घरांत हसरे तारे..

आमच्या सहनिवासात (सोसायटीत) एक शीघ्रकवी रहातात.कांही महिन्यांपूर्वी माधुरी दीक्षित भारतात आली तेव्हा डॉ.श्रीराम नेने,माधुरी आणि त्यांची दोन मुलें या चौघांचा सुंदर हसरा कौटुंबिक फोटो छापून आला होता. तो घेऊन ते शीघ्रकवी माझ्याकडे आले.
"आपल्याला भारतात जायचे आहे,हे माधुरीने आपल्या पतीला कसे सांगितले असेल त्यावर मी एक कविता लिहिली आहे"असे म्हणून त्यांनी ती वाचली. त्यातील लक्षात राहिलेला भाग असा:

"नेने मजसी ने,परत भरत भूमीला | राजसा प्राण तळमळला |
घरी नक्षत्रे, दोन हसरी परी प्यारी | मज सिने सृष्टी ती सारी |
त्यावीण नको, अन्य काही श्रीरामा | जातसे सिनेमाकामा |"

[सिनेमाकामा म्हणजे चित्रपटात भूमिका करण्यासाठी असेही सांगितल्याचे स्मरते.]
........तर आमच्या या सहनिवासात एकूण चौवीस(२४) सदनिका(फ्लॅट) आहेत.त्यांत २४ कुटुंबे रहातात.त्यांच्या सर्वेक्षणा वरून आढळले की:

अ) प्रत्येक कुटुंबात आई,बाबा आणि त्यांची अपत्ये आहेत.ती सर्व इथेच रहातात. कोणत्याही घरात इतर कोणीही माणसे नाहीत.
ब) इथल्या कोणत्याही दोन कुटुंबांत कोणतेही नाते नाही.
क) प्रत्येक कुटुंबात आई,बाबा आणि त्यांचे एक तरी अपत्य आहे.
ड) मुलींची संख्या मुलांच्या संख्येहून मोठी आहे.
इ)प्रत्येक मुलीला एकतरी सख्खा भाऊ आहे.

हे सर्वेक्षण विश्वासार्ह आहे.यावरून पुढील निष्कर्षांतील कोणते तर्कसंगत आहेत ते निश्चित करा.

(त)मुलांमुलींची एकूण संख्या पन्नास तरी आहेच.
(थ) मुलांमुलींची एकूण संख्या ४९ अथवा त्याहून अधिक आहे.
(द) एक तरी कुटुंब "हम दो ,हमारे दो." असे आहे.
(ध) एकही त्रिकोणी कुटुंब नाही.
(न) प्रत्येक कुटुंबात एकतरी मुलगा आहे.
(प)" मुलांची संख्या मुलींच्या संख्येहून मोठी आहे" असे एकही कुटुंब नाही.
(फ) प्रत्येक मुलाला एकतरी बहीण आहे.
(भ) सर्व रहिवाशांची संख्या (पालक+मुले) किमान ९७ आहे.
(म) बाराहून अधिक कुटुंबांत किमान दोन अपत्ये आहेत.
लेखनविषय: दुवे:

Comments

सुधारणा

--

हसरे तारे....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
अद्यपावेतो या कोड्याची पाच उत्तरे आली आहेत. त्यांत श्री.दिगम्भा आणि श्री.वाचक्नवी यांची उत्तरे पूर्णतया बरोबर आहेत.तर्कसंगत निष्कर्ष कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे त्यांनी अचूक ओळखले आहे. श्री.दिगम्भा यांनी विवरणही दिले आहे.

हसरे तारे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तो यांनी उत्तर पाठविले आहे. त्यांनी सर्व विधाने लिहून त्यांतील तर्कसंगत कोणती तर्कविसंगत कोणती हे स्पष्टपणे दाखवले आहे. ते सर्व बरोबर आहे.

 
^ वर