उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
घरपोच पुस्तक सेवा.
द्वारकानाथ
September 18, 2007 - 12:17 pm
पुण्यामध्ये रसिक साहित्य यांची घरपोच सेवा अशी अभिनव अशी सेवा आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी १००० रुपये भरा आणि आयुष्यभर फुकट पुस्तके वाचा अशी योजना आखलेली आहे. इच्छुकांनी श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी जरूर संपर्क साधावा.
पत्ता - रसिक साहित्य योजना, अ ब चौक, पुणे, ०२०-२१११९१०७ आणि ९८२३०७७०९७.
सर्वात महत्वाचे म्हणजे येथे फक्त मराठीच पुस्तके मिळतात.
दुवे:
Comments
उत्तम
उत्तम सेवा आहे. याची माहिती इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
माझ्यासारख्याला अशी बातमी म्हणजे एखाद्या लहानग्याला आता तू जेवताना फक्त आइसक्लीम खायचं, असें सांगणे आहे :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
अरे वा
माहीती बद्दल धन्यवाद. आशा आहे की ही सेवा अजूनही चालू असेल, भरपूर पुस्तके व पुरेसे वाचक असतील.
खरे आहे.
यापूर्वीही रसिक साहित्य ने अनेक आकर्षक योजना आखल्या होत्या. ही योजनाही मस्तच.
याशिवाय रसिक साहित्यचे बिबवेवाडी, कोथरूड, चिंचवड इ. परिसरात अनेक सेवाबिंदू आहेत. तेथेही पुस्तकांची अदलाबदल शक्य आहे असे वाटते.
(रसिक साहित्य प्रेमी) आजानुकर्ण
आम्हाला येथे भेट द्या.
सेवा? वावा!
वा! ही भारीच सेवा आहे. ही लायब्ररी सेवा आहे का? यांचे काही ऑनलाइन कॅटलॉग आहे का? प्लीज कळवा.
वा
वा!!
उत्तम सेवा आहे!
आपला
गुंडोपंत
योजनेविषयी
कृपया या योजनेविषयी अधिक माहिती द्यावी. म्हणजे पुस्तके घ्यायची कुठून? परत कधी आणि कशी द्यायची? कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत आणि भविष्यात उपलब्ध होतील? ही सेवा फक्त पुण्यातच उपलब्ध आहे का? कोणी जर या सेवेचा लाभ घेत असेल तर त्यांचे अनुभव काय आहेत? अनेक प्रश्नांबद्दल क्षमा असावी पण ही माहिती मिळाल्यास आनंद होईल.
आपला
(प्रश्नग्रस्त) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
शंका आणि समाधान.
ही वाचनालयाची घरपोच सेवा असून आठवड्यात एकदा घरी येऊन आपल्याला हवी ती पुस्तके बदलुन मिळतात. एक पुस्तक, एक मासिक, घरात मुले असतील तर लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके असा खजिना आपल्याला प्रत्येक आठवड्यात मिळत असतो.
त्याच बरोबर कोणाला केंद्रावर जाऊन पुस्तके बदलावयाची असल्यास ती सोय ही रोजच मिळु शकते.
अश्या प्रकारे आपण सर्वच अथवा सगळीच पुस्तके विकत न घेता वाचू शकतो.
हेच
तर हवं होतं !!
छान, छान, लगेच दूरध्वनी करून यादी मागवते!!
शंका
हवी ती पुस्तके घरपोच बदलून मिळतात म्हणजे? (माझ्या डोळ्यासमोर सान्ताक्लॉज सारखे पोतडे घेतलेला माणूस आला. मग तो आपल्या घरी येऊन पोतडे उपडे करेल आणि आपण त्यातले पाहिजे ते पुस्तक उचलू.)
तसे नसून आपण यादी बघून पुस्तक निश्चित करुन तेच त्याला आणायला सांगायचे आहे का? मग तसे असल्यास आपण बर्याचदा पुस्तके चाळून 'हे बरं वाटतंय' म्हणून आधी न ठरवलेलं पुस्तक घेतो, तसं करायचं झाल्यास काय?
या योजनेत खरोखर रस आहे, पण पुस्तके बदलायच्या कारभाराबद्दल तपशीलात माहिती हवी आहे, वरील प्रश्नांत कोणताही विषयांतर किंवा टिंगलटवाळीचा हेतू नाही.
उत्तर
मागे रसिकची ५०० रुपये भरुन सभासद व्हा. ६ महिने पुस्तके वाचा व सहा महिन्यांनतर ५०० रुपयांची हवी ती पुस्तके मोफत मिळवा अशी एक योजना होती. त्यावेळी कळलेल्या माहितीवर आधारित सांगतो.
तुम्हाला हवे ते पुस्तक चाळून घ्यायचे असेल तर रसिकची सेवाकेंद्रे बिबवेवाडी, कोथरुड व पेठेमध्ये २-३ आहेत. चिंचवड परिसरातही आहे. शिवाय मुख्य दुकानही अ.ब. चौकात आहे. येथून घेऊ शकता.
आधी निश्चित केलेले पुस्तक हवे असेल तर त्यांना दूरध्वनी करून ते पुस्तक राखून ठेवता येते. जर ते उपलब्ध असेल तर लगेच मिळते.
रसिकची सेवा अतिशय उत्तम आहे. त्यांचे सेवक "पुणेरी" नाहीत. यातच सर्व आले. पुस्तके हाताळून मग घेण्याच्या सुविधेचा मराठी दुकानांतील प्रारंभ त्यांनीच केला आहे असे वाटते.
आम्हाला येथे भेट द्या.
हे सुद्धा आवडले
मराठीत लिहा. वापरा.
काही उत्तरे
आताच उपरोल्लिखित क्रमांकावर संपर्क साधला होता. १००० रुपये भरून या योजनेचे आपण आजीवन सभासद होऊ शकतो. सेवाकेंद्रांमध्ये किंवा रसिकच्या मुख्य दुकानात जाऊन हवे ते पुस्तक घेऊ शकतो अशी ही योजना आहे. घरपोच सेवा हवी असल्यास त्याची वार्षिक वर्गणी ५०० रुपये आहे असे कळले.
त्यामुळे थोडा गोंधळ झाला आहे.
एकदा रसिक केंद्रात भेट देऊन योजनेची नीट खात्री केली पाहिजे.
पण रसिककडे असलेला पुस्तकांचा साठा व पुस्तकांच्या इतर दुकानदारांपेक्षा असलेली सौम्य व मैत्रीपूर्ण वृत्ती लक्षात घेता ही योजना फारच उत्तम आहे यात शंका नाही.
आम्हाला येथे भेट द्या.
मीही
उपरोल्लिखित क्रमांकावर संपर्क साधला.
१००० रुपये भरून या योजनेचे आपण आजीवन सभासद होऊ शकतो. सेवाकेंद्रांमध्ये किंवा रसिकच्या मुख्य दुकानात जाऊन हवे ते पुस्तक घेऊ शकतो अशी ही योजना आहे. घरपोच सेवा हवी असल्यास त्याची वार्षिक वर्गणी ५०० रुपये आहे असे कळले.
होय असेच आहे. १०००/- रु मध्ये घरपोच नाहिये, त्यासाठी ५००/- रु वेगळे आहेत. शिवाय ७००/- रु भरून एक वर्ष हवी तितकी पुस्तके वाचा आणि वर्षाच्या शेवटी ३००/- रु ची पुस्तके मिळवा, अशी अजून एक योजना आहे. ह्या दोन्ही योजनांमध्ये एका वेळी एकच पुस्तक मिळेल.
अर्थात, घरपोच पुस्तके हवी असल्यास आठवड्यातून एकदा बदलून मिळतील, त्याच्या मध्ये हवी असतील तर, सेवाकेंद्रात जाऊन बदलून आणू शकतो, कितीही वेळा ! आणि पुस्तकांसाठी वाट वगैरे नाही पहायला नाही लागत. आपल्याला हव्या त्या पुस्तकाची प्रत उपलवब्ध करून देतात.
त्यांचे एक मासिक देखिल निघते. ते ७००/- रु च्या योजनेमध्ये मोफत मिळते, १०००/-च्या योजनेमध्ये नाही. मासिकामध्ये नवीन पुस्तकांची यादी, intrduction असे काही असते.
पैसे अ ब चौकातील दुकानात अथवा सेवा केंद्रातही भरता येतात. चेकही चालतो. पैसे किंवा चेक घरी येऊन देखिल घेऊन जातात !! अ ब चौकातील दुकानात गेलात तर क्रेडिट कार्ड देखिल चालेल.
स्पष्टीकरण
काल रसिक साहित्यच्या मुख्य दुकानाला भेट दिली आणि तिथे चौकशी केली तेव्हा ही योजना (वाटते तितकी) आकर्षक नाही असे मला तरी वाटले.
१. योजनेअंतर्गत असलेली पुस्तके व दुकानात विक्रीस असलेली पुस्तके ही वेगवेगळी आहेत! योजनेअंतर्गत असलेली पुस्तके ही लायब्ररी सिस्टीम सारखी आहेत.
२. तुम्ही ज्या केंद्रात पैसे भराल त्याच केंद्रामध्ये पुस्तकांची अदलाबदल करता येईल. इतर केंद्रांमध्ये नाही.
३. एकदा पुस्तक घेतल्यानंतर ते १५ दिवसात परत करणे आवश्यक आहे.
३० सप्टेंबरपर्यंत असलेली दुसरी योजना आकर्षक वाटली. ५०० रुपये भरा. ६ महिने पुस्तके वाचा व नंतर ६०० रु.ची पुस्तके भेट मिळवा.
यात सहा महिन्यांनंतर मिळणार्या पुस्तकांवर सवलत मिळणार आहे का हे स्पष्ट विचारायला विसरलो. पण तरीही सहा महिन्यात ५०० रुपयावर १०० रुपये असा २० % घसघशीत पुस्तकी नफा आहे. :)
पुस्तके विकत घेताना रसिकवाले किंमतीवर १५ टक्के सवलत देतात. मात्र सवलत मिळणार नसेल तर हा नफा नलिफाय होईल असे वाटते. ;)
गाडगीळ रस्त्यावर (प्रभातकडून माती गणपतीकडे जाणार्या) के सागर या दुकानात मराठी पुस्तकांवर २० टक्के सवलत मिळते. याशिवाय याच रस्त्यावर उजव्या बाजूला असलेले योगीराज पुस्तकालय या छोटेखानी दुकानात हवी ती पुस्तके आणून देण्याची तत्परता असलेला सेवकवर्ग आहे. :)
--(हिशेबी) आजानुकर्ण.
आम्हाला येथे भेट द्या.
तुष्टीकरण
आजानुकर्णाच्या हिशोबीपणावर आम्ही खूष आहोत. एखादी योजना ' काय आहे' या बरोबरच 'काय नाही' याची लिस्ट करुन मगच सहभागी होण्याचा विचार करावा.
प्रकाश घाटपांडे
एक स्वप्न.
रसिक यांचे अजून एक आगळे आणि वेगळे वैशिष्ठ म्हणजे ते आपणास असे केंद्र खोलायचे असल्यास पूर्णपणे मदत करतात. माझ्या माहिती प्रमाणे त्यांची अशी २० केंद्र आहेत.
मलाही असे एक केंद्र खोलायची इच्छा आहे. आपल्या घरामध्ये दर्शनी भागात ४००/५०० पुस्तके आजुबाजूला असावीत. रोज २५/३० किमान लोकांनी यावे आणि पुस्तकाची अदलाबदल करावी आपापले अभिप्राय द्यावेत, महिन्यात वाचकासाठी स्पर्धा घ्यावी आणि आपले मित्रमंडळ वाढत जावे यापेक्षा चांगले आणि रम्य असे स्वप्न तरी काय बरे असू शकेल?
सहमत - हेच म्हणतो
असे कितीही वेळा लिहिले तरी अपुरेच वाटेल...
सन्जोप राव
द्वारकानाथांचे स्वप्न
द्वारकानाथजी, खरच आपले स्वप्न पुरे झाले तर काय बहार येईल!
प्रकाश घाटपांडे
येथे सुद्धा
पुणे व्यतिरिक्त मुंबइ, ठाणे आणि बेळगाव (चौकशी करून पक्के सांगतो) येथे सुद्धा हि सुविधा आहे. लोकांनी पुढाकार घेतला तर हि चळवळ गावोगावी जाइल.
मराठीत लिहा. वापरा.
मुंबईत
आहे का?
राधिका
आहे
मुबईत आहे. दादरला. दु. क्र. : ०२२-२४४५८६२१.
ठाण्यात नाही. चुकिच्या माहिती बद्दल क्षमस्व. पनवेलला आहे.
मराठीत लिहा. वापरा.
वाचनदिवा
रात्री झोपताना पुस्तकावरच क्लिप करुन लावता येइल असा लॆम्प कि ज्याचा फोकस फक्त पुस्तकावरच पडेल असा दिवा कोठे मिळेल? त्या अभावी आमच्या वाचन संस्कृतीचा र्हास होत आहे. वाचतावाचता लुडकता आले पाहिजे. मी पुण्यात खुप ठीकाअनी हुडकला पण मला कोठेही मिळाला नाही. कस्टमच्या दुकानातही नाही. व्हीनस मध्ये पण नाही.
प्रकाश घाटपांडे
असा?
तुम्हाला असा दिवा हवा आहे का?
ऑटॉमोबाईलच्या दुकानात कदाचित मिळण्याची शक्यता आहे असे वाटते. गाडीत असे दिवे पाहिले आहेत. अर्थात १२ व्होल्टस् चे!
शिवाय हल्ली नवीन पांढरे एल ई डी चे दिवेही मिळतात असे ऐकले आहे ते उत्तम आहेत असे वाटते. इलेक्ट्रीकच्या दुकानात कदाचित मिळतील.
आपला
गुंडोपंत
छान आहे
माझ्याकडे साधारण असाच एक होता, पण भारतात मिळतो का ते माहित नाही.
तो लवकरच बंद पडला, त्याची मूळ बॅटरी होती तो पर्यंत चांगला चालला, नंतर ईथे त्याची योग्य ती बॅटरी नाही मिळाली , आता ठेवून दिलाय !!