सोन्याचांदीची मासोली! :)
राम राम मंडळी,
या पूर्वी आम्ही येथे 'बोंबिल' या लोकप्रिय माश्याबद्दल माहिती संकलीत करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे आमचा उत्साह दुणावला. बोंबलानंतर आम्ही आता येथे 'मांदेली' या विलक्षण चविष्ट माश्याबद्दल माहिती संकलीत करण्याचा प्रयत्न करत आहोत...
आज सकाळीच आम्ही आमच्या लाडक्या कोळणीकडून थोडीशी मांदेली खरेदी केली आणि आम्हाला हा चर्चाप्रस्ताव सुचला. छानशी रविवारची दुपार चवीचवीने मांदेली खाण्यात आणि तिच्याबद्दल माहिती वाचण्यात जाईल असे वाटते! :) ही पाहा आज सकाळीच खरेदी केलेली सोन्याचांदीसारखी चमचमणारी मांदेली - :)
तर मंडळी, आपल्याला या माश्याबद्दल, याच्या जातीबद्दल/प्रकाराबद्दल, कुठकुठल्या समुद्रकिनार्यावर ही गावते, हिची पाककृती कोणकोणत्या पद्धतीने करतात याबद्दल काही माहिती असल्यास ती माहिती अवश्य येथे द्यावी, ही विनंती! आमच्या वैयक्तिक मतानुसार हा मासा अत्यंत चविष्ट लागतो.
महाराष्ट्रातील सर्व समुद्रकिनार्यांवर हा मासा विपुलतेने आढळतो असे वाटते. याला विंग्रजी भाषेत काय म्हणतात हे आम्हाला ठाऊक नाही, त्यामुळे विंग्रजी विकीवर आम्हाला ह्या मत्स्यप्रकाराची माहिती मिळाली नाही. परंतु मराठी विकीवर मात्र आम्ही 'मांदेली' हे पान सुरू केले आहे. आपणही सर्वांनी त्यात माहितीपूर्ण भर घालावी ही विनंती. बाह्यदुवा म्हणून आम्ही उपक्रमवरील ह्या लेखाचा दुवा मराठी विकिवरील मांदेलीच्या पानावर देणार आहोत.
असो,
आपला,
(मांदेलीप्रेमी कोकणस्थ) तात्या कोळी.
Comments
सहज आठवले
आमच्याकडे माझा मित्र व फॅमीली जेवायला आले होते, तेव्हा असेच मासे मस्त तळून एकाशेजारी एक, एका मोठ्या सर्व्हींग थाळीमधे होते. माझ्या मित्राची छोटी मुलगी (३ वर्षे) ते बघून म्हणाली "ओह् फिश झोपलेयत का, गाई गाई म्हणून् तिने हलकेच थोपटले आणी बाहेरच्या खोलीत गेली." असे मासे दिसले की मला तो प्रसंग आठवतो. :-)
वा
मांदेली हा मला मनापासून आवडणारा एकमेव मासा आहे. लहानपणी त्यांचा रंग आवडत असल्यामुळे मी हट्ट करून घ्यायला लावायचे आणि घरी आल्यावर पाण्यात ठेवून खेळायचे. नंतर खायचे मात्र नाही. थोडी मोठी झाल्यावर मात्र मी मांदेली खाऊ लागले.
आमच्याकडे मांदेलीची तुकडी केली जाते. ती तर मला आवडतेच पण गावी गेल्यावर वहिनीच्या हातची कालवणातली मांदेली खायलाही फार मजा येते. गावी कधी न कळवता टपकले तर झाडून सगळे भाऊ भेटल्या भेटल्या "अगं येणार हे कळवलं नाहीस! आता धक्क्यावरूनच आलो, येताना मांदेली आणली असती" असं ऐकवतात आणि मग पुढचे २ दिवस सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या वहिनीच्या हातची मांदेली खाण्यात जातात.
असो. मांदेली बद्दल काही माहिती देऊ शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व!
राधिका
वा वा
मासे खाण्यात करलीचा टप्पा पार केल्यावर भाजलेली अख्खी मांदेली काट्यासकट खाण्याचा पराक्रम करुन दाखवणे ही लहानपणी माझ्या दृष्टीने पुढची यत्ता होती. दळवींच्या भाषेत सांगायचं तर 'बरा दबदबीतसा' कालवण आणि भाजलेली अशा दोन्ही प्रकारात मांदेली छान लागते. पापलेट-हलवा-सुरमई-बांगडा या मोठ्या माशांमुळे कोकणासारखाच मांदेलीच्या लोकप्रियतेत अनुशेष जाणवतो. त्यामुळे रविवारच्या जेवणासाठी पापलेटबरोबर, एखाद्या दुय्यम नायिकेप्रमाणे मांदेलीचा एखादा वाटा घेणारेच अधिक. अर्थात, बर्याचदा हा साईडरोलच अधिक भावखाऊ निघतो, ही बाब अलाहिदा. :)
बाकी. मांदेलीबद्दल गूगलल्यावर हा माहितीपूर्ण दुवा मिळाला. http://www.fishbase.org/Summary/SpeciesSummary.php?id=625
एक, ताजी फडफडीत मांदेली कशी ओळखायची याच्या टिप्स सोडल्या, तर इतर उपयोगी माहिती या दुव्यावर आहे :)
मांदेली आणि इतर माशांची शास्त्रीय नावे येथे सापडतील -
http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/gen_fish.html
पापलेटाचा ष्टांप! :)
नंदनशेठ,
तू दिलेला फिशबेसचा दुवा छानच आहे आणि माहितीपूर्णही आहे. ह्या दुव्यावरची माहिती चाळत असताना मला चक्क पापलेटाचा ष्टांप सापडला! :)
हा ष्टांप कुवेतमधला आहे..
असो..
आपला,
(पोष्ट्या) तात्या.
ओऍसिस
वाळवंटातल्या ओऍसिसचे उत्तम उदाहरण :)
चमचम सोनेरी
मासोळी मांदेली ही माझी सर्वात प्रिय मासोळी नाही याचे कारण सांगण्याची गरज नाही. अर्थात, याचा अर्थ मला ती आवडत नाही असा नाही. आवडतेच. आमच्या घरात नुसती मांदेली आणलेली आठवत नाही. मांदेली आली की सोबत बोंबिल हमखास येतात. :) हे कारणही मांदेली आवडण्यास पुरेसे आहे. :))
चुलतमांदेली
स्पॅनिश अँचोव्ही ही मांदेलीची चुलतबहीण. पूर्वी नाही पण आता तिचे लोणचे (हे अमेरिकेत मिळते, युरोपातही मिळत असणारच) आवडायला लागले आहे. पिझ्झावरती हे लोणचे "आवडते" आणि "आवडत नाही" असे खाद्यधर्मीयांचे दोन कट्टर विरोधी पंथ आहे. गेली काही वर्षे मी अँचोव्ही वाद्यांच्या बाजूला पंथांतर केले आहे.
अवांतर : गोव्यात कोलंबीचे न शिजवता लिंबाच्या रसात घातलेले ताजे लोणचे खाल्ले होते. कालच एके ठिकाणी "ट्यूना" मासळीचे असे ताजे लोणचे खाल्ले. असा प्रकार कोकणातही कोलंबीवेगळ्या मासळीचा करतात का? मांदेलीचे चांगले लागेल असा माझा कयास आहे.
खाण्याच्या सवयी बद्दल
तात्या,
आम्ही मासळी खात नाही मात्र आपला माहितीपूर्ण लेख (तसेच प्रतिसाद सुद्धा) चविने वाचले. आणखी असेच येऊ द्या. आम्ही खाणे जमले नाही तरी वाचन करायला मात्र आहोत.
कोणास ठाऊक, मासळींच्या वासामुळे माझा त्यांच्याबद्दल पूर्वगृहदुषित दृष्टीकोण बनला आहे. त्यामुळे काधि मासळी खाण्याची इच्छाच होत नाही. तुमच्यापैकी कोणी माझ्यासारख्यांच्या गटातून खवैय्या गटात गेले आहे का? जर असेल तर त्या बदलांबद्दल सांगू शकाल का? तसेच कोणी प्रत्न कराताना मघार घेतली असेल तरीही तसे का झाले हे सांगावे.
आणि हो, जर तुमच्या माहितीमुळे मी व माझ्यासारखे अनेक मासळी खावू लागलो अन भाव वाढला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल.
उपाय
मासळींच्या वासामुळे माझा त्यांच्याबद्दल पूर्वगृहदुषित दृष्टीकोण बनला आहे.
यावर उपाय दोनच.
१. ताजी मासळी खाणे.
२. सुगरण लोकांनी बनवलेली मासळी खाऊन बघणे.
मुरुड-जंजिरा किंवा अगदी हर्णे मुरुडमध्ये पूर्वी बाजारात जाऊन खरेदी केलेल्या ताज्या ताज्या मासळीला दुर्गंध मुळीच येत् नाही.
ताजी मासळी
एकदा ताजी मासळी खाण्याचा योग आला होता. आमच्या मित्राच्या घरी जिताडा केला होता. पण मला जमला नाही.
युक्त्या
मलाही आधी माशांच्या वासामुळे मासे खायला नकोसे वाटत असे. पण मासे खायला चांगले तर लागतात त्यामुळे मी पुढील युक्त्या योजल्या.
१- आई/बाबांबरोबर मासळीबाजारात जाणे बंद केले.
२- आईने मासे साफ करायला घेतले की माझे गाठोडे उचलून दुसर्या खोलीत पळून जायला लागले.
:ड्
३- मांदेली आणि कोलंबी सारखे मासे शिजवल्यावर त्यांना वास येत नाही असा माझा अनुभव आहे. तसा तो येऊ नये म्हणून काही वेगळे केले जात असेल तर कल्पना नाही. पाप्लेट, सुरमई सारख्या माशांना मात्र खातानाही एक वेगळा खार्या पाण्याचा की काय माहित नाही, पण एक बारीकसा वास येतो. पण हा वासही कालवण केल्यास येत नाही, तुकडी तळल्यास मात्र येतो. तो टाळण्याची एक सोपी युक्ती म्हणजे तुकडीच्या कडांना पातळ असे चंदेरी आवरण/ स्कीन असते. ते हलक्या हातांनी काढून टाकावे.
या युक्त्या उपयोगी पडल्यास कळवावे!
राधिका
मांदेली आणि कोलंबी
राधिका-ताई,
आमच्या घरी मासळी निषिद्ध असल्याने कधि घरात पाहण्यासा प्रसंग येत नाही. पण बाजरात नाही म्हटले तरी माशांचा वास पिछ्छा सोडत नाही.
आपण सांगितल्याप्रमाणे मांदेली वा कोलंबी खाऊन बघायला हरकत नाही. पण त्यासाठी चित्रा ताई म्हणतात तसे चांगल्या स्वयपाक्याच्या हातचे खायला हवे.
केन्डे साहेब,
मास्यांचा वास येतो या प्रकारातले तुम्ही असाल तर मासे आवडीने खाणे तुमच्यासाठी तरी कठीन काम आहे, मात्र तितकेच सोपेही !
प्रश्न क्रमांक १) तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता म्हणजे गोड्या पाण्यातले मासे खावे वाटतात की समुद्री मासे ते ठरविता येईल.
२) मनाची तयारी करा आणि फक्त अगोदर रस्याचा (ग्रेव्ही) आस्वाद घ्या !
३) सुरुवातीला माश्यांचा फ्राय खावा !
४) आणि नंतर रश्यासोबत थोडे पीस खावेत.
५) मासे खाल्ल्यानंतर डोक्याचे केस पांढरे होत नाहीत असे म्हणतात :) तसेच ते आरोग्यास लाभदायक असतात, असे म्हणून प्रयोग करण्यास हरकत नाही कारण आरोग्याचा फायदा होत असेल तर माणूस काहीही पचविण्यास तयार असतो असे वाटते ! :)
अवांतर ;) आम्हाला गोड्या पाण्यातला राहू हा मासा (रोहू) तसेच वामट हा प्रकार फाय म्हणून आणि ग्रेव्ही सोबत खाण्यात स्वर्गीय आनंद मिळतो !
छान सल्ले
डॉक्टरसाहेब, आपण चांगले सल्ले दिले आहेत. मदत होईल असे वाटते...
तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता म्हणजे गोड्या पाण्यातले मासे खावे वाटतात की समुद्री मासे ते ठरविता येईल.
भारतात असल्यावर पुण्या-मुंबईतच असतो. पण हल्ली इथे परदेशात सुद्धा कोलंबी मिळतात असे मराठी मित्रांचे म्हणने आहे.
मासे खाल्ल्यानंतर डोक्याचे केस पांढरे होत नाहीत असे म्हणतात :) तसेच ते आरोग्यास लाभदायक असतात, असे म्हणून प्रयोग करण्यास हरकत नाही कारण आरोग्याचा फायदा होत असेल तर माणूस काहीही पचविण्यास तयार असतो असे वाटते ! :)
अगदी खरे. आमच्या वडिलांचे केस गळालेले होते ते पाहून एक स्नेही मला म्हणाले की तू शिरसासन दररोज कर नाहीतर तुझे सुद्धा असेच होणार आहे. महिनोन-महिने न जमलेले शिरसासन दुसया दिवशीपासूनच जमायला लागले. आता केस तर भरपूर आहेत पण एखासा मध्येच पांढरा पडू पहात आहे. तेव्हा माशांनो मदतीला या रे बाबांनो.
इतर काही
फोडी भाजण्यापूर्वी किंवा आमटी करण्याआधी तिखट, आलं-लसणाची पेस्ट लावून बराच वेळ मुरवत (मॅरिनेट) केल्यास वास बर्याच अंशी कमी होईल. दुसरा उपाय म्हणजे आधी फोडींना मीठ लावून काही काळ बाजूस ठेवणे. जराशा पाण्यात हिंग विरघळवून, त्यात तिखट - मीठ घालून या मिश्रणात फोडी ठेवल्या तरीही वास कमी येतो अशी ऐकीव माहिती आहे.
बापरे...
तुमचे सगळ्यांचे मासळी या विषयावरचे नॉलेज अगाध आहे.. मी पामर माझे अद्न्यान् पाजळत नाही.
पण आपण सगळ्या खवय्ये लोकांनी सांगितलेली माहिती नक्किच माझ्या उपयोगी पडेल...
तात्या, हा विषय इथे आणल्याबद्दल धन्यवाद..
आपली (मासे विषयात "ढ")
प्राजु