सोनीया क्रमांक सहा...

:

आज फोर्बस् साप्ताहीकाची जगातील सामर्थवान महीलांची वार्षीक यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात अमेरिकन कॉन्डोलिजा राईस या चौथ्या क्रमांकावर आहेत "पेप्सीकन" इंद्रा नूयी पाचव्या क्रमांकावर तर "इटालीयन/भारतीय" सोनीया गांधी या पहील्या शंभर बायकांमधे सहाव्या क्रमांकावर आहेत. देशात आज त्या "पॉवरफूल" आहेत या बद्दल वाद नसावा पण जगातील ठरण्या इतक्यात्या खरेच आहेत का, की हा पण त्यांना प्रसिद्धी देण्याचा परकीय प्रयत्न असा प्रश्न पडतो.
त्यांच्या बद्दल लिहीताना हे साप्ताहीक खालील गोष्टी लिहीते

  1. त्यांच्यामुळे प्रतिभा पाटील या पहील्या महीला राष्ट्राध्यक्ष झाल्या
  2. त्यांना आर्थीक विषमतेची काळजी वाटते
  3. त्यांचा परदेशी गुंतवणूकीस चालना देणार्‍या विशेष आर्थिक भाग (स्पेशल इकॉनॉमिक झोन्स) तयार करण्यास विरोध आहे
  4. त्यांना शेतकर्‍यांची काळजी आहे

यातील काही गोष्टी वृत्तपत्रात देखील वाचल्या आहेत. पण त्या जेव्ह्ढे बोलल्या त्याप्रमाणे नंतर खरेच पावले उचलली गेली की ही केवळ शाब्दीक (म्हणून दिखाऊ) सहृदयता आहे? कृपया हा (पक्षीय) राजकारणाशी संबधीत प्रश्न म्हणून नाही तर खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा, कॉन्डोलिजा राईस, सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का हा प्रश्न आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

यावरून आठवले

ह्या चर्चेत बरेच प्रतिसाद आलेत. मुद्दे संकलीतच करायचे तर थोडक्यात असे म्हणता येईल की सोनीयांच्या सध्याच्या सामर्थ्याविषयी कुणालाच शंका नाही. जर थोडेफार फरक असतील तर ते सामर्थ्य इतकी प्रसिद्धी मिळण्यासाठी योग्य आहे का नाही हे. त्यांच्या प्र्भावापेक्षा त्यांचा अभाव काही जणांना आवडेल तर काहींना उलटे...मला स्वतःला सोनीया गांधीना मिळणारे महत्व मान्य नाही. कारणे त्या केवळ परकीय म्हणूनच नाही तर काँग्रेससारख्या पक्षात अनेक राजकारणी असून देखील जीचे लग्नाआधीचे काम "बेबीसीटर" की काय होते, अशा व्यक्तीकडे भारतासारख्या राष्ट्राची सुत्रे देणेपण अयोग्य वाटते. त्या पण कुठल्यातरी अदृश्य हातातल्या कटपुतळी असू शकतात असे वाटते. स्वतःचे कोते स्वार्थ टिकवण्यासाठी काँग्रेसजनांना अशा बाईला मधे ठेवावे लागते यात काँग्रेस हा किती "पथेटीक" पक्ष झाला आहे हे समजते, आणि यांनी म्हणावे की आम्ही लोकशाहीचे भोक्ते. साधी पक्षात लोकशाही आणता येत नाही तर देशात काय राबवणार (एक म्हणतो की संजय दत्त साठी आम्ही कोर्टात जाऊ, दुसरा म्हणतो सलमान चांगला आहे त्याला अशी शिक्षा होणे बरोबर नाही!)

अर्थात हे बोलत असताना एकंदरीत भारतीय राजकारण्यांवर अटलजींनी लिहीलेली खालील कविता आठवली तो आपल्या सर्वच भारतीय राजकरणी वृत्तीचा आणि जनतेच्या स्थितीचा सारांश वाटतो:

कौरव कौन
कौन पाण्डव,
टेढ़ा सवाल है |
दोनोँ ओर शकुनि
का फैला
कूटजाल है |
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है |
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है |
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,
रंक को तो रोना है |

का बरं?

जीचे लग्नाआधीचे काम "बेबीसीटर" की काय होते, अशा व्यक्तीकडे भारतासारख्या राष्ट्राची सुत्रे देणेपण अयोग्य वाटते.

बेबी सिटींग करणे म्हणजे काय गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे आहे काय? की बेबी सिटींग हे 'हलक्या' प्रतीचे काम आहे?? आणि म्हणून अश्या व्यक्तिने भारताचे नेतृत्व करू नये?
लग्नाआधी ह्या बाई बेबीसिटींग करत होत्या का कुणाच्या घरी भांडी घासत होत्या ह्याचा त्यांच्या आताच्या करतृत्वाशी कसा काय संबध लावला जाऊ शकतो?
एकेकाळी पेपर टाकून पुढे कुशल नेतृत्व गाजवणार्‍यांची उदाहरणे काय कमी आहेत का?

सोनिया गांधी ह्या त्यांना मिळालेल्या सामर्थ्यासाठी पात्र आहेत का नाहीत ह्याविषयी आमचा अभ्यास नाही पण त्यांनी लग्नाआधी 'बेबीसिटींग' केले म्हणून आमच्या कपाळावर आठ्या नक्कीच येणार नाहीत.

कोण कशावरून कुणाची कशी परिक्षा करेल हे सांगता येत नाही हेच खरे!!

सहमत

आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

त्यागाचे नाटक ?

"पंतप्रधान पदाच्या त्यागाचे नाटक तर निव्वळ अप्रतिम होते" - हा त्याग होता कि नाटक याबाबतीत मतभेद असतील, मात्र इतकी हिम्मत इतर कोणत्याही राजकारण्याने दाखवलेली नाही. ज्या गोष्टीची एखाद्याने कधी कल्पनाही केली नसेल ती गोष्ट मीळाल्यावर तीचा त्याग करणे किंवा त्यागाचे नाटक करणे हे सर्वांना शक्य नसते. तेदेखील राजकारणासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात. पवारांचा अनुभव पाठीशी असताना!

बहुधा नाटकच?

सदर प्रसंग नाटकच होते असे म्हणण्यास बराच वाव आहे. कारण पंतप्रधानपद नाकारायचे असते तर एआयसीसी मध्ये जेव्हां त्यांना ठराव करुन नेत्या म्हणून निवडले, तेंव्हाच त्यांनी मनमोहन सिंग यांचे नाव का सूचित केले नाही? राष्ट्र्पती भवनात जाताना त्या उत्साहात गेल्या, परंतु तेथून परतल्यावर मात्र त्यांचा चेहरा पडला होता. तिथे नेमके काय झाले ते डॉ. अब्दुल कलाम, सोनिया गांधी व देवच जाणे.

- जयेश

जरा हे पण वाचा भाऊ...

मला काही जास्त लिहायचे नाही... पण हे खालील अनुवाद मात्र एकदा वाचून काढावे अशी विनंती...(कांग्रेस भक्तांना)...

सोनिया गाँधी को आप कितना जानते हैं? (भाग-१)

सोनिया गाँधी को आप कितना जानते हैं? (भाग-२)

सोनिया गाँधी को आप कितना जानते हैं? (भाग-३)

सोनिया गाँधी को आप कितना जानते हैं? (भाग-४)

नेहरू-गाँधी राजवंश (?)

आपला
केशचर्मोछेदनकर्ता
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर