अलगतावादाची चोरपावले?

साधारणपणे भारतांतल्या भारतांत जेव्हा कार्यालयीन पत्रव्यवहार होतो त्यावेळी प्रेषक कार्यालयाच्या पत्त्यांत पिन् कोड् नंबरानंतर राज्याचे नाव असते. त्यानंतर देशाचे नाव - India - असते. देशाचे नाव नेहमी असतेच असे नाही. पण काही दिवसांपूर्वी चेन्नईंतील एका कार्यालयाकडून मुंबईंतील एका गृहस्थाला एक पत्र आले. त्याच्या पाकिटावर कार्यालयाच्या पत्त्याचा जो शिक्का मारला होता त्यांत पिन् कोड् नंबरानंतर राज्याचे नाव, India, यापैकी काही नव्हते. त्या ऐवजी फक्त South India असे होते. दक्षिणेंतील राज्यांची स्वतंत्र द्रविडीस्तानची मागणी जुनीच आहे. अशा परिस्थितींत पाकिटावरील पत्त्यांत South India हे शब्द टाकण्यामागे चोरपावलांनी अलगतावाद पसरविण्याचा हेतु असावा असे वाटते.

चेन्नईतून येणार्‍या सर्व कार्यालयीन पत्रांच्या पाकिटांवर मारलेल्या पत्त्यांच्या शिक्क्यामध्ये South India असेच लिहिलेले असते का? (लक्ष ठेवायला हवे).

दिल्ली, कोलकाता, येथून येणार्‍या कार्यालयीन पत्रांच्या पाकिटांवर मारलेल्या पत्त्यांच्या शिक्क्यांत North India, East India, असे शब्द असतात का? (माझ्या तरी पाहण्यांत नाही).

मी उगाचच संशयाचे वातावरण निर्माण करीत आहे असे आपल्याला वाटते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

सहमत आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

थोडा फरक

स्वतंत्र विदर्भाचीही मागणी तशी जुनीच आहे. सो व्हॉट?

स्वतंत्र द्रविडीस्थानाच्या मागणीत भारतापासून वेगळे होणे हा पण भाग होता. बरोबर की चूक हा वेगळा वाद होईल, पण स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमधे भारतांतर्गत स्वतंत्र राज्य जेणे करून राज्याचा शासकीय कारभार महाराष्ट्रापासून वेगळा होईल हा मुद्दा आहे.

विषय भरतो बाबा

विदर्भाच्या मागणीमधे भारतांतर्गत स्वतंत्र राज्य जेणे करून राज्याचा शासकीय कारभार महाराष्ट्रापासून वेगळा होईल हा मुद्दा आहे.

आज विदर्भ वेगळा झाला आणि उद्या तीन-चार हिंदी भाषिक राज्यांबरोबर विदर्भ सुद्धा वेगळा देश बनायला निघाला तर? ईशान्येची राज्ये चीनने घशात घातली तर?

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

कॉन्स्पीरसी थीअरी

मी उगाचच संशयाचे वातावरण निर्माण करीत आहे असे आपल्याला वाटते का?

अ.................

अधून मधून दक्षिणेंतील राज्यांची विशेषता तामीळ सिनेमे बघायचा योग येतो. त्यात भारत देशप्रेम, केंद्र सरकारी कर्मचारी हिरो (सी.बी आय, सैनीक ) असे बरेचसे काही असते. त्यामूळे आत्ता तरी तुम्ही म्हणता असे काही असेल वाटत नाही.

पटते..

मी उगाचच संशयाचे वातावरण निर्माण करीत आहे असे आपल्याला वाटते का?

...त्यामूळे आत्ता तरी तुम्ही म्हणता असे काही असेल वाटत नाही.

बरोबर आहे हे म्हणणे. शिवाय स्वतंत्र द्रविडीस्थान हा प्रकार फक्त तामिळनाडूच्या काही भागापुरता मर्यादीत होता, "साउथ इंडीया" साठी नाही.

शिवाय कोर्डेसाहेब जे काही कार्यालय म्हणत आहेत ते कोणाचे सरकारी की खाजगी?

कार्यालयाचे नाव

शिवाय कोर्डेसाहेब जे काही कार्यालय म्हणत आहेत ते कोणाचे सरकारी की खाजगी?

त्या कार्यालयाचे नाव "द इंडियन असोसिएशन् ऑफ् फिजियोथेरपिस्ट्स्" असे आहे.

साउथ इंडिया?

साउथ कोरिया, साउथ व्हिएटनाम, साउथ आफ्रिका याप्रमाणे साउथ इंडिया या नावाचा देश नाही . दक्षिणी भारतीयांना आपण साउथ इंडियन म्हणतो, ते केवळ आपले इंग्रजीचे ज्ञान कमी असते म्हणून. त्यांचा उल्लेख खरे तर सदर्न इंडियन म्हणून करायला पाहिजे. मराठी माणसांना उत्तरेकडचे लोक साउथ इंडियन समजतात हे किती लोकांनी अनुभवले आहे. मी तरी अनेकदा. --वाचक्‍नवी

पटले

मराठी माणसांना उत्तरेकडचे लोक साऊथ इंडियन तर दक्षिणेकडचे लोक नॉर्थ इंडियन समजतात हे खरे आहे. शिवाय सदर्न इंडियनही पटले.


आम्हाला येथे भेट द्या.

सदर्न मारुती

लष्करात सदर्न कमांड आहेच. मग दक्षिणाभिमुख मारुतीला सदर्न मारुती म्हटले तर?
प्रकाश घाटपांडे

स्वतंत्र महाराष्ट्र

ते साउथ इंडिया वगैरे सोडा हो!
फार लांब आहे चेन्नई...

मी मागेही म्हणालोच आहे
तसे "विदर्भासह स्वतंत्र महाराष्ट्र" ही मागणीही मी आपली पिंक टाकल्यासारखी परत नोंदवतो!

आपला
फुटीर
गुंडोपंत

आमचे गोंय

पयलीसान विंगड आसा. (आधीपासून वेगळे आहे.)

पुणून दोनूय राज्यांखातीर मोग आशिल्लो (तरी दोन्ही राज्यांसाठी प्रेम असलेला)
धनंजय

कराड

कराडचा उल्लेख लहान गाव म्हणून केल्याबद्दल जाहीर निषेध. :-)))

मी आता कराड देश वेगळा हवा या मताचा आहे आणि मंगळवार पेठ राजधानी हवी.

मुळात आरडओरडा केला की ज्याला जे हवं ते देण्याची सवय महात्मा आणि बालमित्र देशाला लावून गेले आहेत.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

मी तर म्हणतो...

मिसळपाव, उपक्रम, मनोगत ही पण स्वतंत्र राष्ट्रे म्हणून जाहीर करा. फक्त इथे तिहेरी नागरीकत्वाचा कायदा संमत असावा लागेल आणि पासपोर्ट हाफक्त एकाच नावावर ठेवण्याची आणि बनावट नावे ओळकण्याचे तंत्रज्ञान असायला हवे :-)

 
^ वर