केरळ - माहिती हवी

नोव्हेंबर १८ ते २५ (आठ दिवस) दरम्यान केरळला जाण्याचा विचार आहे. काहीतरी वेगळं बघावं व अनुभवावं अशी इच्छा आहे, त्यामुळे पॅकेज टूर टाळत आहे. मुन्नार, पेरियार अभयारण्य व बॅकवाटर्स मार्गे प्रवास, या व्यतिरिक्त काही फारसे परिचित नसलेले परंतु बघण्यासारखे असल्यास सूचवावे. उदा. प्राचीन वास्तूशिल्प, वनविहार, इत्यादी. सोबतच कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकालाही भेट द्यायची आहे. मुंबई-केरळ-मुंबई विमान प्रवास असेल त्यामुळे १८ व २५ असे दोन्ही दिवस जोडले आहेत. आता काही प्रश्नः

१. प्रवास कोचीनहून सुरु करणे सोईचे ठरेल की त्रिवेंद्रमहून?
२. संपूर्ण प्रवासासाठी एकच कार भाड्याने घेणे सोयिस्कर आहे का?
३. टाळण्यासारख्या काही गोष्टी.

प्रश्न वैयक्तिक माहिती करिता असला तरी खरडवही किंवा निरोपापेक्षा प्रतिसादातून उत्तर दिल्यास अनेकांना माहितीचा उपयोग होऊ शकेल.

-जयेश

लेखनविषय: दुवे:

Comments

केरळ

प्रवास कोचीनहून सुरु करणे सोईचे ठरेल की त्रिवेंद्रमहून?

तुम्ही पाहण्याची ठरवलेली ठिकाणे पाहता तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) पासून प्रवास सुरू केलेला चांगला.

संपूर्ण प्रवासासाठी एकच कार भाड्याने घेणे सोयिस्कर आहे का?

एक दिवस एक ठिकाण आणि मुक्कामाला तिरुवनंतपुरमला येणे हे सोयीचे वाटते. त्यामुळे दिवसाच्या प्रवासानुसार भाडे घेणारी गाडी ठरवावी.

टाळण्यासारख्या काही गोष्टी.

केरळमधील सर्वसामान्य लोक मदतीसाठी तयार असल्याचे जाणवले, त्यामुळे अनोळखी प्रदेशात सर्वसामान्यपणे टाळण्याच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेसे आहे असे वाटते.

मुन्नार, पेरियार अभयारण्य व बॅकवाटर्स ...

आल्लेप्पी हे बॅकवॉटर्सचे ठिकाण चुकवू नये. तिरुवनंतपुरममधील अतिशय प्राचीन असे अनंतपद्मनाभ (यावरूनच शहराचे नाव पडले.) मंदिर अवश्य पाहावे. कोचीनमध्ये एक मोठा वॉटरपार्क आहे. याशिवाय गुरुवायुर मंदिरालाही भेट देता येईल.

ता. क. - या मंदिरांमध्ये जाताना महिलांनी भारतीय पोशाख करणे आवश्यक आहे. पुरुषांना लुंग्या मंदिराबाहेर भाड्याने मिळतात.

समुद्रकिनारे

याशिवाय केरळमध्ये तिरुवनंतपुरमच्या आसपास असलेले समुद्रकिनारे पाहण्यास विसरू नये. विशेषतः कोवलम् आणि वर्कला हे समुद्रकिनारे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेत.

केरळ

केरळ हून आल्यावर इथे वर्णन आणि चित्रे टाकायलाही विसरू नये,
स्वाती

सहमत आहे.

केरळचे प्रवासवर्णन वाचायला आणि प्रकाशचित्रे पाहायला आवडतील.

केरळ नकाशे

हे नकाशे पहावेत.
मला वाटते कोची{न} (शहरभागाचे नाव एर्नाकुलम्) हे गाव मध्यवर्ती व रहाण्यास योग्य आहे.
येथून दक्षिणेकडे आलप्पुळा (अलेप्पी), कोल्लम् (क्विलोन) व टोकाला तिरुअनंतपुरम् (ट्रिवान्ड्रम्/त्रिवेंद्रम्), मोटारीने ४ तासावर, आहे. उत्तरेकडे गुरुवायूर, त्रिशुवपेरूर (त्रिसूर), पालक्काड् (पालघाट) व कोळीकोडे (कालिकट्), पुन्हा मोटारीने ४ तासावर, आहे.
बाकी मी स्वतः फक्त कामापुरते केरळ पाहिले आहे (आमच्या कंपनीने तेथे ५-६ पूल बांधले आहेत) त्यामुळे प्रवासी आकर्षणांविषयी माहिती देऊ शकणार नाही.
मसाल्याचे पदार्थ विकत घ्यायचे असतील तर ताज रेसिडेन्सी हॉटेलच्या समोरील ज्यू स्ट्रीट् वरील दुकानात जाऊन पहावे.
[फार पूर्वीच्या काळी म्हणायचे "नाची (नॉच-गर्ल) हवी असेल तर कोचीला जा". आता मिळेल असे वाटत नाही, पण कुणी सांगावे मिळेलही. ह. घ्या.]

धन्यवाद

शशांक व दिगभ्भा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझ्या मित्राने मला सल्ला दिला की, मी जाताना त्रिवेन्द्रमला उतरावे, तेथे मुक्कामास हॉटेल आरक्षित करुन कारने कन्याकुमारीला जावे. त्याच दिवशी परतून हॉटेलात मुक्काम व दुसर्‍या दिवशी आसपासची ठिकाणे पहावी.
मी त्रिवेन्द्रम, मुन्नार व पेरियार अभयारण्य व कोचिन येथे हॉटेल्स आरक्षित करण्याचा विचार करीत आहे. बॅकवाटर्स सफर मुंबईतून आरक्षित करता येईल का? की तेथे गेल्यावर करणे योग्य आहे?
-जयेश

 
^ वर