खरडवही.कॉम

नमस्कार,

विरंगुळा म्हणून (आणि "तात्काळ ज्ञानप्राप्तीच्या हव्यासापोटी") आम्ही उपक्रमावर येतो... पण गेले काही दिवस विशेष ("एक्सायटींग" या अर्थाने) काही चालू आहे असे वाटले नाही (अर्थात: अपवाद महाराज युयुत्सुंच्या चर्चा प्रस्तावाचा!).

म्हणून मग आज जरा खरडवह्यांवर चक्कर टाकली तर काय, उपक्रमींमधे भरपूर "वैचारीक दळणवळण" दिसले. त्यामुळे कल्पना सुचली की कदाचीत "खरडवही.कॉम" असे संकेतस्थळच जास्त जोमाने चालेल की काय? :)

आपणास काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

आमची वही

वा उत्तम आयडिया!
आमची वही वाचता वाटते येता जाता! ;))

आपला
गुंडोपंत

नाही हो!

तुमचीच नाही, आमची पण वाचतो! इतरांच्या खरडवह्या वाचायला वेळ नाही पण एकंदरीत पानेच्या पाने सर्वत्र भरलेली दिसतात म्हणून ही कल्पना सुचली!

मी पण!

इंटरॅक्टीवीटी असल्याने वाचायला मजा येते!
शिवाय माहितीपुर्णच असावे असे नियमही नाहीत! त्यामुळे आमचे व चिवडाखानाचे 'ललीत' संवादही चालू शकतात!
(कळलेच असेल की इथेच मिसळपावाचे बीज आहे!)

आपला
गुंडोपंत

येवढी एकच ?

बाबूराव उपक्रम सोडून गेल्ता पर भायर जीव लागना आलो वापीस.

काहून आलो हाये का महीत फकस्त इथल्या खरडी वाचाला.

"उपक्रमनी" काय देलं याचं एकच उत्तर म्हंजी 'खरडवही' त्यो आत्मा हाये इथला.

बाकी महीती बीहीती म्हंजी जीव नसेल मानसाचा सांगाडा.

बाबूराव :)

मग काळजी करू नका! :)

उपक्रमनी" काय देलं याचं एकच उत्तर म्हंजी 'खरडवही' त्यो आत्मा हाये इथला.

मग खरडवहीबद्दल काळजीचे कारण नाही कारण "काकाजी आत्मा अमर आहे"!

खरड

विकासराव, कल्पना उत्तम आहे. :) बाय द वे... खरडवही पेक्षा ओरडवही.कॉम बद्दल काय वाटते?

मराठीत लिहा. वापरा.

खरडवहीच ठीक वाटते

खरडवहीत खरडपट्टी काढता येते. नुसतं ओरडलं तर "रोज ओरडे त्याला कोण खरडे" असे होईल. शिवाय 'लेखी बोले उणे लागे' हा उद्देश ही साधता येतो. इथे बरळता येते, ओकता येते, खोकता येते, बोलता येते, ऐकता येते, भुंकता येते, कुंथता येते,.........

प्रकाश घाटपांडे

सही

इथे बरळता येते, ओकता येते, खोकता येते, बोलता येते, ऐकता येते, भुंकता येते, कुंथता येते,.........
हा हा हा!!!

अगदी सही!

आपला
खरडोपंत

तेच म्हणतो...

प्रतिसाद छान दिला आहे...

मराठीत लिहा. वापरा.

मस्त!

खरडवहीत खरडपट्टी काढता येते. नुसतं ओरडलं तर "रोज ओरडे त्याला कोण खरडे" असे होईल. शिवाय 'लेखी बोले उणे लागे' हा उद्देश ही साधता येतो. इथे बरळता येते, ओकता येते, खोकता येते, बोलता येते, ऐकता येते, भुंकता येते, कुंथता येते,.........

एकदम मस्त!

हं

कोणास ठावूक कि "खरडवही.कॉम" असे संकेतस्थळच जास्त जोमाने चालेल नाही? उपक्रम जोमाने चालले आहे की नाही? तुम्हाला नाही चालले असे म्हणायचे आहे काय? ;-)

आत्ताच चाणक्यरावांना ओरडवही.कॉम ही वेगळी चूल मांडावीशी वाटतीय् किंवा तिथे जास्त स्वातंत्र्य असावे / कमी संपादन व्हावे असे वाटते ????

कुठलेही संकेतस्थळ हे १००% इतर लोकांवर चालावले तर चालेलच असे नाही. बरेचवेळा स्थळचालकांनी नीट चालवले पाहीजे असे माझे मत आहे.

येथील स्थळचालकांबद्दल व त्यांच्या भावी योजनांबद्दल (२००८ -९ च्या) काही खास माहीती दिसत नाही हो, किंवा मला नीट बघता येत नाही.

बर मग विकासराव तुमचे खरडवही.कॉम कधी करायचे आम्ही "ऍड टू फेव्हरीटस्" ?

वेगळी चूल

गल्लत होते आहे. आम्ही वेगळीचुल नाही मांडलेली. आम्ही वेगळे नाव सुचवले आहे फक्त. वेगळीचुल मांडणार्‍यातले आम्ही नाही. आमच्यात एवढा कंड नाही. असो, गैर समज होउ नये म्हणून प्रतिसाद. उपक्रमरावांनी ड्रुपलच्या सहाय्याने खरडवहीची सोय केली आहे. नाहीतर ऑर्कुट आहेच ना? तिथे सुद्धा मराठी लिहिण्याला वाव आहेच. येथे सदस्य संख्या मराठीजनांच्या विचारांप्रमाणेच छोटी आहे. त्यात भांडायचा मराठी स्वभाव. तुमचं ते कार्ट ... हा एक मुद्दा. त्यामुळे सुचना करायला सगळेच पुढे. ऑर्कुटचालकांना सरकारे सांगुन सुद्धा फरक नाही पडत. आहे का कोणामध्ये येथे एवढा कंड कि ऑर्कुट सारखे दुसरे काही सुरू करून तेवढीच प्रसिद्धी आणि यश (व्यावसायिक) मिळवावे? अनेकांनी प्रयत्न केले असतील. खरतर याहू ग्रुप्स खुप पुर्वीपासून आहेत. पण आता लोकांचा ओढा ऑर्कुटकडे आहे. असो, थोडक्यात संकेतस्थळ चालक होणे आणि ते यशस्वीरित्या चालवणे या दोन वेगळ्या कुवतीच्या गोष्टी आहेत.

मराठीत लिहा. वापरा.

येथे सदस्य संख्या मराठीजनांच्या विचारांप्रमाणेच छोटी आहे.

मराठीजनांचे विचार छोटे असतात ही नवी 'माहिती' समजली. संपादन मंडळ असल्या व्यक्तव्यांची दखल घेइल का??

यात नवे काय आहे?

मराठीजनांचे विचार छोटे असतात यात नवे काय आहे? आणि यात दखल घेण्यासारखे काय आहे?
संपादन मंडळास विनंती: माझे वक्तव्य खरेच न पटल्यास उडवून टाकावे. तसेच दाखला दिल्यास उपक्रमावरील चिखलफेकीचे माझे तसेच इतरांचे प्रतिसाद/वक्तव्य/लेख सुद्धा अप्रकाशित करावे.

अवांतरः वक्तव्य या शब्दाचा "माहितीपुर्ण" अर्थ कोणी सांगु शकेल काय? तसेच लेखक/लेखन आणि वक्ता/वक्तव्य यात फरक काय? हे हि सांगावे अशी नम्र विनंती.

मराठीत लिहा. वापरा.

विचार

मराठीजनांचे विचार छोटे असतात यात नवे काय आहे?

नेमके कोणते अमराठी भाषिक मराठी माणसापेक्षा विचाराने मोठे असतात ते कळू शकतील का?

वाद घालायचाच आहे काय?

आपल्याला वाद घालायचाच आहे काय? असल्यास तसे स्पष्ट लिहा. जे लेखन/वक्तव्य पटत नाही ते कृपया सोडून द्या. अथवा वाद घालायचा असेल तर तसे सांगा. उगाच काथ्याकुट कशाला?

अवांतरः आपले एकमेकांचे प्रतिसाद हे चांगले उदाहरण आहे. पहिला मराठी लोकांचे पाहू आणि मग अमराठीकडे वळू. अमराठी माणसांची व्यवहारीक कंपूबाजी अनेकांनी अनुभवली असेलच. तसेच मराठी माणसांचा खेकड्यासारखा स्वभाव सुद्धा. हे विषय चर्चा करून पार चोथा झाले आहेत. आता आहे आपल्यात अवगुण. सर्व मराठी माणसे नसतील तशी, पण बहुसंख्य असतात हे अनुभवले आहे.

मराठीत लिहा. वापरा.

अर्थ

>>तसेच लेखक/लेखन आणि वक्ता/वक्तव्य यात फरक काय? हे हि सांगावे अशी नम्र विनंती.

जसे जमेल तसे सांगूच हो. आमचे इतर मराठीजन (ज्यांचे तुमच्यामते विचार छोटे आहेत ते) सांगतीलच आत्ता सध्या (संदर्भ - छान...)
नियमीत व नियम ह्यात (शब्दात व वापरण्यात) थोडा फरक आहे तो सांगतो. जसे नियमीत व्यायाम म्हणजे रेग्यूलर व्यायाम. व्यायामाचे नियम म्हणजे रुल्स् ऑफ व्यायाम हो.

शाब्दीक कवायती पण नितीनियमाने केल्यास वेगळी मजा येते.

जाऊ दे मी मराठी आहे ना असतील माझे विचार छोटे, तुम्हाला पटायचे नाहीत. बहूतेक अशुध्दलेखनपण ;-)

अनर्थ

येथे अर्थाच अनर्थ होतो आहे. कदाचित मुद्दाम होउनच. मुळातच त्रुटी दाखवलेल्या अनेकांना आवडत नाहीत. मग आम्ही आहेच असे म्हणून रेटले जाते. ठिक आहे. मी सुद्धा मराठीच आहे आणि माझे विचार सुद्धा छोटेच आहेत. असो, आपण हि चर्चा खुप भरकटवतो आहोत. होय ना?

मराठीत लिहा. वापरा.

खुलासा

वरील काही प्रतिसादातून असे जाणवले की काही प्रतिसादकर्त्यांचा ही उपक्रमावर अथवा येथील सभासदांवर टिका/टोमणे आहेत असा गैरसमज झाला आहे. ही चर्चा विरंगुळा नावाखाली चालू केली आहे आणि केवळ एक जाता जाता न वाचता जे दिसले (की खरडवह्या जोरात चालताहेत) , त्या वरून असेच लिहायचे सुचले इतकेच.

विरंगुळा

यशवंतरावांच्या कराडातल्या घराचं नाव विरंगुळा आहे.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

कधी -कधी !

विकासराव,
आपल्याला कल्पना भन्नाट सूचली. कधी कधी माहितीपूर्ण विचाराच्या आदान प्रदानात यांत्रिकता येते आणि मग खोटे कशास सांगावे आम्हीही उपक्रमी मित्रांच्या खरडवह्या चाळतो,मला आवडतात बॉ त्या गप्पा :) इतकी माहितीपूर्ण माहिती मिळते एकेकाच्या विचारांची आणि फूल टू मनोरंजन होते. (च्यायला पण सवय चांगली नाही राव ! दुस-याच्या घरात डोकावण्याची :) )
खरडवहीडॉट.कॉम चे आम्ही स्वागत करतो. ;)

आपला.

प्रा.नागूतात्या आढ्ये
(बटाट्याच्या चाळीतला)

घरात डोकावणे

(च्यायला पण सवय चांगली नाही राव ! दुस-याच्या घरात डोकावण्याची :) )

:-))))

तसं बघायला गेलं तर खरडवही म्हणजे घर नसून व्हरांडा किंवा मराठीत ओसरी होय. घरात म्हणजे व्यक्तिगत निरोप. काय बरोबर ना?

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

इतका शब्दशः अर्थ घेतला !

बाप रे ! इतका शब्दशः अर्थ घेणार असाल तर आमचे हालच होतील.
ओसरीत डोकावल्याच्या आनंदापेक्षा खिडकीतून डोकावण्याचा आनंद खासच असतो. ;)

अवांतर ;) तिकडे ते शुद्धलेखनवाले छळतात आणि इकडे तुम्ही ;)
माझ्या लेखनाच्या चुकांवर कोणी सट्टा खेळतंय की काय ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही छळत कोणी

ओसरीत डोकावल्याच्या आनंदापेक्षा खिडकीतून डोकावण्याचा आनंद खासच असतो. ;)

हे पण अफलातून पटलं.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

चावडी...

तसं बघायला गेलं तर खरडवही म्हणजे घर नसून व्हरांडा किंवा मराठीत ओसरी होय.

कधी कधी ती चावडी देखील वाटते! बाकी खरडवही हा प्रकार आहे मात्र खास!

तुम्ही काहीही म्हणा

चावडी, ओसरी, व्हरांडा, खिडकीतून डोकावणे.... खरडवह्या वाचायला मजा येते, उत्सुकता असते. दरवेळी वाचू ते रंजक असेलच असे नाही पण एक काहीतरी वेगळे केल्याचा भाव / भास येतो. मानसशास्त्रीय काहीतरी असावे. काय् चाललय लोकांच्यात काय् म्हणतायत ते कळावे ही तीव्र इच्छा??? लोक जरा जास्त मोकळेपणाने खरडतात म्हणून कदाचीत इतर लोक तेथे रेंगाळतात.

मी जेव्हा ऑनलाइन असतो तेव्हा बहुतेकवेळा जे सदस्य असतात त्यांच्या खरडवहीत डोकावतो. मला वाटते माझ्याकडे बराच मोकळा वेळ आहे किंवा विरंगुळा शोधतो आहे. अर्थात बरेच वेळा नुस्ति एक विंडो उधडलेली असते आपण कामात असतो.

सत्यं वदे!!!

अवांतर - एकाच लॉगीन आय.डी. ला वेगवेगळे नाव लावणे समजते (जसे आपले बाबूराव) पण लोक एकापेक्षा जास्त आय. डी. का घेतात ते अजून झेपले नाही.

एक पर्याय

ज्यांना कट्ट्यावर बसून माहितीपूर्ण नसलेल्या थोड्या पांचट गप्पा मारायच्या आहेत त्यांच्यासाठी "आपापसात" प्रकारचा रोज साफसफाई होणारा एक चर्चाप्रस्ताव सुरु करता येईल. म्हणजे इतर ठिकाणी जाऊन पाय वर करण्याची आमच्यासारख्यांना गरज भासणार नाही.

अशा पांचट व मनोरंजक गप्पा मारणे हे मानसिक संतुलनासाठी आवश्यक आहे. असे प्रामाणिकपणे वाटते.

काय?

हा हा..

म्हणजे इतर ठिकाणी जाऊन पाय वर करण्याची आमच्यासारख्यांना गरज भासणार नाही.

हा हा हि ही हु हू हे है हो हौ हं ह! :))

'पाय वर करणे' हा वाक्प्रचार आवडला! :)

अशा पांचट व मनोरंजक गप्पा मारणे हे मानसिक संतुलनासाठी आवश्यक आहे. असे प्रामाणिकपणे वाटते.

अरे हेच तर गेली तीन वर्ष कानीकपाळी ओरडून सार्‍या आंतरजालीय जगताला आम्ही सांगत आहोत, पण साला कुणी ऐकतच नाही! :)

बाकी 'आपापसात' हा शब्द वाचला आणि आमच्या पहिल्या प्रेमाच्या काही आठवणी जाग्या झाल्या.

असो...! हा थंडपणे टाकलेला सुस्कारा समजावा! :)

आपला,
(नॉस्टॅल्जिक) तात्या.

ताकद

अशा पांचट व मनोरंजक गप्पा मारणे हे मानसिक संतुलनासाठी आवश्यक आहे. असे प्रामाणिकपणे वाटते.

मला देखील. विवेकाच्या आधारे मानसिक संतुलन राखण्यात बरीच उर्जा खर्च होते, संतुलन राखण्यातच सगळी उर्जा खर्च व्हायला लागल्यावर 'आउटपुट' काय मिळणार? विवेकाच्या चौकटीत प्रतिभेची घुसमट होते.एखादा Irrational Day साजरा केल्यावर अशी ताकद येईल. [ लोक काय म्हणतील]काठावर बसुन पाण्यात पाय सोडण्या पेक्षा प्रवाहा सोबत थोड वहात ही जावे. आयुष्यावर बोलु काही मधील 'जपत किनारा शिड सोडणे नामंजूर' आठवा.[ वाहवत जाउ याची भीती] मन हे Abstract असल्याने त्याची गणितं करता येत नाहीत. Abstract Algebra ने सुद्धा. राजकारणात जशी सत्त्ता टिकवण्यात(खुर्ची सांभाळण्यात) बहुतांशी ताकद खर्च होते. मग देशाच्या विकासाला ताकदच उरत नाही. [ तात्विक चर्चा करण्यातच ताकद खर्च होते] मग कर्ते सुधारक आणि बोलते सुधारक वाद घालायला मोकळे.
प्रकाश घाटपांडे

वा

प्रतिसाद सुरेख आहे.

सुधारक! :)

[ तात्विक चर्चा करण्यातच ताकद खर्च होते] मग कर्ते सुधारक आणि बोलते सुधारक वाद घालायला मोकळे.

हा हा हा! हे मात्र मस्त आहे..:)

आपला,
तात्या आगरकर.

 
^ वर