''मराठी साहित्यातील स्त्रीवाद ''

स्त्रीवरील अन्याय हा सनातन विषय आहे.स्त्री परिवारात वेगवेगळ्या भुमिकेत दिसते.मानवाच्या इतिहासात स्त्रीयांचे दु:ख विश्वात सर्वदुर दिसते.पण भारतीय स्त्रीवरील,अन्याय,विषमता,आणि गुलामगिरीच्या बाबतीत भारतीय त्या विषयांची निंदा करतात आणि त्याच वेळी नैतिक समर्थन येथे करतांना दिसतात त्याबाबतीत आपल्या भारतीय स्त्रीयांची स्थिती तर फारच भयानक अशी होती.

भारतीय स्वातंत्र्यानंतर १९७५ साली युनो ने ते वर्ष स्त्री मुक्ती वर्ष म्हणून साजरे करावयाचे ठरवले,सर्व सदस्य देशांना युनोने पत्र पाठवून विचारले की,तुमच्या देशातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे,याचा अहवाल आमच्याकडे पाठवा.भारताच्या समाज कल्याण
( आता सामाजिक न्याय विभाग) खात्याकडेही असे पत्र आले.तेव्हा असे लक्षात आले की,समाज कल्याण खात्यात दलित,युवक,अदिवासी,असे निरनिराळे विभाग होते,पण स्त्रीयांच्या बाबतीत स्वतंत्र असा कोणताही विभाग नव्हता.पुढे हे पत्र या विभागातून त्या विभागात फिरत राहिले.शेवटी समाज कल्याण खात्यातल्या श्रीमती फुलरेणू गुहा यांच्या अध्येक्षेतेखाली एक समिती नेमली गेली,या समितीने भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीविषयी माहिती गोळा केली.आणि त्या समितीचा अहवाल म्हणजेच "समानतेकडे वाटचाल" या नावाने तो प्रसिध्द झाला, असे वाचनात आहे.

तेव्हाच येथील समाजमनात राजकीय,सामाजिक आकाक्षा,वाढल्या.शिक्षण,आणि लोकशाहीचे,महत्व लोकांना पटू लागल्यामुळे जे वेगवेगळे बदल होऊ लागले,त्यात भारतीय स्रीयांमधेही फार मोठा बदल झाला.भारतीय स्त्रियांच्या बाबतीत भारतीय परंपरेच्या दृष्टीने जी विषमता होती,त्या विषमतेच्या व्यवस्थेमुळे "स्त्रियांच्या मनातील वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला व त्याचे वाड्मयीन रुप म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.

मराठी साहित्यातील स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा पुरुष प्रधान संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान, त्याचाही विचार केला पाहिजे. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहतांना स्त्रीला स्वत्वाची जाणीव तसेच तिच्यावरील अन्यायाची जाणीव होऊन ,स्वत:च्याच अस्मितेसाठी ती संघर्ष करते, मानवतेबद्दल आत्मियता वाटणे याला स्त्रीवाद म्हणता येईल.स्त्रीवादी लेखन केवळ स्त्रीयांनीच करावे असे काही नाही.मराठी साहित्यात तर अनेक पुरुषांनीच स्त्रीयांची दु:खे प्रकट केली आहेत.

भारतीय समाजातील कुटुंब व्यवस्थेमुळे काही अपरिहार्य नाती संबधातून कधी स्त्रीने मोकळा श्वास घेतला तर काही बंधनेही तिच्यावर आली,बंधने मर्यादीत स्वरुपात होती तोपर्यंत ती आनंदीत होती.पण स्त्रियांच्या बाबतीत अतिरिक्त बंधनामुळे,तीचा श्वास गुदमरु लागला.एकत्र कुटुंबप्रमुख सर्व निर्णय घेत,तोपर्यंत सर्व सुरळीत चालू होते,जुन्याकाळच्या संस्कृतीची सवय स्त्रियांनाही झाली होती.या स्त्रीयांना कोणतेही स्वातंत्र्य उपभोगता येत नव्हते.पुढे,स्त्री शिक्षित झाली,अर्थाजन करु लागली.त्यामुळे मालकीची भावना,आणि स्वातंत्र्य, या जाणीवेमुळे,एकत्र कुटुंब पध्द्तीची बंधने तीला नकोसे वाटु लागले, मग कुटुंबे विभक्त झालीया व्यवस्थेतूनही स्त्रीवादाचा जन्म झाला.

विभक्त कुटुंबे काहींना लाभदायक वाटले,पारिवारिक घुसमट संपली,मोकळा श्वास घेता येऊ लागला,पण पुढे अर्थाजनामुळे स्त्री-पुरुष दोघेही घरा बाहेर पडले, आजी, आजोबांना वृध्दाश्रमाची वाट धरावी लागली.मुलांना दारे,खिडक्यांच्या सोबतीमुळे ती भावनिकदृष्टया विकलांग होऊ लागली.मग पारिवारीक संबधात केवळ अर्थकारणच महत्त्वाचे नसते याची जाणीव झाली.भारतीय समाजातील स्त्रीवादाला अशा भावनिक गुंता गुंतीचे अधिष्ठान आहे.त्याचे चित्रच आजच्या मराठी साहित्यातुन दिसून येते.

मराठी साहित्यात अनेक स्त्री, पुरुषांनी स्त्रीवाद रेखाटला आहे, बाबूराव बागूल,पारु मदन नाईक,अनुराधा पाटील ,प्रतिभा अहिरे ,ललिता गादगे, आणि कितीतरी नावे सांगता येतील पण आमचा प्रश्न आहे, तो स्त्रीवाद संपला का ? या युगातील स्त्रीया लिहिताहेत पण त्यांचे लेखनाचे विषय कोणते आहेत ? किंवा अजूनही पुरुषी वर्चस्वामुळे तीचे लेखन मी भली आणि माझी अनुदिनी भली असे आहे का ? आपल्याला काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

टिंगल

उत्तम लेखिका असूनही केवळ पुरुषांनी केलेली टिंगल सहन न झाल्यामुळे, सार्वजनिक संकेतस्थळावर लेखन बंद करणारी स्त्री जेव्हा आम्ही पाहतो , तेव्हा मात्र आम्हाला अजूनही या दशकातील लेखन करणारी स्त्री, वैचारिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्टीनेही फारच मागे आहे असे वाटायला लागते !
आपण 'टिंब टिंब टिंब' या नावाने लेखन करणार्‍या लेखिकेसंबंधी लिहीत असाल तर, प्रचारी स्वरूपाचे आणि समाजसेवकाचा आव आणणारे ते लिखाण, खरोखरीच टिंगल करण्यासारखे होते.
इतर प्रामाणिक लेखिकांची नाही कुणी टिंगल करत?--वाचक्‍नवी

प्रामाणिक लेखिका काय लिहिताहेत !

प्रामाणिक लेखिका काय लिहिताहेत तेही दाखवावे की, टींब टींब इथे लिहीत नाहीत पण स्त्रीयांच्या ज्या काही अनुदिन्या आहेत त्यात सामाजिक आशय असणारी आणि स्त्रीयांच्या दृष्टीने अधिक प्रगल्भ विचार मांडणा-या स्त्रीयांच्या अनुदिनी पैकी तीही एक आहे, असे आमचे मत आहे. लेखन प्रचारी असू दे की नसू दे समाजात वावरतांना, पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून फिरणारी सार्वजनिक संकेतस्थळावर टिंगल झाली म्हणूनच जालावर लेखन थांबलेली स्त्री म्हणूनच आम्ही त्या प्रकरणाकडे पाहतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काहीतरीच काय !

भारतीय स्वातंत्र्यानंतर १९७५ साली युनो ने ते वर्ष स्त्री मुक्ती वर्ष म्हणून साजरे करावयाचे ठरवले, तेव्हाच येथील समाजमनात राजकीय,सामाजिक आकाक्षा,वाढल्या.शिक्षण,आणि लोकशाहीचे,महत्व लोकांना पटू लागल्यामुळे जे वेगवेगळे बदल होऊ लागले,त्यात भारतीय स्रीयांमधेही फार मोठा बदल झाला.भारतीय स्त्रियांच्या बाबतीत भारतीय परंपरेच्या दृष्टीने जी विषमता होती,त्या विषमतेच्या व्यवस्थेमुळे "स्त्रियांच्या मनातील वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला व त्याचे वाड्मयीन रुप म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.

श्री नंदन आणि इतरांच्या लेख-प्रतिसादांवरून वरील विधान किती गैरसमजुतीवर आधारित आहे हे स्पष्ट झाले आहे.

वरील विधान गैरसमजुतीवर आधारित असेल असे आम्हाला तरी वाटत नाही. स्त्री चळवळींचा इतिहास आणि साहित्यातील स्त्रीवाद यात आपण काहीतरी गल्लत करत आहात असे वाटते. अनेक विचारवंतानी स्त्रीयावरील अन्यायाची नेहमीच नोंद घेतली आणि त्यांचाही माणूस म्हणून विचार केला पाहिजे असे म्हटलेले आहे. आपण म्हणता तसे अनेक प्राचीन संदर्भ आम्हालाही देता येतील. मागील एका प्रतिसादात अगदी संताच्या विचारात सुध्दा स्त्री विषयक विचार कोणीतरी दाखविलेला आहे. आम्ही जे विधान केले ते शासनात स्त्री विषयक नसलेल्या विभागाबाबत मात्र ते वाक्य आपण तोडले भारतीय स्वातंत्र्यानंतर १९७५ साली युनो ने ते वर्ष स्त्री मुक्ती वर्ष म्हणून साजरे करावयाचे ठरवले, तेव्हा भारतीय स्त्रीयांची अवस्था काय होती ? फार प्रगत होती असे आपणास म्हणावयाचे आहे का ?
आणि पुढे आपण सुरुवात केली ती तेव्हाच येथील समाजमनात राजकीय,सामाजिक आकाक्षा,वाढल्या.शिक्षण,आणि लोकशाहीचे,महत्व लोकांना पटू लागल्यामुळे जे वेगवेगळे बदल होऊ लागले,त्यात भारतीय स्रीयांमधेही फार मोठा बदल झाला.भारतीय स्त्रियांच्या बाबतीत भारतीय परंपरेच्या दृष्टीने जी विषमता होती,त्या विषमतेच्या व्यवस्थेमुळे "स्त्रियांच्या मनातील वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला व त्याचे वाड्मयीन रुप म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.
अहो महाराज,
साहित्यातील स्त्रीवादाचा विचार अधिक प्रगल्भपणे येथून झाला असे आमचे म्हणने आहे.

अवांतर :- आता जरा स्पष्टच लिहितो, स्त्रीवाद हा प्राचीन साहित्यप्रकार आहे असे आपणास म्हणावयाचे आहे का ?
असेल तर तो कसा ? ( कृपया चळवळींचा इतिहास आम्हाला सांगू नये, चळवळीचे साहित्य विचारात रुपांतर कधी झाले ते सांगावे ! म्हणजे स्त्रीवादाच्या साहित्य अभ्यासाच्या कक्षा आम्हालाही तपासता येतील )
आणि मुख्य प्रश्न आहे की, या दशकातील स्त्रीया जालावर पारंपारिक चौकट सोडून लिहित आहेत का ? ते सांगा ना राव !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१९७५ सालानंतर

मी परत मूळ लेख वाचला. त्यातून निघालेला एकमेव निष्कर्ष हा की १९७५ सालापर्यंत स्त्री निद्रिस्त होती आणि त्यानंतर स्त्रीवादी साहित्य जन्माला आले.
या विधानाला मी गैरसमज म्हटले. इथे चर्चा स्त्रीवादी साहित्याची (साहित्यातील स्त्रीवादाची)होती. चळवळीची नाही. किंवा चळवळीच्या फलिताची नाही. त्यामुळे फक्त स्त्रीवादी साहित्याच्या इतिहासावरच लिखाण अभिप्रेत होते. स्त्रियांच्या प्रगत-अप्रगत स्थितीचे, साहित्याच्या विचारातील रूपांतराचे, कश्याकश्याचे नाही. ते श्री नंदन यांनी योग्यरीत्या केले. --वाचक्‍नवी

बरं बाबा, नंदन बरोबर आम्ही चूक :)

साहित्यातील स्त्रीवादाच्या निमित्ताने जी झाली ती चर्चा उत्तम झालेली आहे, पुढेही होत राहील.
या चर्चेत सर्वांचे आभार मानून झाले होते, फक्त आपण आणि तात्या राहिले होते, तेव्हा आपल्या दोघांचेही चर्चेतील सहभागाबद्दल
आभार मानतो आणि या चर्चेवरील आमचेतरी लेखन आता थांबवतो, पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद !

अवांतर :) वाचक्नवी , आपले यापुर्वी कधी भांडण झाले होते का ? नाही म्हणजे, तुम्ही आमच्या आणि आमच्या विचारांच्या मागे जरा हात धूवून लागल्यासारखे वाटता राव, म्हणून विचारतो ! :) ( ह.घ्या)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुमार केतकर

Breaking The Moulds या पुरुश उवाच { http://www.orkut.com/Community.aspx?cmm=37014170}
च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात कुमार केतकरांनी केलेले भाषण वाचक्नवी ,नंदन विकास राजेंद्र यांच्या पर्यंत पोचवावेसे वाटते. त्यांनी कार्यक्रमात ताराबाई शिंदे च्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा उल्ल्लेख केला. भाषण खुपच उद्बोधक झाले. कार्यक्रमाची सीडी माझ्याकडे उपलब्ध होईल . आपल्या पर्यंत कशी पोचवावी?
प्रकाश घाटपांडे

यू ट्यूब

घाटपांडेकाका,
आम्हीही केतकरांचे फ्यान आहोत. यूट्यूब वर चढवणे जमेल का?

-आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.
 
^ वर