तर्कक्रीडा:४७:सरदार लंबोदर शतमोदके

ब्रह्मपुरी येथे सापडलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढील विवरण मिळते.

अठराशे पन्नास साली श्रीमान महोदर शतमोदके यांचे निधन झाले.त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १८५४ या वर्षी त्यांचे वडील सरदार लंबोदर शतमोदके यांचे देहावसान झाले.ते आपल्या पुत्राच्या (म्हणजे श्रीमान महोदर यांच्या ) एकूण आयुर्मानाच्या दुप्पट वर्षे जगले

.
.......सरदार लंबोदर शतमोदके यांच्या एकूण आयुष्याचा एक बारांश (१/१२) काळ बालपणात,तर एक षष्ठांश (१/६) काळ कौमार्यावस्थेत गेला.पुढे आयुष्याचा एक सप्तमांश (१/७) काळ ब्रह्मचर्यपालनात व्यतीत झाल्यावर त्यांनी लग्न केले.या विवाहा नंतर पाच (५) वर्षांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याच पुत्राचे नाव महोदर.
.....तर ऐतिहासिक शतमोदके घराण्यातील या पिता-पुत्रांचे जन्म सन शोधून काढा.
................................................................................................................................
( उत्तर कृपया व्यनि. ने )

लेखनविषय: दुवे:

Comments

शतमोदके

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी तसेच श्री धनंजय यांनी शतमोदके पिता-पुत्रांचे जन्म सन अचूक शोधले आहेत.

माझे उत्तर

व्यनिने ....

शतमोदके

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा तसेच आवडाबाई यांची उत्तरे आली. ती बरोबर आहेतच हें सांगणे नलगे.

तर्कक्रीडा ४७:सरदार लंबोदर शतमोदके

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
समजा लंबोदर यांचे मृत्युसमयी वय २क्ष् वर्षे. म्ह. महोदर यांचे क्ष् वर्षे.
म्ह. ( २क्ष्/१२ )+(२क्ष्/६) + (२क्ष्/७) +५+क्ष् +४=२क्ष
म्ह. क्ष्/६ + क्ष्/३ + २क्ष्/७ +९ = क्ष्
म्ह. ७क्ष् + १४क्ष् + १२क्ष् ९*४२ =४२क्ष
म्ह. ९*४२=९क्ष् म्ह. क्ष्=४२....म्ह. लंबोदर यांचे वय ८४ वर्षे., महोदर ४२ वर्षे
यावरून जन्मसन १७७० आणि १८०८

इतके अवघड?

१२, ६ आणि ७ चा लसावि ८४.त्यामुळे लंबोदरांचे मृत्यूसमयी वय ८४, म्हणून महोदराचे ४२. बाकी सर्व सोपे आहे.--वाचक्नवी

लसावि हा रस्ता "मनोवैज्ञानिक" आहे

यनावाला वये पूर्णांक देतील, असा त्यांच्या मनाचा वेध घेतला, तर लसाविने काम भागते. पण त्यांने तसे न सांगितल्यामुळे लांब पद्धतीने ताळा लावणे भाग पडते.

 
^ वर