मास्तरांची छडी
अशातच बातमी वाचायला मिळाली की मुलांचा शारिरिक वा मानसिक आघात (छळ) करून शिक्षा देणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. एक पालक म्हणून मला या कायद्याचा आनंदच होत आहे. त्यानुषंगाने हा चर्चा प्रस्ताव मांडत मी माझ्या भावना सांगतो आहे...
मला वाटतं "छडी लागे छम-छम" ही म्हण तयार करणारा कोणी तरी मारकुटा मास्तर वा दुष्ट व्यक्ति असावा. तो जो कोण आहे ना त्याला एकदा भेटायचय. कोवळ्या हातांवरच नव्हे तर मनावर देखील आघात करुन विद्या कशी प्रदान करणार आणि छडी न मारता का नको ते मला त्याला विचारयचय. आणि त्याच्या ह्या म्हणीमुळे कित्येक विकृत मास्तरांनी कोवळ्या बालमनावर केलेल्या अत्याचारांचा सुद्धा जाब विचारयचाय.
हेच पहा ना, आज गप्पा मारत असताना सौ.ने तिच्या लहाणपणी त्यांना असणाया एका मारकुट्या मास्तराच्या आठवणी सांगितल्या. तो मास्तर (हो, मला गुरुंबद्दल निंतात आदर आहे तरी सुद्धा अशा विकृत माणसाला मी जास्तीत जास्त एकेरीच संबोधू शकतो)... तर तो मास्तर मुलांना म्हणे चूक विधाने सांगून ते चूक आहेत की बरोबर ते विचारायचा. मुलांनी ते चूक आहे असे म्हटले तर "शहाण्या, माझे विधान चूक आहे असे म्हणतोस का" असे म्हणून बदडायचा आणि भितीपोटी बरोबर आहे असे म्हटल्यावर "गाढवा, येवढे येत नाही का" असे म्हणून हात/छडी मोकळी करायचा. या अशा राक्षसाच्या छडीने कसली विद्या मिळणार हो मुलांना?
आमचा असाच एक मास्तर होता. माझ्या वडील आणि अजोबांप्रमाणे मी पण कपाळावर गंध लावायचो. तो मास्तर मला "टिळ्या"म्हणूनच संबोधायचा व काहीतरी कारण काढून बदडायचा. त्याची तासिका म्हटले की माझ्या पोटात भितीचा गोळा यायचा. पुढे महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर कळले की तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता व त्याला हिंदूत्वाच्या कोणत्याही धार्मिक चिन्हांचा राग असायचा. म्हणून मी त्याच्या घरी जाऊन त्याची खातरजमा करायचे ठरवले. घर त्याच्या पत्नीने उघडले आणि काय चमत्कार, तिच्या कपाळावर टिकली अन गळ्यात मंगळसुत्र होते अन खोलित माओचे चित्र! अर्थात, त्या दिवशी तो मास्तर घरी नसल्याने वाचाला. नाही तर माझ्यातल्या तरुण रक्ताने त्याच्या एक-एक गुद्द्याचा हिशोब घेतला असता तर नवल नव्हते.
तर अशा या रक्षसी मास्तरांना कायद्याने आडवले जात असेल तर स्वागतर्हच नव्हे का? माझा या नवीन कायद्याला पूर्ण पाठिंबा आहे.
आता काही जण म्हणतील की मग मुलांना घडवायचे कसे, संस्कार करायचे कसे? तर मुलांना संस्कार करण्यासाठी मार द्यायची गरज नाही असे सर्व शिक्षण-तद्न्य सांगतात. मुलांना त्यांच्या भावना (राग, आनंद, वगैरे) व्यक्त करायला शिकवण्यासाठी, त्यांच्यातील तंटे सामोपचाराने आपापसांत कसे सोडवायचे हे शिकवण्यासाठी अनेक खेळांचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच शिस्त, सर्वांचा आदर, एकमेकांशी प्रेमाने वागणे, इत्यादि शिकवन्यासाठी छडीने नव्हे तर मुलांच्या मनात शिरुन शिकवावे लागते. आणि म्हणूनच मला वाटते की प्रत्येकाचा आवडता/ती शिक्षक/शिक्षिका हे मारकुटे नसतात. तेव्हा या मारकुट्या धेंडांचा बंदोबस्त होणे चांगलेच.
Comments
हं
आमच्या गुंडोपंताचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांची प्रतिक्रीया येऊ देत आधी. :-)
जिव्हाळ्याचा विषय
सहजराव,
गुंडोपंतांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हे त्यांच्या प्रतिसादातून हधाखवले हो त्यांनी. आपला आणि त्यांचा सुद्धा बराच जिव्हाळा दिसतोय? नाही, आपण त्यांच्या मनातले ओळखलेत म्हणून विचाततोय? :)
आपला,
भास्कर
सहजराव
बराच काळ जालावर एक्त्रच असल्याने
सहजराव गुंडोपंतांचे चांगले मित्र हळूहळू बनून गेले.
हल्ली तर त्यांचे नाव लिस्टमध्ये सहजतेने दिसले नाही तर चुकल्यासारखेच वाटते. :)
शिवाय सहजरावांची लेखणी आपण सध्या अनुभवता आहातच. त्यामुळे गुंडोपंत त्यांचे फॅनही आहेत.
त्यांनी अनेकदा "अति-भयंकर माहीतीपुर्ण वातावरणातून" गुंडोपंताना बाहेर काढून वेळोवेळी शुद्धीवर आणायला मदतही केली आहे! ;))
वरील कारणांमुळे जिव्हाळा वाढत गेला...
आपला
गुंडोपंत जिव्हाळे
आर्दश शिक्षक
गुंडोपंत बर्याचदा स्वतःला साधे समजत असले तरी त्यांचे वाचन, माहीती अफाट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जुन्या तसेच नवीन विषयांची त्यांना माहीती असते. तसेच माहीती नसलेल्या विषयांबद्दल कुतूहल आहे व ते सतत आपले ज्ञान "अप-टू-डेट"करत असतात.
प्रत्येक नविन आलेल्या सदस्याची विचारपूस करतात. त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देतात. (आता हे चांगले की वाईट वादाचा मुद्दा होऊ शकतो कारण अगदीच काहीच्या बाही लिहणारा जर त्यांच्या प्रोत्साहनाने इथे कळाफलक बडवत सुटला तर ....) तर सांगायचा मुद्दा त्यांच्यामुळेच तर मी तुम्हा महान लोकांसमोर माझ्या पणत्या, फटाके लावायला लागलो आहे. (त्यामुळे गुंडोपंताना धन्यवाद की दुषणे द्यायची हा ज्याच्या त्याचा प्रश्र.)
इतर शिक्षक वर्गात डस्टर, पट्टीने मारतात व मुले त्या दोन शस्त्रांना भिऊन असतात पण आमचे गुंडोपंत डस्टरला "मामा" व पट्टीला "मावशी" म्हणतात व भेदरलेल्या मुलांना त्या आयुधांपासून एकदम निर्धास्त करतात. (मामा, मावशी भाचरांचे लाड करतात ना! ट्युब पेटली नसल्यास खुलासा )
असे गुंडोपंत आमचे आर्दश व आवडते शिक्षक आहेत.
दुसर्या दिवशी
तर तो मास्तर मुलांना म्हणे चूक विधाने सांगून ते चूक आहेत की बरोबर ते विचारायचा. मुलांनी ते चूक आहे असे म्हटले तर "शहाण्या, माझे विधान चूक आहे असे म्हणतोस का" असे म्हणून बदडायचा आणि भितीपोटी बरोबर आहे असे म्हटल्यावर "गाढवा, येवढे येत नाही का" असे म्हणून हात/छडी मोकळी करायचा.
छे! काय हा क्रूर माणूस आहे हो!
याला कोणी बाप कसा भेटला नाही?
हा तर मुलांची विचारशक्तीच बंद करण्याचा उद्योग आहे. मी तर म्हणेन याची पेंशन देतांनाही याला दर महिन्याला असेच प्रश्न विचारावेत नि अशाच एका रुपयाला एक छड्या द्याव्यात!
त्या दिवशी तो मास्तर घरी नसल्याने वाचाला. नाही तर माझ्यातल्या तरुण रक्ताने त्याच्या एक-एक गुद्द्याचा हिशोब घेतला असता तर नवल नव्हते.
कशाला सोडला? दुसर्या दिवशी जावून धुवायचा!
अजुनही वेळ गेलेली नाही... शीडीवर जायच्या आधी दोन वाजवता आल्या तर पहा!
तर अशा या रक्षसी मास्तरांना कायद्याने आडवले जात असेल तर स्वागतर्हच नव्हे का? माझा या नवीन कायद्याला पूर्ण पाठिंबा आहे.
माझाही संपुर्ण आहे हो!
इत्यादि शिकवन्यासाठी छडीने नव्हे तर मुलांच्या मनात शिरुन शिकवावे लागते
हेच तर मी म्हणतो... पण हे मास्तरे बी एड ट्रेनींगच्या वेळी बाहेर बीड्या ओढत बसली असणार!
तेव्हा या मारकुट्या धेंडांचा बंदोबस्त होणे चांगलेच.
१०१% मान्य!
बाकी आपल्या प्रस्तावाशी सहमत आहेच
आपला
गुंडोपंत
गुंडोपंत
श्री. गुंडोपंत,
आपल्या पाठिंब्याने बळ वाढले बघा. गावी गेल्यावर बघतो सापडतो का तो मास्तर. सापडला तर मला सुद्धा शिडीवर चढताना कही राहून गेल्याची हुरहुर मनात राहणार नाही.
आपला,
(मानवतावादी) भास्कर
कोर्डे साहेबांचा लेख
उपक्रमवरील मागील काही दिवसांचे संचित वाचत असताना कोर्डे साहेबांचा याच विषयावरील अभ्यापूर्ण व मुद्देसूद लेख/चर्चाप्रस्ताबव वाचायला मिळाला. एवढी चांगली चर्चा सुरु असताना हा चर्चा प्रस्ताव अप्रस्तूत वाटतो आहे.
उपक्रमरावांना विनंती - जमल्यास हा चर्चा प्रस्ताव कोर्डे साहेबांच्या मूळ चर्चेस जोडावा.