नव्या तरूण शास्त्रीय संगीत गायकाबद्दल माहिती

नमस्कार मंडळी,

गेल्या गुरूपौर्णिमेला आदित्य खांडवे ( माझा मुलगा) याने आपले संकेतस्थळ www.adityakhandwe.com सुरू केले आहे. जयपूर घराण्याचे पं. रत्नाकर पै आणि ग्वल्हेर घराण्याचे पं. यशवंतबुवा जोशी हे आदित्यचे गुरू आहेत. रसिकांना संकेतस्थळावर आदित्यच्या गायनाची झलक ऐकता येइल.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा

आदित्यला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

संकेतस्थळ मस्तच. :)


आम्हाला येथे भेट द्या.

धन्यवाद

आजानुकर्ण

इतक्या तत्पर प्रतिसादा बद्दल व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

आपला नम्र

मोहन

हेच म्हणतो !

आदित्यला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

संकेतस्थळ मस्तच. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद

प्रिय प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तत्पर प्रतिसाद व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

मोहन

अनेक शुभेच्छा!

जयपूर आणि ग्वाल्हेराची तालीम घेणार्‍या आदित्यला माझ्याही अनेक शुभेच्छा!

खांडवे साहेब, ठाण्यामुंबई परिसरात जर कधी कुठे आदित्यचं गाणं असेल तर इथेही त्याबद्दल अवश्य माहिती लिहा ही विनंती! ठाण्यात असेल तर मी गाण्याला येईनच, परंतु मुंबईतही कुठे असल्यास व मला सवड असल्यास यायला आवडेल..

पै साहेबांकडून आदित्यला जयपूर गायकीचं अत्यंत शिस्तबद्ध शिक्षण मिळेल अशी खात्री आहे. पं यशवंतबुवा जरी प्रामुख्याने ग्वाल्हेरचे गायक म्हणवले जात असले तरी आग्रा गायकीही ते अतिशय उत्तम तर्‍हेने सादर करतात असा माझा अनुभव आहे. खास करून बोलबनाव, व बंदिशीच्या अंगाने जाणार्‍या आग्रा गायकीचा आनंदही त्यांच्या गाण्यात मिळतो. स्वतः बुवांना पं यशवंतबुवा मिराशी व पं जगन्नाथबुवा पुरोहीत यांच्याकडून अनुक्रमे ग्वाल्हेर व आग्रा गायकीची अतिशय उत्तम तालीम मिळाली आहे. त्यामुळे यशवंतबुवांसारख्या समर्थ गुरूची तालीम आदित्यला मिळते आहे ही भाग्याची बाब आहे.

अशी समर्थ गुरुशिष्य परंपरा जर आदित्यच्या पाठीशी असेल तर त्याहून अधिक काय पाहिजे?!

असो, आदित्यला पुनश्च एकदा माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

धन्यवाद

प्रिय तात्या
समर्पक व विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पं. यशवंतबुवांच्या गायकीचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. आदित्यचे गायन १२ ऑक्टो. ला ठाण्यात सेवासंघात होण्याची शक्यता आहे. नक्की ठरल्यावर निरोप देईन.

आपला

मोहन

सुंदर

वा
आदित्यला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वेब्साईट आवडली. अगदी सुरेख आहे.
मल्टीमिडियाचा वापराने पुर्ण झाल्या सारखी आहे.
पण काही गोष्टी नम्रपणे सुचवू का?

पहिले पेज लोड व्हायला खुप वेळ लागतोय. इमेज साईज छोटी हवी का?
आदित्यने वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण केले आहे. जर त्याची ऑडियो फाईल असेल तर ती ऐकता (१० सेक. वगैरे) आल्यास उत्तम.
ऍवॉर्डसची फक्त नावे येण्यापेक्षा ती दिसावीत.
पुढील सादरीकरणाच्या तारखा यावर याव्यात.
गाण्याच्या कार्यक्रमांचे बुकींग असे स्प्ष्ट पेजही असल्यास उत्तम.

आता माझा मुख्य प्रश्नः या स्थळावर मी आज आलो.
मी परत यावे यासाठी काय योजना आहे?
मला असे सुचवावेसे वाटते की, दर महिन्याला (किंवा साठा असल्यास आठवड्याला) ऐकण्याच्या फाईल्स बदलाव्यात. यामुळे नावीन्य राहील. येण्याला उत्सुकता राहील. पुढील महिन्यात 'हे ऐका' असेही पहिल्या पानावर म्हणता येईल.

आशा आहे मी अति आगावूपणा करत नाहीये.

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

प्रिय गुंडोपंत
सविस्तर समालोचनाबद्दल व ऊपयुक्त सुचनांबद्दल अनेक धन्यवाद.
मुखपृष्ठ् यायला लागणार्‍या विलंबाचे कारण बॅकग्राऊंड ध्वनीपट्टीका जरा मोठी आहे.
ऑडीओ क्लिपस् विभागात आदित्यचा मालकंस ( २०मि. पूर्णवेळ) व ठुमरी (२ मि. क्लिप) आहेत. पण परत ते डाऊनलोड व्हायला वेळ लागतो. कारण साईझ. १० - २० से. च्या ऑडिओ फाईल्स् शास्त्रिय संगीता करता अपूर्‍या वाटतील.
फोटोगॅलरी विभागात अवार्डस् व प्रमाणपत्रांच्या चित्रांचा कोलाज आहे.
कार्यक्रमांच्या तारखाच्याबद्दलची सूचना चांगली आहे. पण अजून आदित्यचे कार्यक्रम महिन्या - दोन महिन्यात एखादा होतो. पुढे ही सुचना अवश्य पाळीन.
तसेच नाविन्य ठेवण्याच्या दृष्ठीने केलेल्या सुचनाही ऊत्तम आहेत. आमलात आणण्याचा प्रयत्न करेन.
अतिशय आपुलकीने सुचना केल्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

आपला

मोहन

शुभेच्छा !

केशव
मोहनराव,
आदित्यला माझ्या व माझ्या कुटुंबातील सर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद

प्रिय केशव
हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

आपला नम्र

मोहन

सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी हवी !

मोहनराव,
आदित्यला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
त्याची सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची हजेरी हवीच !!

तेथे अनेक बडी (संगीतातील) मंडळी असतात, त्यांचे आशिर्वाद मिळतील आणि मार्गदर्शनपण मिळेल !!

प्रसाद

सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची हजेरी हवीच

प्रिय प्रसाद

आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची सगळ्यांनाच इच्छा व स्वप्न असतं. आदित्यला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ईश्वराच्या कृपेने व आपल्या सारख्यांच्या आशीर्वादाने आदित्यची स्वप्नपूर्ती होईल.

परत धन्यवाद.

आपला नम्र

मोहन

 
^ वर