तर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला

काही वर्षांपूर्वी कनकनग डोंगरावर एका गुंफेचा शोध लागला. त्या गुंफेच्या भिंतीवर अनेक चित्रे काढलेली आहेत. ती अजंठा येथील चित्रांच्या तोडीची आहेत असे म्हटले जाते.विशिष्ट शैलीतील ही चित्रे आठव्या शतकात चार चित्रकारांनीच काढली हे आता सिद्ध झाले आहे. हे चार कलावंत म्हणजे आनंद शर्मन,त्याचा पुत्र शोभन शर्मन,तसेच भद्र पूर्णन आणि त्याचा पुत्र रुद्र पूर्णन हे होत.
...या प्रत्येक चित्राला स्वतंत्र चौकट आहे. त्यातील चित्र एकाच चित्रकाराचे असून त्याने स्वतःच त्या चित्राखाली एक वाक्य लिहिले आहे. शर्मन पिता-पुत्रांनी लिहिलेले प्रत्येक विधान सत्य आहे,तर पूर्णन पिता-पुत्रांनी लिहिलेले प्रत्येक वाक्य असत्यच आहे.त्यातील काही चित्रांलील विधाने पुढीलप्रमाणे::
चित्र क्र. १: हे चित्र भद्र पूर्णन यांनी काढले आहे. तर चित्र क्र. १ चा चित्रकार कोण ?
चित्र क्र.२ : हे चित्र आनंद शर्मन यांनी रेखाटलेले नाही. तर चित्र क्र. २ चा चित्रकार कोण ?
चित्र क्र.३ : या जोड चित्रात डाव्या बाजूला श्रीशिवाचे चित्र असून उजव्या बाजूला श्रीविष्णूचे चित्र आहे.दोन्ही चित्रे एकाच वेळी काढली आहेत प्रत्येक चित्रकाराने आपल्या चित्राखाली वाक्य लिहिले आहे ते दोन्ही चित्रांसंबंधी आहे.
*****************************************************************
........... .......श्रीशिवाचे चित्र............................| ....................श्रीविष्णूचे चित्र.....................
ही दोन्ही चित्रे पूर्णन घराण्यातील चित्रकारांनी काढली आहेत. |....या दोन चित्रांतील कोणतेही चित्र शोभन शर्मन
................................................................|. तसेच रुद्र पूर्णन यांनी काढलेली नाही.
***********************************************************************
तर श्रीशिवाचे कोणी काढले ?
श्रीविष्णूचे चित्र काढणारा चित्रकार कोण ? (प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित. )
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.

लेखनविषय: दुवे:

Comments

उर्वरित उत्तर

आज पाठवले आहे

चित्रकला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी सविस्तर युक्तिवादासह उत्तर पाठविले. सर्व चित्रांचे चित्रकार कोण ते त्यांनी अचूक ओळखले आहे.

चित्रकला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
आवडाबाई यांनी सर्व चित्रे आणि त्यांचे चित्रकार यांची योग्य संगती लावली आहे.

चित्रकला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. वाचक्नवी यांनी पाठ्विलेले उत्तर पर्याप्त युक्तिवादासह परिपूर्ण असून अचूक आहे.

तर्क्क्रीदः४८: आठव्या शतकातील चित्रकला :उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. धनंजय यांनी पाठविलेले उत्तर असे:
१. हे चित्र (ही सर्व चित्रे) क्ष-पूर्णन यांनी काढली आहेत = हे वाक्य असत्य आहे असे कुठलेही विधान नित्य असत्य आहे.
२. हे चित्र अमुक एका विवक्षित शर्मनने काढले नाही = हे वाक्य सत्य नाही असे नाही = हे वाक्य सत्य आहे हे विधान नित्य सत्य असते.

चित्र क्र. १: हे चित्र भद्र पूर्णन यांनी काढले आहे.

हे असत्य विधान केवळ रुद्र पूर्णनच लिहू शकतो, तोच चित्र १ चा चित्रकार.

> चित्र क्र.२ : हे चित्र आनंद शर्मन यांनी रेखाटलेले नाही.
हे सत्य विधान केवळ शोभन शर्मनच लिहू शकतो, तोच चित्र २ चा चित्रकार.

चित्र क्र.३ : या जोड चित्रात डाव्या बाजूला श्रीशिवाचे चित्र असून उजव्या बाजूला श्रीविष्णूचे चित्र आहे.दोन्ही चित्रे एकाच वेळी काढली आहेत प्रत्येक चित्रकाराने आपल्या चित्राखाली वाक्य लिहिले आहे ते दोन्ही चित्रांसंबंधी आहे.
*****************************************************************
........... .......श्रीशिवाचे चित्र............................| ....................श्रीविष्णूचे चित्र.....................
ही दोन्ही चित्रे पूर्णन घराण्यातील चित्रकारांनी काढली आहेत. |....या दोन चित्रांतील कोणतेही चित्र शोभन शर्मन
................................................................|. तसेच रुद्र पूर्णन यांनी काढलेली नाही.
***********************************************************************
तर श्रीशिवाचे कोणी काढले ?

श्रीशिवाच्या चित्राखालचे विधान खोटे आहे. अर्थात ते कोणत्यातरी पूर्णनाने काढले आहे, म्हणजे श्रीविष्णूचे चित्र शर्मनांचे, त्याच्या॓ खालचे विधान सत्य आहे. श्रीशिवाचे चित्र रुद्र पूर्णनाने काढले नाही हे सत्य, म्हणजे ते काढले भद्रपूर्णनाने.
शोभन शर्मनाने कुठलेच चित्र काढले नाही हे सत्य, म्हणजे श्रीविष्णूचे चित्र काढले आनंद शर्मनाने.

^ वर