सोनीया क्रमांक सहा...
:
आज फोर्बस् साप्ताहीकाची जगातील सामर्थवान महीलांची वार्षीक यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात अमेरिकन कॉन्डोलिजा राईस या चौथ्या क्रमांकावर आहेत "पेप्सीकन" इंद्रा नूयी पाचव्या क्रमांकावर तर "इटालीयन/भारतीय" सोनीया गांधी या पहील्या शंभर बायकांमधे सहाव्या क्रमांकावर आहेत. देशात आज त्या "पॉवरफूल" आहेत या बद्दल वाद नसावा पण जगातील ठरण्या इतक्यात्या खरेच आहेत का, की हा पण त्यांना प्रसिद्धी देण्याचा परकीय प्रयत्न असा प्रश्न पडतो.
त्यांच्या बद्दल लिहीताना हे साप्ताहीक खालील गोष्टी लिहीते
- त्यांच्यामुळे प्रतिभा पाटील या पहील्या महीला राष्ट्राध्यक्ष झाल्या
- त्यांना आर्थीक विषमतेची काळजी वाटते
- त्यांचा परदेशी गुंतवणूकीस चालना देणार्या विशेष आर्थिक भाग (स्पेशल इकॉनॉमिक झोन्स) तयार करण्यास विरोध आहे
- त्यांना शेतकर्यांची काळजी आहे
यातील काही गोष्टी वृत्तपत्रात देखील वाचल्या आहेत. पण त्या जेव्ह्ढे बोलल्या त्याप्रमाणे नंतर खरेच पावले उचलली गेली की ही केवळ शाब्दीक (म्हणून दिखाऊ) सहृदयता आहे? कृपया हा (पक्षीय) राजकारणाशी संबधीत प्रश्न म्हणून नाही तर खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का हा प्रश्न आहे.
Comments
फक्त
फोर्बस् साप्ताहीकाची जगातील सामर्थवान महीलांची वार्षीक यादी म्हणजे फॅशनसारखे, काही तरि सिझनल, शिळोप्याचे सदर आहे ते.
सत्ता गेली की ती पॉवरफूल मंडळी यादी मधून गळतात उदा. मेगावती इंडोनेशियाच्या माजी ... एकदम टॉप लिस्ट मधील व्यक्ती लगेच शक्तीहीन होते कसे काय बुवा?
अमेरीकेत येत्या निवडणूकीत जर का सत्तापालट झाला तर बघा येते का कॉन्डोलिजा राईस पुढच्या यादीत. हिलरी बाई, नॅन्सी पोलोसी कोणीतरी येईल.
प्रतिभा पाटील यांचे नाव तसे ओळखीचे असेल पण राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत ते काँग्रेस हायकमांडने आणायच्या अगोदर कोणाच्यातरी लक्षात आले होते का? त्यांनी ते नेहमीचे वाक्य टाकले "जागतीकरणाचा लाभ फायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहीजे. विकासाची फळे त्यांना चाखायला..." तेव्हाच त्यांच्या पॉवरबद्दल कळून आले.. हे राजकारणी डॉयलॉग मारतात. सर्वांगीण विकास म्हणजे नक्की काय हे सोप्या भाषेत, तळागाळातील लोकांना समजेल असे स्पष्ट सांगा की, अहो तुम्ही सत्तेतील लोकांनी ते केले पाहीजे जनतेला काय सांगता पोहोचला पाहीजे. म्हणजे उद्या जागतीककरणाचा फायदा घेणारे लोक उदा. कॉल सेंटर, आय टी च्या लोकांनी त्यांना महीन्याचा पगार मिळाला की भिकारी, "तळागाळातील लोकांच्या"पुढे निम्मा पगार ठेवून यायला पाहीजे का? म्हणायचय तरी काय तुम्हाला? काही ठोस कार्यक्रम ठेवा की...
असो सोनीया गांधी पॉवरफूल नक्कि आहेत. तसेच त्या नसत्या तर काँग्रेसचे काय झाले असते व त्यामुळे देशावर काय परीणाम झाला असता हा विचार करून मला त्या आहेत हे बरे वाटते.
बरोबर
फोर्बस् साप्ताहीकाची जगातील सामर्थवान महीलांची वार्षीक यादी म्हणजे फॅशनसारखे, काही तरि सिझनल, शिळोप्याचे सदर आहे ते.
वर्णन आवडले!
असो सोनीया गांधी पॉवरफूल नक्कि आहेत. तसेच त्या नसत्या तर काँग्रेसचे काय झाले असते व त्यामुळे देशावर काय परीणाम झाला असता हा विचार करून मला त्या आहेत हे बरे वाटते.
त्या पॉवरफूल आहेत हे निर्विवाद आहे. फक्त त्या जागतीक स्तरावर सहावा नंबर (फले फॅशनसारखा असो, पण) देण्या इतक्या आहेत का एव्हढाच मला प्रश्न पडला.
सापेक्ष!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
आता भारताची लोकशाही ही जर जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असे एकदा मान्य केले की मग त्या लोकशाहीत(ही) किंग/क्वीन मेकरची भूमिका वठवणारी एक महिला म्हणून सोनियाचे नाव घेणे क्रमप्राप्त आणि नैसर्गिक आहे. इथे वस्तुस्थिती मान्य केलीच पाहिजे. भले ती आपल्याला अनुकुल असो अथवा नसो.
गुळगुळीत वाक्ये
१) भारताची लोकशाही ही जर जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे
म्हणजे लोकशाही देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश
२)आपण एकविसाव्या शतकात पदर्पण केले आहे.
म्हणजे जणू काही जणु काही इस २००० पर्यंतचा टप्पा मागासलेला होता आणी एकदम नव्या आधुनिक सहस्त्रकात प्रवेश केला
३) फुले -आंबेडकरांची परंपरा सांगणारा पुरोगामी महाराष्ट्र ( नंतर त्यात फुले-शाहू-आंबेडकर असा बदल झाला)
म्हणजे महाराष्ट्रात यांनी जन्म घेतला. सुरवातीला फुले स्वल्पविराम आंबेडकर स्वल्पविराम शाहू स्वल्पविराम अशा प्रकारची वाक्य रचना असायची. हा डॅश मध्ये आला. तो काय उगीचच का? येथे जातींच राजकारण जोडले गेले. ही वाक्ये जाणीवपूर्वक रुजवली गेली
४) विद्येचे माहेर घर असलेले पुणे{ मध्ये त्यावर oxford of the East असा परिसंवाद सिंबॉयसिस मध्ये झाला होता.}
मग पुण्याचे प्रथम नागरिक असलेले महापौर किती विद्वान असले पाहिजे.{ बघा पुण्यातल्या महापौरांच्या परंपरा } [ एक महापौर न्या. छागला यांना श्रद्धांजली अर्पण करताना लिहून दिलेले वाक्य कष्टपुर्वक न्या य मा रु ती चा ग ला असे वाचत होते.हे म्हणताना त्यांना जीभेशी खूपच झटापट करावी लागत होती.]
५) नाण्याला दोन बाजू असतात
ही कृष्ण - धवल दृष्टीत जग बघण्याची मानसिकता
६) भारताची संस्कृती मूल्य जतन करणारी आहे.
प्रत्येक देश समूह प्रांत याबाबत असेच म्हणतो.
आता सोनियाचा भारत हा वाक्यप्रयोग रु़जवणे अवघड नाही
प्रकाश घाटपांडे
पटले
सहमत आहे.
वक्रोक्ति
हा प्रतिसाद म्हणजे वक्रोक्तिचे उत्तम उदाहरण आहे!
सन्जोप राव
माझं मत!
देशात आज त्या "पॉवरफूल" आहेत या बद्दल वाद नसावा
खरं आहे. आज तसं बघायला गेलं तर ही बया भारताची अनभिषिक्त सम्राज्ञीच आहे असं म्हणायला हवं! च्यामारी ही सांगेल तो पंतप्रधान, ही सांगेल तो/ती राष्ट्रपती!
एक गोष्टही तेवढीच खरी, की त्या गांधी घराण्याचा काय राजयोग आहे ते कळत नाही, परंतु कॉग्रेसजनांना हांजी हांजी करायला, लाळ घोटायला त्याच घराण्यातील व्यक्ति हवी असते. सोनियाही त्याच घराण्यातली असल्यामुळे तिलाही तो फायदा मिळाला. शिवाय राजीव अचानक वारल्यामुळे तिला कायमस्वरुपी पब्लिक सिंपथीही मिळाली. त्यात पुन्हा तिचं ते साधसुधं राहणं, नेहमी साडीच नेसणं, भाषणात हटकून हिंदी बोलणं (किंवा लिहून दिलेलं वाचणं!), अजून एक गोष्ट स्पष्टच सांगायची तर तिच्या गोर्या कातडीचाही मोह नाही म्हटला तरी कॉग्रेसजनांवर पडला, असं मला वाटतं!
या सर्वच गोष्टी जमून आल्या आणि त्याचा एकत्रित फायदा सोनियाला अगदी छपर फाडके मिळाला. इतका, की ही बया आज भारताची किंगमेकर झाली आहे आणि पुढची किमान १५-२० वर्ष तरी ही बया भारतावर राज्य करेल असं वाटतं! पुढे प्रियांका आहेच! तीदेखील आईच्या पावलावर पाऊल ठेवून पद्धतशीरपणे तयार होत आहे. तीदेखील गोरी चिकणीचुपडी आहेच! :)
आता बोला...(च्यामारी बोललो की तात्या बोलतो म्हणतात! :)
त्यांच्यामुळे प्रतिभा पाटील या पहील्या महीला राष्ट्राध्यक्ष झाल्या
टेक्निकली किंवा वरवर पाहता ही गोष्ट खरीच आहे! (अंतर्गत राजकारण काहीही असो..)
त्यांना आर्थीक विषमतेची काळजी वाटते
त्यांचा परदेशी गुंतवणूकीस चालना देणार्या विशेष आर्थिक भाग (स्पेशल इकॉनॉमिक झोन्स) तयार करण्यास विरोध आहे
त्यांना शेतकर्यांची काळजी आहे
वरील मुद्द्यांशी मी असहमत आहे. तिलाच काय, आपल्या राजकारण्यांपैकी कुणालाच यातली काहीही पडलेली नाही!
तर खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का हा प्रश्न आहे.
मुळीच वाटत नाही, अहो तेच तर सांगतो आहे ना! अहो पण बया नशीबवान आहे त्याला काय कराल?! :)
असो..
आपला,
(अटलजींचा प्रेमी) तात्या.
अनावश्यक
पुढे प्रियांका आहेच! तीदेखील आईच्या पावलावर पाऊल ठेवून पद्धतशीरपणे तयार होत आहे. तीदेखील गोरी चिकणीचुपडी आहेच! :)
काँग्रेस राहुलला पुढे करत असताना ही टिप्पणी अनावश्यक व आक्षेपार्ह वाटली.
पडद्यामागचं राजकारण..
काँग्रेस राहुलला पुढे करत असताना ही टिप्पणी अनावश्यक व आक्षेपार्ह वाटली.
काँग्रेस राहूलला पुढे करत आहे ही गोष्ट खरीच आहे. परंतु पडद्यामागचं राजकारण वेगळंच आहे. प्रियांका ही प्रचंड महत्वाकांक्षी असून एकिकडे तिचे आणि तिच्या गटाचे अंतस्थ राजकारण व्यवस्थित सुरू आहे. खुद्द प्रियांका आणि राहूल यांच्यात भावाबहिणीचं काहीही प्रेम नसून एकमेकात चढाओढ आहे असे कळते.
असो, खरं खोटं काय हे येणार्या काळात कळेलंच..
आपला,
(आतल्या गोटातला) तात्या.
आक्षेप
तीदेखील गोरी चिकणीचुपडी आहेच! :)
या वाक्याला आक्षेप होता. एकूण उल्लेख अनावश्यक.
एक चाचणी
प्रियांका ही प्रचंड महत्वाकांक्षी असून एकिकडे तिचे आणि तिच्या गटाचे अंतस्थ राजकारण व्यवस्थित सुरू आहे.
तात्यांच्या वरील प्रतिक्रीयेशी सहमत आहे. पण एका घटनेत मला प्रियांकाचे appreciation करावेसे वाटते. एक-दोन वर्षांपूर्वी बीबीसीच्या एका निवडणूकीच्या सुमारासच्या (कदाचीत बिहार का कुठल्याशा) मुलाखतीत, मुलाखतकर्त्याने तीला अनेक अडचणीत येणारे प्रश्न विचारले. त्यात प्रामुख्याने "हिंदूत्ववादी" आणि त्याला अनुसरून भाजपवर टि़का ती करेल असे प्रश्न होते. पण तीने कुठलीही वेडीवाकडी उत्तरे दिली नाहीत. तीचा रोख थोडासा "तो आमचा अंत्रगत मामला" आहे त्यात "तुम्ही बोलायचे कारण नाही" अशा पद्धतीचा होता. त्यात त्यांचे राजकारण दिसते असे म्हणू शकतो पण त्या ते करताच आहेत त्यामुळे नीट केले तर चांगलेच आहे. अशा पद्धतीने भारताबाहेर आल्यावर भारतातील विरोधकांविषयी परकीयांशी न बोलणारे मी भाजपचे काही नेते आणि तसेच पी.व्ही. नरसिं।हराव पण ऐकले आहेत.
वादरा
अहो ते प्रियंकाचे वाधरा घराणे संघाचे आहे.
- तथागत
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
रास्व
ह्यांच्या यूपी मधल्या घराच्या अंगणात संघाची शाखा भरायची.
त्यांनी मोठी जागा रास्व संघाला दान केलेली आहे.
- तथागत
--
|| बुद्धं सरणं गच्छामि || || संघं सरणं गच्छामि || || धम्मं सरणं गच्छामि ||
राजस्व
राजकारणात कुणी कुणाचे कायमचे शत्रु नसते किंवा कायमचे मित्र नसते. आमचे देव गुरुजी म्हणायचे जिकड घुगर्या तिकडं उदो उदो.[ घुगर्या - खाण्याचा एक पदार्थ]
॥ दंभं सरणं गच्छामि ॥
प्रकाश घाटपांडे
आवडले!
॥ दंभं सरणं गच्छामि ॥
एकदम पटले! :-)
राजकारणात कुणी कुणाचे कायमचे शत्रु नसते किंवा कायमचे मित्र नसते.
या संदर्भात इंग्रजीत कुणाचे तरी या अर्थी वाक्य आहे: "आंतरराष्ट्रीय राजकारणात कधी कुणाची मैत्री नसते अथवा शत्रूत्व नसते, असतात ते फक्त 'राजनैतिक संबंध'".
वा वा
वा वा किती महान ते की त्यांनी रास्व संघाला देखील दान केल. रास्व संघ पण महान की त्यांनी ते दान स्वीकार केल.
त्यांच्याकडून काहीतरी चांगल शिकूया.
आजकाल कोणाचा भरवसा राहीला नाही बघा तथागत मंडळी हे पण करतात ते पण शिवाय अजून काय काय करतात्.
वद जाऊ कुणाला शरण!
सामर्थ्यवान!
सामर्थ्यवान म्हणजे काय याचे उत्तर तात्यांनी त्यांच्या प्रतिसादात दिलेच आहे.
याशिवाय सोनीया गांधींनी पंतप्रधानपद नाकारून खेळलेली चालही अप्रतिम होती. हजार वेळा राजकारण संन्यास घेऊन नंतर पंतप्रधानपदाच्या हाडकाभोवती शेपूट हलवणार्या आणि "मी नाही त्यातली... " प्रकार करणार्या अटल-लालकृष्ण जोडीपेक्षा ही पद झिडकारणारी मनमोकळी बाई त्यागाचे संस्कार झालेल्या भारतीयांना भावली यात नवल ते काय?
सोनीया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करण्याची प्रतिज्ञा करणार्या सुषमा स्वराज-उमा भारती यांच्या आक्रस्ताळी जोडीपेक्षा सर्व प्रश्न सामंजस्याने व सम्यकपणे हाताळणार्या सोनीया गांधी सामर्थ्यवान नाहीत हे पटणे अशक्य आहे.
जगातील ६०० कोटींपैकी १०० कोटी लोकांच्या राजकारणावर प्रभाव असणारी व्यक्ती सामर्थ्यवानच आहे! सोनीयांच्या राजकारणाबद्दल मतभेद असतील पण त्यांना सामर्थ्यवान मानावेच लागेल.
जियो..
प्रतिसाद आवडला.. पूर्णपणे सहमत!!
हेच म्हणतो !
प्रतिसाद आवडला.. पूर्णपणे सहमत!!
अतिरंजित
हजार वेळा सन्यास, शेपूट, मी नाही त्यातली हे जरा अतिरंजित वाटते. पद झिडकारणारी मनमोकळी बाई वगैरे काहीतरीच :)
माझे मत...
खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का?
हा प्रश्न खरा चर्चेचा आहे असे मला वाटते. बाकि, सोनिया गांधी, कॉंग्रेस आणि इतर मुद्दे हे नेहमी प्रमाणे वादाचे वा चघळायचे मुद्दे आहेत.
तर या प्रश्नाचे उत्तर मी नाही असेच देइन. आता या नाही या उत्तरातच अनेक राजकारणी मुद्दे आहेत. पण माझे स्वतःचे मत नाही हेच आहे. मुळातच वर लिहिलेले मुद्दे बरेच काही सांगुन जातात. जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या राष्ट्रांची भारताबरोबर तुलना करू, त्यात भारत आत्ता कितवा आहे? या देशांच्या देशाभिमानी जनतेचे राजकिय मन आणि भारतीयांचे यात तुलना होउ शकते का? कार्य हि तर फार दुरची गोष्ट आहे. मागे एका चर्चेत मी स्वानुभव लिहिला होता. ते आत्ता परत लिहितो. एका वाहन चालकाला सोनिया गांधी या महात्मा गांधीजींच्या कुटुंबीय वाटत होत्या आणि म्हणून त्यांना त्या भावतात. असो, तर अशा भारतीयांवर त्या सम्राज्ञानी म्हणून राज्य करत असतील तर सहावा का? मी त्यांना शुन्य वा (पहिल्याच्या ही आधिचा) नंबर देइन.
बाकि फोर्ब्सची यादी, काँग्रेसचे निधर्मी तत्व, आजची रामसेतु बद्दलची बातमी असे अनेक मुद्दे विचार करून जोडले तर काहि निरिक्षणे मांडता येतील का? पण मांडायला गेले तर लगेच त्याला धर्म युद्धाचा रंग येइल. बाकि ज्यांना सोनियांच्या निर्णयाची, निर्णय क्षमतेची झळ बसत नाहित अश्या लोकांनी भारतात येउन चर्चा कराव्यात हि नम्र विनंती.
फोर्ब्सच्या पुढच्या यादी बद्दलचे आमचे भाकितः सोनिया गांधी यांचे नाव यादित नसेल. पण जागतिक पातळीवर नव्या भारतीय कुमारिकेचा उदय आणि तो सुद्धा सहाच्या वरच्या नंबरला असेल.... मायावती....
मराठीत लिहा. वापरा.
सोनिया
त्यांना आर्थीक विषमतेची काळजी वाटते
हो का? छान आहे. यांच्या सासूबाईंनाही वाटत होती आणि ती नष्ट करण्याचे आश्वासन दर निवडणुकीत देण्याची परंपरा बाई समर्थपणे चालवत आहेत.
त्यांचा परदेशी गुंतवणूकीस चालना देणार्या विशेष आर्थिक भाग (स्पेशल इकॉनॉमिक झोन्स) तयार करण्यास विरोध आहे
अरे हे नवीनच ऐकतोय.
त्यांना शेतकर्यांची काळजी आहे
हा हा हा ! हो आहे ना राज्यात आणि देशात यांची सत्ता असताना शेतकर्यांची काळजी वाढली हे खरेच.
विसोबा खेचर यांनी लिहिले "अजून एक गोष्ट स्पष्टच सांगायची तर तिच्या गोर्या कातडीचाही मोह नाही म्हटला तरी कॉग्रेसजनांवर पडला, असं मला वाटतं!"
अहो हे खरेच आहे. हा मोह आधी राजीव गांधीला पडला. हमे देखना है | हमे करना है | म्हणत म्हणत इटलीला जाऊन हे करून आला. इतर काँग्रेसजन राजीवच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे गेले (म्हणजे नक्की कुठे गेले?) तर त्यात वावगे ते काय?
हहलोपो..:)
अहो हे खरेच आहे. हा मोह आधी राजीव गांधीला पडला. हमे देखना है | हमे करना है | म्हणत म्हणत इटलीला जाऊन हे करून आला.
ह ह लो पो! :))
आपला,
(बाईलवेडा!) तात्या.
प्रतिसाद
गेल्या निवडणुकीच्या वेळी भारतीय संस्कृतीचा उठताबसता उदोउदो करणार्या पक्षांना एका स्रीला कसे संबोधावे हे कसे काय समजत नाही हा वेगळाच प्रश्न अशिक्षित लोकांना पडला होता. त्यामुळे वरील काही प्रतिसादात दिसणारी वाक्यरचना भाषणात वापरल्यानंतर खेड लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकर्यांच्या सभेतून शेकडो महिला उठून गेलेल्या याचि डोळा पाहिले आहे. झक मारली आणि बाळासाहेबांना बोलावले असा वैताग नंतर व्यक्त करणारे शिवाजीराव आढळराव केवळ मतदारांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याने निवडून आले.
तेराव्या लोकसभेच्या पूर्वीपासूनच "ही माझी शेवटची निवडणूक" असे सांगणारे अटलजी नंतर दोन-तीन वेळा लोकसभेला उभे राहिले व निवडूनही आले. बाबरी मशीद पाडण्याचे व्हिडिओज आम्ही बजरंग दलाच्या आमच्या मित्रांसोबत बघितले होते. त्यात साध्वी(!) ऋतंभरा, उमा भारती यांच्या जोडीने मुसलमानांना, जीनांना व पाकिस्तानला घाऊक शिवीगाळ करणारे लालकृष्ण साहेब नंतर पाकिस्तानला जाऊन जीनांची दाढी कशी कुरवाळून आले तेही बघितले. आणि आता इतके दिवस ज्यांना डोक्यावर घेऊन नाचले ते नरेंद्र मोदी कसे डोईजड झाले आहेत हेही दिसत आहे.
सांगायचा मुद्दा असा की सगळे राजकीय पक्ष एकजात नालायक आहेत कोणी डावा-उजवा नाही.
पण या सर्वांच्या तुलनेत सोनीयांचे प्रगल्भ व्यक्तिमत्व, समजूतदारपणा उठून दिसत नाही का?
सहमत
सांगायचा मुद्दा असा की सगळे राजकीय पक्ष एकजात नालायक आहेत कोणी डावा-उजवा नाही.
पण या सर्वांच्या तुलनेत सोनीयांचे प्रगल्भ व्यक्तिमत्व, समजूतदारपणा उठून दिसत नाही का?
आजानुकर्ण यांच्याशी सहमत आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सहमत
पण या सर्वांच्या तुलनेत सोनीयांचे प्रगल्भ व्यक्तिमत्व, समजूतदारपणा उठून दिसत नाही का?
सहमत.
एकजात नालायक आहेत कोणी डावा-उजवा नाही.
चला एकजात (राजकारणी) नालायक आहेत कोणी डावा-उजवा नाही. भारतीय राजकारणातले सगळे एका माळेचे मणी समजूया
आणी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी येथेच थांबवूया.
शक्यतो अराजकीय प्रतीसाद व चर्चा असे स्वरूप यापूढे ठेवूया.
कम ऑन वुई कॅन शुअर्ली डू बेटर दॅन धीस्!
सांगायचा मुद्दा
सांगायचा मुद्दा राजकीय पक्षांचा नालायकपणा नसून
पण या सर्वांच्या तुलनेत सोनीयांचे प्रगल्भ व्यक्तिमत्व, समजूतदारपणा उठून दिसत नाही का?
हे वाक्य आहे. भारतातील सामान्य जनतेने (किंवा तुम्हाला समजत नसेल तर आधुनिक मराठीत आम जनतेने असे म्हणूया) सोनियांचे नेतृत्व मान्य केले असेल वा नसेल. पण त्या संपूर्ण भारतीय आहेत हे नक्कीच मान्य केले आहे. शिवाय त्यांचा राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती अशी महत्वाची पदे निवडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे फोर्बसची निवड योग्यच आहे. उलट इंद्रा नूयींपेक्षाही सोनिया अधिक प्रभावशाली आहेत असे वाटते.
भरकटते आहे
चर्चा भरकटते आहे.
विकास यांनी आपल्याला विचारले आहे कि "खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का?"
येथे तिच तिच राजकिय चर्चा करण्यापेक्षा सोनियांची तुलना या आंतरराष्ट्रीय पातळीच्या प्रभावी स्त्रियांसोबत करून त्या खरच सहाव्या क्रमांकाला लायक आहेत का? याची चर्चा करू. तसे राष्ट्रपती पदाची निवडणुक आणि जर लवकरच लोकसभा निवडणुका झाल्यास मायावतींचा हत्ती सगळ्यांना नामोहरम करणार आहे असे अनेकांचे भाकित आहे. मग जगातील ६०० कोटींपैकी १०० कोटी लोकांच्या राजकारणावर प्रभाव असणारी व्यक्ती कोण असणार आहे हे वेगळे सांगावे लागेल असे वाटत नाही.
तसेच, काँग्रेसच्या हातात यावेळी सत्ता का आली? ती त्यावर खरी पकड कोणाची आहे? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मायावतींची भुमिका. या अशा अनेक मुद्यामध्ये सोनियांचे बळ/कुवत कुठे आहे? थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीला सहावा क्रमांक देण्यासाठी एवढे काय खास आहे त्यांच्यात?
अवांतरः ९० च्या दशकात अचानक जगाला साक्षात्कार होउन सगळ्या सौदर्यवती भारतातच आहेत असे वाटु लागले.
मराठीत लिहा. वापरा.
अवांतर २
अवांतरः ९० च्या दशकात अचानक जगाला साक्षात्कार होउन सगळ्या सौदर्यवती भारतातच आहेत असे वाटु लागले.
व्हेनेझुएला कितीशी मोठी बाजारपेठ आहे?
इथे संदर्भ: फोर्बसे भारतात कितीसे वाचक आहेत ज्यांमुळे त्यांना आर्थिक फायदा होतो, होऊ शकतो? अशा क्रमवारीने त्यांच्या मान्यतेवर (जी अर्थिक लाभासाठी आवश्यक आहे असे मानूयात) कसा फरक पडतो?
प्रश्न
प्रश्न जागतिक स्तरावर होणार्या प्रसिद्धीचा आहे. भारताकडे ब्रिटिशांनी कच्चा माल पुरवणारा देश आणि परत तिच जागा बाजारपेठ असे पाहिले होते नाही का? आजच्या घडीला जगातले विकसित देश भारताला बाजारपेठ मानत आहेत हे रोज ऐकायचे सत्य आहे.
भारताच्या नावाचा आणि भारताच्या परिस्थितीचा जगातल्या विकसित देशांनी आजवर हवा तो वापर केला आहेच. आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे एवढे पुढे का आले बरे? (तसा चर्चेचा विषय आहे. येथे पुढे सुरु झाले तर विषयांतर होइल.)
मराठीत लिहा. वापरा.
कर्तृत्वशून्य !
हा चर्चेचा विषय होणे आणि या चर्चाविषयावर प्रतिसाद देणे हीच मोठी नामुष्कीची बाब आहे असे मला वाटते.
चर्चेचा विषय असलेली व्यक्ती पूर्णपणे कर्तृत्वशून्य असून तिचे या ठिकाणी पोचण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य भारतीयांचे मानसिक मागासलेपण हे आहे.
भारत राजेशाही मानसिकतेतून साठ वर्षानंतरही बाहेर पडलेला नाही याची उदाहरणे पावलोपावली दिसतात. त्याचे सर्वात उघड आणि प्रच्छन्न प्रदर्शन ते हेच - कोणतीही अनुभवसंपन्न, विचारसंपन्न पार्श्वभूमी नसलेली एक व्यक्ती जगातील शंभर कोटी लोकांचे भवितव्य हस्ते-परहस्ते ठरवू शकते. कारण बहुसंख्य भारतीय स्वकर्तृत्वावर ताठ मानेने न जगता कोणीतरी फेकलेल्या तुकड्यांवर जगत असतात.
किंबहुना माणसाला तसे ताठ मानेने जगता येऊ नये यासाठी काही यंत्रणा काम करत असावी अशी शंका येते.
विलक्षण सहमत
सोनिया गांधी सामर्थ्यवान आहेत हे मी नाकारता येत नाही म्हणूनच स्विकारतो आहे. आजच्या घडीला तरी त्यांना कोणी डावलू शकत नाही. अर्थातच काँग्रेसची सत्ता असल्यामुळे.
राजीव गांधींची बायको या खेरीज बाईसाहेबांच काय कर्तृत्व आहे? जे काही घडतय तो गांधी आडनावाचा करिष्मा आहे. आणि वर कुणीतरी सांगितल्याप्रमाणे अजूनही इंदिरा गांधींच्या नावावर मते देणारी भारतीय जनता आहे तोपर्यंत हे असंच होणार.
युरोपातील किंवा अमेरिकेतील नेत्या वाडवडीलार्जित पूर्वपुण्याईवर पुढे आलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यांच विशेष कौतुक वाटत.
अवांतरः
पण स्त्रियांनी असं काही केलं तर त्याचा एवढा बाऊ करणे किंवा आश्चर्यचकित होणे म्हणजे पुरुषप्रधान मानसिकतेच लक्षण आहे. एखादी स्त्री राष्ट्रपती होते ही सहज वाटण्यासारखी गोष्ट असली पाहीजे.
अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.
सापेक्ष
कर्तृत्व ही सापेक्ष गोष्ट आहे.
भारतात कीटकनाशकयुक्त फसफसलेल्या द्रवपदार्थाची विक्री करणार्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्या पदावर पोचणे व त्या कंपनीचे आरोग्यास हानीकारक असे द्रवपदार्थ - खाद्यपदार्थ जगभर भरमसाट विकले जाणे व पुढे ती व्यक्ती जगातील पाचवी प्रभावशाली महिला होणे हे संपूर्ण मानवजातीच्या आरोग्यविषयक समजुतींच्या मागासलेपणाचे लक्षण आहे.
असेही म्हणता येईल.
त्यामुळे मॅडमचे कर्तृत्व काहीही असो. नि:संशय त्या प्रभावशाली आहेत.
वडाची साल पिंपळाला
कर्तृत्व ही सापेक्ष गोष्ट आहे.
- कोणत्याही व्यक्तीचे अनुभवसंपन्न आणि विचारसंपन्न असणे हे सापेक्ष कसे? काँग्रेसमध्येच असे अनेक नेते होते / आहेत की जे त्या पक्षातील सर्वोच्च पदासाठी लायक होते/ आहेत. (उदा. शरद पवार!) शैक्षणिक जीवनातील राजकारण, समाजकारणापासून ते राष्ट्रीय पातळीवरील राजकारणापर्यंत प्रवास केलेले अनेक कर्तृत्ववान नेते तिथे आहेत. ख्रिश्चन धर्मीय मार्गारेट आल्वाही त्यादृष्टीने कर्तृत्ववान आहेत. परंतु सत्ताकेंद्र कधीही त्यांच्याकडे जाणे शक्य नाही.
कीटकनाशकयुक्त फसफसलेल्या ....प्रभावशाली महिला होणे
- ते श्रीमती नूयी यांचे कर्तृत्व आहे. त्यांनी जाणतेपणी योग्य शिक्षण घेतले, कार्यक्षेत्र निवडले, त्यात प्रयत्न केले आणि त्यांच्या कंपनीला यश मिळवून दिले.
याउलट उपरोक्त व्यक्तीचे शिक्षण अंधारात आहे, सदर व्यक्तीला राजकारण नको होते, तिला त्याचा गंधही नव्हता, त्यात प्रयत्न करण्याची गरज पडली नाही, गरज होती तेंव्हा त्यांनी स्वतः समजून , विचार करून बोलण्याची तसदी घेतली नाही आणि त्यांच्या पक्षाला यशही मिळाले नाही. त्यांच्या पक्षाची लोकसभेतील संख्या आजवर सर्वात कमी आहे. हेच कर्तृत्व काय?
तसेच त्यांच्या आगमनामुळे काँग्रेस पक्षातील मरगळ दूर झाली असे जर कुणाला वाटत असेल तर ते "मालक घरी नाही म्हणून अंग टाकून पडलेल्या कुत्र्याने मालकाची वहाण वाजताच कान झाडत उठावे" तसे आहे. 'वाट्टेल तेवढे खाऊन घ्या' असे धोरण असणारे सरकार आल्यावर सगळी कोल्ही कुत्री तुटून पडणारच!
संपूर्ण मानवजातीच्या आरोग्यविषयक समजुतींच्या मागासलेपणाचे लक्षण
- असेलही कदाचित. पण त्यामुळे समस्त समाजाचे नुकसान होते असे ऐकीवात नाही. राजेशाही मानसिकतेमुळे भारताचे पदोपदी नुकसान होत आले आहे आणि यापुढेही होईल.
अवांतर : कोणत्याही राजकीय पक्षात भ्रष्टाचार, गुंडगिरी करून अथवा आईबाप किंवा नवर्याच्या पुण्याईवर पुढे येणार्या नेत्यांना माझा विरोध आहे. असेच नेते भारतात बहुसंख्य आहेत हे सत्य आहे.
सहमत
प्रतिसाद आवडला....
एक निरिक्षण कदाचित चुकीचे असेल सुद्धा... सोनिया गांधींना कधी हि कोणत्या समोरासमोर करायच्या चर्चेत सहभाग घेताना पाहिले नाही. जर मी चुकीचा असेन तर कृपया निदर्शनास आणुन द्यावे हि विनंती...
मराठीत लिहा. वापरा.
इतकेच काय?
इतकेच काय? - पण त्या कोणत्याही शिष्टमंडळातून इतर देशांना भेट देतात तेंव्हा तेथील नेत्यांशी काय बोलत असतील असा भयंकर प्रश्न पडतो....
गल्लत
कर्तृत्व-विचारसंपन्न व अनुभवसंपन्न असणे यात गल्लत होत आहे असे वाटते. सुरुवातीला सगळेच नेते नवखे असतात. राजीव गांधींनीही जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यावर अनुभव या निकषाद्वारे टीका करणारे लोक होतेच. इंदिरा गांधीनाही "गुंगी गुडिया" म्हणून सुरुवातीला हिणवण्यात आले होते.
लोकशाहीत सुदैवाने वा दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीच्या लायकीपेक्षा ती व्यक्ती सर्वमान्य असणे महत्त्वाचे ठरते. शरद पवार यांच्यापेक्षा सोनिया गांधी या मुद्द्यावर सरस ठरल्या.
सोनिया गांधी केवळ ख्रिश्चन आहेत म्हणून त्यांना समर्थन देणारे लोक अयोग्य विचार करत आहेत असेच मी मानेन. त्यामुळे मार्गारेट अल्वांशी त्यांची तुलना होऊ नये.
राजकारणात यश मिळवण्यासाठी शिक्षणाचा काही आधार लागत नाही. किंबहुना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (की वसंतराव नाईक) हे केवळ चौथी पास होते असे ऐकले आहे. आमच्या आंबेगाव मतदारसंघाचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे किसनराव बाणखेले हे दहावी पास होऊ शकले नाहीत. पण त्यांनी १६ वर्षे आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
इंडिया शायनिंगचा आक्रमक प्रचार होत सताना काँग्रेस पक्षाला मागील निवडणुकीत यश मिळवून देणे हे देखील त्यांचे कर्तृत्व नाही का? सोनिया गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी सुस्त असलेल्या काँग्रेस पक्षात नवीन प्राण फुंकण्याचे कामही सोनियांनीच केले आहे. येथे काँग्रेस पक्षाची त्या वेळेची परिस्थिती ध्यानात घ्या. ती निवडणूक कॉंग्रेस जिंकेल असे कोणीही मान्य केले नसते.
राजेशाही मानसिकतेमुळे भारतीय समाजाचे नुकसान होत आहे हा मुद्दा मान्य आहे. मात्र केवळ सोनिया गांधी त्याला जबाबदार नसाव्यात. बाळासाहेब ठाकर्यांनंतर उद्धव ठाकरे, प्रमोद महाजनांनंतर राहुल महाजन, देवेगौडांनंतर कुमारगौडा, करुणानिधींनंतर स्टॅलिन असे सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
कर्तृत्व : त्यांचे यांचे - रामचंद्र कह गये सियासे
इंदिरा गांधी
-परदेशी बाहुली जाळली, वडिलांबरोबर पर्यटन, समाजवादाबरोबर चुंबाचुंबी - बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थान तनखे रद्द, पुढे समाजवाद्यांशी हातघाई - जे.पी., आणीबाणी, प्रचंड भ्रष्टाचार.(१९७१ युद्ध जिंकले हे कर्तृत्व..पण हरले असते तर?)
राजीव गांधी
-मेरा भारत (उगीचच) महान, सॅम पित्रोदा, कॅ. सतिश शर्मा यासारख्या कन्सल्टंटस् मुळे आय्.पी.के.एफ्. पचका. पुढे बोफोर्स.
वसंतदादा पाटील
तासगाव कचेरीवर झेंडा लावला. खजिन्याची लूट. पायात गोळी. तुरुंगवास.साठ वर्षे समाजकारण.
इंडिया शायनिंग
-आम आदमी को क्या मिला? (आणि आता या लुळ्यापांगळ्या सरकारमुळे क्या मिला? राखेचा तोबरा? )
ती निवडणूक कॉंग्रेस जिंकेल
-एन्.डी.टी.व्ही. आणि कं. - दोन महिने सातत्याने निवडणूक भाकिते - भाजपा- ३२५ ते भाजपा - १४०. पद्धतशीर खच्चीकरण.
(आता त्याच दाढीवाल्याला धत्तुरा - सरदेसाईचे आय्.बी.एन. जवळचे आहे.)
तुमचे किसनराव बाणखेले खरे कर्तृत्ववान म्हणायला हवेत.
काही म्हणा- "हंस चुगेगा दाना तिनका, कौवा मोती खाएगा" सत्यात उतरले आहे.
अवांतर : मुळात राम झालाच नाही असे कालच ऐकले - आज मात्र होऊन गेला असे ऐकतो ;)
गल्लीत
हे मात्र खरे. ही मान्यता संख्या बळावर ठरते. किति डोकी? येथे बहुसंख्यांनी अग्नि थंड आहे असे म्हणले कि प्रत्यक्ष अनुमान गौण ठरते.
हे वसंतदादा पाटीलच .व्यापक जनसंपर्क, जनमानसाची अचुक पकड.( हा जनमानस आपल्या मतदार संघातला असला पाहिजे यावर विशेष लक्ष) किसनराव तर आपला तळागाळातला माणुस्. वाड्या तोड्या, सगे सोयरे, लोककलावंत यांना जपणारा. खेड,मंचर , नारंग्गाव, टापु संभाळून घेणारा.साधेपणाच पण राजकारण करता आल पाहिजे. (किसनराव निवडुन आले कि गावाला टार रोड होणार ही श्रद्धा मी बाळगून होतो)
प्रकाश घाटपांडे
काही ऐकलेले
वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन, - आत्ता तरी इतकेच राजकारणी आठवताहेत (अजूनपण असे समाजकारणी माहीत आहेत पण चर्चा भरकटेल) मुद्दामून मराठी व्यक्तींपुरते मर्यादीत ठेवतो:
यांच्यातील प्रत्येक व्यक्ती कुठल्याही माणसास भेटली की त्या माणसास नंतर परत भेटल्यावर पण नावानिशी ओळख देयची/देत, जवळीक साधायची/साधते. तसं पहायला गेल तर लहान गोष्ट आहे पण जनसंपर्क हा राजकारण्यांचा ठेवा असतो. मला शंका आहे असे जवळीकीचे संबंध सोनीयाजींचे करू शकतील का? यातील प्रत्येकाचे राजकारण वेगळे असेल प्रत्येकाचे १००% कुणाला आवडेल अशातला भाग नाही १००% आवडत नसेल तरी ते एकांगी विचार वाटतील. प्रमोद महाजन तुर्त बाजूस ठेवा आणि वर उल्लेखलेले काँग्रेसवाले पहा पण गंमत पहा यातील प्रत्येकास त्यांच्याच माणसांकडून कधी पाठींबा मिळाला नाही. पण हीच विरोध करणारी माणसे दिल्लीत जे काही होईल ते अगदी शिस्तीने पाळतील...
थोडक्यात त्या मोठ्या आहेत का या पेक्षा, आपले देशभरातील सरदार, जहागीरदार आपापसात लढायचे आणि इतरांसमोर कुर्निसात करायचे. आज इतक्या वर्षांनी चित्र फार बदलेले वाटत नाही. मला मधूकर तोरडमल यांचे "गोष्ट जन्मांतरीची" हे नाटक आठवले...
अजून एक गोष्ट - वरील चर्चा चालू करताना मी काही इंदिरा नुयीचा क्रमांक बरोबर वगैरे बोलत नव्हतो. पण चाणक्यांनी म्हणल्याप्रमाणे १९९० मधे अचानक अनेक भारतीय स्त्रीया विश्वसुंदर्या झाल्या आणि सौंदर्यसाधने विकणार्या आंतर्राष्ट्रीय कंपन्यांना भारतात बाजारपेठ गावली...
काठावर पास
अँगला मर्केल असोत किंवा कोंडोलिझा राइस या आपापल्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर अग्रेसर आहेत. आपापल्या क्षेत्रातील अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करून त्या उच्चपदाला पोहोचल्या आहेत.
राजकाराणाचा आणि समाजकारणाचा यत्किंचितही गंध नसलेल्या सोनियांना काँगेसचे अध्यक्षपद का दिले गेले याचे समाधानकारक उत्तर कोण्याही काँग्रेसवाद्याने दिलेले नाही. ज्यांच्या आयुष्यातील बहुसंख्य वर्षे परदेशात आणि भारतात असतानाही राजेशाही सुखसोयींमध्ये गेली आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांच्या अडचणींची, समस्यांची माहिती असेल आणि माहिती दिली तरी काही सोयरसूतक असेल अशी अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. यात त्यांचा काही दोष नाही, जशी ज्यांची जडणघडण तसे त्यांचे आचारविचार हा तर निसर्गनियम आहे.
तात्पर्य हे की आडनावाव्यतिरिक्त काहीही कर्तृत्व नसताना पद मिळाले पण त्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांचे प्रगतीपुस्तक पाहता "काठावर पास" असेच म्हणावे लागेल.
आपला
(विश्लेषक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
कोंडोलिझा राइस
कोंडोलिझा राइस या आपापल्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर अग्रेसर आहेत.
राईस ऍन्ड फॉल हा लेख आपले मतपरिवर्तन करू शकतो.
कोंडोलिझा राईस
विकी ज्ञान कोषावर कोंडोलिझा राइस यांच्याविषयी पुढील माहिती मिळाली,
पॉलिटिकल सायन्स या विषयात बीए, त्याच विषयात पुढे एमए. काही काळ सरकारात उमेदवारी. वयाच्या सव्विसाव्या वर्षी पॉलिटिकल सायन्स या विषयात पीएचडी! पुढे स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात प्राध्यापकी. तिथल्या वरिष्ठांकडून बुद्धिमत्तेचे आणि कठिण प्रसंगांना सामना करण्याच्या कौशल्याचे कौतुक.
पुढे सरकारदरबारी परराष्ट्रधोरणाशी संबंधित विभागात काम. शीतयुद्ध आणि जर्मनी एकत्रिकरणाच्या महत्त्वपूर्ण काळात "सिनियर डायरेक्टर ऑफ सोव्हिएट अँड इस्ट युरोपियन अफेअर्स" हे अत्यंत जबाबदारीचे पद सांभाळले. पुढे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अतिशय महत्त्वाचे, जोखमीचे आणि जबाबदारीचे पद सांभाळले.
ही त्यांची पार्श्वभूमी पाहता परराष्ट्र सचिव पदापर्यंतची त्यांची वाटचाल ही अगदी पहिल्या पायरीपासूनची आहे हे पटण्यात अडचण येऊ नये. त्यांचे निर्णय, धोरणे कितपत व्यवहार्य आणि पटण्यासारखी आहेत हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकेल पण या पदापर्यंत पोचण्याची पात्रता त्यांच्यात निश्चित आहे हे वरील माहितीने साधार सिद्ध होते.
राष्ट्राध्यक्षांशी असलेली जवळीक राइस यांच्या पदोन्नतीला अनुकूल ठरली असा एकंदर तुम्ही दिलेल्या लेखाचा सूर आहे. पण सोनिया गांधी यांना तर फक्त आणि फक्त आडनाव आणि घराणे यामुळेच काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.
आपला
(साधार) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
कुशल राजकारणी
सोनिया गांधी शक्तिशाली आहेत की नाहीत हा वादाचा मुद्दा असू शकतो, परंतु त्या धुर्त (माफ करा कुशल) राजकारणी मात्र नक्कीच आहेत. त्यांचे पंतप्रधान पदाच्या त्यागाचे नाटक तर निव्वळ अप्रतिम होते. प्रतिभा पाटील, मनमोहन सिंग, शिवराज पाटील, प्रणव मुखर्जी इत्यादी जनाधार नसलेल्या किंवा स्वतःच्या राज्यातही निवडून येण्याची क्षमता नसलेल्या व काहीही न्यूसन्स् वॅल्यू नसलेल्या माणसांना त्यांनी जाणीवपूर्वक महत्त्वाच्या पदांवर बसविले आहे.
गेल्या निवडणूकीत लोकांनी काँग्रेसला बहूमताने निवडून दिलेले नाही. त्यातही जिंकलेल्या बर्याच मतदारसंघात ऍन्टी इनकंम्बन्सीचा फायदा या पक्षाला झाला. उत्तर प्रदेशचे उदाहरण तर ताजेच आहे. तेथे शक्तिशाली सोनियांचा करिष्मा कामास आला नाही.
राष्ट्रीय स्तरावर पक्षांतर्गत प्रभावी नेतृत्व तयार होणार नाही याची त्या पुरेपूर काळजी घेतात. इतकेच काय प्रादेशिक स्तरावरही कूणी एक नेता प्रबळ होणार नाही याची सुद्धा त्या सोय करतात. एकूणच त्या काँग्रेस पक्षामध्ये निर्विवाद आणि काँग्रेसची सत्ता असल्याने भारतात व भारताच्या वाढत्या प्रभावाने जगात सामर्थ्यवान ठरल्या असाव्यात. (ह. घ्या)
- जयेश
सहमत
मुद्दे पटण्यासारखे आहेत.
मुद्दे पटणारे आहेत पण -
जयेशराव
मुद्दे पटणारे आहेत पण असे असूनसुध्दा काँग्रेसमधे पर्याय आहेत का ? नेतृत्वाचे कोणतेही पर्याय नाहीत. असले तरी राहूल,प्रियंकाशिवाय तरी दुसरे कोणी नाही.
जनतेच्या मनात आता 'सोनिया' च्या संबंधी भारतीय प्रतिमा आहे, ती अगदी 'इंदिरा गांधी' प्रमाणे आहे इथपर्यंत.
आता हे डावे इतके छळतात पण आहे का कुठे प्रतिक्रिया काही ? नाही . अगदी शांतपणे पक्षाचा आणि देशाचा संसार नेटाने चालवताहेत.
इतर प्रतिसादात चर्चा झाल्याप्रमाणे इतर पक्षातील नेतृत्वासाठी लाथाळ्या चालू असतांना सर्व सम्मतीने इतक्या मोठ्या ऐतिहासिक पक्षाचे अध्यक्षपद सांभाळणे म्हणजे ही मला तरी मोठी गोष्ट वाटते.
वारसा
चर्चेमध्ये गांधी कुटुंबाचा मुद्दा आला होता. सुदैवाने किंवा दुर्दैवाने जगभरच्या राजकारणात वारसाहक्काची परंपरा दिसून येते. सीनीअर बुश राष्ट्राध्यक्ष नसते तर जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष झाले असते काय?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
ठाकरे
अलीकडे ठाकरे हे आडनावही बर्याच जागी ऐकू येते.
सहमत
सहमत आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.