मराठीत गुटेनबर्ग?

internet च्या नियमित प्रवाशांना प्रोजेक्ट गुटेनबर्गबद्दल माहिती असेलच. जुन्या पुस्तकांचे digital रुपांतर करून त्यांचा उत्तम संग्रह करण्याचा हा प्रकल्प निश्चितच स्पृहणीय आहे. ज्या जुन्या पुस्तकांच्या copyright चा कालावधी संपलेला आहे, अशी हजारो पुस्तके वाचकांसाठी (पूर्णतः फुकटात!) उपलब्ध आहेत. त्यांत इंग्रजी पुस्तकांची संख्या सर्वाधिक असली तरी, फ्रेंच, स्पॅनिश, ग्रीक इत्यादी भाषांमधले ग्रंथही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

मराठी पुस्तकांबद्दल म्हणायचे तर या website ची तशी वेगळी शाखा नाही. या website वर काही पुस्तके उपलब्ध आहेत; परंतु त्यापैकी काहिंच्या copyright बद्दल (उदा. कुसुमाग्रजांच्या कविता) मला शंका वाटते.

आपल्यासारख्या नियमित लेखकांनी आणि वाचकांनीसुध्दा पुढाकार घ्यायचे ठरवले तर मराठीतली जुनी ग्रंथसंपदा internet वर आणता येईल. कदाचित अशी सोय अस्तित्त्वात असेलही, मात्र मला त्याची आत्ता तरी कल्पना नाही. आपल्यापैकी सगळ्यांकडेच अशी काही जुनी पुस्तके असतीलच, नाही?

काय म्हणता?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

असेच म्हणतो.

माझाही

मला तर खुप आवडेल असे काही करायला...
शिवाय त्याच पुस्तकांचा "ऑडियो बुक्सचा" प्रोजेक्ट सुरु करायला ही आवडेल!

आपला
गुंडोपंत

माझाही

अहो आम्ही तर अशा प्रस्तावाच्या प्रतिक्षेतच आहोत. झोकून देउन काम करु.
प्रकाश घाटपांडे

पूर्ण पाठिंबा, थोडेफार कामही करीन

१००% वापर करणार. बारीकसारीक कामाची मदत करू शकलो तर तीही जरूर करीन.

कॉपीराइट कायदा

पुस्तकांच्या/साहित्याच्या बाबतीत नक्की काय आहे? (अमेरिकेत आहे तोच भारतात आहे का? आणि भारतात आहे तोच महाराष्ट्रात आहे का?) लेखकाच्या मृत्यूनंतर अमुक वर्षे का प्रकाशनानंतर अमुक वर्षे? आणि ही अशी वर्षे समजा झालेली असली, पण लेखकाच्या घरच्यांचा विरोध असला तर? आणि झालेली नसली, पण त्यांची संमती असली तर? हे नियम ललित साहित्याला वेगळे आणि माहितीपूर्ण/ अभ्यास सदरासाठी वेगळे आहेत का?
जाणकारांनी कृपया तपशील पुरवावा. विकी सोर्सवर ऍगाथा ख्रिस्तीची केवळ एक कादंबरी पूर्ण आणि दुसरी अर्धी इतकेच आहे, पुढच्या कादंबर्‍या कधीकधी येतील ते जाणून घेण्याची इच्छा आहे.
(फुकटी!)अनु

प्रोजेक्ट गुटेनबर्ग मराठी?

एखादे वेगळे संकेतस्थळ सुरु करण्यापेक्षा, विकीप्रमाणेच जर मराठी किंवा भारतीय भाषांत प्रोजेक्ट गुटेनबर्ग सुरु झाले तर अधिक चांगले असे वाटते. याचे कारण म्हणजे, सध्याच्या प्रोजेक्ट गुटेनबर्गची जी उपलब्ध चौकट आहे, आणि त्यांना आजवरच्या वाटचालीतून आलेले जे शहाणपण आहे त्याचा बराच फायदा होईल. शिवाय, एखाद्या व्यक्तीवर किंवा लहानशा गटावर अवलंबून न राहता मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होऊ शकतील. सध्या प्रोजेक्ट गुटेनबर्ग ऑस्ट्रेलिया, प्रो. गु. य्रुरोप/फिलीपाईन्स इ. इ. दिसत आहेतच.

अर्थात, कॉपीराईट कायदा-जुनी पुस्तके आऊट ऑफ प्रिंट असणे-मनुष्यबळ-मराठी स्पेलचेक (शुद्धिचिकित्सक) अद्याप बाल्यावस्थेत असणे अशा अनेक संभाव्य अडचणी आहेत. पण एकदा सुरुवात झाली की हळूहळू त्यांचेही निराकरण होईल याची खात्री वाटते.

आय आय आय टी हैद्राबाद

आय आय आय टी हैद्राबाद यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो.

इथे मराठी व इतर भाषांतील बरीच पुस्तके आहेत.

मला वाटते डाउनलोड ची सुविधा नाही आणि वाचण्यासाठीचा इंटरफेस फारसा सुसह्य नाही.

... तर काय बहार येइल!!

इतकी यादी पाहून फार बरं वाटलं आधी.. पण त्यातली बरीचशी पुस्तके उपलब्धच नाहीत :(
आहेत ती पण वाचनीय नाहीत (इंटरफेस फारसा सुसह्य नाही. अगदी मान्य)

इतकी यादी जर खरच वाचनीय स्वरूपात जालावर उपलब्ध झाली तर काय बहार येइल!! माझा पूर्ण पाठिंबा आणि जमेल तश्या मदतीला तयार आहे

स्तुत्य

नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. याला पूर्ण पाठींबा आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माझे शब्द

या संकेतस्थळावर काही अतिशय जुनी पुस्तके (किंमत दिड रुपया - १रु.) प्रकारची स्कॅन करून चढवली होती. त्यातील काही पुस्तके अतिशय वाचनीय होती असे आठवते. ती पुन्हा उपलब्ध होऊ शकतील का हे राजना विचारायला हवे.

माझे शब्द

माझे शब्द ची नवीन जोडणी कार्यरत झाली आहे, सध्या जुनी पुस्तके जुन्या संकेतस्थळावरुन नवीन जागी स्थापन करण्याचे कार्य चालू आहे, लवकरच होइल व माझे शब्द वरील सर्व साहित्य पुन्हा वाचण्यासाठी उपलब्ध होइल.
येथे एक नजर टाका...

माझे शब्द....

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

चांगली सुधारणा

माझे शब्दची सुधारणा पाहून बरं वाटलं. हे स्थळ लवकर कार्यरत होवो. शुभेच्छा!

असेच

म्हणतो. संकेतस्थळ लवकरात लवकर कार्यरत व्हावे यासाठी शुभेच्छा.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माझे शब्द

नमस्कार,

गेल्या तीन महीन्यांच्या अंधकारमय वाटचालीतून आज माझे शब्द पुन्हा आपल्या मार्गी लागले आहे व नवनवीन सोयी तथा सुविधांचा उपयोग करुन हे संकेतस्थळ पहिल्यापेक्षा जास्त वेगवान तथा सुरक्षित झाले आहे, जुन्या माझे शब्द वरील काही पुस्तके येथे सलग्न केलेली आहेत व काही होत आहेत लवकरच आपले ग्रंथालय परिपुर्ण होईल ह्याचा विश्वास आहे मला.

हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी ड्रुपल ह्या प्रणालीची मदत घेतली आहे व आपले मित्र श्री निलकांत ह्यांनी खुप मदत केली आहे, तसेच शांतनू जोशी, नागपुर ह्यांच्या मराठी लेखन सुविधा प्रणालीचा वापर करुन आम्ही माझे शब्द वर मराठी लेखन सुविधा प्रदान केली आहे, येथे ई-पुस्तके सलग्न करण्याची व छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा दिली आहे.

मराठी वाचकांनी आपल्याकडील पुस्तकांची येथे भर घालावी व येथे उपलब्ध असलेल्या साहित्यांचा आनंद घ्यावा ही विनंती, एखादे लेखन / साहित्य आवडल्यावर येथे आपले मत प्रतिसाद रुपात जरुर नोंदवा.

माझे शब्द... ला येथे भेट द्या

राज जैन

*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

मदत करायला आवडेल

मलाही मदत करायला आवडेल. (आणि अर्थातच वापर करायलाही!!!)

श्रीमंत गोपिकाबाई पेशवे

मायबोली/स्कॅनर/विकी

मायबोलीवर पांढर्‍यावरचे काळे की अशाच सदरात प्रथितयश लेखकांच्या कलाकृती आहेत. (जे प्रताधिकाराचे उल्लंघन आहे असे त्याला वाटते.).

इंग्रजीत पुस्तके स्कॅन करून नंतर प्रूफिंग केले जाते. मराठी वाचू शकणारे स्कॅनर नसणे ही अडकाठी ठरू शकेल.

या कायद्यातून बाहेर पडलेल्या कलाकृती (६० वर्षा पूर्वीच्या?) सध्या विकीवर चढवणे पुरेसे ठरावे. विकीचा मुख्य फायदा म्हणजे, एकाच वेळी अनेकांना समांतररित्या काम करणे शक्य आहे.

एक आगाऊ सुचवणी, दर आठवड्याला पुस्तक निवडून त्यातील पाठ/विभाग/खंड वाटून घेऊन पुस्तक आठवड्यात पूर्ण करता येइल का हे पाहावे. (पुस्तक इतक्या जणांकडे उपलब्ध असणे गृहीतक आहे.)

(होतकरूंची संख्या वाढल्यास पाने वाटून पुस्तके काही तासांत पूर्ण होतील!!)

(स्वप्नरंजक) तो

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

चांगली

सूचना चांगली आहे, फक्त पुस्तकांचे सर्वांकडे असणे हीच आडकाठी ठरू शकेल. या बाबतीत शक्य होईल ती मदत करायला तयार आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धन्यवाद!

चांगल्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढला आहे. थोड्याच दिवसांत ठोस प्रस्ताव ठेवीन म्हणतो!

प्रस्ताव

हा प्रस्ताव मी खरं तर आमच्या घाटपांडे साहेबांना दिला होता.
मग वाटले की सगळ्यांनाच हा बघायला काय हरकत आहे?
म्हणून येथे मामूली फेरफार व वैयक्तीक मुद्दे काढून देत आहे.

नमस्कार,
स्कॅनर असेल तर पिडिएफ फॉर्मॅट मध्ये इ पुस्तक जालावर चढवता यावे.
यात दोन प्रकार ठेवता येतील.
१. जालावर वाचण्यालायक (हलकी कमी के बी ची आवृत्ती)
२. प्रींट करण्यालायक (जास्त केबी ची आवृत्ती)

जुनी कालबाह्य पुस्तके उपलब्ध होण्यासाठी हे काम खुप मोठे ठरेल.
आशा आहे काही काळाने मराठी स्कॅन झालेली अक्षरे ओळखणारे तंत्रज्ञान विकसित होईल मग तर युनिकोड मधेच ही पुस्तके आणता येतील तोवर मात्र स्कॅन शिवाय पर्याय दिसत नाही.

मी आपल्याला हवी ती मदत करायला तयार आहे. अगदी स्कॅनर विकत घेण्यासाठी पैसे काँट्रीब्युट करण्यासाठीही. मात्र त्याआधी आपण या प्रोजेक्ट चा
१. कालावधी
२. कोण काय करणार उदा, प्रकल्प सुसुत्रता, उद्याचे तंत्रज्ञान व त्यानुरुप अंमलबजावणी, मुख्य स्कॅनिंग चे काम, स्कॅनींग कसे करावे याचे मार्गदर्शन, युझेबीलिटी वगैरे!
३. काय करू शकेल
४. पुढे धोरण काय
५. एकुण खर्च किती कसा केला पाहिजे?
६. इतर तात्कालीक येवू शकणार्‍या बाबी /अडचणी
७. बदलत्या तंत्रज्ञानचा उपयोग व सातत्य
८. प्रोजेक्ट गटेनबर्गशी नसल्यास बॅक अप म्हणून पुस्तके ठेवायला जालावर कायम स्वरूपी जागा
९. प्रोजेक्ट गटेनबर्गशी संवाद, पत्रव्यवहार, संमती वगैरे बाजू कोण पाहणार
१०. इतर मुद्दे
११. आपलेही विचार

याचा विचार करू.
हे प्लॅनिंग कागदावर पुर्ण करू आणी मग(च) सुरुवात करू.
कसे वाटते?

आपला
गुंडोपंत गटेनबर्ग

स्कॅनिंग

स्कॅनिंग या प्रकारात साठवणक्षमता जास्त लागेल असा (प्राथमिक) अंदाज आहे. शिवाय पुस्तकाच्या कागदाची प्रत, चित्रे इ. चाही मेमरीवर प्रभाव असेल असे वाटते. उदा कदाचित पिवळट पडलेले पुस्तक स्कॅनिंग केल्यास जास्त मेमरी आकाराचे असेल, इ.इ. मला माहिती नाही . हा केवळ अंदाज.)
पुस्तके कॉपीराईट मधून मुक्त असल्याने जगभरात ठराविक इछुकांना एका पानाची संपादनपरवानगी देऊन प्रत्येकाने थोडे थोडे टंकन असे करत पुस्तक पूर्ण करता येईल का?
याने टेक्स्ट फाईल तयार करता येतील. (आणि या टेक्स्टच्या पीडीएफ प्रती कोणाला हव्या असल्यास माफक किंमत आकारुन त्या देता येतील.)
प्रकल्पात जमेल तसा सहभाग देण्याची इच्छा व तयारी आहे.

काळे पांढरे

आपला प्रतिसाद उपयुक्त वाटला.
टेक्स्ट ची कल्पना उत्तम आहे पण मी माझ्या पुरते नक्की म्हणेन की टंकनाचा कंटाळा येतो.
चिवट् पणे बसणे जमतही नाही!

उदा कदाचित पिवळट पडलेले पुस्तक स्कॅनिंग केल्यास जास्त मेमरी आकाराचे असेल

हा काही प्रोब्लेम नाही कारण काळेपांढरे स्कॅनिंग करून हे सोडवता येईल.
रंगित पानांना असेही जास्त जागा लागणारच आहे. शिवाय हल्ली जागा हा प्रॉब्लेम उरला नाहिये तितकासा. :)

पण माझ्या अंदाजाने याहू व गुगल या बुक स्कॅनिंगसाठी वेगळी पद्धत वापरत आहेत. कारण मोठे प्रोजेक्ट्स अशा जुन्या व घरगुती पद्धतीनी नक्कीच चालत नसणार!
हा प्रकल्पही मोठाच आहे. यात नवे - नवीन तंत्राने पुढे जाणेच हीतावह आहे.

सर्किटराव आपल्या प्रतिसादाची यासाठी वाट पाहतो आहे. यातले लेटेस्ट व " आतले तंत्रज्ञान" फक्त तुम्हीच सांगु शकाल.;)
शिवाय मला आठ्वते त्याप्रमाणे याहू चे पुण्यातही एक केंद्र होते. त्यांची मदत उपयोग होवू शकेल.

शिवाय गुगल /याहू मराठी पुस्तकांवरही काम करत आहेत का? करणार आहेत का? या प्रश्नाचाही अंदाज घेतला तर बरे.
याशिवाय अमेरिका किंवा युरोपातल्या कोणत्यातरी विद्यापीठाने हा प्रकल्प आधीच राबवलेला तर नाही ही खात्री करून घेणे महत्वाचे आहे.

आधी ज्यांनी असे प्रकल्प केले आहेत त्यांचा अनुभवही या बाबतीत महत्वाचा आहे. बोका यांनी सांगितलेल्या ठिकाणाशी संपर्क साधायला हवा मग् कळू शकेल.
उगाच रि-वर्क नको व्हायला!!!
शिवाय प्रकल्पाची योग्य ती प्रसिद्धी ही व्हायला हवी यामुळे मदत मिळणे सोपे होत जाते. इतरांचेही रि-वर्क करणे वाचू शकते! :)

आपला
कामाच्या वेळी जमीनीवर घट्टपणे चिकटून बसणारा
गुंडोपंत

लायब्ररी थिंग

लायब्ररी थिंग सारखे काही मराठीत करण्यासाठी काय करावे लागेल? होस्टिंग व डोमेन नेम उपलब्ध असेल तर लायब्ररी थिंग सारखे करण्यासाठी काही तयार सॉफ्टवेअर्स, कंटेन्ट मॅनेजमेंट टूल्सची माहिती कोणाला आहे का?
द्रुपल-वर्डप्रेस द्वारे हे करणे शक्य आहे पण ते फार किचकट होईल.


आम्हाला येथे भेट द्या.

दोन पुस्तके

मला वाटत आपण नुसतीच चर्चा करण्या पेक्षा दोन पुस्तके तयार करायची आहेत. ती कशी करावीत? यावर काम सुरू करु, एक स्कॅन पी डी एफ आणि एक टाइप केलेले टेक्स्ट फाइल. फार मोठे ध्येय न ठेवता सहज साध्य ध्येय ठेवता येइल जसे कि, नुकत्याच गणेशोत्सव काळात वर्तमान पत्रासोबत आलेले आरतींचे पुस्तक अस्थवा म्हणींचे संकलन. अर्थात या कल्पना आहेत. सगळे मिळुन एखादा प्रयोग करायला काहिच हरकत नाही.





मराठीत लिहा. वापरा.

म्हणी..

म्हणींची एक यादी इथे आहे. त्यात भर घालणे देखील पुरेसे ठरावे. म्हणी खास असतील (जुन्या/कालबाह्य/अपरिचित) तर वेगळे पान सुरू करून देता येऊ शकेल.

मराठी पुस्तके इथे देता येतील.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

माझी मदत

टंकलेखनाकरिता देऊ करत आहे.
माझा टंकलेखनाचा वेग भरपूर आहे (मराठीसाठी तसा कमी आहे, विचार करत करत टंकावे लागते) आणि सध्या वेळ देखिल काढू शकेन असे दिसते. (माझ्याकडे स्कॅनर नाही)

मराठी ओ सी आर

स्कॅन करुन देवनागरी फॉन्टमध्ये रुपांतर करण्यासाठी http://www.cdac.in/HTmL/GIsT/down/chtri_d.asp या पत्त्यावरून चित्रांकन नावाचे सॉफ्टवेअर उतरवून घ्या. खुप चांगले नाही पण् बर्‍यापैकी रुपांतर् करता येते. मी या प्रोजेक्ट मध्ये स्कॅन करुन देण्याची मदत करू शकतो. कॉपीराइट कायद्याची नीट माहिती कळवावी.

विकीसमरीज्

विकीसमरीज ला भेट द्या.

इथे प्रताधिकाराच्या कचाटयात न सापडता, मराठी पुस्तकांबद्दलची माहिती व त्यांचा गोषवारा देणे शक्य आहे. लेखनासाठी नावनोंदणी आवश्यक असली तरी किचकट नाही. लेखन व इतर सोयी विकीपीडियाप्रमाणेच आहेत.

आवश्यकता वाटल्यास उपक्रमासाठी स्वतंत्र नाव नोंदणी करून हेच खाते अनेकांना वापरता येईल.

 
^ वर