही.
......अ,ब   आणि  क हे या  शंबूद्वीपावरील  तीन  पुरुष  आहेत.या तिघांत  एकच  गंधर्व  असून  तो  विवाहित  आहे. इतर  दोघे  अविवाहित  आहेत.या तिघांनी  पुढील  प्रमाणे  विधाने  केलीं  :
बः-- अ सांगतो ते सत्य आहे.
कः-- ब हा किन्नर नाही.
... या तिघांना  परस्परांची  पूर्ण  महिती  आहेच.तरः
  विवाहित  कोण?  अ, ब, की  क ?
तसेच इतर  दोघांचे  धर्म  निश्चित  करा.
******************************************************************
प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या  एका  कोड्यावर  आधारित.
कृपया  उत्तर  व्यनि. ने
********************************************************************
 
          
Comments
उत्तर व्यनिने पाठवले आहे
उत्तर व्यनिने पाठवले आहे. बरोबर आहे का?
जावे त्याच्या वंशा...
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सहज आणि श्री. धनंजय यांची उत्तरे आली. दोन्ही उत्तरे योग्य युक्तिवादासह परिपूर्ण आहेत.ती अचूक आहेतच.
शंबूद्वीप
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
अनु यांनी अ,ब आणि क या तिघांचेही धर्म अचूक ओळखले आहेत. तसेच विवाहित कोण तेही शोधून काढले आहे.
माझे उत्तर
व्य. नि. मधून पाठवले आहे.
बाकी कोडे छान आहे.
आपला,
(कोड्यात पडलेला) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
शंबू द्वीप
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे अचूक उत्तर शोधण्यात श्री. भास्कर केन्डे यशस्वी ठरले आहेत.
शंबूद्वीप
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडाबाई यांनी या कोड्याचे अचूक उत्तर शोधले आहे. अभिनंदन!
शम्बूद्वीपः उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोडे असे आहे: अ,ब आणि क हे या शंबूद्वीपावरील तीन पुरुष आहेत.या तिघांत एकच गंधर्व असून तो विवाहित आहे. इतर दोघे अविवाहित आहेत.या तिघांनी पुढील प्रमाणे विधाने केलीं :
अ:--मी अविवाहित आहे.
बः-- अ सांगतो ते सत्य आहे.
कः-- ब हा किन्नर नाही.
"मी अविवाहित आहे" असे सत्यवचनी गंधर्व म्हणणार नाही. कारण तो विवाहित आहे.
"...,,......,,........" असे असत्यवचनी यक्षही म्हणणार नाही. कारण तो अविवाहित आहे.
म्ह. अ किन्नर. त्याचे वाक्य सत्य.म्ह. ब चे वाक्यही सत्यच.म्ह. ब किन्नर अथवा गंधर्व. 'ब' किन्नर असल्यास क चे वाक्य असत्य ठरते. म्हणजे क गंधर्व नाही असे ठरते. पण एक गंधर्व आहे असे दिले आहे. म्ह.'ब' किन्नर नाही. ब गंधर्वच असला पाहिजे. आता क चे वाक्य सत्य. म्ह.तो यक्ष नव्हे. म्ह. क किन्नर. कारण गंधर्व एकच आहे. यावरूनः
अ: किन्नर. बोलणे खरे.
ब : गंधर्व .(म्ह. तोच विवाहित.)
क : किन्नर. बोलणे खरे.
उत्तर एकमेवच आहे.